कोहळ्याचे सांडगे आणि इतर वाळवणीचे पदार्थ

Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

1 कोहळा किस करून

तिखट , मीठ, ओवा

दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून

क्रमवार पाककृती: 

1. पोहे वापरून

कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.

IMG_20220130_061912.jpg

2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.

IMG_20220130_080918.jpg

आमचे उडीदवाले बिघडले. पसरले. Sad

IMG_20220131_132151~2.jpg

वाढणी/प्रमाण: 
3
अधिक टिपा: 

1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.

2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.

3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.

4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.

5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?

माहितीचा स्रोत: 
यू ट्यूब
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन मग त्या पिठाच्या भाकर्‍या बनवायच्या का..??

एकापेक्षा एक नवनविन रेशिप्या सांडग्यांच्या धाग्यावर वाळवणाला ठेवल्या सारखं वाटू लागलंय... Uhoh

वसईची सुकेळी करताना त्याला मधाचे पाणी लावून करतात.
पण नेटवर नुसत्याच केळीच्या स्लाइस करून सुकवण्याचेही प्रकार आहेत

अजून एक कँबोडिया की कुठलातरी प्रकार पाहिला , त्यात केळीचे लांब स्लाइस करून वाळवताना एकमेकांना चिकटून ठेवतात , मग सगळे चिकटून फणसपोळी आंबापोळीसारखा पदार्थ तयार होतो

सुकेळी करताना केळ्याचे काप नुसते सुकवत नाहीत , त्याना गन्धकाची धुरी वगैरे देतात अशी काही तरी प्रोसेस वाचल्याचं आठवतंय।

डिजे, केळ्याच्या सुकवलेल्या पीठाचे परोठे मस्त होतात. माझी एक मैत्रिण जी काही वर्ष जळगावला राहिली होती, ती तिथल्या शेजारणीकडुन शिकुन आलीय. कणकेत केळ्याचे सुकवलेले पीठ + हिर्वी मिर्ची बारीक चिरुन + मीठ असे घालुन भिजवुन जाडसर पोळ्या लाटायच्या. गोड होत नाहीत. हे पीठ उपवासाच्या थालीपीठात वापरले तरी चालते.

केळ्याचे पीठ बहुतेक ऑनलाईन पण मागवता येते आजकाल.

अरे वा वैनी... मनापासून धन्स..!! असं काहीतरी पुर्ण कळाले तर नवीन प्रयोग करायला हुरुप येतो.. नुसतं वर वर कळालं तर उत्सुकता पण शमत नाही अन नवीन काही करुही वाटत नाही. मी यु ट्युब वर सुकेळ्यांबद्दल पाहिलं पण त्यात केरळी अन थायलंड वालेच व्हिडीओ होते... इथेही कोणी त्याबद्दल धागा काढेना Wink

चालेल.. तसेही आता थंडी कमी झालेली आहेच.. ऊनही कडकडीत पडायला सुरुवात झाली आहे. सांडग्यांसोबत एक डझन देशी केळी मिळाली की सुकेळीही करेन (घरच्यांना चुकवून सुकेळी करायची सोय नाही... करताना बघितले तर ८०-९० रुपयांसाठी बोलणीही ऐकावी लागतील Uhoh ).

केळी नुसती सुकवली तर थोडी काळपट होतात, मध लावून केली तर त्यातील फ्रुकटोज हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करते व केळी गोल्डन यलो होतात , असे यु ट्यूबवर वाचले.

पण वसई सुकेळी फोटोत व्हिडिओत डाम्बरासारखी काळी दिसत आहेत, मनुका कलर.
आमची नुसती सुकवलेलीही तशीच झाली आहेत , लांबट मनुका. जापनीज अक्षरांचे वेडेवाकडे पाय असतात, तसे दिसत आहेत.

ड्राय फ्रुट म्हणून खाता येतील , किंवा खीर , शिरा , हलवा , केक यात वर गारनिशिंगला वापरता येतील.

मायक्रोवेव्ह वापरून कसे करतात ?

