क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मा परत फेल बॅटिंग मध्ये...
>>>
परत फेल नाही म्हणता येणार. आपल्या त्याच्याकडून अपेक्षा जास्त आहेत.
पहिल्या सामन्यात त्यानेच धुलाई करून सामना सेट केला होता.
त्या आधीच्या न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिलेल्या २०-२० मालिकेत तो तिन्ही सामन्यात खेळलेला आणि मालिकावीर होता.

या सामन्या आधीचे २०-२० चे ५ सामने त्याचा स्कोअर असा होता..
४८, ५५, ५६, ४०, १९ ...

बाकी या मालिकेत शर्माच्या कॅचेस जबरदस्त होत्या..

बाकीचे लोकं कॅचेस सोडून सामन्यात टेंशन देत होते.. शर्मा जबरदस्त कॅचेस पकडून एक्जाम्पल सेट करत होता Happy

त्यानी थोका पत्करून व विकेट गेल्याची पर्वा न करतां आडवी- तिडवी फटकेबाजी करायलाच हवी होती. > भाऊ अननुभवी संघ आहे . . बिशप इंग्लंद सिरीजपस्सून म्हणतोय कि ह्या तरुण संघाला एकत्र सामने खेळायची गरज आहे. प्रत्येक जण वैयक्तिकरित्या खेळतो पण संघ म्हणून अजून एकत्र घडी बसलेली नाही.

स्वरुप, एकदम थयथयाट म्हणण्यासारखे मला काही वाटले नाही. त्याने त्याची बाजू मांडली आहे एव्हढेच. तू नक्की कुठे मुलाखत वाचली माहित नाही पण क्रिकैंफोवरची मूळ मुलाखत नि त्याचे स्निपेट्स घेऊन बनवल्या गेलेल्या क्लिक बेट बातम्या ह्यात फरक आहे नक्कीच. साहाच्या बोलण्यात पॉईंट आहे. (मला हे ही मान्य आहे कि द्रविड नि सिलेक्टर ने घेतलेला निर्णय चुकिचा म्हणता येणार नाही) पण पंत आल्यापासून मिळालेल्या लिमिटेड संधी मधे साहा कधी कमी पडला नाहिये . साहाच्या किपीम्ग मुळे सामना गमावला असे कधी आठवतेय का ? पंत नि धोनी जनरेशनल बॅटींग टॅलेंट आहेत म्हणून त्याच्याशी तुलना करून ऑल्सो रन म्हणणे थोडे जास्त होत नाही का ? निव्वळ किपीम्ग ह्या क्रायटेरिया वर पंत साहाला हटवू शकला असता का ह्याचे उत्तर काय असणार. ' फिटनेस नि स्किल हे कारण नाही' हे कोच नि सिलेक्टर स्वतःच सांगत आहेत तसे असताना निव्वळ वय हा फॅक्टर देऊन त्याला कायमची संधी नाकारणे त्याच्या बाजूने बघता अन फेअर वाटले तर त्यात चुकीचे कसे रे ? तू चेतन शर्मा ने साहा ला 'तुझ्यावर कायमची काट मारतो आहे' सांगून दोन दिवसांपूर्वी लंका टीम जाहिर करताना 'ह्या सिरीजसाठी चार जणांना ब्रेक दिला आहे' असे म्हणणे ह्याबद्दल काय म्हणशील ? ह्याउलट साहा ने संघात असेतो तोंड उघडले नाही नि डावला गेल्यावरच तोंड उघडले आहे हे लक्षात घे, ह्या आधी तो कधीही काही काँट्रोव्ह्रशियल बोलळ्ल्याचे - वागल्याचे आठवतेय का ?

अव्यावसायिकपणाची कमाल खरी गांगूलीची आहे - टीम सिलेक्शन हा त्याचा प्रांत नाही. कोहली प्रकरणानंतर हा दुसरा प्रसंग ज्यात त्याने टीम सिलेक्शन मधे इंटरफियर करू शकतो असे सुतोवाच केले आहे.

अहो असामी ते शर्मा गावस्कर मंडळी कोहलीबद्दल असेच सकारात्मक बोलणार. पण माझी पोस्ट काही कोहलीपर्यंत पोहोचणार नसल्याने मला रोखठोक बोलायला हरकत नाही. > > सर, तुमची पोस्ट कोणापर्यंत पोहोचते कि नाही ह्यावर पोस्ट काय करायची हे ठरवता होय आपण. आले लक्षात 'तुमच्या पोस्ट्स का असतात' नि 'एव्हढ्या का असतात' ते . चालू दे तुमचे.

