कोविड लसीचा अनुभव

Submitted by च्रप्स on 19 March, 2021 - 22:23

मित्रांनो, तुम्ही कोविड लस घेतली का?
आमची पुढच्या आठवड्यात अपॉइंटमेंट आहे, moderna मिळेल आम्हाला.
तुमचे अनुभव कसे आहेत, साईड इफेक्ट्स जाणवतायत का काही?
इथे चर्चा करूया का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Bharat Biotech to supply its COVID vaccine at Rs 600/dose to state govts, Rs 1,200/dose to pvt hospitals: Statement
यांनाही सुपरप्रॉफिट हवाच की.

moderna vaccine मुळे कोणी उष्णतेचा त्रास अनुभवला का? आईला moderna vaccine मिळाली आणि तेव्हा पासून उष्णतेचा त्रास होतोय.

Screenshot_20220111-195001~3.pngतिसरा डोस घेतला
आमच्याच हॉस्पिटलात घेतला, लगेच झाले

संध्याकाळी कोविनवर सर्टिफिकेट डाउनलोड केले , त्यात तिसरा डोसही दाखवत आहे

वा! अभिनंदन. आता तुम्ही ओमेक्रॉन ला मास्क फेडून अन छाती फाडून सामोरे जा.

बादवे. ज्या राज्यांत इलेक्शन्स लाग्लीत तिथे ईसीने ते भेसूर थोबाड दिसणं बंद केलंय म्हणे.

(हे म्हणजे इसी कसं स्वतंत्र वगैरे आहे हे आर्ग्यू करायला, अन अर्गो, एव्हीएम बरोबरच आहे हे सांगायला भक्तांडांना/भक्त-लांड्यांना मोकळीक मिळावी म्हणून केलेलं नाटक आहे हे सिंपल डिंपल.)

This creep gets even his photo on certificate updated with different fashion everytime, AND, public faces problems in updating their own ADHAR data.. विकृती भरलीय इथे सगळी.

निवडणुका असलेल्या राज्यात कोविड लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो असणार नाही, इलेक्शन कमिशनचा निर्णय

Vaccine certificates issued in 5 poll-bound states won't have PM Modi's picture

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/covid-vaccine-certi...

असे वाचले की अमेरिकेत फायझर दहा शॉट्स चे गोळे असणारी कार्ड वाटणार आहे. पहिला शॉट, दुसरा शॉट, बूस्टर १, बूस्टर २..... बूस्टर ८. जसेजसे टोचणे होईल तसे ह्या गोलात शिक्के मारले जातील. आणि शेवटी दहा शॉट घेणारा जिवंत राहिल्यास त्याला छानसे बक्षीस मिळेल. कित्ती छान आहे ना कल्पना?

हो मी पण ऐकलं हे. पण दहा वर्ष्यांनंतर ज्याचे सगळ्यात जास्त शिक्के रिकामे असतील त्याला बक्षिस आहे ना? शेंडे तुमचे पहिले तीन रकाने रिकामे आहेत का हो?
आमच्याइथे क्यबेकमध्ये ज्यांनी शॉट घेतले नाहीत त्यांना मेडीकल टॅक्स लावता येईल का याची चाचपणी करताहेत. त्यांच्यामुळे मेडिकल सिस्टिमचा नाहक खर्च वाढतो तो वसुल पण त्यांच्याकडूनच झाला पाहिजे असं प्रिमियर सांगत होता आज प्रेस कॉन्फरंस मध्ये.

>>कित्ती छान आहे ना कल्पना?<<
आय्ला हे म्हणजे इथले स्मॉल बिझ लॉयल्टि कार्ड देतात तसंच झालं. दहा शॉट्स टिक झाले कि बोनस शॉट (ढुंगणावर?)... Lol

दोन शॉट्स झाल्यावर आम्हि मारे लॅमिनेट करुन घेतली आमची कार्डं; बुस्टर शॉटने पोपट केला...

बहुधा हे बक्षीस म्हणजे आणखी दहा गोल असणारे कार्ड असावे. फायजर निव्वळ दहा टोचे मारून समाधानी होणारा अल्पसंतुष्ट नसावा.
ग्रीक अक्षरे संपली तर हिब्रू, अरबी अक्षरे वापरणार आहेत म्हणे!

>>>>>>>>दोन शॉट्स झाल्यावर आम्हि मारे लॅमिनेट करुन घेतली आमची कार्डं; बुस्टर शॉटने पोपट केला...
आमच्या न्यु जर्सीत 'डॉकेट' नावाचे गवर्न्मेन्टचे (बहुतेक) अ‍ॅप आहे. आपला एसेस एन घातला की लगेच आपल्या शॉटसचा डेटा येतो. की अमक्या तारखेला पहीला शॉट मग त्या तारखेला दुसरा, बुस्टर वगैरे वगैरे.

>>आपल्या शॉटसचा डेटा येतो. <<
बर्‍याच स्टेट्सनी आपापले अ‍ॅप्स बनवले आहेत किंवा आउट्सोर्स केलेले आहेत; आमचं स्टेट थोडं ओल्ड स्कूल आहे. अ‍ॅपल वाज सपोज्ड टु रोल औट वॅक्सिनेशन कार्ड अ‍ॅज पार्ट ऑफ इट्स हेल्थ अ‍ॅप इन आयोएस १५; डिडंट हॅपन. ते येइस्तोवर आमची मदार फिजिकल कार्ड आणि स्कॅन्ड कॉपिवर...

Pages