क्रिकेट - ७

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41

कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई हेच तर करतात. कुठले तरी अननोन आणि सरप्रायझिंग लोक घेतात आणि त्यांना ग्रूम करतात. बूमबूम, अंबाती रायुडू, राहुल चहर, हार्दिक पांड्या, मार्को जान्सेन ही रिसेंट उदाहरणं. आता पहिला सीझन कदाचित कठीण जाईल पण नंतर ते भरपूर पुढे जाऊ शकतात. उनाडकतलाही फायदा झाला तर चांगलंच आहे.

मुंबई मध्ये या वर्षी बघण्या सारखा unknown प्लेअर जो ठरू शकतो तो आहे तिलक वर्मा.

हैदराबाद चा U19 आक्रमक मधली फळीचा फलंदाज.

८ च्या १० टीम झाल्यात. म्हणजे २५ टक्केंनी प्लेअर्सचा डिमांड सरळ सरळ वाढला. चला ओवरसीज प्लेअर तरी सुटतील कारण कित्येक चांगले ईंटरनॅशनल प्लेअरही दरवेळी अनसोल्ड जातात. त्यातून निघतील. पण भारतातून जास्तीचे २५ टक्के प्लेअर कुठून निघणार. ते जास्तीचे तुलनेत दुय्यमच असणार. त्यामुळे प्रत्येक टीमला थोडाबहुत फटका बसला असणारच. त्यांच्या आधीच्या सीजनच्या टीमच्या तुलनेत हा संघ थोडाअधिक कमकुवत भासणे हे जवळपास सर्वच संघांशी झाले आहे. मुंबई आधीची ईंडियन स्टार प्लेअर असलेली टीम असल्याने हा फरक जास्त जाणवतो ईतकेच.

स्वरुप बंगलोर ने चांगली टीम बनवली आहे रे. हेक्षलवूड , हर्शद पतेल नि डु प्ल्सी ला उचलून गॅप्स भरल्या आहेत . हसरंगा नि शाबाज हे चांगले स्पिनिंग ऑप्श्न्स आहेत.

तिलक वर्मा बद्दल वाचले - कळेलच आता किती पाणी आहे ते.

स्वरूप, मला राजस्थानविषयी खात्री वाटत नाही. एक तर संजू सॅमसन हा अजून तरी लीडर म्हणून इफेक्टीव्ह वाटला नाहीय. त्यातून तो बटलर, अश्विनसारख्या स्ट्राँग पर्सनॅलिटीज ना कसा हँडल करेल ह्याविषयी पण शंका आहे.

>>८ च्या १० टीम झाल्यात. म्हणजे २५ टक्केंनी प्लेअर्सचा डिमांड सरळ सरळ वाढला. ..... जास्तीचे तुलनेत दुय्यमच असणार. त्यामुळे प्रत्येक टीमला थोडाबहुत फटका बसला असणारच.
Agree!!

>>स्वरुप बंगलोर ने चांगली टीम बनवली आहे रे.
फाफ किती वर्षे खेळेल माहित नाही, फाफ आणि कोहली ओपन करणार असतील तर ते पॉवरप्लेचा किती फायदा उचलू शकतील??
त्या दोघानंतर भरवश्याचा असा म्हणशील तर फक्त मॅक्सवेलच आहे (त्यालाही किती भरवश्याचे म्हणायचे हा प्रश्न आहेच) अनुज रावत आणि लोमरोर अजूनही नवखेच आहेत आणि दिनेश कार्तिकला तर इतक्या महाग किमतीला फक्त विकेटकीपरचा स्लॉट भरुन काढायला घेतले असावे त्यामुळे त्याला बॅटींगमध्ये फारसे धरत नाही!!
बॉलिंग कागदावर चांगली वाटतीय.... मॅक्सवेल आणि लोमरोर एखाद्या रेग्युलर बॉलरचा ऑफ डे कव्हर करु शकतात!!
कॅप्टन कोण हा प्रश्न आहेच..... फाफ ला कॅप्टन करणार असतील तर ते शॉर्ट टर्म प्लॅनिंग असेल आणि मॅक्सवेल कॅप्टन म्हणून फारसा बरा पर्याय वाटत नाही
They should have gone all out for श्रेयस or वॉर्नर!!
आता कोहलीलाच गळ घालून परत कॅप्टन करणार असतील तर गोष्ट वेगळी!!