केळी नुसती सुकवली तर थोडी काळपट होतात, मध लावून केली तर त्यातील फ्रुकटोज हे प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून काम करते व केळी गोल्डन यलो होतात>> जे हुई ना बात..!! धन्स..!!!

सांडग्यांचा धागा आधी कोहळ्याने अन आता सुकेळ्याने हायजॅक केला Proud

केळी , नाचणी , बाजरी , कोहळा, उडीद डाळ हे पदार्थ आपण स्वस्त व उपलब्ध असूनही फार कमी वापरतो. त्यामानाने साऊथवाले हे पदार्थ भरपूर वापरतात.

ते तर साखर भात केळीपण खातात

उरलेली / जास्त पिकलेली केळी सुकवून खायला अतीशय छान लागतात. (वैष्णोदेवीच्या प्रसादात असेच सुकवलेले सफरचंदाचे तुकडे असतात. तेही भारी लागतात) म्युसेली च्या पाकिटांवरच्या फोटोत असे डेसिकेटेड केळाचे काप असतात, मशीन वापरून सुकवलेले. (समहाऊ मला पाकिटात कधीच सापडलेले नाहीत)

केळी नुसती सुकायलाच भरपूर वेळ लागतो, संपायला फार वेळ लागत नाही. मध लावून वाळवायला जास्त वेळ अन मुंग्या लागतील. सोलून केळी वाळत घालण्याआधी त्या ताटाला तुपाचा हात लावावा. चिकटतात. नाहीतर बटरपेपरवर वाळवावीत.

पावडर्/पीठ कच्च्या केळ्याचं रेडिमेड मिळतं, उपवासाच्या पिठात किंवा नुसतंही दुधात घालून छान लागेल.

पिकलेल्या केळाचीही भुकटी मिळते. फारच सुंदर लागते.

हल्दिराम orange बर्फी मध्ये कोहळा असतो. मला Ingredients list वाचल्यावर फार आश्चर्य वाटलेले.
<<
हो. बेसिकली ऑरेंज फ्लेवर्ड पेठा खपवतात बर्फीच्या नावाखाली.

पिकलेल्या केळाची स्लाईस तुपावर शॅलो फ्राय करून उर्फ परतून त्यावर साखर पेरून कॅरॅमलाईज करुन, किंवा मध ओतून सुंदर डेझर्ट होते. त्या सोबत प्लेन व्हॅनिला आईसक्रीम स्कूपही सुंदर लागतो.

पिकलेल्या केळाची स्लाईस तुपावर शॅलो फ्राय करून उर्फ परतून त्यावर साखर पेरून कॅरॅमलाईज करुन, किंवा मध ओतून सुंदर डेझर्ट होते. त्या सोबत प्लेन व्हॅनिला आईसक्रीम स्कूपही सुंदर लागतो.>>+++११११११ धन्स पुरुष आयडी..!!

पिकलेल्या केळाची स्लाईस तुपावर शॅलो फ्राय करून उर्फ परतून त्यावर साखर पेरून कॅरॅमलाईज करुन>> हे फारच छान लागतं. खूप वर्षांत खाल्लं नाही!

कांचन बापट यांच्या यूट्यूब चॅनेलवर त्यांनी बीट वाळवून खाण्याचा रंग तयार केलेला दाखवलाय.
https://youtu.be/U-VOXYBfdT4

आणि या व्हिडिओत सनड्राईड टोमॅटो. हे मी एकदा केले होते. मस्त लागतात. पण लगेच संपतात Happy

https://youtu.be/mgMrpnCbG-k

या दोन्ही कृती या ताईंच्या पुस्तकातपण आहेत.

राजाळी केळ्यांचे काप करून तुपावर 2 लवंगा घालून हलके परतावे.साखर,ओले खोबरे घालावे.छान लागते.

केळी अजिबात खात नसल्याने बाकी प्रकार माहीत नाही.

