Submitted by sneha1 on 20 February, 2022 - 20:11
नमस्कार,
आजकाल आपले वेगवेगळ्या बँकेत खाती असतात. क्रेडिट कार्ड्स असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो. तर तुम्ही हे सगळे प्रत्येक महिन्याला कसे नोंदून ठेवता? अॅप वापरता की एक्सेल वगैरे वापरता? अॅप असेल तर त्याची सुरक्षितता कशी पाहता?
या विषयाबद्दल अजूनही काही माहिती असेल तर सांगा प्लीज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी रिटर्न्स फाइल करायच्या आधी
मी रिटर्न्स फाइल करायच्या आधी फंड फ्लो स्टेटमेंट बनवतो.
त्यावरून कशाकशावर किती खर्च झाला हे बघायचा प्रयत्न केला होता.
नेहमीच्या खर्चाचे आकडे कायम असतात. कधी व्हाइट गुड घेतलं किंवा आजारपण आलं तर त्या महिन्यात क्रेडिट कार्डाचं बिल मोठं दिसतं.
क्रेडिट कार्डाच्या स्टेटमेंटचं असं विश्लेषण करायचं तर आणखी वेळ लागेल आणि ते दर महिन्याला करावं लागेल.
मी हे एक्सेलमध्ये करतो आणि ढोबळ आकडेच बघतो. त्यावरून आपण अंथरुणाच्या बाहेर पाय पस रत नाही ना, पांघरून नीट पुरेल ना एवढंच तपासून बघतो.
माझी बहुतेक गुंतवणूक म्युच्यल फंड मध्ये आहे. त्याची एक्सेल फाइल अपडेटेड असते. व्हॅल्यु रिसर्च ऑनला इ नवर अकाउंट ओपन करून तिथेही फीड केलं आहे. त्यामुळे एका दृष्टिक्षेपात ताजी स्थिती कळते.
शेअर्समध्ये पोजिशन ट्रेडिंग करतो. त्याचाही डेटा एक्सेलमध्ये ठेवतो.
हे वरचं दोन्ही फंड फ्लो सोबत क्रॉस चेक करतो.
गेल्या दोन वर्षांपासून
गेल्या दोन वर्षांपासून सगळ्याचा हिशोब ठेवायला लागले आहे आणि त्यासाठी मी एक्सेल वापरते.. हि एक्सेल नवऱयाबरोबर शेअर केलेली आहे त्यामुळे आमच्यापैकी कोणीही एक्सेल मधे काही चेंजेस केले की एकमेकांना अपडेट्सही मिळतात.. एक्सेल चा फॅार्मॅट महत्वाचा.. कॅल्कुलेशनसाठी कोणकोणते फॅार्मुलाज वापरणार ते ही महत्वाचं
माझं सगळं सी ए बघतात. शिवाय
मी काहीच बघत नाही.
कुत्रे हिशेब ठेवत असेल कदाचित शी सीम्स रिस्पॉ न्सिबल इनफ. हलके घ्या दिवे घ्या. हा विनोद आहे.
मी कोणे एके काळी एक एक्सेल
मी कोणे एके काळी एक एक्सेल मेंटेन केली होती.
आता काहीच करत नाही. कोणत्या गोष्टीवर किती खर्च करतो याचा एक ढोबळ अंदाज आहे.
मार्केटमधे ॲक्टिव्ह असल्याने ईक्विटी मधील गुंतवणूकीवर रोजच लक्ष असते.
अँड्रॉइड वर असाल तर walnut ॲप
अँड्रॉइड वर असाल तर walnut ॲप चेक करा.
तुमच्या sms मधून खर्चाचे आकडे उचलून त्यांना categorize करतं.
अदमासे.
अदमासे.
जमाखर्च कधीच लिहिला नाही.नाही
जमाखर्च कधीच लिहिला नाही.नाही म्हणायला एकदा मैत्रिणीच्या धाकाने म्हणा की सुरसुरी म्हणा, हिशोब मांडला होता.नेमका त्याच महिन्यात जास्त खर्च झाला होता.8- १० दिवस खर्च मांडला.नंतर सोडून दिला.वायफळ खर्च होत नव्हता.