संजू सॅमसन हा अजून तरी लीडर म्हणून इफेक्टीव्ह वाटला नाहीय.
>>
अगदी अगदी...

तो तसाही दर सीझनला १ जबरदस्त, २ चांगल्या अन ३ साधारण इनिंग्ज खेळतो.
बाकी फ्लॉप.
त्यामुळे कॅप्टन मटीरिअल म्हणून माझ्यासाठीतरी पोलार्ड लेव्हलला...

बाकी ऑक्शनमधे ह्यू एड्मीड्स कोलॅप्स झाल्यावर चारू शर्मा नी शॉर्ट नोटिसवर येऊन ऑक्शन सांभाळणं आणि शेवटच्या तासासाठी परत ह्यू चं येणं... सगळ्यासाठी बिग थम्स अप टू ऑर्गनायझर्स....
सगळ्याला

एक मजेची गोष्ट म्हणजे पांड्या अन हूडा दोघंही एकाच टीम मधे आलेत तसंच अश्विन अन बेअर्स्टो पण...
काय होतं बघुया...

चारू शर्माला मात्र मानले पाहिजे. पहिल्या दिवशी गोंधळ उडत होता. अ‍ॅप्रोच चुकत होता. जे किमान होणे स्वाभाविकच होते. पण दुसर्‍या दिवशी मात्र त्यावर मेहनत करून, त्या चुका सुधारून उतरला. नर्व्हस सुद्धा सेटल दिसले. आयपीएल लिलावाचा स्टॅण्डर्ड राखला गेला.

दिल्ली सुद्धा श्रेयसच्या मागे थोडावेळ गेलेली. ते देखील मला रोचक वाटले. श्रेयस स्वतः ते बघून काय विचार करत असेल. मला वाटते ते दिल्लीने फक्त श्रेयस फॅनला दाखवले की आम्ही त्यासाठी गेलेलो पण बजेटच्या बाहेर गेला मग सोडले.

>>स्वरूप, मला राजस्थानविषयी खात्री वाटत नाही. एक तर संजू सॅमसन हा अजून तरी लीडर म्हणून इफेक्टीव्ह वाटला नाहीय. त्यातून तो बटलर, अश्विनसारख्या स्ट्राँग पर्सनॅलिटीज ना कसा हँडल करेल ह्याविषयी पण शंका आहे.

खरय..... संजू थोडा passive captain वाटतो..... sometimes it works when you have a strong coach and mature team!!
बटलरला चांगले हॅंडल केलय त्याने पण आता बटलर आणि अश्विन दोघांना एकत्र म्हणजे जरा मजा आहे Wink
Hopefully they both will leave behind that bitter episode and will work together as a team!!

पण एकंदर टीम बघता जयस्वाल, बटलर, पड्डीकल, संजू, हॅटमायर. नीशम, रियान पराग, अश्विन, बोल्ट ही बऱ्यापैकी डीप बॅटींग वाटतेय.

बोल्ट-प्रसिध ही left arm, right arm जोडी आणि अश्विन-चहल ही ऑफ आणि लेगीची जोडी यामुळे त्यांच्या बॉलींग ॲटेकमध्येही व्हरायटी दिसतेय!!

पाचवा बॉलर हा कमकुवत दुवा नक्कीच आहे!!

बॉलिंग कागदावर चांगली वाटतीय... >> अरे तेच तर त्यांनी बॉलिंग एव्हधी जबरदस्त बनवली आहे कि त्यामूळे बॅटींग मधल्या त्रुटी कव्हर होतील असे वाटते. फाफ सध्या जिथे तिथे दणकून खेळतोय. त्यामूळे १-२ वर्षे ते सेट आहेत. हसरंगा बॅट्समन म्हणून पण फॉर्म मधे आहे. फिनिशर म्हणून तो नि कार्थिक असणार. कोहली नि बाकीचे काय करतात हे बघूया. पण त्यांनी नेहमीचे फक्त ओव्हर्सीज बॅट्समन वर अवलंबून राहायचे बंद केलेय.

