तुम्ही महिन्याचा जमा खर्च कसा मेन्टेन करता?

Submitted by sneha1 on 20 February, 2022 - 20:11

नमस्कार,
आजकाल आपले वेगवेगळ्या बँकेत खाती असतात. क्रेडिट कार्ड्स असतात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण खर्च करतो, कुठे गुंतवणूक करतो. तर तुम्ही हे सगळे प्रत्येक महिन्याला कसे नोंदून ठेवता? अ‍ॅप वापरता की एक्सेल वगैरे वापरता? अ‍ॅप असेल तर त्याची सुरक्षितता कशी पाहता?
या विषयाबद्दल अजूनही काही माहिती असेल तर सांगा प्लीज.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तीन चार categories पुरेत.
सर्व बिलांची बेरीज मारा आणि त्यास A - आवश्यक खर्च म्हणू. दूध भाजी,फळे
B -करमणूक mobile recharge, Ott dth , wifi,subscription, cinema ,
C -घरभाडे,वीज,
D -गुंतवणूक .
E - नवीन वस्तू खरेदी टीवी,फ्रीज,कार,टूविलर,मोबाईल, लापटॉप इत्यादी.
F - vacations,trip,

A. मधून B,C,D,E ,F वेगळे काढल्यावर निव्वळ A राहतो.

महिन्यावारी काढण्याचा उपयोग नाही. कारण काही खर्च हे आगावू तीन,सहा महिन्याचे एकदम असतात. तर बारा महिन्यांनी टोटल आढावा घ्यावा आणि इन्कमशी तुलना करावी. गुंतवणूक D हा खर्च नसतो पण क्याश कमी होत असते.
एकेका वर्षाची तुलना दुसऱ्या वर्षाशी करावी.

F - vacations,trip,>> हे शक्य असल्यास तरुण / मध्यम वयात करावे. ६० नंतर ठेवु नये. माणसाचा काय भरवसा नाही साठी नंतर.

प्रत्येकाची तर्‍हा निराळी. प्रत्येकाची गरज वेगळी. उत्पन्न आणि खर्च वेगळे. जबाबदार्‍या वेगळ्या...

vacations,trip,

हातपाय धड असतानाच जमेल तेवढे करावे हे बरोबर. नंतर पैसे गाठीशी असूनही चढउतार,चाल होत नसते. पहिला उत्साह राहात नाही.

मला वाटतं Excel/sheet मध्ये A मधून B,C,D,E,F वेगळे काढता येईल फावल्या वेळी. आवक वाढत असेल तर संशोधनाची गरज नसते. पण कमी झाली तर कोणत्या category मधून काय उडवले तर किती रकमेचा फरक होईल हे शोधायला सोपे पडेल.

एका व्यक्तिच्या आढाव्याचा दुसऱ्याशी तुलना करण्यात अर्थ नाही. आपले आपल्याशीच तोलायला हवे.

एक दोन अधिक category वाढवणे शक्य आहे. कपडे, शिक्षण वगैरे.

करमणुकीत घरातल्या सर्वांचीच एकत्र ठेवणे योग्य ठरेल.

मी तीन वर्षापूर्वी जॉब मधून बिझिनेस मध्ये शिफ्ट होताना आपला महिन्याचा/वर्षाचा खर्च किती होतो हे एक्सेल शीटमध्ये लिहुन काढले होते. आणि तो खरेच तेवढा होतो का हे दर महिन्याला ऍक्च्युअल खर्च लिहुन एक वर्षाने ताडून पहाणार होतो. पण......

असे फार कठीण नाही, शिस्त तेवढी हवी जी पाळणे महा कठीण आहे. त्यात बायकोला अजिबात आवडत नाही हिशेब ठेवायला, ती पण माझ्यासारखी आरंभशूर एकदा तिच्या वडिलांकडुन कडुन स्फूर्ती तिने आठ-दहा दिवस लिहिला खर्च, स्वतः केलेला, मी केलेला मला विचारून.

ऑप्शन्स ट्रेडिंग करतो ते डिटेल्स मात्र रोजच्या रोज एक्सेल शीट मध्ये न चुकता लिहितो. त्यातच दुसरी खर्चाची शीट ठेवून महिन्याचा जमाखर्च लिहिता येईल.
दिनांक, कॅटेगरी, फ्रिक्वेन्सी (0, M, Y) , अमाउंट सुरवातीला एवढे कॉलम्स केली तरी पुरे असे वाटते. मग कॅटेगरीज फाईन ट्यून करता येतील.
बघु होईल का.

