Submitted by BLACKCAT on 31 January, 2022 - 07:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
1 कोहळा किस करून
तिखट , मीठ, ओवा
दोन प्रकारे केली एक पोहे वापरून , दुसरी उडीद डाळ वापरून
क्रमवार पाककृती:
1. पोहे वापरून
कोहळा किसून घ्यावा, त्यात जाड पोहे मिसळून 1 तास भिजत घालावे. एक तासाने ते घट्ट मळून त्यात तिखट , मीठ, ओवा घालावा, मग बोटाने त्याचे सांडगे घालावेत व उन्हात वाळत घालावेत.
2. उडीद सकाळी नऊ वाजता भिजत घालावी , रात्री पाणी काढून मिक्सर मधून फिरवून घ्यावे व झाकून ठेवावे , सकाळी त्यात कोहळा किस , तिखट मीठ ओवा मिसळून मळून सांडगे करून वाळवावेत.
आमचे उडीदवाले बिघडले. पसरले.
वाढणी/प्रमाण:
3
अधिक टिपा:
1. शिजवावे लागत नाहीत, हाताला चिकटत नाहीत, लगेच बनवून होतात.
2. ते वाळले की तळून किंवा भाजी करून खातात.
3. उडदाचे कसे होतील माहीत नाही.
4. तेल अजिबात घालू नये, खवट होतात.
5. अजून कोणत्या भाज्या वापरता येतील ?
माहितीचा स्रोत:
यू ट्यूब
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय उरक आहे!
काय उरक आहे!
उडीद डाळ जास्त भिजविली आणि पीठ जास्त आंबवले का?
मस्त!
मस्त!
सांडगे जगातल्या आवडत्या पदार्थांपैकी एक ज्याच्याशी बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
भाताबरोबर पापड खावे तसे खायला आवडतात.
स्पेशली फोडणीचा भात. सोबत सांडगे आणि ताक! पुर्ण आहार
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर नवीनच आयडिया काढलीत. हे कोहळ्याचे सांडगे आहेत तसेच आपण लाल भोपळा, दुधी भोपळा, कारलं, दोडका, गवार, रताळे, नवलकोल वगैरेंचे पण करू शकू...
मी फक्त पापड सांडगे बोटाने
मी फक्त पोह्याचे सांडगे बोटाने घातले, 10 मिनिटांचे कॉन्ट्रीबुशन आहे.
उरलेले सर्व घरच्यांनी केले आहे.
कोहळा कापून अर्ध्या कोहळ्याचे व पोह्याचे आज केले , मग उडीद भिजवून ते करायला दुसरा दिवस उजाडला, तेंव्हा मी घरात नव्हतो, त्यामुळे का बिघडले , कल्पना नाही.
मस्त!
मस्त!
खूप छान.
खूप छान.
काय उरक आहे! << शमत.
काय उरक आहे!
<<
शमत.
छान.
छान.
ब्लॅककॅट, म्हणजे कुरुंदवाड ना? आपल्याकडे साबुदाणा घालून कोहळ्याचे सांडगे करतात ते बघितलेत का ?
साबुदाणा शिजवून घ्यायचा. पापड्यांना करतो तसा. पातळ. त्यात कोहळा बियां सकट घालून मिक्स करायचा. अक्ख्या बिया तशाच दिसल्या पाहिजेत. आणि मग पळीने सांडगे घालायचे. फार म्हणजे फारच सुंदर लागतात. (खुप कमी होतात आणि लगेच संपतात. )
साबुदाणा सांडगे तसेच करताना
साबुदाणा सांडगे तसेच करताना बघितले आहे, कोहळा न घालता
मुळात कोहळ्याचा वापर आपण फार कमी करतो , बाजारातही रोज येत नाही. शेताततरी मुद्दाम लावतात की सहज उगवून आले म्हणून दोनचार कोहळे उगवतात , समजत नाही
मस्तच.
मस्तच.
मस्तच. कोकणात तरी कोहळा
मस्तच.
कोकणात तरी कोहळा मुद्दाम लावत नाहीत . कोहळा कारण काय आहे माहीत नाही पण अशुभ समजला जातो। आपोआप वेल उगवला तर कोणी उपटून मात्र टाकत नाहीत.
पण घरात बांधून ठेवतात म्हणे
पण घरात बांधून ठेवतात म्हणे
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर
अरे वा ब्लॅककॅट, तुम्ही तर नवीनच आयडिया काढलीत. हे कोहळ्याचे सांडगे आहेत तसेच आपण लाल भोपळा, दुधी भोपळा, कारलं, दोडका, गवार, रताळे, नवलकोल वगैरेंचे पण करू शकू...>>>> डिजे, मला नीट रेसेपी मिळाली नाही, पण असेच भेंड वडे पण करतात. कोवळी भेंडी + दूधी + लाल भोपळा आणी आणखीन भाज्या ( कोणत्या त्या माहीत नाही ) फुड प्रोसेसरला ओबडधोबड म्हणजे जाडसर वाटाव्यात, वाटताना जीरे मिर्ची घातली तर चालते. किंवा खलात कुटाव्यात. मग त्याचे छोटे वडे करुन उन्हात वाळवावेत. छान लागतात. मी खाल्ले नाही पण बर्याच जणींकडुन ऐकले आहे.
कामांनी छान पद्धतीने चटकन करुन बघीतले. कोहळ्याचे तर होतातच पण कलिंगडाच्या ( खरबुजे ) पांढर्या भागाचे पण किसुन सांडगे करतात.
