हल्ली मॉल मध्ये आणि online सगळे ब्रँडेड ड्रेसेस असतात त्यातील काही खरंच खूप चांगल्या क्वालिटी चे असतात तर काही नावाजलेले ब्रॅण्ड्स चे कपडे सुद्धा अतिशय सुमार दर्जाचे असतात. मी शक्यतो बिबा चे ड्रेसेस घेत नाही कारण मला ते overpriced वाटतात. पण माझ्या मैत्रिणीने ब्रँड महत्वाचा असतो ग, लुक येतो त्याच्यामुळे असे म्हणाल्यामुळे आणि डिस्काउंट असल्यामुळे मी ५००० चा ड्रेस २२०० ला घेतला. कापड अतिशय सुमार वाटले पण आता ठरवले आहेच तर घेऊ असा विचार केला. पण घरी येऊन घालून बघितला तर पश्चाताप झाला (खूपच ट्रान्स्परन्ट आणि लगेच फाटेल कि काय अशा type चे कापड होते ) अशी quality असून पण फक्त ब्रँड म्हणून बायका घेतातच कसे असे कपडे? असा विचार पण मनात आला. का मी जगाच्या मागे आहे, फॅशन सेन्स वगैरे नाही अस काही आहे ?असे प्रश्न पडले. तुमच्यातील कुणाला असा अनुभव आलाय का? का मला माझी विचारसरणी बदलण्याची गरज आहे.
ब्रँडेड ड्रेसेस च्या खरेदी बाबतीत आपलं काय मत आहे ?
Submitted by मी फुलराणी on 11 January, 2022 - 04:07
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
का मी जगाच्या मागे आहे, फॅशन
का मी जगाच्या मागे आहे, फॅशन सेन्स वगैरे नाही अस काही आहे ? >>> असं काही नाही हो , आपल्याला जे comfortable असेल तेच घ्यावं, आणि ब्रॅंड पेक्षा quality महत्वाची, किंमत काहीही असो ते आपण आपल्या बजेटनुसार बघतोच. मलाही फार नाही आवडत बीबा , Pantaloons , big bazar चे कपडे कारण नुसतं brand च्या नावाखाली वाटेल त्या किंमती असतात. तरीही आपण काही घेतलं महागाचं आणि कुठे घालून गेलो तरी आपलाच ड्रेस सुमार वाटतो इतरांपुढे . ते असे मॉल मध्ये ढीगाने जी दुकाने असतात आणि त्यात जे ढीगभर कपडे असतात ते खरंच कितपत बायका घेत असतील असं नेहमी वाटतं.
बिबा चा एक ड्रेस होता
बिबा चा एक ड्रेस होता माझ्याकडे. फारच अजागळ डिझाइन होती. त्यावर बुट्ट्या होत्या गोल्डन. त्याच्या तारा ड्रेस च्या आतून मला टोचायच्या.
Fab india याचा पण असाच अनुभव फारच तलम कापड होते.
काही धुण्यात फाटले पण.
reyon avasa कपडे छान वाटतात पण घरी वापरण्यास.
Chanderi silk आजकाल फार कॉमन झाले आहे. Multiple wash नंतर त्याचीही लक्तरं झालेली असतात.
यावर्षी cotton ड्रेस मटेरियल आणून शिवून घेतले. ओढणी सहित येतात.
Biba che इतरही ड्रेसेस ठिगळ जोडल्या सारखे होते.
तुम्ही डिस्काउंट मध्ये घेतलात
तुम्ही डिस्काउंट मध्ये घेतलात त्यात काही प्रॉब्लेम असेल म्हणूनच भाव कमी केला. नाहीतर बिबा ब्रांड मस्त आहे.
माझे फेवरिट खालील प्रमाणे.
वेस्ट साइड कुरते अल्टिमेट. वेल डिझाइन्ड व मटेरिअल मस्त खिसे वगैरे
ह्यांचा एक जिया म्हणून पण ब्रँड आहे. जरा वजन जास्त असल्यास फोर एक्स एल परेन्त मिलतात
फॅब इंडिआ कुर्ते पायजमे सल वारी, फुल ड्रेसेस साड्या सर्व मस्त. इथे पण डिस्काउम्ट मध्ये हाफ रेटला जुने माल मिळतात.
बिबा. बरेच दिवसात घेतला नाही. पन साडेतीस ते पन्ना स वयात भरपूर वापरले आहेत कपडे बिबाचे.
हस्तकला ठाणे ह्यांचे व्हिवी आना मध्ये आहे दुकान तिथे पण मस्त सिलेक्षन आहे. लिनन कुर्ते.
मार्क्स व स्पेन्सर इंडो वेस्टर्र्न वेस्टर्न्स एकदम मस्त फिटिन्ग व मटेरिअल्स,
एच अँड एम कॅजुअल व घरी घालायचे शर्ट शॉर्ट वगैरे मस्त. इनर वेअर मस्त.
इनर वेअर मध्ये इनॅमोर ब्रँड मस्त, मार्क्स स्पेन्सरस पण मस्त इनरवेअर साठी.
जॉब प्रोफाइल नुसार ब्रांडेड कपडे घातले तर इमेज छान राहते. व मला वाट्ते आय डिझर्व इट. तुमचा आउट लुक वेगळा असू शकतोच की.
छोट्या गावात छान मिळतीलच असे नाही. कदाचित जुना स्टॉक ठेवत असतील.
पूर्वी शॉप र्स स्टॉप मधील बिबा ड्रेसेस पण घेतले आहेत.
माज्य्याकडे एक मसबा ची साडी पण आहे डिझायनर.
पँटलून बिग बझार एकच कंपनी
पँटलून बिग बझार एकच कंपनी हे मास मार्केट वाले कपडे आहेत. टुकार डिझाइन व मटेरिअल. पब्लिक साठीचे कपडे असतात.स्वस्त व लगेच खराब होणा र ते ब्रेंड फॅक्टरी पण भिकार सिलेक्षन आहे.
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन गावठी कलेक्शन.
एफबीबी बकवास.
अनुभवातून अक्कल येते.
अनुभवातून अक्कल येते.