सर्व खर्च जर क्रेडीट कार्डाने करायची सवय ठेवली (आणि वेळेत फेडण्याची) तर स्पेन्ड अ‍ॅनालिसीस पण मिळते. नेटबँकींग करत असाल तर बँकेच्या अ‍ॅप मधे असते सुविधा. स्टेट बँकेच्या यो नंबर मधे लगेच मिळते. तिथेच महीन्याची सर्व बिलं भरण्याची पण सुविधा आहे.

@रुंमेश - आपण आपल्या आमदनीच्या हिशोबाने खर्च करतोय तोपर्यंत विचार करायची गरज नाही.
त्यापेक्षा जास्त खर्च म्हणजे विचार करून बाजूला टाकायची गरज आहे - असे मला वाटते.

वरच्या काही प्रतिसाद दा मधले आंग्ल भाषेतील शब्द मोजावेत, त्यालाही प्र तिशब्द सुचवा वेत ही नम्र विनंती Happy

म्हणजे तुम्हाला भाषा शुद्धीकरण करण्यात रस आहे हे सिद्ध होईल.
नाहीतर troling वाटेल (ह्यालाही मराठी प्रतिशब्द सुचवा)

"भाषा शुद्धीकरण" करण्यात मला रस नाही आणि व्यक्तिशः तुमच्याशी काही वैरही नाही. पण जर काही शब्द खटकले तर मी बऱ्याचदा त्याला पर्याय सुचवतो. तुम्हाला पटले तर वापरा, नाही तर सोडून द्या. आग्रह अजिबात नाही.

असो, आता मूळ मुद्द्याबद्दल. मी उत्पन्नातून नेहमी प्रथम बचत करत असे आणि मग उरलेल्या पैशातून खर्च करत असे. माझे उत्पन्न माझ्या खर्चापेक्षा बरेच जास्त असल्याने, बजेट हे मुख्यत: कॅशफ्लो बघण्यासाठी लागत असे म्हणजे एकदम मोठा खर्च कधी येणार आहे ते समजण्यासाठी. (उदा. वर्षाचा इन्शुरन्स भरणे, प्रॉपर्टी टॅक्स भरणे, प्रवासाचा बेत असेल तर तो खर्च वगैरे).

बजेटमध्ये मी साधारण पुढील बाबींकडे बघतो.
१. फिक्स्ड खर्च (हे करावेच लागतात):
a. घरभाडे किंवा कर्जाचा हप्ता (कर्ज असल्यास)
b. वीज, पाणी, गॅस, फोन, इंटरनेट
c. गाडीचा हप्ता (कर्ज असल्यास), इंधन खर्च
d. भाजीपाला, वाणसामान इ.
२. ऐच्छिक खर्च:
a. इतर खरेदी
b. बाहेर खाणे
c. Gift वगैरे

फिक्स्ड खर्च अंदाजानुसार झाले तर सर्व ठीकठाक आहे असे समजावे. त्यासाठी मी ईमनी ॲडवायजर यांचे ॲप वापरतो.

>>आता एका दुकानात आपण ग्रोसरी, कपडे आणि बाकी कॅटॅगरीज एकाच वेळी घेतो आणि मग ते सगळे बिलातून वेगळे करून घालायचा कंटाळा येतो. मग थांबले ते>> आजकाल बरीचशी क्रेडीट कार्डस हे सगळे वेगवेगळ्या गटात घालून खर्चाचा अहवाल देतात. अगदी रंगित पाय चार्ट वगैरे असतो. आपल्या अकाउंटला लॉग इन करुन स्पेंडिंग रिपोर्ट बघणे आणि एक्सेल / अ‍ॅप मधे नोंद करणे एवढेच काम रहाते. नेहमीच्या खर्चाचा अंदाज ३-४ महिन्यात येतो. सिझनल खर्चाचा अंदाज वर्षभरात येतो. एकदा अंदाज आला की आवक, लिविंग एक्सस्पेन्सेस, सेविंग-इमरजन्सी फंड, सेविंग-गुंतवणूक , सेविंग- मोठी हौसमौज/खरेदी, टॅक्सेस याचा ताळमेळ बसतोय ना हे अधुन मधुन बघितले की झाले.

