या धाग्याला शिर्षक काय द्यावे कळले नाही म्हणुन सध्या हेच दिले आहे. आणि हे कुठे लिहावे हेही न कळल्याने नवीन धागा कढत आहे. जर असा काही धागा असेल तर कृपया सांगा, तिथे हलवता येईल.
अॅडमिन, हा धागा मायबोली धोरणानुसार उचित वाटला नाही तर काढुन टाकला तरी चालेल.
बर्याचदा वृत्तपत्रात, आपण स्वप्नातही विचार करू शकणार नाही अशा परिस्थितीशी झुंजणार्या व्यक्तींची बातमी येते व त्यांना मदतीचे हात पण द्यावेत असे आवाहन असते. ते वाचुन लोक मदतीला पुढेदेखील येतात.
ही मदत आर्थिक असते किंवा इतर स्वरुपाची. पण होते काय की अशा बातम्या सर्वचजण वेळेवर वाचतील असे नाही. आणि मग त्या वाहुन जातात. तर अशा प्रकारच्या वृत्तपत्रातल्या बातम्या मायबोलीकरांपर्यंत पोचाव्यात याकरता हा धागा चालु केलाय.
हे मदत करा असे आवाहन नाही पण बातमी वाचुन कोणा मायबोलीकराला इथे न लिहिता त्या व्यक्तिला वैयक्तिक कोणत्याही प्रकारची मदत करावीशी वाटली तर करु शकतील हा उद्देश आहे.
हे बरेच दिवसापासुन मनात होते पण आज शेवटी धागा उघडत आहे.
कृपया बातमीचा दुवा द्यावा.
धन्यवाद.
आज वाचलेली बातमी,
http://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5207226419503796321&Se...सप्तरंग&NewsDate=20160501&Provider=उत्तम कांबळे&NewsTitle=वेदनांवर झोपताहेत 4 बहिणी (उत्तम कांबळे)
ही बातमी वाचुन इतरांच्या मनात आला तसाच विचार येऊ शकतो की इतक्या मुली जन्माला का घातल्या. पण आता आहे ते आहे यात बदल करता येत नाही. म्हणुन बातमीचा दुवा दिलाय.
हा धागा विसरले होते.
हा धागा विसरले होते.
एक खूपच वेदनादायी व्हिडीओ पहायला मिळाला त्याची लिंक देत आहे. महाराष्ट्रातली बातमी नाही. संबंधीत कुटुंबातल्या बाळाला त्रास आहे. त्यांना मदत मिळवुन देण्याच्या कोणाला काही कल्पना सुचल्या (संस्था, हॉस्पिटल, डॉक्टर वगैरे) तर व्हिडीओ बनवणार्या टीमकडे पाठवता येईल.
https://m.youtube.com/watch?v=BuiGOVcSG_o
चांगला धागा व उपक्रम.
चांगला धागा व उपक्रम.