Submitted by ऋन्मेऽऽष on 8 January, 2022 - 10:41
कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेत कमी झाल्याने भरगच्च क्रिकेट आहे येत्या वर्षात. धाग्यावर चर्चाही तितकीच रंगू द्या
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/77883
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मागच्या धाग्यावरून
मागच्या धाग्यावरून
उस्मान ख्वाजाची एक अप्रतिम खेळी!!! ट्रॅव्हिस हेड ला कोव्हिड झाल्यामुळे त्याच्या जागी आलेल्या ख्वाजाने टेस्टच्या दोन्ही इनिंग्ज मधे शतक झळकावलं. व्हॉट अ परफॉर्मन्स!!
Submitted by फेरफटका on 8 January, 2022 - 11:26
>>>>
नुकतेच एका बातमीत/लेखात वाचलेले की कसे हॅरीस सातत्याने अपयशी जाऊनही संधी मिळतेय आणि उस्मान ख्वाजा मात्र डावलला जातोय.
अगदीच पटलेले.
आय ॲम आल्सो हॅपी फॉर उस्मान ख्वाजा
काल कॉमेंटेटर्स म्हणत होते कि
काल कॉमेंटेटर्स म्हणत होते कि हॅरीस च्या जागी ख्वाजाला संधी मिळू शकते. ती वैय्यक्तिक शतकं केली ना, मग भोगा आपल्या कर्माची फळं
ऑन अ सिरियस नोटः मला ख्वाजाला संधी मिळाल्यामुळे बरं वाटलं. त्याच्या खेळात एक फ्लेअर आहे. रिस्टी शॉट्स, रिव्हर्स स्वीप्स (टी २० झिंदाबाद), मस्त खेळतो. स्पिनर्सना खेळताना फूटवर्क अॅश्युअर्ड आहे. मोठे शॉट्स सहजतेनं खेळतो.
धमाल मॅच झाली.. टिपिकल ॲशेस..
धमाल मॅच झाली.. टिपिकल ॲशेस.. बोलंडने आठवी काढल्यावर अवघड वाटत होते.. पण वाचवला सामना एका विकेटने ईंग्लंडने.. अनिर्णित सामन्यातही असला थरार हिच कसोटी क्रिकेटची मजा..
लास्ट ओवरला स्मिथ v/s ॲंडरसन काँटेस्ट होते.
पण बॅटसमन स्मिथ नाही तर ॲंडरसन होता आणि बॉलर स्मिथ
हिच कसोटी क्रिकेटची कमाल
*हिच कसोटी क्रिकेटची कमाल* -
*हिच कसोटी क्रिकेटची कमाल* - +1
(शेवटच्या षटकातलं क्षेत्ररक्षकांचं फलंदाजाभोवतीचं कडं पाहून आपलीच फिरकी गोलंदाजी सुरूं असल्याचा भास झाला. )
थ्रिलिंग झाला कालचा दिवस.
थ्रिलिंग झाला कालचा दिवस. फ्रॅक्चर्ड बोटाने खेळत बटलरने एका बाजूने किल्ला लढवलाच पण बाकी इंग्लिश बॅट्समेन सुद्धा ह्या सिरीजमधे पहिल्यांदाच इतके टिच्चून खेळले (कलेक्टीव्हली).
न्यूझिलंड अक्षरशः पेटून खेळले बांग्लादेशविरूद्ध. लॅथम द्विशतकाच्या आणि कॉनवे शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहेत - कॉनवे तर उंबरठ्यावर उभा राहून एक पाय उचलून उभा आहे. २००३ च्या अॅडलेड टेस्टमधे द्रविड असा दिवसाखेर १९९ वर नाबाद होता आणि दुसर्या दिवशी त्याने द्विशतक झळकावलं होतं, त्याची आठवण झाली.
हा कॉनवे काही ऐकत नाही..
हा कॉनवे काही ऐकत नाही.. तिन्ही फॉर्मेट रनमशीन असल्यासारखे खेळतोय..तीस वर्षांचा आहे हा.. होता कुठे ईतके दिवस?