Gift वगैरे>> भेटवस्तू वगैरे.
माफ करा - इथेच मराठी वरुन त्रोल करणारे अनेक जण आहेत.
तुम्ही तसे नाही हे गृहीत धरते , पण आमदनी शब्द खटकला, तस तुमच्या पुढच्याच पोस्ट मध्ये अनेक इंग्रजी शब्द वापरलेत तुम्ही मराठीत. तेही चालू नयेत असे वाटते.

माझ्याकडूनही वैयक्तिक काही नाही.
घरामध्येही आम्ही शुद्ध मराठी बोलतो. मुलांनाही जाणूनबुजून मराठी शाळेत घातलं आहे आणि त्यांना मराठीचा ( जाज्वल्य! Lol ) अभिमान आहे. शुद्ध बोलतात.
माझ्या पोस्ट मधला एक हिंदी शब्द खटकला आणि तुम्ही सांगितलत, जे ठीक आहे ( सहसा आमदनी हा शब्दा आठवतही नाही , अचानक वापरला गेला आज.)
पण त्यानंतर स्वतः: अनेक शब्द इंग्रजी वापरणे मला दुट्टपी वाटले.

ह्या विषयावर माझ्याकडून शेवटचे पोस्ट.

<< त्यानंतर स्वतः: अनेक शब्द इंग्रजी वापरणे मला दुट्टपी दुटप्पी वाटले. >>
सहमत आहे. बजेट, कॅशफ्लो, इन्शुरन्स, प्रॉपर्टी टॅक्स, फिक्स्ड खर्च, इंटरनेट, Gift या ऐवजी अर्थसंकल्प, रोख प्रवाह, विमा, मालमत्ता कर, स्थिर खर्च, आंतरजाल, भेटवस्तू हे शब्द कृपया वाचावेत.

दुटप्पी वाटले>> धन्यवाद.. माझा शब्द सुधारून वाक्य पुन्हा लिहिलत, तसच स्वतः:च न लिहिता "वाचावेत" म्हणालात ह्यावरून "दुसऱ्याचा डोळ्यातलं कुसळ दिसत, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही", "आपला तो बाब्या, दुसऱ्याच ते कार्ट.." वगैरे म्हणी आठवलय्या..

आता आठवल्या लिहिलेलं वर ते कीबोर्ड ने आठवल्या ... आपल आठवालय्या आपोआप केलं त्याबद्दल माफीनामा. आपण ते "आठवल्या" समजून वाचालच, ह्याची खात्री वाटते! Light 1

ही खरीखुरी शेवटची पोस्ट! Lol

माफ करा - इथेच मराठी वरुन त्रोल करणारे अनेक जण आहेत.
नवीन Submitted by नानबा on 24 February, 2022 - 07:56
>>
कोण आहेत ते? अलिकडील काही उदाहरण?
ईथे म्हणजे मराठी वेबसाईटवर मराठीचा आग्रह नाही धरायचा मग कुठे बीबीसी ईग्लिश साईटवर धरायचा का? तिथे परत म्हणाल ही इंग्लिश बातम्यांची वेबसाईट आहे इथे मराठी कशाला लादता म्हणुन?
नक्की कुठे मराठीचा आग्रह धरायचा याचे ठोकताळे काय आहेत?

पुरे की आता.
>>>
+७८६
कोणीतरी मराठी भाषा दिनाच्या मुहुर्तावर या मराठीच्या हट्टावर नवीन धागा काढा आणि ईथे पुढे चला

मी पण कधी लिहीत नाही जमा खर्च पण अर्थात काय चाललंय म्हणजे आर्थिक स्थितीचा अंदाज असतोच.

एखादा मोठा खर्च जसे की मोठी ट्रिप, लग्न, घर दुरुस्ती वैगेरे असेल तर त्याच साधारण बजेट तयार असते , पहिल्यांदा असा खर्च तपशीलवार लिहिला जातो पण एकदा का अंदाज आला सगळं आटोक्यातलं आहे की मग नाही लिहिला जात.

मराठीच्या जाज्वल्य अभिमानासाठी अभिनंदन आणि हल्ली इथे निव्वळ मराठीत नियमीत टंकलेखन सुरू केल्याबद्दल आभारी आहे.

<< माफी नामा उर्दू शब्द आहे. जस्ट म्हणिंग. >> Rofl

धागा आता महिन्याचा खर्च मराठीत कसा लिहायचा याकडे वळला आहे.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!

Excel sheet
गेल्या ७ वर्षांचा हिशोब लिहिलेला आहे
त्याचं data analysis करीन म्हणते

Pages