ईथे बायकांनीच बायकांच्या ब्रांडेड कपड्यांबद्दलच चर्चा करायची आहे की नाही याची कल्पना नाही.
पण कुठला ब्रांड खरेच वर्थ आहे हे थोडे ब्रांडेड कपडे वापरले की समजते.. फक्त पुन्हा पुन्हा त्याच चुका नाही करायच्या. आणि ट्रायल रूम वापरायचीच. भले कितीही गर्दी का असेना, आपल्या हिशोबाने वेळ घेऊनच वापरायची. कपडा अंगावर चढवल्यावरच फील येऊन कळते त्यासाठी किती पैसे मोजणे वर्थ आहे.
बरेचदा एखादा कपडा अंगावर घातल्यावर ईतके भारी वाटते, आपल्याला ईतका सूट होतो की खरे तर त्याची किंमत बघून कळते की हे त्या कपड्याच्या मानाने जरा महागच आहे. पण तरीही ते त्या वेळी मोजायचे असतात. कपडे हवे तर कमी घ्यावेत, पण मनात भरलेले घ्यावेतच. कारण आपण आवडीचे कपडे घालतो तेव्हा आपला मूड देखील प्रसन्न असतो. मी तर ऑफिसचे फॉर्मल कपड्यांचे सारे नियम धाब्यावर बसवून हवे ते कपडे घालतो. उदाहरणार्थ आमच्या पुर्ण ऑफिसमध्ये जवळपास अडिचशे तीनशे पुरुषांत सिक्स पॉकेट कार्गो स्टाईल वगैरे पँट घालणारा मी एकटाच आहे ईतर लोकंही पिकनिकना घालत असतील, पण ऑफिसमध्ये मात्र नियम पाळत बसतात.. मी हा हा करतो आणि पुन्हा मला हवे तेच करतो
माझी बायको मला शॉपिंगबाबत पक्की ओळखते. मी मनात भरलेले एखादे शर्ट किंमत बघून पुन्हा जागेवर ठेवतो. आणि तासभर मॉल फिरून पुन्हा तेच घेतो. यावरून नेहमी तिच्या शिव्या खातो अध्यमध्ये तीच मला सांगते, बस रे, आणा आणखी नको फिरवूस, तू फिरून पुन्हा तेच घेणार आहेस
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन गावठी कलेक्शन.>> मला वाट्ते नॉर्थ इंडी या मधील मध्यम वयीन ललना घालत असतील. त्यातल्या त्यात फॅ शनेबल अश्या. गृहिणी टाइप डिझाइन्स वाटतात. मी पण त्या फेज मध्ये घेतले आहेत. आता ते वय नाही. आता वेस्ट साइड फॅब इन्डिआ व मार्क्स अॅण्ड स्पेन्स र बेस्ट आहेत. खरेतर इन्स्टाग्राम वर भरपूरच एक्स्क्लुजिव आहेत तरुणींसाठी ते चेक करा. रेट्स पण रीझनेबल आहेत. पण इथे ते लिहिलेले फारसे कोणास पचत नाही.
आय टोकरी/ जेयपोर साइट पण बघा. मी शो बघा. मी काही तिथून घेत नाही.
अजून एक म्हणजे आमचे हैद्राबादचे दस्तकार आंध्रा. बेस्ट कपडे. साड्या.
मुंबईत असाल तर फीनिक्स
मुंबईत असाल तर फीनिक्स वरळी इथे झारा, शनेल स्टीव मॅडेन व इतर उपलब्ध आहेत. अगदी खास ऑकेजन असेल तर घ्यायला हरकत नाही.
इथे मसबा शॉप पण आहे. मसबाचे कपडे ऑनलाइन पण आहेत मला साडी घरपोच मिळाली.
सिक्स पॉकेट कार्गो स्टाईल पँट
सिक्स पॉकेट कार्गो स्टाईल पँट पुरूषांसाठी>>>>> हि फैशन दहा बारा वर्षापूर्वी होती ना?? कारण नवरा याच स्टाईलच्या घ्यायचा..कॉटन किंग च्या कार्गो चा इतका भयानक अनुभव आला होता तेव्हा. पहिल्या वॉशमधेच रंग गेला होता.आणि धब्बे पडले होते .वापरण्यायोग्य राहिल्या नव्हत्या. अजूनही आहे का तो ब्रैन्ड??
ब्रँडेड कपडे घेतले म्हणजे
ब्रँडेड कपडे घेतले म्हणजे फॅशन सेन्स असतोच असं नाही. काही जणी जास्त पैसे खर्चुन कायतरीच (मला कायतरी वाटणारे) घेतात.
कापड आणून शिवून घ्यावे
कापड आणून शिवून घ्यावे
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन
बिबाचे कुरते कोण घालतं? तद्दन गावठी कलेक्शन.>> मला वाट्ते नॉर्थ इंडी या मधील मध्यम वयीन ललना घालत असतील. त्यातल्या त्यात फॅ शनेबल अश्या. गृहिणी टाइप डिझाइन्स वाटतात. >>>> काही काही असतात मस्त . शोधून काढायला लागतात . माझ्याकडे एक होता बिबाचा ड्रेस - अनियन पिन्क कलर आणि त्यावर नाजूक फुले , गळ्याला सोनेरी पायपिन - एक्दम एलिगन्ट . आणि एक निऑन पिस्ता कलरचा . तोपण मस्त .
W चे पण काही काही कुडते मस्त असतात.
मला कलाकेन्द्र मध्ये चांगले कपडे मिळतात , आमच्या बोरीवलीला कलापि आहे . त्याच्याकडचे कुडते एक्दम ट्रेन्डी आणि वाजवी .
मला चक्क फॅबमधे वाईट कुर्ते
मला चक्क फॅबमधे वाईट कुर्ते मिळाले आहेत. दोनदा घालूनच विटले ते.
फॅब आणि बिबा चा "माझा" अनुभव-
फॅब आणि बिबा चा "माझा" अनुभव- नाव मोठं न् लक्षण खोटं..