गांगुली माझ्या फार आवडीचा होता, सचिनपेक्षाही जास्त. बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावरही कमालीचा आनंद झाला. सुरुवातीचे काही निर्णय असे घेतले की दादागिरी सुरू झाली म्हणत सुखावलोही. पण या कोहली प्रकरणात खरेच वाईट राजकारण करतोय असे वाटतेय. क्रिकेटप्रेमींमध्येही तीच चर्चा आहे. पर्सनली मला लिमिटेड फॉर्मेटमध्ये शर्मा कर्णधार झाला हे आवडले आणि तसेच व्हावेसे वाटत होते. पण तरीही कोहलीबाबत जे चालूय वा त्याला जशी वागणूक मिळतेय ते पटत नाहीये. कसोटीत तर त्यानेच कर्णधार राहायला हवे होते.

फुल्ल टाईम कप्तान झाल्यापासून शर्माचा ऑल फॉर्मेट मिळून सलग नववा विजय. ३ व्हाईटवॉश सलग.

२०-२० मध्ये कप्तान म्हणून शर्माचा सलग नववा विजय.

२०-२० फॉर्मेटमध्ये शर्माचा ओवरऑल चौथा व्हाईटवॉश. ते देखील केवळ ६ द्विपक्षीय मालिकांत.
आयपीएल+चॅम्पियन ट्रॉफी मध्ये १० स्पर्धात ६ विजेता यासारखाच भन्नाट रेकॉर्ड आहे हा त्याचा. ईटरनॅशनलमध्ये आहे म्हणून विशेष कौतुक.

२०-२० मध्ये प्रतिस्पर्ध्याला व्हाईटवॉश देणारे कर्णधार
शर्मा ४
कोहली २
धोनी १

२०-२० मध्ये २५ सामन्यात कप्तानी करताना शर्माने २१ विजय मिळवले आहेत.

तुर्तास कप्तानीचा ड्रीम रन चालू आहे. आगे आगे देखते है होता है क्या Happy

भारतीय संघाने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थान तब्बल ६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळवले आहे. यापूर्वी भारताने एमएस धोनी याच्या (MS Dhoni) नेतृत्त्वाखाली असा कारनामा केला होता. त्यावेळी धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ १२ फेब्रुवारी ते ३ मे २०१६ या दरम्यान टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यानंतर आता ६ वर्षांनी रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी२० क्रमवारीत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात मिळवलेला विजय हा रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून मायदेशात मिळवलेला १४ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता. त्यामुळे तो मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने याबाबतीत विराट कोहली आणि एमएस धोनीला मागे टाकले आहे. विराटने भारतात १३ आणि धोनीने १० विजय कर्णधार म्हणून मिळवले होते. त्याचबरोबर रोहितचा हा कर्णधार म्हणून सलग ९ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय देखील ठरला.

रविवारी रणजी ट्रॉफी ची पहिली राऊंड संपली.

महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ सगळ्यांनीच चांगला परफॉर्मन्स दाखवला.

महाराष्ट्राने आसामला इंनिंग्स डिफेट दिला. महाराष्ट्र च्या ओपनिंग बॅट्समन पवन शहाने पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक मारले तर फिरकी गोलंदाज सत्यजित bacchav ने दुसऱ्या इंनिंग मध्ये सात बळी घेऊन सामना जिंकवून दिला.

मुंबई चा विजय थोडक्यात हुकला. सौराष्ट्र ह्या match मध्ये येताना हॅन्ड्स डाउन favorites होते, पण मुंबई ने त्यांना सगळ्याच बाबतीत outplay केलं. शेवटच्या सेशन मध्ये मात्र मुंबई त्यांची लास्ट विकेट काही घ्यायला जमली नाही.
मुंबई चे स्टार परफॉर्मर होते, सर्फराज खान अजिंक्य राहणे आणि शम्स मुलाणी. सर्फराज ने दणदणीत २७५ रन्स ठोकल्या आणि अजिंक्य ने सुद्धा छान शतक मारले. मुलाणी ने सामन्यात ११ विकेट्स टिपल्या.

>>स्वरुप, एकदम थयथयाट म्हणण्यासारखे मला काही वाटले नाही.

खरय तुझे!! मी आधी youtube feed वर येणाऱ्या news channel च्या बातम्या बघितल्या आणि नंतर crickinfo वर जाऊन त्याची रीतसर मुलाखतही वाचली आणि त्यानंतर काल प्रेस कॉन्फरन्समधले द्रवीडचे स्पष्टीकरणही वाचले.
News channel चे व्हिडिओज जरा जास्तच सनसनाटी होते हे मान्य केले तरी त्याच्या मुलाखतीतही "I don't complain about selection...... I am not going to say anything against it" वगैरे म्हणत असला तरी तक्रारीचा एक किरकिरा सूर आहेच!!
त्याची नाराजी साहाजिक असली तरी द्रवीडने दिलेल्या सल्ल्याचा "तुम्ही मला रिटायर व्हायला सांगताय" असा अर्थ लाऊन उपयोग नाही!!
तुझ्यात असेल शिल्लक क्रिकेट तर खेळत रहा की कुणी नाही म्हंटलय पण team roadmap काय आहे ते त्याला कळायलाच हवे!!

