Submitted by rmd on 20 December, 2021 - 14:28
एबीपी माझा वर 'मन सुद्ध तुझं' नावाची मालिका ३ ऑक्टोबरपासून दर रविवारी सकाळी १०.३० / रात्री ८ वाजता सुरू झाली आहे. यात प्रमुख भूमिकेत स्वप्निल जोशी असून त्याने यात मानसोपचारतज्ञाची भूमिका केली आहे. दर एपिसोड मधे एक वेगळी केस तो सोडवतो. प्रत्येक एपिसोडमध्ये मराठी चित्रपट / मालिकांमधले वेगवेगळे चेहरे दिसतात. साधी, थोडीशी बाळबोध पण मनोरंजन करणारी ही मालिका वाटते आहे. काही काही केसेस अगदी जवळच्या माणसांत, नातेवाईकांत पाहिल्यासारख्या रिलेट होतात. आधीचे एपिसोड युट्युबवर उपलब्ध आहेत.
इतर माहिती -
कथा : डॉ. नंदू मुलमूले
पटकथा-संवाद : प्रशांत दळवी, गीत दासू
दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी
या मालिकेबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अरे वा! कथा, पटकथा, दिग्दर्शक
अरे वा! कथा, पटकथा, दिग्दर्शक सगळेच महान दिसताहेत. युट्युबवर शोधतो.
ओळखीसाठी धन्यवाद.
छान ओळख. मराठीत डॉ. हाऊस,
छान ओळख. मराठीत डॉ. हाऊस, प्रायव्हेट प्रॅक्टीस इ इंग्रजी मालिकांसारख्या वैद्यकीय क्षेत्रातील मालिका फार कमी असतात.
एबीपी माझा ही वृत्तवाहिनी आहे
एबीपी माझा ही वृत्तवाहिनी आहे. . त्यांच्या बातम्यांनी मनोरंजन होत असले तरी ते एंटरटेनमेंट चॅनेल नाही. तसंच विषयामुळे मालिकेचा उद्देश मनोरंजनापेक्षा प्रबोधन करणे हा असावा.
गीतकार दासू वैद्य का?
स्वप्नील जोशी मुळे पास.
खूपच छान मालिका आहे ही.
खूपच छान मालिका आहे ही.
लहान मुलांच्या parenting साठी खूप छान टिप्स मिळाल्या.
नेहमीच काही ना काही नवीन गवसते येथे.
व्हिडिओ चित्रण जुने असले तरी विषयही जुना असला तरी, सर्वांनी पाहण्यासारखे नक्कीच आहे.
Episode 3 माझ्या मुलीला विशेष आवडला.
काय भन्नाट एपिसोड आहेत एकेक.
काय भन्नाट एपिसोड आहेत एकेक.
झपाटल्यासारखे बघतेय. तिसरा एपिसोड 'केमिकल लोचा' मलाही आवडला. मेडिकल टर्म्स किती सहज सोप्या करुन सांगितल्या आहेत.
अन पति-पत्निच्या नात्यातले, टीन एजर्सचे सगळेच प्रश्न हाताळलेत.
थॅन्क्यु सो मच rmd !
मी ही मालिका सुरवातीपासून बघत
मी ही मालिका सुरवातीपासून बघत आहे. साधे कथानक, सोपी भाषा यातून मानसिक आजाराबाबत प्रबोधन आहे आणि त्या जोडीला चुकीच्या मनोधारणा आणि त्यातून उद्भवणार्या समस्याही दाखवल्या आहेत. दर एपिसोड मधे नवी समस्या हाताळतात. मुख्य म्हणजे यात सर्व पात्रांचा सहज वावर आहे, उगाच मनोरुग्ण म्हणून अवास्तव, भडक अभिनय रुग्ण- डॉक्टर कुणाचाच नाही. कथानकात काही सनसनाटी घडत नाही. जसे आपल्या आजूबाजूला मानसिक समस्येला तोंड देणारे असतात तसे इथे दाखवलेत. उगाच बागुलबुवाही नाही आणि खोटी आशाही नाही.
एकच एपिसोड पहिलाय आणि तो
एकच एपिसोड पहिलाय आणि तो चांगला वाटला.
मी पण नियमीत पहाते. ह्या
मी पण नियमीत पहाते. ह्या रविवारचा पाहायचा राहिला.
बघायला हवी. मी स्व जो मुळे
बघायला हवी. मी स्व जो मुळे बघत नव्हते पण त्याने चांगलं काम केलं असावं.
स्वाती२ : अगदी नेमके लिहिले
स्वाती२ : अगदी नेमके लिहिले आहे
<<जसे आपल्या आजूबाजूला मानसिक
<<जसे आपल्या आजूबाजूला मानसिक समस्येला तोंड देणारे असतात तसे इथे दाखवलेत. उगाच बागुलबुवाही नाही आणि खोटी आशाही नाही.<< अगदी त्या लोकांचे प्रॉब्लेम बघतांना .. आपलीही घुसमट होते. पण सोल्युशन इतके सहज सोप्प सांगतात ना, कि आपल्यालाही हायसे वाटते.