हि फैशन दहा बारा वर्षापूर्वी
हि फैशन दहा बारा वर्षापूर्वी होती ना?>>>>
होय गेल्या दशकात होता तो ट्रेंड, माझ्याकडे तेव्हा होत्या
आता आऊटडेटेड झालाय तो प्रकार
कॉटन किंग बाबत अनुमोदन, बळच महाग आणि फालतू
ब्रँड ते ब्रँड फरक पडतो.
ब्रँड ते ब्रँड फरक पडतो.
ब्रँड का?
१. काही लहान ब्रँड किंवा नॉन ब्रँड साइझ, उंचीच्या बाबत कापडात काटकसर करतात (म्हणजे त्यांचा एम आणि एल मध्ये फक्त उंचीत फरक असेल, रुंदीतला फरक लक्षात घेतलेला नसतो, किंवा घेतला तर अर्धा इंच वगैरे.) लेगिंग च्या बाबत हे नेहमी होतेच.
२. कपडा चांगल्या टिकाऊ, घट्ट वीणीचा , रंग टिकेल असा आपण बघून घेतोच. पण या कपड्यावर केलेलं काम्/वापरलेल्या टिकल्या/दोरे हे टिकाऊ रंगाचे, साबणाने ५ धुण्यात रंग, चमकी न उडणारे वापरावे लागतात. ब्रँड मध्ये असे वापरलेले असण्याची शक्यता वाढते. लहान मुलांच्या नॉन ब्रँड कपड्यात खडे, सॅटिन बो चक्क फेव्हि क्विक किंवा फॅब्रिक ग्लू ने चिकटवलेले असतात. ५ धुण्यात किंवा हाताने खेळ केल्यास हे निघून तिथे कायमचा ग्लू चा डाग उरतो फक्त.
३. कपड्याचा स्लिव्ह चा आणि कमरे पासून खालचा कट. हा नीट कधीकधी नॉन ब्रँड मध्ये मिळतोही. पण बरेचदा मिळत नाही.
४. रंग संगती: आपल्याला आवडणार्या रंगावर काहीतरी विचीत्र रंगाची बॉर्डर, किंवा त्यावर आपल्याला न आवडणारं काम असतं. ब्रँड मध्ये असं नसण्याची शक्यता वाढते.
५. नॉन ब्रँड मध्ये वॉश सूचना वाले लेबल काही वेळा नसते. ते कपडे भगवान भरोसे धुवावे लागतात.
बायकांचे एथनिक कपडे नश्वर प्रकार आहे. अगदी ५००० चा ड्रेस घ्यावा आणि त्यावरच्या सोनेरी नक्षीचे भूत व्हावे ४ महिन्यात. बिबा काय फॅब काय. फॅब वाले ऑरगॅनिक रंग वापरत असल्याने रंग काही कपड्याचे अगदी १० व्या धुण्यात पण जात राहतात.
नॉन ब्रँड मध्येही काही विश्वासाचे दुकानदार शोधून चांगले कपडे मिळतात. फक्त तो शोधायला जरा वेळ द्यावा लागतो.
डिस्काउम्ट मध्ये हाफ रेटला
डिस्काउम्ट मध्ये हाफ रेटला जुने माल मिळतात. >>>>>ते कधीतरी नवीन असतातच ना। म्हणजे तेव्हा खरेदी केल्यावर ते चांगले आणि थोडे जुने झाले म्हणून डिस्काउंट मध्ये विकले तर ते FAULTY किंवा चांगले नाहीत असे असते का ????
बायकांचे एथनिक कपडे नश्वर
बायकांचे एथनिक कपडे नश्वर प्रकार आहे. अगदी ५००० चा ड्रेस घ्यावा आणि त्यावरच्या सोनेरी नक्षीचे भूत व्हावे ४ महिन्यात. बिबा काय फॅब काय. फॅब वाले ऑरगॅनिक रंग वापरत असल्याने रंग काही कपड्याचे अगदी १० व्या धुण्यात पण जात राहतात.
नॉन ब्रँड मध्येही काही विश्वासाचे दुकानदार शोधून चांगले कपडे मिळतात. फक्त तो शोधायला जरा वेळ द्यावा लागतो. >>> सं ह म त .
हि फैशन दहा बारा वर्षापूर्वी
हि फैशन दहा बारा वर्षापूर्वी होती ना?>>>> तेव्हा उठसूठ कोणीही घालायचे. त्यामुळे मी घालायचो नाही.
कॉटन किंग च्या कार्गो चा इतका भयानक अनुभव आला होता तेव्हा. >>> हो त्या बंडल असायच्या. त्याच काळात या फॉर्मात होत्या. आता मी घेतो त्या छान सुळसुळीत असतात आणि बहुधा थ्री ईन वन घेतो. म्हणजे खालून फोल्ड करून थ्री फोर्थही करता येतात आणि चैन खोलून खालचा पार्ट वेगळा केला तर शॉर्ट सुद्धा होते. एकदा हे ऑफिसवाल्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी मला त्याची शॉर्ट करून घालायचे आव्हान दिले. लंचटाईम ते ऑफिस सुटेपर्यंत. अर्थात ती पैज मी जिंकली आणि चिकन बिर्याणी पटकावली. अॅक्चुअली बिर्याणीची पैज लावली नसती तरी मी हे करू शकतो हे सिद्ध करायला म्हणून मी ते केले असते. कारण लोकं कपड्यांच्या नावावर खूप शिष्टाचार बनवून ठेवतात जे मला बिलकुल पटत नाही. कपडे आपण आपल्यासाठी घालतो न की लोकांना बघायला कसे वाटतात यासाठी घालतो. ऑफिसमध्ये फॉर्मलच कपडे हवेत, लग्न समारंभात ट्रेडिशनलच हवेत, पिकनिकला जीन्स थ्री फोर्थ टीशर्ट वगैरेच हवे हे नियम जोपर्यंत आपल्या कम्फर्टनुसार जाताहेत तोपर्यंतच पाळावेत. पण हे असेच नियम आहेत, जग असेच घालते म्हणून बिलकुल भाव देऊ नये असे मला वाटते..