काही वर्षांपूर्वी गुंतवणूक लिहून ठेवली होती.आता फक्त शेयरचे आणि म्युच्यअल फंडस् चे डिटेल्स फिड करून ठेवलेत.अधूनमधून लक्ष असते.
बाकी जसे लागतील तसे पैसे वापरते.
एक्सेल लाख दुखों की एक दवा
एक्सेल लाख दुखों की एक दवा आहे. त्यासाठी बेसिक नॉलेज नसेल, आळस असेल तर खंडीभर ॲप आहेत.
करत नाही.
करत नाही.
माझ्या ओळखीचा एक मोठ्ठा माणूस
माझ्या ओळखीचा एक मोठ्ठा माणूस म्हणतो:
आली ती जमा, झाला तो खर्च आणि राहिले ते कर्ज (:दिवस:)
सर्वकाही EXCEL.
सर्वकाही EXCEL / मॅक नंबर मधे.
त्या आधी कागद-पेन वापरायचो, शक्यतो दुसर्या बाजूने कोरा असलेला वापरलेला कागद वापरतो. आजही वापरतो.
प्रत्येक व्यावहाराच्या (घराचा हप्ता, घराचा टॅक्स, वीजेचे, पाण्याचे बिल, विमा) तारखा ठरलेल्या असतात. शेवटचा बॅलन्स +ve मधे आहे एव्हढे बघायचे.
cheque account मधे बॅलन्स $५० किंवा $१० पर्यंत घसरल्यावर बायको ' अरे काय चालले आहे हे ? ' असे ओरडते. जास्त पैसे शिल्लक असणे म्हणजे व्यावहाराचे ज्ञान नाही असे मी समजतो. चेकींग मधे कमीत-कमी पैसे शिल्लक ठेवणे आणि कुठलेही transaction नाकारले न जाणे अशी कसरत यात एक आनंद असतो.
एखाद्या गोष्टीवरच्या खर्चावर ( जसे गाडीचे maintenance/ fuel, प्रवास किंवा हॉटेल) बारिक लक्ष ठेवायचे असल्यास त्यासाठी वेगळे credit कार्ड वापरतो. हवे असेल तेव्हा, महिना/ वर्षाचा सगळा अंदाज एकत्रच बघता येतो. त्यासाठी काही खास वेगळे परिश्रम घ्यावे लागत नाही. आजकाल विनासायास अनेक credit card मिळतात.
बॅन्केच्या वेबसाईट वर टूल्स
बॅन्केच्या वेबसाईट वर टूल्स आहेत. चांगले आहेत. बजेट वॉच , स्पेन्डींग रिपोर्ट वैगरे. वेल्स फार्गो बन्केत वापरायचा प्रयत्न केलेला पण मग कंटाळा आला..
चांगला चर्चा धागा.
चांगला चर्चा धागा.
मी monthly expenses लिहायला
मी monthly expenses लिहायला google sheets वापरते.. प्रत्येक महिन्यासाठी एक टॅब.. त्यात एक categories चा column बनवलाय (Categories - household, grocery, recurring expenses, School, 401k, one time/special income etc.), प्रत्येक कॅटेगरीत खर्च टाकल्यावर शेवटी total expenses, current balance, monthly saving कॅलक्युलेट करायला फॅार्मुलाज टाकलेत.. त्याबरोबर across the months कॅल्क्युलेट करायला monthly average, average monthly saving पण कॅलक्युलेट करते.
Google sheet आम्हा दोघांत share केली आहे त्यामुळे मी काही खर्च टाकला की त्यालाही updates मिळतात
मी ओल्ड फॅशन मेथड वापरतो.
मी ओल्ड फॅशन मेथड वापरतो. पगार झाला की सगळा बायकोच्या हाती देणे. आता सॅलरी बँकेत जमा होते तर तिला माझ्या सगळ्या अकाऊंटचे पासवर्ड माहीत आहेत. ती लगेच पगार आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करते आणि तिला जसे हवे तसे ती खर्च करते. जेणेकरून माझा जमाखर्च हिशोब ठेवायचे टेंशन निघून जाते
ती सुद्धा हिशोब वगैरे काही ठेवत नाही. पैसे कमी पडले की एकमेकांच्या सासू सासर्यांकडून उधार घेतो. जास्त झाले की परत करतो. त्यामुळे पैसे घरातल्या घरात फिरत राहतात. कर्जावर व्याजाची भानगड राहत नाही.