२००३ च्या अॅडलेड टेस्टमधे
२००३ च्या अॅडलेड टेस्टमधे द्रविड असा दिवसाखेर ९९ वर नाबाद होता आणि
>>>>>
थोडेसे कर्रेक्शन, द्रविड तिसऱ्या दिवशी १९९ वर नाबाद होता .. आठवणींशी थोडे विसंगत वाटले म्हणून लगेच चेक केले. दुसऱ्या दिवसाअखेरीस मूड डाऊन होता.. त्या टेस्टचा जवळपास प्रत्येक बॉल तेव्हा लाईव्ह बघायचे नशीब लाभले होते
करेक्ट! १९९. टायपो होता.
करेक्ट! १९९. टायपो होता. बदलतो. धन्यवाद!
मग भोगा आपल्या कर्माची फळं
मग भोगा आपल्या कर्माची फळं Wink >: ) थोडक्यात काय सिलेक्टर म्हटले कि सगळी कडचे सारखेच बाकी ऑसीज ना आपल्या सारखेच नॅचरल ओपनर्स मिळत नाहियेत - सगळे मारून मुटकून बनवलले आहेत.
राहाणे, पुजारा नि विहारी मधले कोण कोहली साठी जागा रिकामीकरेल असे वाटते ? मला विहारी वाटतो आहे.
सिराजच्या जागी उमेश कि इशांत ? उमेश असावा असे वाटते. त्याच्या इंग्लंड मधल्या बॉलिंग कडून बघून त्यात सुधारणा झाली आहे हे जाणवतेय. त्याचा अधिक पेस कामी येऊ शकतो जरी मधे रन्स देत गेला तरी.
मला विहारी वाटतो आहे.
मला विहारी वाटतो आहे.
>>>.
विहारीला त्याच्या रेग्युलर टर्नची वाट बघावी लागेल असे स्टेटमेंट द्रविडने दिलेय असे वाचले. म्हणजे क्लीअर आहे.
तसेच आश्विन हा आमचा परदेशातील
तसेच आश्विन हा आमचा परदेशातील अष्टपैलू स्पिनर आहे असे स्टेटमेंट कोहलीनेही दिल्याचे वाचलेय
कोहली अर्धशतक
कोहली अर्धशतक
अर्धशिल्लक
पंत सो फार सो गूड.. आज जबाबदारीने खेळताना.. द्रविडने कान टोचलेत
इंटरेस्टींग विकेट आहे.
इंटरेस्टींग विकेट आहे. कोहलीची इनिंङ कामाला आली नाहितर्काहि खरे नव्हते. राहणे ची शेवटची टेस्ट ठरणार असे दिसतेय.
कोहली छान खेळला. टोटली झोनमधे
कोहली छान खेळला. टोटली झोनमधे होता. मधे एक रबाडा - कोहली द्वंद्व पहायला मिळालं. अगदी स्टेन - तेंडुलकर द्वंद्वाइतका वेळ नाही पण जितका वेळ चाललं तितका वेळ ग्रिपिंग होतं. पुजारा आणि थोड्याफार प्रमाणात पंत ह्या दोघांनी जरा साथ दिली कोहली ला, पण बाकी अगदीच गंडले. Rahane continues to flatter to deceive. आता बॉलर्स के हवाले वतन साथियों.
कालचा खेळ कुणी पाहिला नाही का
कालचा खेळ कुणी पाहिला नाही का?
आपली सातवी विकेट २०५ वर गेली होती अन कोहली क्रीजवर सेट होता. त्यात आपण १० षटकं खेळून १८ धावांची भर घातली.
अफ्रिकेची सातवी विकेट १७६ वर गेली (पीटरसन क्रीजवर सेट होता). त्यात त्यांनी १४ षटकं खेळून काढली (पीटरसन गेल्यानंतर १२) अन ३४ धावा जोडल्या.
सद्य स्थितीतला जगातला वन ऑफ द बेस्ट पेस अटॅक बॅटिंगच्या बाबतीत बहुतांशी सपशेल शरणागती मोडमधे का असतो? पण त्यांना तितका दोष देण्यात अर्थ नाही कारण त्यांचं प्रमुख काम : विकेट्स घेणं हे ते (एखाद दुसरा अपवाद वगळता) चांगल्या प्रकारे करताहेत. अन त्यामुळेच आपण नं १ वर टिकून आहोत.