गांगुलीने त्याला केलेला text message हा सहाला motivate करण्यासाठी होता (.तो "अव्यावसायिक" होता हे मान्य करुनही गांगुलीचा एकूण स्वभाव बघता त्याला थोडी शोऑफची सवय आहेच).... त्याचा चुकीचा अर्थ काढून संघातली जागा गृहीत धरणे हा अव्यावसायिकपणाच आहे आणि त्याहूनही जास्त अव्यावसायिकपणा हा आहे की गांगुली आणि सहामधल्या one on one संभाषणाबद्दल गांगुलीशी न बोलता किंवा त्याची बाजू ऐकून घ्यायचा प्रयत्न न करता त्याबद्दल तो डायरेक्ट मिडियाशी बोलला!!

>>साहाच्या किपीम्ग मुळे सामना गमावला असे कधी आठवतेय का ?
पण त्याच्यामुळे जिंकलेला सामनाही आठवत नाहिये..... सध्याच्या काळात चांगली बॅटींग करणारे इतके तरुण कीपर उपलब्ध असताना ३७ वर्षाच्या साधारण बॅटींग स्कील असणाऱ्या कीपरला also run नाही म्हणायचे तर काय?

असो!!
मला द्रवीडचा खुलासा पटला आणि आवडलाही!!

पण त्याच्यामुळे जिंकलेला सामनाही आठवत नाहिये >> कीपर किती चांगला की वाईट हे त्याच्या किपिंग बद्दल बोलले जाते ह्यावरून ठरते रे. असो, मी पण म्हटलय कि एकंदर डिरेक्शन चुकीची नाहीये पण ती साहाला खटकणे एकदमच लॉजिकल आहे. द्रविड चा खुलासा पण स्पष्ट आहे - कुठेही काहीही न नाकारता त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शर्मा मात्र दोन्ही डगरींवर पाय ठेवायचा प्रयत्न करतोय असे वाटले. (ज्याची खरच गरज नाही) गम्मत अशी आहे कि समजा, साहा बंगाल कडू न रणजी खेळला नि दबकून बॅटींग केली तर काय करणार पुढे ? Happy मीडीया कन्स्लटंट नि स्पोकपर्सन ठेवून हे असे अनाठायी वाद , प्रसंग सहज टाळता येतील - का करत नाही देव जाणे !

*...असे अनाठायी वाद , प्रसंग सहज टाळता येतील - का करत नाही देव जाणे !* - कुणाला तरी ते टाळायचे नसतातच म्हणून. गांगुली व द्रविड दोघांनीही दिलेला सल्ला सदिच्छेने दिलेला व व्यक्तीगत स्वरूपाचा होता, हें साहालाही माहित असणारच. पण तें अशा प्रकारे व अशा वेळी मांडून त्याने सहानुभूति व प्रसिद्धी मिळवण्याचा डाव रचला असावा.

३७ वर्षांचा साहा...

३७ वर्षांचा सचिन !
2010 was Sachin's best year in his Test career when he scored 1562 runs, including 7 Test centuries. The former Indian superstar has 6 1000+ calendar year runs in Test cricket, which is the best by any batsmen.
याच वर्षी एकदिवसीयमध्ये सुद्धा पहिलेवहिले द्विशतक ते देखील आफ्रिकेविरुद्ध सचिनच्याच बॅटमधून आलेले.
त्यामुळे ३७ वयात कसोटीसाठी तरी कोणी कोणाच्या नावावर फुली मारू शकत नाही.

साहावर केवळ वयामुळे काट मारली असती, तर वरचं सचिनचं उदाहरण लागू पडेलही. पण खरंच तसं आहे का ? यष्टीरक्षक म्हणून साहा खूप सरस होता व आहे, हें जाणकारांचं मत असूनही त्याला हवी तितकी संधी मिळाली नाहीं कारण धोनीसारखे त्याच्याहूनही सरस यष्टीरक्षक व फलंदाज ( व कर्णधार) त्याच वेळी उपलब्ध होते. त्यामुळे, त्याचं, ' बॅड लक ' कीं त्याला आपली योग्यता सिद्ध करायची सचिनसारखी पूर्ण संधी मिळाली नाहीं. पण यावरून असा निष्कर्ष तर निघत नाहीं कीं 37व्या वयात तोही सचिनसारखा कामगिरी करूं शकेल. हा मुद्दा तर प्रत्येक 37 वर्षीय खेळाडूच्या बाबतीत मांडता येईल. जर तरूण व चांगले पर्याय उपलब्ध असतील, तर त्याना संधी मिळणं स्वाभाविक आहे व तें स्विकारणं साहासाठी योग्यच ( द्रविडने हेंच सुचवलं होतं )

भाऊ, साठीला टेकलेले सुर्कुतलेले नट अजून स्वतःला हिरो समजतात, दोन चार पोरांचे बाप इथे कॉलेजकुमार म्हणून मिरवितात! तर सदोतिसाच्या सहाने का नाही- समजू? त्याला वाटत असेल अजून धोनीची चपळाई आणि सचिन सारखी द्विशतक करायची क्षमता आहे त्याच्यात. Wink

रच्याकने सुर्या, व्यंकटेश चांगली जोडी तयार होईल असे वाटतेय.

