Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27

प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
1 कोहळा किस करून
तिखट , मीठ, ओवा
दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून
क्रमवार पाककृती:
1. पोहे वापरून
कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.
2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.
आमचे उडीदवाले बिघडले. पसरले.
वाढणी/प्रमाण:
3
अधिक टिपा:
1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.
2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.
3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.
4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.
5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?
माहितीचा स्रोत:
यू ट्यूब
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
यातले काही प्रकार घरी केले
यातले काही प्रकार घरी केले जातात. किंवा नातेवाईकांच्यात करताना बघितलेत.
१.मुळ्याच्या शेंगाना मीठ्+दही लावून वाळवायचे.
२.गवारः दही+ मीठ लावून वाळवायचे. लोणचेही छान करतात.
३.मेथी किंवा हरभर्याच्या कोवळ्या पानांना वाळवून त्याची नंतर पातळ भाजी.
४.कोहळा आणि साबुदाणा घालून सांडगे
५. दोडक्याच्या शिरा काढून ,त्यात लाल मिर्ची आणि मीठ एकत्र चेचून घ्यायचे आणि मग वाळवायचे.
६.कैर्या कोवळ्या बाठीसकट मिळतात. त्या एक वाफ आणुन मीठ लावून वाळवितात.
७.वांगी, टोमॅटो स्लाईस करून वाळवितात.
एका दक्षीण भारतिय
एका दक्षीण भारतिय रेस्टॉरंटच्या बाहेर कोहळा कापून दाराबाहेर ठेवला होता. काहीतरी अंधश्रद्धेचा प्रकार वाटला मला.
खंडांतर्गत कडक उन्हाच्या
खंडांतर्गत कडक उन्हाच्या प्रदेशात अनेक मोसमी भाज्यांच्या कुसरी करून साठवून ठेवण्याची प्रथा होती. अजूनही असेल. त्यात गवार, भेंडी, मेथी, तोंडली,कारले ह्या प्रमुख. मेथीची कुसरी म्हणजे कसूरी मेथी ही फारच लोकप्रिय. काही भाज्या नुसत्याच हळद मीठ तिखट घालून खडखडीत वाळवायच्या. कारल्याच्या पातळ चकत्या करून त्यांना हळद, तिखट मीठ चोळून वाळवीत असत.
पण नुसतेच वाळवले तर किती
पण नुसतेच वाळवले तर किती क्वांटीटी होणार
पोहे, डाळ घातले की थोडी भर होते
मोसमी भाज्या बिनमोसमातही
मोसमी भाज्या बिनमोसमातही खायला मिळाव्यात म्हणून वाळवून ठेवायच्या. वापरात आणताना त्यात आवडीचे काहीही घालून भाजीसारखा वापर करता येतो. पूर्वी बिस्किटांचे मोठे डबे भरून भाज्या सुकवीत असत.
आजकाल शहरांमध्ये अर्थात बिनमोसम असा काही नसतो. कुठलीही भाजी कधीही मिळू शकते. तेव्हढी ताजी आणि चविष्ट नसते इतकंच.
हो मीरा, भेंडवड्यांच्या
हो मीरा, भेंडवड्यांच्या बाबतीत बर्याच जणींनी चांगला रिप्लाय दिल्याने करुन बघायचेच असे ठरवले आहे. लोकसत्तात रेसेपी आली होती पण लक्षात राहिली नाही.
एका सारस्वत शेजार्यांनी कोवळी अख्खी गवार व कमी तिखट मिर्च्यांचे असे लोणचे आम्हाला दिले होते. खुप मस्त लागते ते.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=sP1DLgLLkRw
पण यात बाकी भाज्या नाही दिसल्या.
इथली चर्चा वाचून दिनेशदा
इथली चर्चा वाचून दिनेशदा माबोवर सक्रिय हवे होते असे वाटले. या प्रकाराच्या माहितीचा खजिना होते.
कोहळ्याच्या कीसात मावेल इतके
कोहळ्याच्या किसात मावेल इतके उडीद्डाळीचे पीठ घालायचे.पीठ नसल्यास भिजवलेली उडीदडाळ्,उपसून(पाणी काढून) कोहळ्याच्या पाण्यात वाटायची.त्यात राहिलेला कीस्,आले ओ.मि.,कोथिंबीर्,हिंग घालून सांडगे लगेच घालायचे(की पाडायचे?). को.च्या रसाव्य्तिरिक्त पाणी घालायचे नाही.कीसही वाटायचा नाही.यांचा आकारही मोठा असतो.बाजारात शेंगदाण्याएवढे नाजूक मिळतात तसे नाही.
हे सांडगे आंम्ही आमटीकरता वापरतो.तळून नुसते खाल्ले नाहीत.हलके कडवट असतात.
एका दक्षीण भारतिय
एका दक्षीण भारतिय रेस्टॉरंटच्या बाहेर कोहळा कापून दाराबाहेर ठेवला होता. काहीतरी अंधश्रद्धेचा प्रकार वाटला मला.>>>>>>>>>>>>>
तो कोहळाच असतो का?
इकडे घरांच्या बाहेर पण ठेवतात फोडून त्यावर कुंकू टाकून दाराच्या दोन्ही बाजूंना.