पण सुमारे २०२० पासून आपल्या टॉप अन मिड्ल ऑर्डर बॅटिंगचे वांदे चालू आहेत. २०२१ मधे रोहित-राहुलनी काही काळ दिलासा दिला होता. पण तो फक्त ओपनिंग पुरता. पहिले ६ बॅट्समन म्हणून जर विचारात घेतले तर आपण फार इन्कन्सिस्टंट खेळतोय. कुणी एक जण ही जबरदस्त फॉर्म मधे नाही (लबुस्काख्नी टाईप). मिड्ल अन लोअर मिड्ल ऑर्डरचं तळ्यात मळ्यात चालू आहे अन ते ही (रहाणेची मेलबर्नची खेळी वगळता) मोठ्या खेळीत कन्व्हर्ट होत नाहीये. (छोट्या खेळ्या सिच्युएशनली उपयोगी असल्या तरी खेळाडूंचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याइतक्या सॉलिड नाहियेत). रोहित ऐवजी आलेला मयंकाही असाच तळ्यात मळ्यात आहे.
या सिरीज नंतर पुढच्या सहा महिन्यांमधे इंग्लंडविरुद्धची एक टेस्ट अन श्रीलंका विरुद्ध दोन टेस्ट्स होणारेत. रणजी कपच्या भवितव्याबाबत काहीच क्लॅरिटी नाहिये. त्यामुळे या आऊट ऑफ फॉर्म प्लेअर्सना डोमेस्टिक खेळायची संधीही कितपत मिळेल कोण जाणे.
कोच द्रविड अन सपोर्ट स्टाफच्या म्हणण्यानुसार हे प्लेअर्स नेट्स मधे खूप चांगली बॅटिंग करताहेत, पण मॅचमधे मोठी खेळी होत नाहिये. पुढल्या काळात मॅच प्रॅक्टिस नसताना नुसत्या नेट प्रॅक्टिसच्या जोरावर फॉर्म परत मिळवणं अजून कठीण असणार आहे.
सप्टेंबर मधे ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार टेस्ट्स असणार आहेत. तोपर्यंत ही परीस्थिती सुधारायला हवी.
लंकेविरुद्धच्या दोन टेस्ट्स मधे होम पिचवर नवीन खेळाडूंना संधी देऊन बघायचं की जुन्या खेळाडूंना फॉर्म मिळवायच्या दृष्टीनी शेवटची संधी द्यायची हा यक्षप्रश्ण सिलेक्टर्स, कॅप्टन, कोच नि सपोर्ट स्टाफसमोर असणार आहे यात शंका नाही.
तुम्हाला काय वाटतं???
रहाणे नी 15 डावांमध्ये कधीतरी
रहाणे नी 15 डावांमध्ये कधीतरी एक अर्धशतक केले की इथले त्याचे भक्त कौतुक सुरू करतात, पण आजसरखा महत्वाच्या सामन्यात परत अपयशी झाला की काहीच बोलत नाहीत. राहणे चा हा शेवटचा सामना ठरो, पुजाराचा देखिल शेवटचा असला तरी काही हरकत नाही
पुजारानी दुसऱ्या अन् रहाणेनी
पुजारानी दुसऱ्या अन् रहाणेनी बाराव्या बॉल वर गचका खाल्ल्याने श्रीलंका सिरीज मधे अय्यर अन् विहारीला देशातल्या ट्रॅक वर खोऱ्यानी धावा काढून इंग्लंड दौऱ्यात टेस्ट करायच्या दृष्टीनी प्लॅन करता येईल.
सलामीला रोहित परतल्यानी तिथेही धावा होतीलच.
रहाणे अन् पुजाराला एक एक हरणाचं कातडं अन् एक एक आफ्रिकन शहाळं देऊन रवानगी एनसीए मधे करावी.
केवळ कप्तान असल्यानी कोहली त्यांच्या सोबत जाणार नाही.
कारण त्याचाही परफॉर्मन्स तितकाच वाईट आहे.