वैनी, या महिन्यात ऊन चढु
वैनी, या महिन्यात ऊन चढु लागलं की आपण दोघेही आपापल्या घरात हे तुम्ही सांगितलेले भेंडवडे करून बघु. या महिन्यात भाज्या पण जरा चांगल्या-तजेलदार-निरोगी असतात. सगळ्या पावशेर पावशेर आणुन घरी कुणाला काही न सांगता, कुणाची मदत न घेता हे करायचं अन वाळवत ठेवायचं.. चवीला चांगलंच लागेल यात वाद नाही त्यामुळे आपलीच कॉलर ताठ अन समजा नशीब फुटकं निघालं तर पावशेर-पावशेर अक्कलखाती जमा है कै अन नै कै.
आयडिया माझी नाही
आयडिया माझी नाही
युट्युबच्या आहेत.
पोहेवाले चांगले वाटले, आता तळल्यावर किंवा भाजी केल्यावर बघू
पूर्वी कोहोळ्याचे पाणी
पूर्वी कोहोळ्याचे पाणी (सोंवळ्याच्या) पापडांचे पीठ भिजवायला वापरीत असत. कोहोळा किसायला फार कठीण जातो म्हणतात. किसात जरा जास्तसा हिंग, थोडे मेथी दाणे वाटून आणि भिजवून वाटलेली उडीद डाळ मिसळून त्या मिश्रणाचे सांडगे घालतात. तिखटासाठी ओल्या मिरच्या वाटून किंवा सोंवळ्यातली मिरची पूड वापरीत असत. मी खाल्ले आहेत. तळून किंचित कडवट असे छान लागतात. पण जरा कडक कुडकुडीत होतात. कढीमध्ये मात्र बेस्ट. कढीत उरलेले सांडग्याचे गोळे मात्र खाववत नाहीत. नुसते फायबर्स आणि बिया.
कोहोळा किसायला फार कठीण जातो
कोहोळा किसायला फार कठीण जातो म्हणतात. >>>
नाही.. दुधी भोपळ्याइतका मऊ आणि सोपा असतो.
डिजे याच म्हणजे
डिजे याच म्हणजे जानेवारीच्या शेवटी आणी फेबच्या पहिल्या आठवड्यात त्या हिरव्या बुटक्या मिर्च्या येतात. त्याच सांडगी मिर्च्या. त्यात हिंग पावडर + मेथी पावडर, मीठ व धने पावडर एकत्र करुन भरुन वाळवायचे. हाय काय नी नाय काय. दुसरी सोपी आयडीया म्हणजे याच किंवा कुठल्याही फिक्या मिर्च्या मिक्सरमध्ये मीठ घालुन बारीक करायच्या त्यात धने व मेथी पावडर घालुन त्याचे छोटे सांडगे घालायचे , वाळवायचे. त्या भरायची दगदग नको.
ही पण भन्नाट आयडिया आहे..
ही पण भन्नाट आयडिया आहे.. तिखट मिरच्यांचे मिक्सरमधून वाटण काढून सांडगे..!
यात ते दुधी/कोहळा/लाल भोपळा यापैकी एकेके करून मिक्स केले तर तिखटाला उतार पडेल.. अन्यथा पंढरपूर-चिपळूण सुरू व्हायची
नाही हो डिजे, फिकट साध्या
नाही हो डिजे, फिकट साध्या मिर्च्या घ्यायच्या. कोल्हापूरी काळ्या गडद मिर्च्यांचे सांडगे खाणे म्हणजे आतड्याचा भोका भोकाचा बनियान होईल.
(No subject)
सांडगी मिरच्या जास्त तिखट
सांडगी मिरच्या जास्त तिखट नसतात, मसाला भरताना आधीच सगळ्या बिया काढतात, मग तळल्यावर तर अजूनच सपक होतात
पण घरात बांधून ठेवतात म्हणे >
पण घरात बांधून ठेवतात म्हणे >>> हे मी श्रीरामपुरला बघितलं, दारात बाहेरच्या बाजुने बांधून ठेवतात नजर लागू नये म्हणून, तिथे कोहळा आम्ही राहायचो तिथले कोणी खाण्यासाठी वापरायचे नाहीत.
कोकणात कोहळा असा बांधलेला बघितलेला आठवत नाही, सासरी माहेरी.
नगर भागात उपासासाठी कोहळ्याची
नगर भागात उपासासाठी कोहळ्याची भाजी करतात. बटाट्याच्या भाजीप्रमाणेच लागते.
ब्लॅककॅट यांची कोहळ्याच्या सांडग्याची रेसिपी मॉडिफाय करून उपासासाठी सांडगे बनवता येतील.
हो, युट्युबवर एक साबुदाणा
हो, युट्युबवर एक साबुदाणा घालूनही आहे
पेठा मला वाटते कोहाळ्याचाच
पेठा मला वाटते कोहाळ्याचाच करतात ना?
हो.
हो.
बग्गा.... मला वाटायचं दुधी
बग्गा.... मला वाटायचं दुधी भोपळ्याचे पेठे बनवतात.
चालतय वो
चालतय वो
युट्युबवर कोहळा आणि दुधीत फरक न समजणारे मोठे मोठे शेफ आहेत
रश्मी, तुझ्या दोन्ही पोस्ट्स
रश्मी, तुझ्या दोन्ही पोस्ट्स मधल्या रेसिपीज टेम्पटिंग वाटताहेत.
Pages