Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जवळपास आलाय वर्ल्डकप..
जवळपास आलाय वर्ल्डकप..
*जवळपास आलाय वर्ल्डकप..*
*जवळपास आलाय वर्ल्डकप..* इंग्लंडने 200+ केले ( बहुतेक करणारच ) तर हातात आला वर्ल्डकप नाहीं म्हणतां येणार आतांच. जिंकूच पण मॅच एकतर्फी होणार नाहीं, हें नक्की.
९५ ला गेला.. शतकाचा विचार
९५ ला गेला.. शतकाचा विचार घात करतो बरेचदा.. हुमायुन नेचर
घ्या आता झटपट ऑल आऊट आणि रोखा..
मग नवीन बॉल की फॅक्टर आहे.. तो जपून खेळला. न्यूझीलंडच्या सेमीसारखे काही केले नाही तर विजय आपलाच आहे.
इंग्लंडच्या त्या आठव्या
इंग्लंडच्या त्या आठव्या विकेटच्या पार्टनरशिपमुळे मोमेंटम शिफ्ट झालाय. त्यातून भारताची पहिली विकेट लवकर गेलीय. भारतानं संयम दाखवून मॅचमधे कमबॅक करायला हवा. ओव्हर्स भरपूर आहेत, टारगेट मोठं नाहीये. patience is the key
जिंकली हो!!!
जिंकली हो!!!
छान झाली मॅच.
छान झाली मॅच.
कॅरेक्टर टेस्ट झाले प्लेअर्सचे.. मजा आली. ईंग्लंडने झुंजवले.
अभिनंदन, दोनही संघांचं !! फार
अभिनंदन, दोनही संघांचं !! फार छान मॅच !!!
अभिनंदन युवा खेळाडू . सफाईदार
अभिनंदन युवा खेळाडू . सफाईदार विजय . चार बाद झाल्यावर जरा कठीण वाटत होत पण शेवटी सहज जिंकली . धूल आणि रशीद किती पुढे येतात ते बघायचे . बाकी कोणी आता तरी नक्की वाटत नाही . बघु काय होतेय .
अंडर १९ च्या खालचे फलंदाज
अंडर १९ च्या खालचे फलंदाज फिरकी सहजतेने खेळत नाहीत हे पाहणे तापदायक होते.
आज कोहलीला शर्माच्या
आज कोहलीला शर्माच्या कॅप्टनशीपखाली खेळताना बघून मजा येईल
मी तासभर आधीच बघायला सुरुवात करणार आहे.
*अंडर १९ च्या खालचे फलंदाज
*अंडर १९ च्या खालचे फलंदाज फिरकी सहजतेने खेळत नाहीत हे पाहणे तापदायक होते.* +1. विशेषतः, इंग्लंडचे फलःदाज त्या मानाने आपली फिरकी सफाईने खेळतांना पाहून अधिकच वाईट वाटलं.
अपेक्षेप्रमाणे रोहित टॉस
अपेक्षेप्रमाणे रोहित टॉस जिंकला. मला वाटतंय टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावावर असावा. कोहली असता तर हारलो असतो असो. कोहली तोंड पाडून का आहे समजलं नाही. खरं म्हणजे त्याला आज बाहेर बसवायला पाहिजे होता.एक दोन महिने बाहेर ठेवला असता म्हणजे धक्क्यातून सावरायला वेळ मिळाला असता त्याला. मूड ऑफ असेल तर मोठी खेळी होणार नाही त्याच्याकडून
शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय
शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटचं सुवर्णपर्व सुरू झालंय.
एक दोन महिने बाहेर ठेवला असता
एक दोन महिने बाहेर ठेवला असता म्हणजे धक्क्यातून सावरायला वेळ मिळाला असता त्याला. मूड ऑफ असेल तर मोठी खेळी होणार नाही त्याच्याकडून>>> बोललो होतो मी.
अभिनंदन ! चांगला विजय.
अभिनंदन ! चांगला विजय.