एक्सेल बनवली आहे.त्यात ऑनलाईन
एक्सेल बनवली आहे.त्यात ऑनलाईन शॉपिंग, फूड्,ग्रोसरी,मेडिकल्,चॅरीटी, मंथली बिल्स अश्या प्रकारानुसार खर्च लिहीता येतो. तारीख, खर्च्,मोड ऑफ पेमेंट(कॅश्/ऑनलाईन्/ऑटो डेबिट). पाय चार्ट बनून त्यात एकेका कॅटेगरी खर्चाचे त्या त्या महिन्याचे प्रमाण दिसते.
प्रत्येक महिन्याची एक शीट. शेवटी एका शीट मध्ये दर महिन्याचे असा पूर्ण वर्षाचा त्या कॅटेगरी चा ग्राफ बनतो.
बरेचदा विसरते लिहायला. जानेवारी चे १५ दिवस पूर्ण विसरले मग फेब मध्ये इमानदारीत चालू केले.
बाकी गोष्टी मायकॅम्स वरच्या यादीत आहेत.
ICICI च्या app मध्ये छान
ICICI च्या app मध्ये छान reports बघता येतात. category wise खर्च...
बाकी planning साठी excel बेस्ट..
अमा++++११११११११
अमा++++११११११११
मी पण हिशेब ठेवत नाही... जसं येतंय तसं जातंय... खर्च करुन उरेल ते सेविंग अकाउंटला पडतंय.. या असल्या वागण्याला वडील रागावले म्हणुन त्यांच्या सल्ल्याने १ सीप सुरू केली जी सद्ध्या दुप्पट फुगली आहे... त्यामुळे अजुनच बोलणी बसत आहेत. जॉबला लागला तेव्हा पासून सुरू केलं असतं तर आतापर्यंत करोडपती झाला असता म्हणुन..!
जाऊद्या... एवढं काय त्यात. करोडपती झालो असतो तरी माबो वर यायचं सोडलं नसतं मी.
जॉबला लागला तेव्हा पासून सुरू
जॉबला लागला तेव्हा पासून सुरू केलं असतं तर आतापर्यंत करोडपती झाला असता म्हणुन..!
>>>>
सेव्हिंग करून करोडपती बनण्याऐवजी जास्त पैसे कमावून बनायला हवे. पोटाला चिमटा घेऊन करोडपती बनून काय फायदा
सेव्हिंग करून करोडपती
सेव्हिंग करून करोडपती बनण्याऐवजी जास्त पैसे कमावून बनायला हवे. पोटाला चिमटा घेऊन करोडपती बनून काय फायदा >>
सेविंग करावं लागतं असं लिहिलं नाहीये त्यानी.. आमच्याकडे तर आपोआप होत.
रुपया मिळाला तर आठ आणे खर्च करावेत (विचार न करता) , १० रू मिळाले तर ५-६ रुपये.
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
जे मिळतात त्यातले काहीतरी बाजूला पडलेच पाहिजेत, असे आपोआप होते. वाढदिवस मित्रमंडळींना इमेजिका laa नेऊन पण करता येतो आणि घरी भेळ करून पण. शेवटी मजा ज्यांच्याबरोबर आनंद मिळतो त्यांच्याबरोबर असण्यात आहे, वस्तूंच्या असण्यात नाही.
५०० रुपयात पण मजा आणि ५०००० रू मध्ये पण. परिस्थितीप्रमाणे.
अगदी हातातोंडाशी गाठ असलेल्यांची गोष्ट कदाचित वेगळी असेल...
अर्थातच पैसा अनेक त्रास वाचवतो आणि म्हणूनच अडीनडीकराता तो वाचवावाच (डिफॉल्ट सेटिंग)
पोटाला चिमटा घेऊन करोडपती
पोटाला चिमटा घेऊन करोडपती बनून काय फायदा Happy>>> पोटाला चिमटा कुठे दिसला? नाही रे ऋन्मेष त्यांनी तसं नाही लिहीलय.