पूर्वी वेस्टसाईडचे कपडे घेतले
पूर्वी वेस्टसाईडचे कपडे घेतले आहेत जे चांगले होते. इथे जनरली ड्रायक्लिन केले जातात त्यामुळे जास्त टिकतात. मशीनमधे मी चांगल्यातले सलवार कमीज वगैरे कधीच टाकत नाही. त्यामुळे वाईट अनुभव असा नाही आलेला.
ह्यावर्षी मला डोंबिवलीत मॉलमध्ये ऊत्सा नावाचा ब्रँड दिसला. चांगले कपडे होते. मी जो ड्रेस घेतला तो कॉटन्+लिनन असा मिक्स आहे. सिंपल आहे पण एलेगंट आहे.
डिझायनर कपड्यांच्या किंमती मात्र काहीच्या काही दिसतात. नावाचं लेबल लागलं की काहीही मागायला मोकळे.
माझ्या ऑफिसमध्ये मी सदा 3/4
माझ्या ऑफिसमध्ये मी सदा 3/4 आणि टीशर्ट घालून वावरलो
पावसाळ्यात सुटसुटीत कारण पॅन्ट खालून भिजण्याचे चान्सेस कमी
त्यात मी अनेकदा सायकलने जायचो त्यामुळे घामाने भिजलेला टीशर्ट, हातात हेल्मेट, पाठीवर उडलेले स्प्रे पेंटिंग, पायात सँडल अशा अवतारात माझी ऑफिसला एन्ट्री व्हायची
नंतर सगळ्यांना त्याची सवय झाली
मला त्यासाठी चिकन बिर्याणी मिळू शकते हे आधीमहिती असते तर
श्या
सर्व ब्रँडेड कपडे
सर्व ब्रँडेड कपडे बांग्लादेशात/ थोड्या प्रमाणात भारतात वा पाकिस्तानात शिवून दुकानात २ रुपयांचं ब्रँड लेबल चिकटवलं की १० चे १० हजार रुपयांचे होतात. तेव्हा क्वालिटी वगैरे कापडाला हात लावून अन अंगावर दिसतोय कसा, हे पाहून ठरवावी असे माझे मत.
यामुळेच आमच्या लोकल सतीष टेलरने शिवलेला सूट त्याच्या 'ब्रँड'च्या कवरमधे घालून मी बिन्धास्त सर्व कॉन्फरन्सेस मधे पंचतारांकित हॉटेलांत मिरवतो. अंगावर घातल्यावर दिसतोही सुंदर अन कंफर्ट के तो क्या कहने. पूर्वी कधीकाळी 'एमार'ने दिलेल्या ब्रँडेड ब्लेझरचे कव्हर त्याच्याच(सतिष टेलर) सूटसाठी वापरले होते काहींदा. फाय्स्टार हाटेलात 'इज्जत' कमी व्हाय्ला नको म्हणून. बट अजकाल आय अॅम युजिंग 'हिज' क्रिएशन्स फॉर सिंपल रीझन की इट्स मच मच मोअर कंफर्टेबल दॅन ऑफ द रॅक कपडे. सो व्हाय नॉट गिव्ह हिम क्रेडिट? (स्वगत : हे ब्रँडवाले काय लाखोंचा युजरबेस घेऊनच पैदा झाल्ते की क्वाँय? टीप : ब्रँडवाले. बँडवाले नाही) बिसाईड्स, इन धिस काँफरन्स, आय अॅम द ब्लडी फॅकल्टी. मै शिक्वेंगा वो नया टेक्निक पब्लिक शिकेंगा. ऐसेहिच मै करेंगा वो फ्याशन. तेव्हा, ब्र्यांडेड ब्यांडवाले, एन्ज्वाय.
नॉर्मली देखिल "टेलरमेड" नेहेमीच जास्त कॉस्टली/हायर क्वालिटी असतात. (आमचा सतिष फारच स्वस्तात देतो ते अलाहिदा. त्याची शोरूम आयडिया भारी आहे. कापड दुकान प्लस शिवण दुकान. कपडाही तिथेच घेता येतो अन लगेच शिवूनही मिळतो.) लोक उग्गाच टेलरचा ही 'कचिन्स' वगैरे ब्रँड करून उग्गं सॅविल रो वगैरे स्टाईल भाव मारत फिरतात.
मला व्यक्तिशः ब्रँड ओळखू येत नाहीत. त्यामुळे समीर वानखेड्याने घातलेला टीशर्ट दीड लाखाचा आहे हे ट्विटरवर कळले.
मला ब्रँड्स ओळखू येत नाहीत तसेच ते ९९% भारतीयांनाही ओळखू येत नाहीत. त्यामुळे मी ऑडीमधे फिरतोय की इंडीकामधे यातून त्यांना माझ्या 'स्टेटस' ची जाहिरात कळत नाही. शिवाय इंड्यन रस्त्यावर स्पीडब्रेकर आला किंवा डुक्कर आडवं पळत गेलं की ऑडी अन इंडिका यांत इंडिका नेहेमीच जिंकते. शिवाय यु क्नो, 'एवरेज' अँड 'रिसेल व्हॅल्यु'?
हेच लॉजिक मी कपड्यांतही वापरतो.
अन खरं तर या करोनापासून मी अॅब्सोल्यूट २ सेट कपड्यांवर जगतोय. २ टी अन २ पँट्स. दवाखान्यात जाण्याचे कपडे घरी येउन तात्काळ धुवायला जातात. दवाखान्यात स्क्रब्स अन वरतून पीपीई.
आता डिजायनर पीपीई मिळत नाही, अन स्क्रब्ज खरंच सतिष टेलरनेच शिवलेले ब्रँडेड आहेत.
***
ता. क.
फ्याशन / करंट ट्रेंड्स वगैरे बद्दल :
एक विशिष्ट वय क्रॉस केलं की तुमचे प्रेफरन्सेस फिक्स होत जातात. (माझं अजोबा व्हायचं वय झालंय. :हाहा:)
उदा. मला मला टीशर्ट ला खिसा हवा असतो. मला ट्राऊजर नेहेमी प्लेट्स वाली, क्रॉस पॉकेट्स, अन एक वॉचपॉकेटवालीच लागते. ते लो वेस्ट वगैरे स्टुपिडीटी चालतच नाही. "च" खाली पंचावन्न अंडरलाईन्स. यासाठी आमच्या गावात एक स्पेशल जीन्स चं दुकान आहे, तिथे ऑब्स्क्युअर कंपन्यांचं लेबलवाल्या अश्या डेनिम जीन्स मिळतात. मी कायम तिथून घेतो, अन तिथला ऑल्टर मास्टर मला लग्गेच त्यात वॉचपॉकेट लावून अन त्या कंपनीचं लेबल गायब करून देतो.