कालच्या तीन रिव्यू आणि ते
कालच्या तीन रिव्यू आणि ते चर्चा करून घ्यायच्या पद्धतींचे फार कौतुक होत आहे.
७२ वर्षीय गावसकरांनी डीआरएसचे नाव बदलण्याबाबत सांगितले, ते म्हणाले ”पूर्वी जेव्हा महेंद्रसिंह धोनी योग्य रिव्ह्यू घ्यायचा तेव्हा त्याला ‘धोनी रिव्ह्यू सिस्टम’ म्हटले जायचे. आता रोहित शर्मा ही कामगिरी करतोय, म्हणून मला वाटते याला आता ‘डेफिनेटली रोहित सिस्टीम’ म्हटले पाहिजे.
रोहितला आधीच कॅप्टन करायला
रोहितला आधीच कॅप्टन करायला पाहिजे होतं. विनाकारण लॉस झाला भारतीय क्रिकेटचा. कोहलीने यातून शिकावं आणि rcb चे कप्तानपद सोडून द्यावं. एक नंबरचा नाठी माणूस आहे. नाठ लावून लावून वाट लावली. सामना जिंकायचा राहिला बाजूलाच टॉस तरी जिंकू दे म्हणून लोक्स प्रार्थना करायचे.
कोई मिल गया मधल्या रोहित
कोई मिल गया मधल्या रोहित मेहराला जसा जादू भेटला आणि बास्केटबॉल जिंकवली तसा आपल्या रोहित शर्मालापण जादू मिळालाय गांगुलीच्या रुपात. आता वर्ल्ड कप आपलाच आहे.
विशेषतः, इंग्लंडचे फलःदाज
विशेषतः, इंग्लंडचे फलःदाज त्या मानाने आपली फिरकी सफाईने खेळतांना पाहून अधिकच वाईट वाटलं. >> भाऊ मी मधे अॅशले गाईल्स चे (की स्वान चे) पुस्तक वाचले होते. त्यात त्याने आशियाई खेळाडू नि इंग्लिश खेळाडू ह्यांच्या स्पिन खेळण्याच्या प्रकारात कसा फरक आहे ह्याबद्दल मस्त लिहिले होते, इन गनरल इंग्लिश पिचेस डँप असल्यामूळॅ बहुतेक वेळा स्पिन व्हावा ह्यासाठी अधिक रेव्ह वापरणे हा नॉर्म आहे. त्यामूले बॉल अधिक बाउन्स पण होउ शकतो. त्यामूळे मूलभूत खेळण्याची पद्धत वेगळी असते वगैरे.
पहिल्या पंधरा ओव्हर्स मधे पुरेपूर फायदा घ्यायचा अशा हेतून सगळी संघबांधणी सुरू आहे असे वाटतेय आपली. शॉ चे काय झाले राव ? त्याला अगदीच बाजूला टाकलाय सध्या.
त्यामूले बॉल अधिक बाउन्स पण
त्यामूले बॉल अधिक बाउन्स पण होउ शकतो. त्यामूळे मूलभूत खेळण्याची पद्धत वेगळी असते वगैरे
>>>>
ऋषभ पंत त्याच्या पहिल्या ईंग्लंड दौऱ्यात बरेचदा या बाऊन्सचा अंदाज न आल्याने फिरकी गोलंदाजांना मारण्यात झेलबाद झालेला. अर्थात माझा आवडता खेळाडू असल्याने त्याला फॉलो केल्याने हे निरीक्षण.
रोहित त्याच्या पहिल्या ११
रोहित त्याच्या पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने नेतृत्व केलेल्या आतापर्यंतच्या ११ एकदिवसयी सामन्यांपैकी ९ सामने भारताने जिंकले आहेत. त्याचे हे आकडे सर्वोत्तम आहेत.
विराट कोहलीने नेतृत्व केलेल्या सुरुवातीच्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी ८ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला होता. विरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांच्या नेतृत्वातील पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी ७ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला होता. तसेच कपिल देव, सौरव गांगुली आणि दिलीप वेंगसरकर या दिग्गज कर्णधारांनी नेतृत्व केलेल्या पहिल्या ११ एकदिवसीय सामन्यांपैकी प्रत्येकी ६ विजय मिळवले होते.