नानबा +१११
डिजे तुम्ही कामून पोटाला
डिजे तुम्ही कामून पोटाला चिमटा घेऊन राहीलेत, सरांना त्रास होतोय त्याचा, घेऊ नका बरे त्यांच्या पोटाला चिमटा
पोटाला चिमटाचा शब्दशः कश्याला
पोटाला चिमटाचा शब्दशः कश्याला अर्थ घेत आहात. पण एकदा का जमाखर्च मांडून सेव्हिंग करायला सुरुवात केली की मग आपल्याही नकळत हिशोबी जगणे सुरू होते असे मला वाटते. जे अति उधळपट्टी करणारे आहे त्यांनी आपली उधळपट्टी कंट्रोल करायला असे जमाखर्च मांडावा जेणेकरून त्यांना जाणीव होईल. याऊलट जे मुळातच पैसे मोजून मापून वापरणारे आहेत त्यांनी खर्च मांडू नये असे मला वाटते. उगाच अजून काटकसरीच्या नादाला लागतील.
रुपया मिळाला तर आठ आणे खर्च
रुपया मिळाला तर आठ आणे खर्च करावेत (विचार न करता) , १० रू मिळाले तर ५-६ रुपये.
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
>>>>>
नानबा,
रुपयात आठ आणे, १० रुपयात ५-६, अंथरूण पाहून पाय पसरावे अशी वाक्येही टाकता आणि त्यातच कंसात विचार न करताही लिहीता
सर, आता दिसतेय ना? नाहीतर
सर, आता दिसतेय ना? नाहीतर टंकलेखनासाठी सहायक ठेवा.
छान माहिती मिळते आहे, धन्यवाद
छान माहिती मिळते आहे, धन्यवाद सगळ्यांना. इथे कम्युनिटी कॉलेज मधला एक बेसिक कोर्स करते आहे सध्या, फायनान्शिअल लिटरसी नावाचा. तर त्याच्यामधे दिलेली असाईनमेंट ही, की सगळ्या कॅटॅगरीज मधे तुमचे पैसे किती परसेंट होतात ते बघा, आणि किती असायला हवेत ते पण बघा. त्यामुळे ही सगळी कसरत करायला घेतली.
ह्याच्याआधी पण मी हे केले होते मधे. पण अॅप मधे सगळी माहिती देणे अजून करावेसे वाटत नाही. आणि एक्सेल मधे त्यादिवशी नाही घातले तर नंतर त्रास होतो. म्हणजे काय, आता एका दुकानात आपण ग्रोसरी, कपडे आणि बाकी कॅटॅगरीज एकाच वेळी घेतो आणि मग ते सगळे बिलातून वेगळे करून घालायचा कंटाळा येतो. मग थांबले ते
You are asking for pretty
You are asking for pretty sensitive personal financial data of strangers. Habits etc can be fed to an ai machine. What next
मग ते सगळे बिलातून वेगळे करून
मग ते सगळे बिलातून वेगळे करून घालायचा कंटाळा येतो. मग थांबले ते >> जरा द्राविडी प्राणायाम सुचवते - सेल्फ चेक-आउट करायचं. वस्तूंच्या हव्या तश्या वेगवेगळ्या पावत्या घ्यायच्या. दुकानात ५-७ मिनीटे जास्त जातील पण वेगवेगळ्याच पावत्या असतील "गणित" करायची कटकट नि कंटाळा नाही.
या सर्व जमाखर्चाचा हिशेब
या सर्व जमाखर्चाचा हिशेब ठेवण्याचा नक्की फायदा काय असतो?
Category / वर्गवारी करायची झाली तर ती थोडी ढोबळ केली तर काम सोपे होईल. त्यासाठी अकाउंटिंगची तत्त्वे वापरणे गरजेचं आहे. अन्यथा खटाटोप ठरेल.
परंतु, मध्यमवर्गी-मध्यममार्गी
परंतु, मध्यमवर्गी-मध्यममार्गी कुटुंबात जी सवय लागते ते धनुडी अन नानबांनी बरोब्बर अधोरेखित केली आहे. आशुचँप म्हणतात तसं मी सरांच्या पोटाला चिमटा काढणार नाही.. पोटाला चिमटा नावाचा एक धागा निघु शकतो हे मात्र नक्की सुचवेन..!!
सर, आता दिसतेय ना? नाहीतर टंकलेखनासाठी सहायक ठेवा.>>
Pages