राजस्थानचा मेन प्रॉब्लेम हा असाणार आहे कि बटलर ला पुरेपूर वापरायला ओप न करायला हवे. पड्डिकल नि जय्स्वाल पण ओपनर म्हणून जास्त सूट होतात नि त्यामूळे सॅमसन ला खाली सरकावे लागेल. सॅमसन थेट येऊन मारामारी करताना अजून फारसा चमकलेला आठवत नाही - राहाणे प्रॉब्लेम आहे त्यालाही. कसे ठरवतात बघू. संगा ची ऑक्शनमधे मुंबई ने आर्चरला उचलल्यावरची रीअ‍ॅक्शन जबरा होती Happy

डेविड मलान ला कोणीच घेतले नाही ? रशिद नि ताहिर पण नाही ?

मालन ला विकत ना घेण्या मागे माझ्या मते तरी त्याची batting पोसिशन आणि style आहे.

टॉप ऑर्डर मध्ये येऊन ११०-१२० च्या strike rate ने खेळणारे भारतीय बॅट्समन प्रत्येक टीम कडे आहेत. त्या रोल साठी एक इंटरनॅशनल प्लेअर चा स्लॉट वाया घालवणे परवडणारे नाही.

गुजरात ची टीम मेजर गंडलेली वाटते. खास करून त्यांची फलंदाजी.

मधली फळी असून नसल्या सारखी आहे. विजय शंकर, हार्दिक, सहा किंवा Wade आणि tevatia या batting ऑर्डर कडून मला तरी फारशी अपेक्षा नाही.

जिंकलो
शर्माच्या फुल्ल टाईम कप्तानीत सलग सातवा विजय.
पराभवाची चव चाखावी लागेल तेव्हापासून मजा येणार आहे..

रवी बिश्नोई आला आणि पहिल्याच सामन्यात चमकदार कामगिरी करत सामनावीर.
मस्त बॉलर आहे. गेल्या आयपीएलमध्येच म्हटलेले की याचा गोलंदाजीचा कंट्रोल वाढला आहे. हा लवकरच संघात दिसेल.
आता याला त्या वरूण चक्रवर्तीसारखे न लपवता आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव द्या. तयार झाला तर वर्ल्डकपला एक पर्याय राहील.

कालचा सामना कुणी पाहिला नाही का?

शेवटच्या सात ओव्हर्समधे १२च्या रेटनी ८४ रन्स हव्या होत्या, विंडीजकडे विकेट्सही होत्या, कॅचेस सुटत होते, बॅट्समन सेट होते (१००+ पार्टनरशिप), आपले बोलर्स रेग्युलरली लूझ बॉल्स देत होते (उदा. हर्शल पटेल नी १८व्या ओव्हरमधे ५ बॉल्स एकदम टाईट टाकले, अन सहाव्याला पाटी टाकली.

पण भुवी नी सगळा एक्सपीरिअन्स लाऊन १९वी ओव्हर टाकली ज्यात फक्त ४ रन्स देऊन पूरनचा बळी घेतला. पोलार्ड सेट नसल्यानी मोठे शॉट्स बसले नाहीत, अन १२ चेंडूत २९ वरून ६ चेंडूत २५ वर सामना आला.
शेवटच्या ओव्हरमधे ४ चेंडूत २३ हव्या असताना पोवेलनी २ कडक सिक्सर्स मारून अण्डकोषांना ललाटगमन करून आणलं. पण पुढचे २ बॉल्स टाईट टाकल्यानी जीव भांड्यात पडला.