नीना कुलकर्णीचा भाग ही आवडला.
किती मनाला कुरतडत असतात काही गोष्टी.. आपण उगाच गिल्ट फिल करत असतो.
मी दोन भाग बघितले. छान आहेत.
मी दोन भाग बघितले. छान आहेत. स्व जो चक्क सुसह्य आहे यात. आणि कुठलाही नाटकीपणा नाही त्यामुळे रिलेट करता येतं आपल्याला.
२६ डिसेंबरला या मालिकेचा
२६ डिसेंबरला या मालिकेचा पहिला सीझन संपला. मात्र मालिकेचा दुसरा सीझन येणार आहे असं चंद्रकांत कुलकर्णींनी या भागाच्या शेवटी सांगितलं आहे.
१३ भागांच्या मालिका पहायची सवय खरंतर दूरदर्शन पाहणं सोडलं तेव्हाच मोडली होती. पण या मालिकेमुळे जुन्या दूरदर्शनची आठवण झाली. असे छोटे सीझन पहायला चांगले वाटतायत. हा सीझन तरी मनापासून आवडला.
मी एक दोन भाग पाहिले.
मी एक दोन भाग पाहिले. शाहरूखचा 'डियर जिंदगी' पुन्हा बघून तीन तासात ओरिजिनल बघितल्याचे समाधान मिळवावे असे वाटले. आता केवळ तू रेकमेंड करते म्हणून उरलेले बघते नि मग पुन्हा प्रतिसाद लिहीते.
मी ह्या वीकेंडला बिंज वॉच
मी ह्या वीकेंडला बिंज वॉच केले. उत्तम सीरीअल. धन्य वाद इथे वाचले नस्ते तर काही समजले नसते. पन इथे वाचले व मग यु ट्युब वर सजेशन मध्ये आला धागा.
मला स्वप्नीलचे हे काम सर्वात आवडले. सर्व केसेस निव डुन घेतल्या आहेत. व कामे फार छान म्हणजे ओव्हर अॅक्टिन्ग आजिबात नाही. ते बघून फार छान वाट्टॅ.
दामीनीतली अॅक्ट्रेस तिचा एपिसोड. नीना कुलकर्णींचा, कोवि ड काळजीचा पेशंट, पालकांच्या लाडाखाली अपेक्षांखाली दबलेली मुले
ती प्रेमात पडलेली सुरेख नववीतली मुलगी. हे भाग बघितलेत. आता परत एकदा सलग सर्व बघेन.
.
समहाउ सर्व माणसे रोजच्या भेटण्या बोलण्यातली ओळखीतली वाटतात . इतके नैसर्गिक काम सर्वांनी केले आहे
मनातल्या खूपच रिकाम्या जागा भरून निघ तात व अश्या मालिकेची गरजच आहे . दुसर्या सीझनची प्रतीक्षा चालू आहे.
rmd, खूप खूप धन्यवाद ह्या
rmd, खूप खूप धन्यवाद ह्या धाग्यासाठी.
मी एरवी कुठलीही सिरियल म्हटले की धागा ओलांडून पुढे जाते. कसा काय माहित नाही, पण हा तुमचा धागा उघडून पाहिला आणि मस्तच खजिनाच सापडला.
अशा प्रकारच्या मालिकांची फार गरज आहे हो समाजासाठी.
ही बघायची आहे, राहून जातंय.
ही बघायची आहे, राहून जातंय.
युट्युब वर सारखं दिसत होतं हे
युट्युब वर सारखं दिसत होतं हे प्रकरण पण स्वप्नील जोशी म्हणून बघत नव्हतो. आता नक्की बघेन, धन्यवाद.
अशी काही मालिका चालू आहे हे
अशी काही मालिका चालू आहे हे बर्याच जणांना माहिती नसेल असं वाटूनच हा धागा काढावासा वाटला. धाग्याचा तुम्हा सगळ्यांना उपयोग झाला हे वाचून खरंच बरं वाटलं.
धागा काढला हे अगदी मस्त
धागा काढला हे अगदी मस्त त्यामुळे बघावीशी वाटतेय खरंतर.
आमच्याकडे एबीपी माझाच सुरू असतं जास्त वेळा, त्यावर प्रोमोज सतत बघितले होते पण स्व जो म्हणून सिरियलच्या वाट्याला गेले नव्हते, आता जाईन.
पहिला भाग बघितला, डोळ्यातून
पहिला भाग बघितला, डोळ्यातून पाणी आलं शेवटी. टचिंग एकदम. स्व जो ने चांगलं काम केलंय.
अन्जूशी सहमत..मी पण आतापर्यंत
अन्जूशी सहमत..मी पण आतापर्यंत पहिलाच भाग बघितला आणि असेच वाटले.
चंकु नी हातात छडी घेऊन स्वजो चा अभिनय अती होण्यापासून वाचवला आहे असे वाटतेय.