सो, फ्याशनसाठी ब्रँडेड वगैरे अपुन को नही जमता.
आणि चिकन बिर्याणी पटकावली.
आणि चिकन बिर्याणी पटकावली.
<<
प्रॉबॅब्लि ट्रू स्टोरी.
एक गमतीदार स्टोरी सांगतो.
लाळेरं नामक एक प्रकार असतो. एक गळपट्टी अन समोर छोटं चौकोनी फडकं.
असं शर्टाऐवजी फक्त एक रंगीबेरंगी लाळेरं अन एप्रन घालून कॉलेज अटेंड केलंय
अरारा......:)
अरारा......:)
ब्रॅन्डेडचं फिटींग छान असतं. कधी कधी भरतकाम किंवा रंगसंगतीही खूप कल्पक असते. असं काही आवडलं तर घेते मी ब्रॅन्डेड पण हस्तकला वगैरे पेठांमधल्या दुकानांवर पण लक्ष असतं. आणि म्हणतात ना..सिप्लिसिटी ही जगात भारी फॅशन असते. आपलं जोरदार अनुमोदन आहे त्याला.
>> कापड दुकान प्लस शिवण दुकान
>> कापड दुकान प्लस शिवण दुकान. कपडाही तिथेच घेता येतो अन लगेच शिवूनही मिळतो.)>> हे हल्ली बरेच जणं करतात. त्यांचाही बिझनेस इन हाऊस रहातो आणि कस्टमरलाही बरी सोय मिळते.
ब्रॅन्डेडचं फिटींग छान असतं.
ब्रॅन्डेडचं फिटींग छान असतं.
<<
अक्का, हे एका ह्युमन अॅवरेजसाठी बरोबर आहे. (मला शाळेत 'शिवण' नावाचा विषय होता वर्क एक्स्पिरियन्ससाठी. मला मशिनवर कपडे शिवता येतात, अन हो. बंडि वगैरे बेतता ही येते. आय मीन रिफ्रेश केलं तर नॉलेज आहे)
तर, त्या विषयात शिकवले आहे, कीब ५०% लोकांना 'अॅवरेज फिटिंग' जमते. याचा अर्थ असा की उरलेल्यांना जमत नाही..
मला वाटतं आरारा टेलरमेड वि.
मला वाटतं आरारा टेलरमेड वि. ब्रँडेड तुलना करत आहेत, आणि ब्रँडेडचं फिटिंग छान म्हणणारे ब्रँडेड वि. आयते शिवलेले अशी.
फिटिंग टेलरमेडला सर्वोत्तम असेल, कारण तो... 'टेलरमेड' आहे. ते कुणीसं म्हटलंय ना, दुकानात अगासरशी असलेला कपडा घरी घेऊन आला की रामदासीबुवाची कफनी! ते आयत्या शिवलेल्या 'शा कलेल्शन' टाईप दुकानात व्हायची शक्यता फार.
तसं नाही म्हणायचं मला. टेलर
तसं नाही म्हणायचं मला. टेलर लोक ठरीव ठाशीव पद्धतीचं शिवण छान शिवतात पण ते फार टिपिकल असतात. असे स्टायलिश नव्या प्रकारचं
ज्ञान त्यांच्याकडे जरा उशीरा पोचतं. डिझायनिंगचा भागही जरा कमी असतो त्यांच्याकडे. त्यामुळे ब्रॅन्डेड + टेलरमेड दोन्ही असावं असं मत आहे बापडीचं.
सध्या टेलरमेड कपडे ब्रँडेड
सध्या टेलरमेड कपडे ब्रँडेड पेक्षा बरेच महाग पडतायत. काही काही बाबतीत मात्र इलाज नसतो.टेलरमेड चांगला टेलर भेटल्यास अगदी बेस्ट प्रकार.
डिकॅथलॉन चे मेन्स शर्ट तसे स्वस्त मिळतात आणि टिकतातही चांगले.
थोडक्यात डोळे घारीसारखे ठेवून चौफेर बघत रहावं लागतं.
चांगला कपडा वाजवी किंमतीत दिसला की सण वार मॉल फ्लीआ मार्केट फूटपाथ काही न बघता उचलायचा आणि डेटॉल मध्ये धुवून वापरायचा. कधीकधी नवे कपडे खूप काळ न वापरता जपून ठेवले तर त्यांना राग येतो आणि ते नंतर फिट व्हायला नकार देतात
नेहमीचे टेलर देखील कधी कधी
नेहमीचे टेलर देखील कधी कधी चांगल्या कापडाची वाट लावतात.
डिकॅथलॉन चे मेन्स शर्ट
डिकॅथलॉन चे मेन्स शर्ट
<<
स्पोर्ट्स इक्विपमेंट्स विकता येईनात म्हणून काय शर्टं विकायची का?
ईथे कोणी पुरुषमंडळी आहेत का
ईथे कोणी पुरुषमंडळी आहेत का जे शर्ट वा पॅंट आजही टेलरकडून शिवून घेतात ?
आम्ही कॉलेजात असताना जीन्स शिवून घ्यायचे फॅड आलेले. एक टेलर होता काळाचौकी की लालबाग परेळ कुठलातरी त्याच परीसरातला. त्याच्याकडेच डेनिमचे कापड घ्यायचे आणि मापात हव्या त्या स्टाईलची जीन्स शिवायची.. आमच्या बिल्डींगमधील एकूण एक पोरे त्याकडे जाऊन आलेले ..