आपली टीम सध्या छान खेळती आहे, एक्सपरिमेंट्स वर्क होताहेत, पण टी २० वर्ल्डकप लक्षात घेऊन आता सेट टीम खेळवायला पाहिजे (जी वर्ल्डकपमधे एकत्र खेळणार आहे ती). नाहितर टीमला मुख्य टूर्नामेंट पर्यंत अ‍ॅज अ टीम खेळण्याची फारशी संधी मिळत नाही अन ऐन वेळी घात होतो हे आपण अनुभवलं आहे.

काल सामना रंगतदार झाला अर्थात त्याचे श्रेय सोडलेल्या झेलांना!
भुवी ने स्वत:ची योग्यता दाखविली योग्यवेळी!
कोहली छानच खेळत होता!

पंतने काल कुठलाही चान्स न देता, न घेता. वेगवान अर्धशतक मारले. ते देखील गरजेच्या वेळेस. त्याच्याकडून अश्याच खेळाची सातत्याने अपेक्षा. तो दरवेळी जबर्रदस्त ईम्पॅक्ट खेळी खेळायला जातो. पण त्याला हे समजत नाही की तो नुसते खेळला तर त्याची खेळी ईम्पॅक्ट पाडतेच. तो मैदानावर असताना प्रतिस्पर्धी कर्णधाराच्या डावपेचांवर त्याचा प्रभाव असतो. मोमेंटम आपल्याकडे असते. एकूणच गेम बदललेला असतो. तेच तो बाद होताच पुन्हा डाव पलटतो.

कोहलीचे अर्धशतक आले तरीही अजून तो नॅचरल खेळ खेळतोय असे वाटत नाही.

काल शर्माच्या पुर्णवेळ कप्तानीत सलग आठवा विजय आला आणि अजून पराभव चाखावा लागला नसल्याने आपण सलग तिसरा व्हाईटवॉश देण्याच्या मार्गावर आहोत.

कालचा सामना वे. इंडीजने जिंकायला तरी हवा होता किंवा निदान फक्त 3 विकेट गमावून हरायला नको होता. भारताने जगातील सर्वोत्तम गोलंदाजी विरूद्धही हातांत एवढ्या विकेटस ठेवून हा सामना गमावला नसता असं मला खात्रीपूर्वक वाटतं. सामना जिंकणं महत्वाचं असूनही शेवटच्या 3 षटकांत हातांत 8 विकेट असून 30-35 धांवा न करतां येणं टी20 संघासाठी नामुष्कीच म्हणावी लागेल. ( व्हीव रिचर्डस , द ग्रेट, यानी येत्या टी20 विश्वचषकांसाठी वे. इंडीज व पाकिस्तान हे मुख्य दावेदार असल्याचं म्हटलंय, हें विशेष )

3 षटकांत हातांत 8 विकेट असून 30-35 धांवा न करतां येणं टी20 संघासाठी नामुष्कीच>>
मान्य!
परंतु....

तीन षटकात ४० धावा हव्या होत्या. अर्थात दबाव दोघांवरही असतो अश्यावेळी एक बळी जरी मिळाला तरी ते फायचे ठरते. आणि शेवटच्या दोन षटकात २९ धावा हव्या होत्या परंतु भुवीने अनुभव पणाला लावत १९ वे षटक टाकले आणि त्यात केवळ ४ धावा देत पुरनचा बळी मिळवला! त्यामुळे शेवटच्या षटकात ६ चौकार देखिल पुरेसे ठरले नसते. आणि किमान ३ षटकार मारावे लागणार होते. आणि तेच दडपण उपयोगी पडले.
२०-२० मध्ये २-३ चेंडूत गणित पूर्ण बदलून जाते! तेच काम भुवीच्या १९व्या षटकाने केले!

श्रीलंका विरुद्ध कसोटी सामन्यात रहाणे आणि पुजाराला डच्चू, हे अपेक्षित होते पण रहाणे ला घेतले नाही म्हणजे सिलेक्टर्स ला क्रिकेट समजत नाही असे काही जण म्हणतील

*अर्थात दबाव दोघांवरही असतो अश्यावेळी एक बळी जरी मिळाला तरी ते फायचे ठरते. * - मान्य. पण 2-4 बळी गेले तरीही त्यावेळी सामना जिंकण्यासाठी तसा प्रयत्न करणं अत्यावश्यक होतं, असं मला वाटतं.