(तिसऱ्या टेस्ट मधे तो जरी बरा खेळाला असला तरी हे दोघे दुसऱ्या टेस्ट मधे बरे खेळले होते तसंच)
चुम्मा मस्तच खेळतोय आज. फुल्ल
चुम्मा मस्तच खेळतोय आज. फुल्ल कंट्रोलमध्ये दिसतोय. आता बॅडलक वा मस्ती नको. हे दोघे मिळून आणताहेत परत सामन्यात
चुम्मा अर्धशतक
चुम्मा अर्धशतक
क्लास इनिंग. असे वाटतेय कोहली वेगळ्या पिचवर खेळत होता आणि हा वेगळ्या. लंचपर्यंतची हायलाईटस म्हणजे याचेच शॉटस आहेत. कोहलीचे दोनतीन फाईनलेगला चौकार आहेत.
चुम्माचे आज शतक व्हायला हवे.. मजा येईल
येस्स येस्स येस्स...
येस्स येस्स येस्स...
ईंग्लंड ऑस्ट्रेलिया पाठोपाठ आता आफ्रिकेतही शतक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध गाबाला निर्णायक सामन्यात मॅच विनिंग खेळी..
ईंग्लंडविरुद्ध पुन्हा निर्णायक सामन्यात मॅचविनिंग शतक..
आजचेही पुन्हा निर्णायक सामन्यात निर्णायक डावात.. ही खेळीही आता विजयी सामन्याची होवो .. बोलो आमीन
आज ९९ वर असताना सिंगलचा विचार
आज ९९ वर असताना सिंगलचा विचार न करता पहिल्या दोन बॉलला बसून आणि कव्हर सोडून चौकार शोधायला जाणे .. हॅटस ऑफ पंत.. मन जिंकलेस
*चुम्माचे आज शतक व्हायला हवे.
*चुम्माचे आज शतक व्हायला हवे.. मजा येईल* - झालं, मजाही आली. अभिनंदन !
मजा नाही ओ आली..
मजा नाही ओ आली..
पंतचे शतक म्हणताना सोबत भारताचे २५०-२७५ पकडलेले..
पण झाले हे..
पंत बॅटिंग ला आला त्यावेळी 58-4 होते
त्यानंतर 140 रन निघाले
पंत - 100
बाकी 6 बॅटर - 29 (विराटला धरून)
Extra - 11
आता गोलंदाजांनी जिंकवून दिले तरच मजा.. हि ईनिंग हरलेल्या सामन्यात नकोय..
रहाणे आणि पुजारा शेवटची टेस्ट
रहाणे आणि पुजारा शेवटची टेस्ट खेळले का? ओपनिंगला शर्मा, लोअर मिडल ऑर्डरमधे जडेजा येतीलच. पुजारा - रहाणे च्या जागी शुभमन गिल, अय्यर, ऋतुराज पैकी कुणीतरी यावं.
पंत मस्तच खेळला आज. (वैय्यक्तिक) शतक झळकावलं (तो स्कोअर सुद्धा टीम टोटलमधेच अॅड केला). पण तरिही स्कोअर अजून तरी विनिंग वाटत नाहीये. अडीच दिवसात २०० चं टारगेट म्हणजे द. अफ्रिकेला आरामात खेळायची संधी आहे. एखाद्या बॉलरचा दिवस असला तरच भारताला संधी आहे.