"मन सुद्ध तुझे" मालिका पाहिली
"मन सुद्ध तुझे" मालिका पाहिली #शुद्धमनानेचिरफाड:
१. लहान भाग, साधे सेट्स, उगाच भिरभिरते कॅमेरे/संगीत इ नाही. नीट मांडणी
२. स्वप्नील जोशी डॉक्टर (मानसोपचारतज्ञ) शोभला. जिथे पेशंटला फूटेज द्यायला पाहिजे तिथे त्याने बॅकसीट घेतली हे कौतुकास्पद. नाहीतर मराठीतला ए लिस्ट कलाकार म्हणल्यावर...
३. वेळ नसेल तर फक्त २ भाग बघावे- भाग ७ (नीना कुलकर्णी) आणि भाग १० (प्रतिक्षा लोणकर). कसलेले कलाकार साधं कथानक किती चांगलं प्रस्तुत करू शकतात याचा मास्टरक्लास.
४. पौगंडावस्थेतील्/यंग अडल्ट्स च्या समस्या अजून नीटपणे हाताळायला हव्या होत्या. वर्तमानपत्रात हल्ली कुमारवयात "टिकटॉक" सेल्फ डायग्नोसिस फार रूळले आहे याच्या बातम्या येतात. मानसोपचार घेणे हे 'कूल' आहे. लोकंही 'थेरपी'चे/ट्रीटमेंटचे कौतुक करतात. डायग्नोसिस असेल तर शालेय सोयीही मिळतात मग स्वतःच काहीतरी डायग्नोस करून डॉक्टरांकडे जाणार्यांचे प्रमाण जास्त झाले आहे. डॉक्टर उपलब्ध असतानाही हे ग्रह कमी करणे कठीण जाते. मग भारतात वा अन्यत्र जिथे सोयी नाहीत तिथे हे ग्रह काढून टाकणे अवघड. त्यामुळे याविषयी माहिती देताना जास्त काटेकोरपणा हवा.
रविवारी सकाळी लावायचं कधी
रविवारी सकाळी लावायचं कधी लक्षात नाही रहात पण यु ट्यूब वर सगळे भाग बघितलेत. खूप वेगळी आणि छान मालिका आहे
मला तसा आवडतोच स्व जो पण होम मिनिस्टर मध्ये मध्यंतरी तो आणि त्याची बायको आले होते. तेव्हा पासून जास्त आवडायला लागला आहे. ह्यात तर फारच सुंदर काम केलं आहे. म्हणजे काम केलंय अस वाटतच नाही इतकं सुंदर.
माझे सगळे भाग बघून झाले
माझे सगळे भाग बघून झाले युट्युबवर. मला खरंतर स्वजो अजिबात आवडत नाही पण ह्यात त्याचं काम फार छान झालं आहे. त्याची जी पर्सनॅलिटी दाखवली आहे तसे सायकीयाट्रिस्ट असतील तर लोकांचा आजार पावपट कमी होईल असं वाटलं.
स्वजो ची ऍक्टिंग दिवसेंदिवस
स्वजो ची ऍक्टिंग दिवसेंदिवस बहरत चालली आहे... समांतर पासून.... मराठीतला एकमेव सुप्पर्रस्टार....
छान आहे ही मालिका.
छान आहे ही मालिका.
rmd, धन्यवाद ह्या धाग्यासाठी !
त्याची जी पर्सनॅलिटी दाखवली
त्याची जी पर्सनॅलिटी दाखवली आहे तसे सायकीयाट्रिस्ट असतील तर लोकांचा आजार पावपट कमी होईल असं वाटलं >>> अगदी बरोबर. मलाही असंच वाटलं.
माझे अजून दोनच बघून झालेत.
माझे अजून दोनच बघून झालेत. दुसरा जरा बोअर होतोय वाटता वाटता, मस्त ग्रीप घेतली. सर्व एपिसोडचा शेवट टचिंग आहे का, याचाही वाटला पहिल्या एपिसोडसारखाच.
स्व जो चॉकलेट हीरो म्हणून अजिबात आवडत नाही पण व्हिलन आणि वेगळे रोल चांगले करतोय. जीवलगामध्ये नंतर व्हिलन झाला तेव्हा आवडला, समांतर एक मध्ये पण आवडला, दुसरा सीझन बघितला नाही. गुडी गुडी, चॉकलेट हीरो म्हणून नापास माझ्याकडून, हाहाहा. बाकी मस्त.
नीना कुलकर्णी, मेडीकलला जायची
नीना कुलकर्णी, मेडीकलला जायची आई/वडिलांची इच्छा असलेला पोरगा, तो मर्डरर गोडसेचे गोडवे गाणारा नट, प्रतिक्षा लोणकर, सुनिल बर्वे इ. भाग बघितले आणि आवडले.
साधं नेपथ्य, उत्तम अभिनय आणि सहज कनेक्ट होऊ असे संवाद. छान वाटतं बघुन. सुरुवातीचे एक दोन एपिसोड स्व.जो. येडपटासारखं हसतो वाटत होतं, पण मग ते कमी झालं. तो ही ठीक वाटला नंतर.
Pages