पण 2-4 बळी गेले तरीही त्यावेळी सामना जिंकण्यासाठी तसा प्रयत्न करणं अत्यावश्यक होतं, असं मला वाटतं. >> म्हणजे काय नक्की भाऊ ? त्यांनी असे काय केले नाही कि प्रयत्न केला नाही असे तुम्हाला वाटले हे लक्षात आले नाही. पोलार्ड ने शेवटचा बॉल नुसता तटवला म्हणून का ?

नाहितर टीमला मुख्य टूर्नामेंट पर्यंत अ‍ॅज अ टीम खेळण्याची फारशी संधी मिळत नाही अन ऐन वेळी घात होतो हे आपण अनुभवलं आहे. >> +१. उद्या वेंकटेश अय्यर ला खेळवतील अशी आशा धरतो. तो बाळसे धरायला लागलाय तेंव्हा त्याला होपफुली रोटेशन मधे फिरवू नये. डाऊन अंडर शेवटी फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर लागणार आहे.

कोहलीचे अर्धशतक आले तरीही अजून तो नॅचरल खेळ खेळतोय असे वाटत नाही. >> सर, आपण थेट गावस्कर, बिशप, आगरकर, भोगले वगैरें लोकांच्या धोतराला च हात घालताय हो. ते कोहली फ्लो मधे आहे , आऊट ऑफ फॉर्म वाटत नाही, वगैरे काही च्या काही बरळत आहेत. तो वेडा शर्मा सुद्धा पत्रकारांवर कोहलीच्या फॉर्म्स बद्दल प्रश्न विचारला म्हणून असाच डाफरून आला.

*म्हणजे काय नक्की भाऊ ? * - शेवटच्या तीन षटकात, फक्त शेवटच्या षटकात नव्हे , त्यानी थोका पत्करून व विकेट गेल्याची पर्वा न करतां आडवी- तिडवी फटकेबाजी करायलाच हवी होती.

अहो असामी ते शर्मा गावस्कर मंडळी कोहलीबद्दल असेच सकारात्मक बोलणार. पण माझी पोस्ट काही कोहलीपर्यंत पोहोचणार नसल्याने मला रोखठोक बोलायला हरकत नाही.

कोहली फार मोठा प्लेअर आहे ओ. थोडक्यात कसले समाधानी होत आहात. त्याचे शतक नाही पण तो चांगले खेळतोय हे गेले दोन वर्षे ऐकतोय. पण तो विंटेज कोहली की काय म्हणतात तो कुठे दिसलाच नाही या काळात. एखाद दुसऱ्या शॉटला दिसणे वेगळे आणि ईनिंगमध्ये दिसणे वेगळे. मोठ्या खेळी खेळणारा प्लेअर आहे तो वा होता तो म्हणावे लागेल. नुसते ईनिंग बिल्ड क्वालिटीच नव्हती त्याकडे तर तो गेम कंट्रोल करायचा. तो खेळपट्टीवर असताना आपण निर्धास्त असायचो. हेच सचिनबाबतही असायचे. ते पुन्हा वाटणे फार दूर आहे अजून..

वृध्धिमान सहाचा का एव्हढा थयथयाट चालू आहे?
मिळाली की भरपूर संधी!!
लोकांना काळाची पावले ओळखून काहीकाही निर्णय ग्रेसफुली का घेता येत नाहीत?
सिलेक्टर आणि कोचनी शिस्तीत "open and transperent" communication केले तरी प्रॉब्लेम आणि न कळवता न बोलता ड्रॉप केले तरी प्रॉब्लेम!!
इतक्या स्पर्धात्मक क्षेत्रात काम करताना (आणि when you are at wrong side of 30) तुम्हाला टिकून रहायचे असेल तर सतत काहीतरी चमकदार करत रहावे लागते.... नुसते also run असून चालत नाही.
गांगुलीबरोबरच्या text chat चा उल्लेख म्हणजे तर अव्यावसायिकपणाची कमाल आहे!!

Pages