बहुतेक सणासुदीला,अमावस्या, पौर्णिमेला वगैरे...का करतात?विचारले नाही कधी.
घराला / दुकानाला दृष्ट लागू
घराला / दुकानाला दृष्ट लागू नये म्हणून..
इथली चर्चा वाचून दिनेशदा
इथली चर्चा वाचून दिनेशदा माबोवर सक्रिय हवे होते असे वाटले. या प्रकाराच्या माहितीचा खजिना होते.>>>>>. +१११११
तो कोहळाच असतो का?>>
तो कोहळाच असतो का?>>
हो घुमडकायी का असे काही तरी म्हणतात!
इथे हैद्राबादेत भरपूर येतात कोहळे.
कोहळ्याचा पेठा घरी केला होता मध्यंतरी. पेठा करायला जून कोहळा हवा थोडा निबर. पण खूप चेंगट काम आहे . छान झाला होता तरी. इथले मिठाई वाले ट्रकभर कोहळे आणतात केवळ पेठा बनवायला वापरत नसावेत. बहुदा मिठाईच्या बर्याच प्रकार कोहळा वापला जात असावा, अगदी बर्फीत देखिल.
वरील प्रमाणे कोहळ्याचे सांडगे देखिल बनविले.
हाच तो घरी बनविलेला पेठा!
हाच तो घरी बनविलेला पेठा!
मस्त झालेला वर साखरेचा हार्डनेस आणि आत एकदम रसरशीत!
व्वा ! मस्त झालाय पेठा. वरुन
व्वा ! मस्त झालाय पेठा. वरुन टफ आणी आतुन मऊ हेच तर कौशल्य.
हाच तो घरी बनविलेला पेठा!....
हाच तो घरी बनविलेला पेठा!....... जबरी पेठा!
छान पेठा बनवला आहे कृष्णा...
छान पेठा बनवला आहे कृष्णा... एक रेसिपी येऊ द्या नवीन धाग्यावर..!!
छान
छान
जबरदस्त.
जबरदस्त.
आग्राचा सुप्रसिद्ध पेठा तयार
आग्राचा सुप्रसिद्ध पेठा तयार करतात त्याची झलक
https://fb.watch/aWh0viZt9z/
विसू: व्हिडीओ बघून पेठ्यावरच मन उडू शकते
पेठ्याची प्रोसेस सही आहे!
पेठ्याची प्रोसेस सही आहे!
मस्त दिसतायत सांडगे!
मस्त दिसतायत सांडगे!
इथे कोहळा घराबाहेरही टांगून ठेवलेला बघितला आहे नजर लागू नये म्हणून. दुकानात मोठी पूजा वगैरे असेल (दसरा दिवाळी वगैरे) तर कोहळा फोडून दोन तुकडे कुंकू वगैरे भरून दोन्ही बाजूला ठेवलेले बघितले आहेत.
Ash gourd म्हणतात कोहळ्याला असं वाटतंय.
माझी आजी कोहळ्याच्या वड्या करायची (पेठा नाही) मस्त लागायच्या.
Blackcat उडीदवाले सांडगे
Blackcat उडीदवाले सांडगे पसरले कारण कोहाळा किसून झाल्यावर त्यातुंन पाणी काढून टाकाव लागत.त्यानंतर उडीद पीठात मिक्स करावे.
आम्ही दरवर्षी करतो. कुवाळे वोडी (kuvale vodi) म्हणतो कोंकणी मधे.
हाच तो घरी बनविलेला पेठा!
हाच तो घरी बनविलेला पेठा!
मस्त झालेला वर साखरेचा हार्डनेस आणि आत एकदम रसरशीत!>> मस्तच एकदम.
मला प्रचंड आवडतो पेठा. आता घरी करून बघते. बिकाजीचा आणलेला तो खुप कोरडा होता.
माझी आजी कोहळ्याच्या वड्या
माझी आजी कोहळ्याच्या वड्या करायची (पेठा नाही) मस्त लागायच्या. >>> सेम आई करायची, सा बा पण. आई त्याला कोहळे पाक म्हणायची.
पेठा काशीचा मस्त असतो. कालच भावाने आणला तिथून, आग्र्यासारखी बाहेरुन फार साखर नसते, कोहळा जास्त दिसतो त्यात, चौकोनी तुकडे असतात लहान, चवही कोहळ्याची जास्त जाणवते.
काल केळी वाळत घातलेत
काल केळी वाळत घातलेत
वाळवण या विषयावर मग एक धागा काढू
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105404.html?1212599079 >>>>>इथे आहे बघा.
त्यात मुख्यतः सांडगे पापड
त्यात मुख्यतः सांडगे पापड आहेत,
मला डाळीचे सांडगे , फळे , भाज्या इ वर हवा आहे
ओके
ओके
पेठा हा शब्द मोघल काळापासून
पेठा हा शब्द मोघल काळापासून रूढ झाला. पण इतिहास तज्ञांच्या मते पूर्वीही हा पदार्थ उपलब्ध होता, त्याचे नाव कुष्मांडपाक असे होते म्हणे. पण पाक म्हणजे तो हलव्याप्रमाणे किंवा च्यवनप्राशप्रमाणे असेल असे वाटते
Pages