रहाणे आणि पुजारा शेवटची टेस्ट
रहाणे आणि पुजारा शेवटची टेस्ट खेळले का? ओपनिंगला शर्मा, लोअर मिडल ऑर्डरमधे जडेजा येतीलच. पुजारा - रहाणे च्या जागी शुभमन गिल, अय्यर, ऋतुराज पैकी कुणीतरी यावं. >> थोडा विचार केला तर जाणवेल कि पुजारा नि राहाणे च्या जागी जे येणार तेही अतिशय
तंत्रशुद्ध आहेत असे नाही. किंबहुना, विहारी वगळता बाकीचे लिमिटेड क्रिकेट चे प्रॉडक्ट्स आहेत , त्यांची डोमेस्टिक कामगिरी दैदिप्यमान वगैरे नाही. त्यामूळे त्यांना पुजारा नि राहाणे पेक्षा अधिक लाँग रोप्स द्यावे लागणार हे उघड आहे. भारतीय पिचेस वरून केलेल्या धावा नि बाहेर केलेल्या धावा ह्यात अंतर असणार हे जाहीर आहे. आपण वेळेत नवे प्लेयर्स ग्रूम केले नाहीत हे खरय. "लंकेविरुद्धच्या दोन टेस्ट्स मधे होम पिचवर नवीन खेळाडूंना संधी देऊन बघायचं की जुन्या खेळाडूंना फॉर्म मिळवायच्या दृष्टीनी शेवटची संधी द्यायची" ह्याचे उत्तर माझ्यापुरते तरी राहाणे च्या जागी कोणाला तरी संधी द्यावी नि पुजारा ला सध्या तरी हात लावू नये असे आहे. एका वेळी एकच बदल बरा. (इंग्लंड ची मॅच मी तरी आपण हरणार असे धरून चाललो आहे - आपला एकंडर पहिल्या सामन्याचा रेकॉर्ड बघता)
अश्विन ची एकंदर लिमिटेड बॉलिंग ( नि त्याचा वापर) वगळता ह्या टेस्ट मधे त्याच्या जागी विहारी चालला असता असे वाटू लागलय.
आपला एकंडर पहिल्या सामन्याचा
आपला एकंडर पहिल्या सामन्याचा रेकॉर्ड बघता >>> आफ्रिकेत उलटे होतेय
आश्विनला खरेच या सामन्यात खेळवायचे नव्हते. गेल्या दौऱ्यातही बहुधा आपण जो एकमेव सामना जिंकलेलो तो आश्विनला वगळून सारे वेगवान खेळवल्यावर...
पण विराटवर आश्विनला खेळवायचे प्रेशर आहे का असे वाटतेय.. ईंग्लंडला त्याला खेळवत नव्हता. आश्विनवर तो अन्याय करतोय असा ओरडा होता. आणि आता या सामन्यापुर्वी स्टेटमेंट दिलेले की आश्विनसारख्या अष्टपैलूची संघाला गरज आहे.
पुजाराने हातातली कॅच सोडली.
पुजाराने हातातली कॅच सोडली. ती सुद्धा पीटरसनची. हेच व्हायचे बाकी होते.
सलग दोन सामन्यांमधे आपल्या
सलग दोन सामन्यांमधे आपल्या बोलिंग युनिटला चौथ्या डावात चांगली बोलिंग टाकूनही विकेट्स मिळल्या नाहीत आणि आपण मॅच हरलो.
आपण वेळेत नवे प्लेयर्स ग्रूम केले नाहीत हे खरय >> आणि एका वेळी एकच बदल बरा>>
पहिल्या कारणामुळेच मला आता दोन बदल करायची गरज जास्त वाटते आहे. आणि टोटली नवीन लोक (मिड्ल ऑर्डर मधे गिल / ऋतुराज) ट्राय करण्यापेक्षा मला अय्यर (३) - विहारी (५) ला खेळताना बघायला आवडेल.
सलग दोन सामन्यांमधे आपल्या
विकेट मिळवण्यासाठी फार डेस्परेट वाटत होते. पेशन्स ठेऊन सेट अप करा हे फार कमी दिसले. थोडावेळ दिसायचे पण विकेट न आल्याने पुन्हा उतावीळपणा. अन्यथा पुर्ण ईनिंगभर पिचची मदत पाहता ईतके सहज चेस होऊ देणे हे गोलंदाजांचे अपयशच आहे. एकाही गोलंदाजांचा एकही चॅलेंजिंग स्पेल त्यांना पडलाच नाही. सलग दोन सामन्यात अननुभवी फलंदाजांसमोर हे झाल्याने नक्कीच गोलंदाजी युनिटचे अपयश म्हणावे. भले सामना गमावला फलंदाजांनीच असला तरीही..
शर्मा असता तर सिरीज जिंकलो
शर्मा असता तर सिरीज जिंकलो असतो.
Pages