सॅमसनला अजून एक संधी मिळालीय. सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत कदाचित प्लेयिंग-११ मधे सुद्धा असेल. तसं झालं तर त्याने (आता तरी) ह्या संधीचं चीज करावं.

*...त्याने (आता तरी) ह्या संधीचं चीज करावं.* - +1. सॅमसन त्याच्या गुणवत्तेला साजेशी कामगिरी करून स्थिरावेल अशी आशा व प्रार्थना मीं देखील बरीच वर्षं करतो आहे. शुभेच्छा.

*राहुल, किशन, सॅमसन आणि पंत * - राहूल केवळ फलंदाज म्हणूनही स्थिरावला आहे. पंतही जागा पक्की करून आहे. ज्या घाई गर्दीने दौरे आंखले जाताहेत, त्यावरुन अधिकाधिक पर्याय ऊपलब्ध असणं आता आवश्यकच असावं.

त्यावरुन अधिकाधिक पर्याय ऊपलब्ध असणं आता आवश्यकच असावं. >> पुढच्या वर्षि दोन संघ एकत्र खेळण्याचे चान्सेस आहेत असे वाचले. आयर्लंड, झिंबाव्वे वगैरे सिरीज आहेत त्यात उपयोगी येईल.

*...त्याने (आता तरी) ह्या संधीचं चीज करावं.* >> मूळात त्याला ओपनर म्हणून पाठवले तर तो सेटल होईल पण ती शक्यता जवळजवळ नाहीच. बक्की तो काय करतो हे त्याचे त्यालाच माहित. माझे घोडे गायकवाड वर लागलेत. सरफराज खान ह्या नि आधीच्या रणजी मधे असा द्दणकून खेळलाय कि त्याला संधी मिळायला हवी होती असे वाटते.

गांगुली व द्रविड दोघांनीही दिलेला सल्ला सदिच्छेने दिलेला व व्यक्तीगत स्वरूपाचा होता >> भाऊ त्या दोघांचे हुद्दे बघता सल्ला त्यांनी वैयक्तिक सल्ला देऊ नये असे मला वाटते. गांगूलीचे टेक्स्ट कुठल्याही प्रकारे व्यक्तीगत वाटत नसून बिसीसीआय चा हेंचो म्हणून लिहिलेले वाटते ज्यातून चुकीचा सांदेश जातो आहे. थोडा मागे जाऊन आठवले तर इंग्लंड सिरीजच्या सुरूवातीला थिंक टँकला ईश्वरन दुसरा किंवा बॅकप ओपनर म्हणून योग्य वाटत नाही अशा बातम्या आल्या होत्या. तो बंगालकडून खेळतो म्हणून त्याच्यावर वरदहस्त आहे असे वाचले होते. ह्या गोष्टींमागे सखेद तथ्य असावे असे वाटायला लागते.

"तो स्थिरावला तर किती कीपर संघात? राहुल, किशन, सॅमसन आणि पंत" - राहूल मेक-शिफ्ट कीपर आहे रे. त्याने कधी कर्नाटककडून किपींग केलेली पाहिलेली नाहीये. बाकी तिघं चांगले स्टँड-अलोन बॅट्समन म्हणूनही खेळू शकतात - ट्रू ऑल-राऊंडर्स.

"माझे घोडे गायकवाड वर लागलेत. " - गायकवाडकडून मलाही खूप अपेक्षा आहेत. तो वन-डे / टेस्ट्स मधे खेळावा असं फार वाटतं.

शर्माला आवरा कोणीतरी
कप्तानीची सुत्रे हाती घेतल्यापासून सलग अकरावा विजय Happy

काल विजयासाठी ५४ बॉल ९६ का असे काहीतरी समीकरण असल्यापासून उरलेली मॅच बघितली..... त्यानंतर श्रेयस, संजू आणि जड्डू ने जी काही आधी रन अ बॉल पर्यंत आणि नंतर जेमतेव अठराव्या ओव्हरलाच मॅच जशी संपवली ते बघायला मजा आली!!

बाकी श्रीलंकेची फिल्डींग फारच गचाळ होती!!

Pages