हे आमचे जुन्या लॉटमधले
IMG_20220207_211802.jpg

यु ट्यूबवर विविध प्रकार आहेत

1. मिठाच्या पाण्यात 10 मिनिट बुडवणे , मग वाळवणे
2. सायट्रिक एसिडमध्ये 10 मिनिटे बुडवणे , मग वाळवणे ( लिंबू पिळला तर चालेल का )
3. आधी किंवा मध्ये कधीतरी हाताने पूर्ण केळी चोळून गुळगुळीत करणे.
4. अर्धी वाळल्यावर थोडी चपटी करणे
5. केळीच्या फोडी वाळवणे , मग साखर घालून परत उन्हात ठेवून केळीचा गुलकंद करणे

देवकी हा केळ्याचा हलवा, मला प्रचंड आवडतो. साध्या केळ्याचा करते मी नेहमी. थोड्या तुपावर एक दोन लवंगा परतून त्यात पिकलेली केळी मोठे तुकडे करून परतायची. खवलेलं खोबरं आणि साखर घालायची ( किंवा गुळ) अंदाजे. झटपट होतं आणि छान लागतं

पिकलेल्या केळाची स्लाईस तुपावर शॅलो फ्राय करून उर्फ परतून त्यावर साखर पेरून कॅरॅमलाईज करुन, किंवा मध ओतून सुंदर डेझर्ट होते. त्या सोबत प्लेन व्हॅनिला आईसक्रीम स्कूपही सुंदर लागतो.>>
हो. मी करते पण नेहमीची केळी नाही वापरत . प्लांटेन वापरते.
टॉमी बहामाच्या रेस्टॉरंट मध्ये मिळते. त्यांचीच रेसीपी फॉलो करते. उत्कृष्ट लागते. कास्ट आयर्नचा तवा पाहिजेच खर ह्या रेसीपीसाठी.
(वाळवण, फळाम्च्या रेसीपीज सगळ मिक्स झालय इथे आता. लोल)

ब्लॅककॅट उत्साही आहेत, केळीपण सुकत (वाळवत) ठेवली.

केळ्याच्या पीठाची धिरडी आई उपासाला करायची.

बाय द वे केळी नारळ हलवा फार सुरेख लागतो, मी गोड खात नाही फार पण बरेचदा करते, झटपट होतो. एकदम सोपा प्रकार.

कोहळ्याची गाडी आता केळ्याकडे पुर्णपणे वळली म्हणून उल्लेख करतेय, हाहाहा .

अंजु, नारळ घातलेले गोड पदार्थ प्रचंड आवडीचे आहेत. केळी नारळ हलवा आवडेल अस वाटतय. रेसीपी लिहाल का ? पहिल्यांदाच ऐकला हा हलवा.

मला एकुणच फळ वापरून केलेले पदार्थ ( वाळवणं असो/नसो) फार आवडतात. त्यामूळ हा धागा एकदम फेव्हरेट झालाय. आणि खरतरं हा कोहळ्याचा आहे धागा. लोल /

फार सोपी रेसिपी आहे.

ओले खोबरे, केळी प्रमाण हवं तसं घ्या. मला खोबरं जास्त केळी कमी आवडतात. काहीजण उलट करतात, मीही करते केळी जास्त उरलेली असली तर.

थोड्या साजूक किंवा गाईच्या तुपावर आधी खोबरं काही सेकंद परतते. मग सोलून घेतलेलया केळ्याचे तुकडे परतते (केळे कुस्करून घातलं तरी हरकत नाही) , त्यानंतर साय जरा जास्त आणि थोडं दूध घालते, थोडं आटवते मग त्यात गूळ (पावडर वापरते) जास्त आणि थोडी साखर घालते (नुसत्या साखरेचाही छान होतो, नुसत्या गुळाचाही छान होतो, मी दोन्ही घालते ) , परत थोडं आटवते. एव्हरेस्ट मिल्क मसाला असेल तर सरळ तो घालते प्लस काजू, बदाम, बेदाणे घालते (हे नसलं तरी चालते). सुका मेवा, मिल्क मसाला ऑप्शनल. नुसती वेलची पूड घालूनही छान लागतो.

प्रमाण सांगता येणार नाही, अंदाजपंचे दाहोदरसे. किती आटवायचा हे आपल्यावर आहे. फ्रीजमध्ये राहतो चार दिवस.

Pages