तसाच एक लालबागचा बॉक्स कट हेअरकट मारणाराही आमच्या बिल्डींगमध्ये फेमस होता. त्याचाही लाभ एकूण एकाने घेतलेला. पण ते असो. ईथे विषयांतर होईल
आमच्याकडे आजही माझे सासरे
आमच्याकडे आजही माझे सासरे बाबूभाईकडून शर्टासाठी कापड घेऊन दादरच्या टिकरे टेलरकडे शिवायला देतात..तरी मी गेल्या इंडिया ट्रिपमधे मॅालमधून त्यांच्यासाठी एक पोल्का डॅाट्सवाला शर्ट घेतला होता.. तेवढा त्यांनी सगळ्यांच्या वाढदिवसाला घातला. पण तरीही पहिला प्रेफरन्स टिकऱयांनाच.
आम्ही कॉलेजात असताना जीन्स
आम्ही कॉलेजात असताना जीन्स शिवून घ्यायचे फॅड आलेले >> ५०० रूपयांत जीन्सचे कापड आणि जीन्स शिवून मिळायची.. गांधी मार्केटजवळ
आरारा, गंमत अशी की जे
आरारा, गंमत अशी की जे डिकॅथलॉन आम्ही पाहिलेले, तिथे लोक स्पोर्ट साधनांपेक्षा स्पोर्ट्स वेअर च्या खरेदी साठी जास्त जातात. हे शर्ट बहुधा ट्रेकिंग ला उन्हाळ्यात वापरायचे वगैरे असे म्हणून भारतीय हवामानाला चांगले आहेत.
<<< ५०० रूपयांत जीन्सचे कापड
<<< ५०० रूपयांत जीन्सचे कापड आणि जीन्स शिवून मिळायची.. गांधी मार्केटजवळ. >>> घाटकोपर चे गांधी मार्केट ना, तिकडे अजूनही गर्दी असते. फिटिंग मस्त असते शिवाय हवी तशी शिवून देतात. मी घेतल्यात शिवून त्यांच्याकडे.
बिबा, फॅब मला आवडत नाहीत. वेस्टसाईड चे आवडतात पण बरेचदा ते मला मोठ्या वयाच्या बायकांसाठी असावे असे वाटतात.
मी ब्रँडच्या फंड्यात जास्त पडत नाही, ते खूप महाग असतात, त्यापेक्षा आवडतील असे, रंगसंगती अन फिटिंग बघून घेते. किती टिकतील हा विचार डोक्यात नसतोच कारण फारतर दोन ते तीन महिन्यांत कंटाळा येऊन नवीन खरेदी करतेच . जीन्स मात्र ब्रॅण्डेडच घेते,
फक्त कपडेच नाही, ब्रँडेड
फक्त कपडेच नाही, ब्रँडेड फर्निचर सुद्धा. चांगले पैसे वाजवून घेतलेलं गोदरेजचं कपाट, त्याच्या बिजागर्या गंजून खल्लास झाल्या. आमच्या सुकडू सुताराने बदलून दिल्या तेव्हा जीव भांड्यात (आणि अनब्रँडेड कपडे कपाटात) पडले. हल्ली आय्किया की कायसं आलंय म्हणतात.
(गोदरेज कपाट आमच्या पणजोबांनी १९११ मध्ये जेव्हा ब्रिटीश सरकारनं रत्नांग्रीत थिबॉ पॅलॅस बांधलं तेव्हा घेतलं होतं, हे सांगायचं राहिलंच).
जिव्हाळ्याचा विषय
जिव्हाळ्याचा विषय
ब्रँड पेक्षा क्वालिटी महत्वाची..फिटिंग आणि लुक आपल्या ला सुट होतोय का हे ही महत्वाचे.
नाहितर काही महाभाग न विचारता तोंडानेच स्वतः सांगतात अमुक ब्रँड चा कुर्ता आहे वगैरे
बिबा चा एक ड्रेस होता माझ्याकडे. फारच अजागळ डिझाइन होती. त्यावर बुट्ट्या होत्या गोल्डन. त्याच्या तारा ड्रेस च्या आतून मला टोचायच्या.>>> सेम अनुभव मला ही आला. काही ब्रँडेड कपडे मला खूप मोठ्या शिवणीचे वाटले..म्हणजे फिटींग ला योग्य पण आपण त्यात खूप च मोठ्ठ्या दिसू असे मटेरियल.. लोल.
कधी कधी नॉन ब्रँड चे घेतलेले टॉप्स चिकार टिकलेले आहेत सो आय अॅम नॉट ए ब्रँड फॅन !
मला कुठल्याच ब्रँडेड
मला कुठल्याच ब्रँडेड कपड्याचं कधी आकर्षण होतं असं आठवत नाही. पूर्वी शिवून घेत असे . आता वेळेअभावी दुकानात जाऊन अंगात व्यवस्थीत बसणारे , जरा ऊठून दिसणारे कपडे घेतो. आणि इतर कुणी ब्रँडेड घातले असले तरी मला ते कळत नाही. त्यामुळे आपलेच कपडे वेगळे आहेत असे थोडेसुद्धा वाटत नाही.
आपल्यामुळेच आपण घातलेल्या कपड्याचा ब्रँड सुरु झाला आहे , आपणंच त्यांचे ब्रँड अँबेसेडर आहोत अशा आत्मविश्वासात वावरायचं. हे एकदा जमले की कुठलाही ब्रँड असो किंवा नसो काय फरक पडतो?
तुम्ही आमच्या ब्रँड चे कपडे घातले की तुमच्यात आत्मविश्वास येईल , तुम्ही चांगले दिसाल असे तुम्हाला पटवण्याचे काम जाहिराती करतात. पण खरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला भक्कम आत्मविश्वास असेल तर कुठल्याही ब्रँडेड किंवा अन ब्रँडेड कपड्यात तुम्ही सुंदर दिसता.