रोचक माहिती
रोचक माहिती![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
शतक प्रेमींसाठी
रोहित शर्मा आणि के एल राहुल या दोघांनीच वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारात शतके करण्याचा विक्रम केला आहे. यांच्याव्यतिरिक्त कोणालाही वेस्ट इंडिजविरुद्ध तिन्ही क्रिकेट प्रकारात शतक करता आलेले नाही.
राहूल व सूर्यकुमार डाव सावरून
राहूल व सूर्यकुमार डाव सावरून छान खेळत होते. राहूल धांवबाद (48)- बॅड लक !
50 षटकांच्या सामन्यात पंतला सलामीला किंवा 3, 4 क्रमांकांवर खेळवणयाचं लाॅजिक कळत नाहीं. He is at his best only at lower middle order याबद्दल अजून शंका आहे ? व तेंही वरच्या क्रमांकावर खेळवायला अनेक चांगले पर्याय असताना ?
शर्माजीनी जिंकली पहिली मालिका
शर्माजीनी जिंकली पहिली मालिका....
पहिली एक दिवसीय.. २०-२०
पहिली एक दिवसीय.. २०-२० न्यूझीलंडला व्हाईट वॉश देत जिंकलाय. आता परवा हिच्यातही दे व्हाईट वॉश.. आणि हो सज्ज कसोटीचे कर्णधारपद घ्यायला..
व तेंही वरच्या क्रमांकावर
व तेंही वरच्या क्रमांकावर खेळवायला अनेक चांगले पर्याय असताना ? >> खरय ! काही लॉजिक कळत नाही. वन ऑफ प्रयोग होता म्हणे. पन प्रयोगच करायचा तर इशान किशन ला ठेवायचे ना. (शर्माजी पहिल्या सामन्या नंतर सलग संधी देण्याबद्दल पण म्हणाले होते ) राहुलला आत आणायचे होते तर पंतच्या जागी आणता आले असते. पंत अजून्तरी वन डे मधे १००% फिक्स नाही आहे. धवन उपलब्ध असणार आहे तिसर्या सामन्यासाठी त्यामूळे तो ओपन करेल असे वाटते.
प्रसिद्ध ने आज मस्तच बॉलिंग केली.
आजचे रोहीतचे बॉलिंग चेंजेस
आजचे रोहीतचे बॉलिंग चेंजेस अफलातून होते.
पहिल्या सामन्याला रिव्यूची चर्चा होती. आज बॉलिंग चेंजेसची.
प्रसिद्धला आणून पूरनला चूरन देणे ईथे जणू मॅचच संपली.
आजही एक अचूक रिव्यू घेत अंपायरने न दिलेला निर्णय फिरवला.
शर्माचं करावं तेव्हडं कौतुक
शर्माचं करावं तेव्हडं कौतुक कमीच आहे. आता कोहली फॅन्स पण गप्प असतात सोशल मीडियावर. त्यांना कोहलीला सपोर्ट केल्याचा पश्चाताप होत असावा. भारताला आता हरवणं असंभव गोष्ट आहे.
प्रसिद्ध कृष्णाला लहानपणी कु
प्रसिद्ध कृष्णाला लहानपणी कु.प्रसिद्ध कृष्णा म्हणत असतील का?
रच्याकने,
इनर सर्कल मधे फील्डर्स कमी झाल्यानी नो-बॉल काल किती वेळा मिळाला? (मी दोनदा पाहिला)
या आधी हे तितकं पाहिलं नाहिये...
*इनर सर्कल मधे य कमी झाल्यानी
*इनर सर्कल मधे य कमी झाल्यानी नो-बॉल काल किती वेळा मिळाला* - म्हणजे, याच मॅचमधे अंपायर अधिक जागरुक होते कीं फिल्डींग कर्णधार गलथान होते ?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages