युक्ती सुचवा युक्ती सांगा -भाग ४

Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24

आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा

आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सर्वांच्या प्रत्येक serving मध्ये नक्की किती लोह असते ह्याचा खुलासा कोणी करील काय? म्हणजे उदा. दर पन्नास ग्राममागे किती लोह? त्यामुळे बीट आहारात असलेच पाहिजे हा समज दूर होऊ शकेल. अथवा बीट खातोय म्हणजे काहीतरी पौष्टिक खातोय ही समजूत ही दूर होईल. >>

फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन चा मोठा डेटाबेस आहे. पॅकेज्ड फूड आणि घटक पदार्थ ( बटाटा, बीट, तांदूळ इ ) यातले कॅलरीज, फायबर, कोलेस्टेरॉल, आयर्न , कॅलशियम , व्हिटामिन सी इत्यादींचे कंटेंट दर्शवणारी माहिती आहे. गेल्या १५-२० वर्षात यात लक्षणीय वाढ आणि सुधारणा होत आहेत.

ही कच्च्या बीटच्या माहितीची लिंक . १०० ग्रॅम बीटचे अ‍ॅनलिसिस आहे. इतरही पदार्थ शोधू शकता

https://fdc.nal.usda.gov/fdc-app.html#/food-details/169145/nutrients

मॅंंडोलिन स्लाइसर ने बीटच्या अगदी पातळ चकत्या कापून त्यावर चाट मसाला, लिंबाचा रस शिंपडून ट्राय करा . मस्त लागतात.
त्याच स्लाइसेस वर बारकासा चीझ स्प्रेड / ग्रीक योगर्टचा ठिपका आणि आवडीचे हर्ब्स बारीक चिरुन पण छान लागतात.

स्लाइसर ने बीटच्या अगदी पातळ चकत्या कापून (त्या काहीवेळ पाण्यात ठेवा. उग्रपणा जातो. ) त्यावर चाट मसाला, लिंबाचा रस शिंपडून ट्राय करा .

वरच्या १०० ग्रॅम बीटच्या माहितीमध्ये १०७ ग्रामहून थोडे अधिक वजनाचे घटक दिले आहेत. त्यात कार्बोहायड्रेट्स आणि फायबर्स वेगळ्या पद्धतीने मोजले आहेत का?

त्या पेजवरच्या सगळ्या घटकाच्या वजनाची बेरीज केलीत का ?
टोटल कार्ब वजनात साखर आणि डायेटरी फायबर दोन्ही येतात. ते नंबर वगळले तर बेरीज बरोबर यावी. त्यांच्या डेटाबेस मधे बरेच सोर्सेस आहेत आणि प्रत्येक सोर्सबद्दलची माहिती पण आहे

बीटचा उग्र वास कमी/नाहीसा करण्यासाठी,साल काढून बंद डब्यात भरून कुकरमध्ये भाताबरोबर लावते.मऊ बीट छान लागते.

बीटचा ज्युस केल, सेलरी,अ‍ॅपल आणि लिंबु रस घालून इथल्या ज्युस बार मध्ये मिळतो. घरी पण तसाच करते. एकदम छान लागतो,

त्यामुळे बीट आहारात असलेच पाहिजे हा समज दूर होऊ शकेल. अथवा बीट खातोय म्हणजे काहीतरी पौष्टिक खातोय ही समजूत ही दूर होईल.>>>

इथे लोह वगैरेची चर्चा चालली आहे म्हणुन लिहिते.
आपण ज्युस करतो तेव्हाही गाजर्/बीट वगैरेचा ज्युस जर रेग्युलर ज्युसर मधून गेला तर तो तितका पौष्टीक रहात नाही. कोल्ड प्रेस्ड ज्युस मध्ये त्यातले घटक बर्‍यापैकी आहे त्या स्वरुपात रहातात. अलिकडे डॉ त्रिपाठीचं डाएट घरी फॉलो केली जात आहे. कठीण डाएट आहे पण डायबेटीससाठी खुप चांगले बेनीफिट्स दिसले. डायबेटीक पर्सनला ह्या वरच्या ज्युस मध्ये बीट ऐवजी गाजर वापरले तरच चालेल.

मी न्युट्रिशन वॅल्यु सारख्या साइट्स संदर्भ म्हणून वापरते. माझ्या माहितीप्रमाणे तांबडा रंग असलेल्या सर्वच फळभाज्यांमध्ये लोह असेलच असं नाही. पालक, बीट हे त्यातल्या त्यात लो कॅलरी सोर्सेस, जवस जरा फॅटी पण खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेला सोर्स. खात असाल तर आक्रोड, अंडी, चिकन, इ. आयर्न शोषलं जाण्यासाठी व्हिट सी मदत करतं हे तर माहितीच आहे. बाकी एखाद्या घटक पदार्थात लोह किंवा इतर मिनरल्स/व्हिटॅमिन्स असले तरी नक्की किती पोर्शन खाल्ल्याने किती टक्के नुट्रिशन मिळतंय आणि ते जास्तीत जास्त शोषलं कसं जाइल, साइड इफेक्ट्स काय आहेत महत्वाचं आहे (हा मुद्दा आलाय वाटतं वर). आपल्याकडे गूळ किंवा काकवी दोन्ही लोह मिळतं म्हणून खावं म्हणतात. पण कणीभर लोह मिळण्यासाठी पोतंभर शुगर पण जातेय पोटात त्यासोबत असं व्हायला नको.

कलिंगडातून लोह मिळते हे पहिल्यांदाच वाचले. https://www.nutritionvalue.org/Watermelon%2C_raw_nutritional_value.html

आवळा candy गुळाच्या पाकात ( आख्या आवळ्या एवजी) करण्याच्या प्रयत्नात , पाक व तुकडे केलेले आवळे जास्तवेळ gas वर होते त्यामूळे
candy व पाक ह्यांचे मिश्रण खूप्च खूपच कडक झाले आहे...काही करता येईल का...

पाणी घाला ( मिश्रण बघितल्या शिवाय किती ते सांगू शकत नाही.) थोडा वेळ ठेवून द्या मग गॅस बारीक बारीक ठेवून ढवळत ढवळत एक उकळी काढा , होईल पात्तळ . चांगलं लागेल. पण नंतर फ्रीज मध्ये ठेवा म्हणजे टिकेल . खूप प्रमाणात केलं असेल , सगळं फ्रीज मध्ये ठेवणं शक्य नसेल तर थोडं थोडं द्या कोणा कोणाला.

ब्राऊन शुगरचा दगड झालेला मोकळा करायला ही युक्ती वापरा.
ब्राऊन शुगरच्या पिशवीत एक/ दोन ब्रेडच्या स्लायसेस ठेवा आणि पिशवीचे तोंड घट्ट बंद करा. एखाद दिवसात साखर परत भुसभुशीत पहिल्या सारखी होते. टिक टॉक वरुन समजलं आणि परफेक्ट वर्क झालं. ब्रेड बाष्प शोषुन घेत असावा.

बीटरूट सोलून मोठे तुकडे करून मीठ, तिखट, ऑलिव्ह ऑइल, ऑरिगॅनो मध्ये घोळवायचे आणि अवनमध्ये २०० डि.सें. वर ८-१० मिनिटं (मऊ होईपर्यंत) रोस्ट करायचे. गोट चीज बरोबर तर छानच लागतात पण भारतात गोट चीज महाग मिळतं, नेहेमी चांगलं मिळतंच असं नाही म्हणून चक्क्यात मीठ मिरपूड घालून त्याबरोबर हे बीटरूट मस्त लागतं. तसंच गाजर, किंवा इतरही भाज्या रोस्ट करून मस्त लागतात. उग्र वास अगदी येत नाही. बीटरूट रायत्याचीही एक रेसिपी आहे, पण त्यात बीटरूट खूप कमी आणि इतर गोष्टीच जास्त असल्यानं मी ते करत नाही.

पाणी घाला ( मिश्रण बघितल्या शिवाय किती ते सांगू शकत नाही.) थोडा वेळ ठेवून द्या मग गॅस बारीक बारीक ठेवून ढवळत ढवळत एक उकळी काढा , होईल पात्तळ . >>> हेच लिहीणार होते.

अगदी थोडं पाणी घालून सारखं केलंत तर मस्त आवळा चिक्की होईल. तुकडे चिक्कीसारखे खाता येतील.

पुआ , BLACKCAT, मनीमोहोर , अमितव , पार्वती , अन्जू

उपायांबद्दल धन्यवाद Happy
( माबो नेहमीच supportive solutions देते. Happy )

फोटो चिटकवला आहे , वरील सर्व उपाय करण्याजोगे आहेत . मिश्रण खूप कडक आहे त्यामुळे चमचाही वाकत आहे. Happy

मनीमोहोर, अन्जू ,

पाणी टाकून बघतो .
नंतर टाकलेले पाणी पदार्थ ची चव dilutes करते , त्यामुळे मी शक्यतो टळतो , पण माझ्या मिश्रण ला केल पाहिजे.

मला गुळ पाकातले आवळे ( तुकडे रुपात) करायचे होते.

BLACKCAT
==> चमचाही वाकत आहे. Happy : हाहा:

मुलगी मात्र तुकडे प्रयत्न कारून काढते अन आवडीने खाते.. गोड जास्त आहे ना : हाहा:

ब्राऊन शुगरचा दगड झालेला मोकळा करायला ही युक्ती वापरा>>> अर्रे वा. बॉर्नव्हिटा ला वापरू शकु ना हि युक्ती? बरेच
वेळा कॉफी, बॉव्ही चा दगड होतो

इडली शिजल्यावर, वरती पाणी का जमतेय?
माझा स्टिल इडलीपात्र आहे.
पात्रात कमी पाणी टाकून पाहिले, पीठात कमी पाणी टाकून पाहिले.

डिंकाचे लाडू शिल्लक आहे , आता खाण्याचा कंटाळा केला जातो .काय करता येईल?>> कंटाळा ? Uhoh
पण असो, व्यवस्थित फ्रीजमध्ये ४-५ आठवडे (जास्तही) रहातात. लागेल तसा मायक्रोवेव्ह मध्ये वार्म केला तर अगदी ताजा पाकात घातल्या सारखो लागतो.

मी एकटी लाडु आठवड्यात संपवु शकते. पण मोह आवरून थोडे फ्रीज मध्ये ठेवते. म्हणजे मग नंतर खाता येतात आईच्या लाडुची आठवण आली कि.

तीन महीने‌ झालेत लाडू करून रोज सकाळी नाष्टा आणि लाडू खात आहे. मला बारा महिने दिले तरी मी खाईन ,पण नवरा आणि मुलगा यांना कंटाळा आला आहे आणि जरा जास्तच वानोळा आलाय लाडू चा‌ म्हणून मी पण केले आईनं पण पाठवले. आता लाडू गटग करावं लागेल

मी एकटी लाडु आठवड्यात संपवु शकते. पण मोह आवरून थोडे फ्रीज मध्ये ठेवते. ........he kase काय शक्य होते? मला पाठवा.2-४ दिवसात खातं होतील.

ते आपले हे ३०-३५ पुरणपोळ्या एका बसल्याला पातेलंभर तुपासोबत संपवत असत असं मामींनी सांगितलंय.

अठवड्यात ४० लाडू त्या हिशोबाने काहीच नाहीत.

३५ ते४० लाडू आठवड्यात संपवणार्याना माझा __/\__ साष्टांग दंडवत>
Lol . अहो मी एका मिडिअम बॉक्स मध्ये मावतील ईतके लाडु 10-12 अ‍ॅझुम करत होते. तुम्ही तीन महिन्यापासुन खात असाल वगैरे माझ्या डोक्यात नाही आल.
३ महिन्याच्या लाडुला माझा सल्ला नाही applicable. १ आठवडा झाला म्हणजे खराब होतील , खाण्याचा तर कंटाळा आहे म्हनुन विचारता आहात असे वाटले.

३ महिन्याच्या लाडुला >>>> लाडू तीन महिन्यांपासून खातोय . पण आईने ताजे करुन‌ पाठवले होते नातू आणि जावयासाठी तेच कंटाळा करतात याचं दुसरं काही बनव मग खाऊ ,
जाऊदे आता अमा यांच्या सल्ल्यानुसार डोनेट केले.

ब्राऊन शुगरचा दगड झालेला मोकळा करायला ही युक्ती वापरा>>> अर्रे वा. बॉर्नव्हिटा ला वापरू शकु ना हि युक्ती? बरेच
वेळा कॉफी, बॉव्ही चा दगड होतो >> येस. पिठीसाखर साठी पण ही युक्ती कामी येते का बघितली पाहिजे. बरीच पिठीसाखर दगड होऊन पडलीय.

उकडीचे मोदक आधी करून फ्रीज मधे ठेवुन दुसर्या दिवशी उकडतात असे काहीतरि वाचले होते. बहुतेक मा बो वरच. त्याची लिन्क किन्वा त्याबद्दल माहिती असेल तर द्या प्लीज. आधीच धन्यवाद

.

गुलाब जाम मिक्स वापरून मलई कोफ्ता भार्री होतो! मी स्वतः नाही केलेला पण खाल्ला आहे. नेट वर रेसिपीज मिळतील नक्की.
ही पहा एक
https://amomscookbook.com/2017/11/21/gulab-jamun-malai-kofta/

Jamun mix Halawa . खाल्ला नाही कधी वाचलयं

मी काल गुलाब जाम डोनटस पाहिले इन्स्टावर. डोन ट च्या आकारात बनवलेले गुजा. मग वरून क्रीम लावले व्हाइट व केशर इलायची पेरली.
दम आलू सारखी रेसीपी होईल.

रुचिरा मध्ये एक रंगीत खीर नावाची रेसीपी होती. त्या मिक्स चे छोटे गोळे करून त्यात वेग वेगळे फूड कलर्स घालायचे. मग अगदी बारक्या गोळ्या वळायच्या. ह्या मग दुधात शिजवायच्या. व चवीपुरती साखर केशर इलाअय्ची घालायची.

मस्त आयडिया. पण त्यात साखर असते ना? >>> गुलाब जाम च्या गोळ्यांमधे साखर नसते , पाकात टाकल्यावरच तो गोड होतो , बाकी त्या खवा / दूध पावडर चा काय असेल तो गोडपणा तो मलाई कोफ्त्यामधे फिट होतो बरोबर,

आशु आणि चंपा,
मी इथे दिली आहे आप्पेपात्रातल्या चितळे गुजा मिक्सच्या मलाई कोफ्त्याची कृती Happy
https://www.maayboli.com/node/82888

अमा, ती कृती हमखास पाकसिद्धी मधेही आहे बहुतेक. रंगपंचमीला करायला फार सुरेख आहे.

Pages