<< तुम्हाला भक्कम आत्मविश्वास
<< तुम्हाला भक्कम आत्मविश्वास असेल तर कुठल्याही ब्रँडेड किंवा अन ब्रँडेड कपड्यात तुम्ही सुंदर दिसता. >>
तुम्हाला आत्मविश्वास यावा किंवा चांगले वाटावे, म्हणून ब्रँडेड कपडे नसतात. ब्रँडेड कपडे/प्रॉडक्ट हे इतरांना ओळखू यावेत, म्हणून असतात. यातून एक मेसेज जातो की मला पण महागडे ब्रँडेड प्रॉडक्ट परवडतात आणि मी यशस्वी आहे. (त्यांची क्वालिटी चांगली असते, नाही असे म्हणत नाही, पण ती बाब दुय्यम आहे.) नाही तर उद्या कुणी प्राडाची पर्स घेऊन आफ्रिकेच्या खेडेगावात गेली आणि कुणाला कळलंच नाही, तर उपयोग काय त्या पर्सचा?
मला वाटतं ब्रँड चा उद्देश
मला वाटतं ब्रँड चा उद्देश फक्त ब्रॅग करणे हा एकच नाही(हो पण तो एक उद्देश असू शकतो)
वाढतं आर्थिक स्थैर्य यानुसार जर वाढतं आकारमान असेल तर आपण घेतलेले एल साईझ चे कपडे खरोखर एल साईझ चे असावे आणि नीट बसावे हा ब्रँड मागचा अजून एक उद्देश.स्वतःच्या एरियात नॉन ब्रँड ची चांगली दुकानं नसली(म्हणजे 3 बुटीक असतात, ती पण टॅक्स मध्ये तोटा दाखवायला काढलेली, त्यात 4 कपडे असतात, ते त्या एरियात गाळ्याचं भाडं वसूल करून नफा उरेल इतक्या किमतीत असतात.) तर नॉन ब्रँड चे चांगले कपडे मिळेपर्यंत करावा लागणारा प्रवास खर्च आणि वेळेचा पडतो.अश्या वेळी जवळ किंवा ऑनलाईन ब्रँड दुकान असेल तर थोडी खात्री असते, अमुक कपडा अमुक साईझ चा मिळेल आणि होईल असा.
थोडक्यात जर शरीरयष्टी प्रमाणात असेल, चांगली दुकानं जवळ असतील तर ब्रँड नॉन ब्रँड फरक पडत नाही.सगळं छान दिसतं.
लॉक डाउन मध्ये खरंच घरच्याच
लॉक डाउन मध्ये खरंच घरच्याच नॉन इस्त्री कपड्यात काम केले आहे. कपडे इज सच अ नॉन इशू नाउ.
गुजरात्यांच्यात जास्त दिसते ब्रँडचे. व प्रचंड कलर्स आणी लटकन फिटकन आरसे ह्याव अनत्याव.
आमच्या इथे सातव्या मजल्यावर एक बाई राहायची तिचे बुटीक होते ती लिफ्ट मध्ये भेटली की कायम दुकानात या तुम्ही काय बाई कायम ब्रँडेड
वाप रता असे म्हणून टोमणून जायची. दिसली नाही सध्या. आता तिला काय सांगणार मी काही इतके टिकल्या झगमग वापरत नाही. ओढणी नाही. कट मस्त व लिननचे असले की बास. ते मार्क्स स्पेन्सर व वेस्ट साइड मध्ये दहा मिनिटात सात आठ मिळून जातात.
सिंगापूर एअर्पोर्ट वर भरपूर मस्त शॉपिन्ग आहे तेव्हा मला तिथून एल वी पर्स घ्यायची होती व टिफनी रिंग डायमंडची. पण लेक म्हणे ते घेउन तु
कुठे जाशील हपिसात नाहीतर कुत्रा फिरवायला. दॅट टू यु विल लुक लाइक अ सिंधी लेडी!!! ख्याव ख्याव करून हसुन पैसे वाचवले व पेस्ट्री खाल्ली.
बरेच ग्लोबल ब्रँड्स त्यांच्या माला ची हाइप टिकून राहावी म्हणून मागील वर्शाचे महागडे कलेक्षन पर्सेस कप्डे बेल् ट जाकेट्स जाळून व नस्ठ करून टाकतात. आजकाल जगात उपाशी गरीब लोकांकडे वापरायला कपडे नाहीत व हे लोक असे फुकट वेस्ट करतात म्हणून अश्या ब्रांडेड कपड्यांचे आजकाल पर्यावरणाव रील इंपॅक्टही बघितला जातो. व कार्बन फुट प्रिन्ट फॅशन इंड्स्ट्रीचे भयानक आहे म्हणून असे कपडे वापरू नयेत असा एक मत प्रवाह आहे.
ईथे कोणी पुरुषमंडळी आहेत का
ईथे कोणी पुरुषमंडळी आहेत का जे शर्ट वा पॅंट आजही टेलरकडून शिवून घेतात ?
<<
नाही रुन्म्या. नो पुरुष.
इथे फक्त माझ्यासारखे महापुरुष आहेत नाही तर माझा प्रतिसाद वाचूनही टेलरबद्दल विचारणारी तुझ्यासारखी पोरेटोरे.
गुजराथी मैत्रिणीचा माझा देखील
गुजराथी मैत्रिणीचा माझा देखील बेक्कारअनुभव आहे. तिच्या मते ती मला फॅशन शिकवते.
>>>>>>>बरेच ग्लोबल ब्रँड्स
>>>>>>>बरेच ग्लोबल ब्रँड्स त्यांच्या माला ची हाइप टिकून राहावी म्हणून मागील वर्शाचे महागडे कलेक्षन पर्सेस कप्डे बेल् ट जाकेट्स जाळून व नस्ठ करून टाकतात.
हे भयंकर आहे.
>>>>>>>>> आजकाल जगात उपाशी गरीब लोकांकडे वापरायला कपडे नाहीत व हे लोक असे फुकट वेस्ट करतात म्हणून अश्या ब्रांडेड कपड्यांचे आजकाल पर्यावरणाव रील इंपॅक्टही बघितला जातो. व कार्बन फुट प्रिन्ट फॅशन इंड्स्ट्रीचे भयानक आहे म्हणून असे कपडे वापरू नयेत असा एक मत प्रवाह आहे.
उपाशी लोकांना अन्न/वस्त्र/निवारा पुरविण्याची जबाबदारी कोणत्याच कॅपिटलिस्ट स्टेकहोल्डर्स्ची नसते. तो राजकारण्यांनी सुधारण्याचा मुद्दा आहे. तेव्हा आपल्या कपड्याची कशी वासलात लावायची हा सर्वस्वी प्रायव्हेट कंपन्यांचा निर्णय आहे. हां जाळून वगैरे प्रदूषण करणे याबाबत त्यांची कॉलर धरुन त्यांना जाब जरुर विचारता येइल.
उपाशी लोकांना अन्न/वस्त्र
उपाशी लोकांना अन्न/वस्त्र/निवारा पुरविण्याची जबाबदारी कोणत्याच कॅपिटलिस्ट स्टेकहोल्डर्स्ची नसते. तेव्हा आपल्या कपड्याची कशी वासलात लावायची हा सर्वस्वी प्रायव्हेट कंपन्यांचा निर्णय आहे. >> Well said. टाळ्या.
कपडे जाळतात की नाही याची
कपडे जाळतात की नाही याची कल्पना नाही. मात्र शॉपर्स स्टॉपमध्ये अश्या गेल्यावर्षीच्या कपड्यांचा वा गेलेल्या स्टाईलच्या कपड्यांचा सेल लागायचा. जरा वेळ काढून हुडकायची तयारी ठेवली तर बरेचदा चांगला पीस मिळायचा. म्हणजे एखादा सेम पीसच सहाआठ महिने वा वर्षभरापूर्वी फ्रेश अराईव्हलमध्ये पाहिलेला त्या सेलमध्ये ३०-४० टक्के डिस्काऊंटला दिसायचा.
हल्ली मात्र बरेच वर्ष गेलो नाही तिथे. एकेकाळी फार क्रेज होती शॉपर्स स्टॉपची जेव्हा आतासारखे दर स्टेशनबाहेर मॉल नव्हते.
सिंगापूर एअर्पोर्ट वर भरपूर
सिंगापूर एअर्पोर्ट वर भरपूर मस्त शॉपिन्ग आहे तेव्हा मला तिथून एल वी पर्स घ्यायची होती व टिफनी रिंग डायमंडची. पण लेक म्हणे ते घेउन तु
कुठे जाशील हपिसात नाहीतर कुत्रा फिरवायला. दॅट टू यु विल लुक लाइक अ सिंधी लेडी!!! ख्याव ख्याव करून हसुन पैसे वाचवले व पेस्ट्री खाल्ली.>>> हाहा मजा आली वाचून
कपडे, बेल्ट, पर्स जाळतात हे ऐकून आश्चर्य वाटले.. २०%, मग ५०% आणि अखेरीस ७०% असा सेल लावतात. एवढंच माहित होतं.. ह्या वस्तू हे लोक गरीब लोकांना देऊ शकतात चॅरीटी म्हणुन..नाव ही होईल कंपनी चे.
उपाशी लोकांना अन्न/वस्त्र
उपाशी लोकांना अन्न/वस्त्र/निवारा पुरविण्याची जबाबदारी कोणत्याच कॅपिटलिस्ट स्टेकहोल्डर्स्ची नसते.>> बरोबर आहे तुमचे मॅडम नमस्कार.
ही सिस्टिमच बदलायची गरज आहे. एकतर गरीब देशात लेबर ला कमी त कमी वेतन देउन डिझायनर ड्रेसेस बनवून घ्यायचे अवाच्या सवा प्रोफिट मार्जिन मध्ये विकायचे व सहा महिन्यात ते आउट ऑफ फॅशन होतात मग न विकलेला माल जाळून टाकायचा. कारण तो कोणत्यातरी मार्केट मध्ये आल्यास आर्टिफिशिअली चढवलेले भाव जस्टिफाय करता येणार नाहीत.
प्रत्येक हाय एंड फॅशने बल हव्या हव्यास्या वाटणार्या गुड्स चे असेच आहे. हिरे हे प्रत्येक ऑकेजनला गरजेचे आहेत म्हणून त्यांची प्राइस वाढवलेली असते. function at() { [native code] अग दी वाइट परिस्थितीत त्यांचे खाणकाम होते. ब्लड डायमंड/ कॉन्फ्लिक्ट डायमंड
गूगल केल्यास सापडेल. पहिल्या जगातील लोकांच्या सो कॉल्ड भावनिक गरजा भागवायला दुसरे व तिसरे जग function at() { [native code] }ओनात खितपत पडून मेहनत करते जगणया इतका पैसा सुद्धा दूर असतो. केमिकल्स चे दुस्परिणाम शरीरावर होतात. अपघातात मरतात उपासमारीने मरतात. ती ही माणसेच आहेत. पण त्यांच्या जगण्याला मुल्य नाही.
ओ ही प्रपोज्ड मी विथ अ १००० कॅरट डायमंड. ही गेव्ह मी अ ४०० $ शनेल बॅग आय नीड अ बर्किन बॅग इन एव्हरी कलर. हे वाचायला किती गोड वाटते. पण प्रत्येक ब्रँडेड वस्तू च्या प्रॉड्क्षन ला एक काळी बाजू आहे.
तीन चार वर्षे पूर्वी लालबागात
तीन चार वर्षे पूर्वी लालबागात कापड निवड करून नवर्याने जीन्स शिवून घेतल्या, ठीक आहेत. नांव बहुतेक लेटेस्ट टेलर्स.
बाकी रेडीमेड मध्ये ब्रॅंडेड नाॅन ब्रॅंडेड काही नाही, कापड बघायचे, पोत बघायचे, शिवण व्यवस्थित आहे की नाही बघायचे, रंग, डिझाईन वगैरे आपल्याला चांगला दिसतो आहे की नाही ते बघायचे (सोबत असल्यास मित्र मैत्रिणी कडून कन्फर्म करायचे) , झालं काम.
प्रदर्शनात घेतलेलं कपडे/ कापड चे पण तीच गोष्ट
बाकी काही ही असो, अजय यांना अनुमोदन. आत्मविश्वास महत्त्वाचा!
कपडा अपेक्षेप्रमाणे न मिळाल्यास किंवा खराब झाल्यास उगी दुःख करूनये, utilise the experience in your next purchase
Pages