फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 2 March, 2014 - 01:12

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी? तसेच कशी नसावी? यावर लोकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. फलज्योतिषावर आपले मत काय? हे अजमावण्याचा प्रयत्न हा नेहमीच असतो. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे.कारण तो चाचणीशी संबंधीत नाही. तो स्वतंत्र विषय आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्यासाठी हा धागा नाही. . या पुर्वी २००८ मधे प्रो.जयंत नारळीकरांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या मतिमंद व हुशार मुलांच्या बाबतची फलज्योतिषाची चाचणीचा अहवाल खालील दुव्यावर उपलब्ध आहेत
http://faljyotishachikitsa.blogspot.in/2008/10/blog-post_09.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रम
स्तुत्य आहे .
१काळ

आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था
आहे का ?कारण उदा : शनि ग्रहाचे प्रभाव पाहाण्यासाठी अठ्ठावीस वर्षाँची
दोन तीन आवर्तने जावी लागतील परिणाम नोंदवण्यासाठी .

२प्रश्नाचे स्वरूप

काही प्रश्नांना थोडे ढोबळ अथवा व्यापक रूप
द्यावे लागेल .उदा .शिक्षण
=उच्चशिक्षण ,
धंदा /नोकरी =अर्थार्जन ,मध्यम का अल्प ,
राजयोग=मोठे राजकारणी /उद्योगपती

३ठोस व्याख्या

हे थोडे कठीण आहे .उदा हुशार मुले ,
श्रीमंत माणूस ,सुखी कोणाला म्हणायचे .

४छोट्या छोट्या प्रश्नांची यादी संमत करणे फार गरजेचे आहे .मग
ज्योतिषी/गट/मंडळे त्यांना हवा त्या क्रमांकाचा प्रश्न घेऊन निरीक्षणे ,नोंद
आणि अनुमाने वैज्ञानिक पध्दतीने सादर करतील .

>>आम्ही म्हणजे आपली काही बी एन एच एस सारखी दीर्घकाळ पाठपुरावा करणारी संस्था
आहे का ?<<
आम्ही म्हणजे वैज्ञानिक चाचणी घेउ इच्छिणारे लोक. मुद्दा हा आहे कि वैज्ञानिक चाचणी कशी घ्यावी या बद्दल आपल्या मनात असलेले मॉडेल

"फलज्योतिष" आणि "वैज्ञानिक
पध्दत" या दोन मुद्यांना विचारात घ्यायचे आहे असे धरून

उदा:हरणार्थ
पंचमेश उच्चीचा आहे/नाही याचे शिक्षणाबद्दल काय फल मिळते ते पाहाणे हा
प्रश्न घेऊ .
शंभरेक पहिलीतल्या मुलांच्या /मुलींच्या कुंडल्या नोंदवा .आता नमुने गोळा
करतांना वेगवेगऴया आर्थिक /सामाजिक/धर्मांतील/स्थानांतील प्रत्येकी पंचवीस
कुंडल्या लागतील .आता त्यांचे भविष्य लिहा की खूप /कमी शिकेल वगैरे .नंतर
दहा /पंधरा/वीस वयाला नोंदी करत जाणे .नंतर तीसला अनुमान काढा .

इथे ज्योतिष अभिप्रेत असल्याने आताच्या तीसवयाच्या शिकलेल्या मुलांच्या
कुंडल्या जमा करून काढला एक आलेख असं चालणार नाही .(तसे केल्यास त्याला
सांख्यिकी विश्लेषण statistical analysis असे म्हणा ) तसेच अमुक एक
पध्दतीचे ज्योतिष धरलँ तर सर्वाँचे तसेच पाहिजे .

बघा पटतंय का .

एसार्डी, गुड! Happy
"परदेशप्रवास" हा शब्द देखिल मला असाच घोळात घालतो. "परदेश" कशाला म्हणावे? व्यक्तिसापेक्ष ती त्रिज्या बदलत जाईल. असो.

मला येरवड्यातील वेड्यांच्या इस्पितळातील मनोरुग्ण, तसेच मुक्तांगणमधिल व्यसनाधिन व्यक्ति याबाबत अभ्यास करायचा आहे. त्यांचा जन्मतारखेचा/रोग केव्हा झाला/लक्षात केव्हा आला/रोगी केव्हा सुधारला वा अजुन बिघडला- याबद्दलचा डाटा मिळाला, तर बरीचशी कोडी सुटून, केवळ "चंद्र बिघडला" किंवा "द्वितीयात राहू/मंगळ" यांनी घोळ केला असे ढोबळ होणार नाही.

याचबरोबर माझे निरीक्षण असे की शारिरीक ताकदीवर गुन्हे करणार्या व्यक्ति व संरक्षण/पोलिसदलातील व्यक्ति यांच्या अंगठ्याची/नखाची ठेवण जवळपास समान असते, मग गुरुप्रभावाची अशी कोणती उणीव गुन्हेगारात असते ते जाणून घ्यायला मला सर्व तर्‍हेचे गुन्हेगार तसेच सर्व पातळीवर काम करणारे संरक्षण/पोलिस दलातील व्यक्तिंच्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे.

याचबरोबर, मला "सरकारी नोकरांच्याही " कुंडल्या हव्यात.

ग्रेड ४ ते ग्रेड १ पर्यंत टक्केवारी लावुन पैसा खाणारी "डिपार्टमेण्ट्स" असली तर अधिक चांगले कारण मला फरक शोधुन काढायचा आहे तो असा की "सरकारी कृपाप्रसादाकरता/सेवेकरता" रवीचे स्थान माहात्म्य असावे लागते कुंडलीत, पण रविसारखा ग्रह "भ्रष्टाचाराला " कशी काय साथ देऊ शकतो, ते कोडे उलगडले नाहीये.

भ्रष्टाचाराचा सरळ सरळ संबंध वेळेस 'कुटील" ठरु शकणार्‍या बुधाशी जोडता येतो, पण सरकारी नोकरीकरता चान्गला रवि अन जोडीला कुटिल बुध (चंद्राचे सापेक्ष/साथीने?) हे गणित अजुन जुळले नाहीये. तेव्हा भ्रष्टाचारी व्यक्तिंच्या कुंडल्या बहुसन्ख्येने अभ्यासण्याशिवाय व सांख्यिकी तपासणी केल्याशिवाय पर्याय नाही.

याचबरोबर, भान्गेत तुळस उगवावी या पद्धतीने सरकारी नोकरीत राहुनही तेथिल "पाणीही" न पिणार्‍या अपवादात्मक व्यक्ति माहितीत आहेत, तर त्या काय कारणे अपवाद बनतात, गुरू मंङळाचा कोणता प्रभाव त्यान्ना धोकादायक परिस्थितीतही अपवाद बनवुन ठेवतो ते देखिल अभ्यासायचे आहे.

इच्छा तर नाही, पण मजबुरीने देश तसा वेष या न्यायाने तिथे (सरकारी नोकरीत) वागावे लागते म्हणून पैसा खाणारे देखिल आहेत, यांचेवर शनि कसा प्रभाव टाकतो ते देखिल अभ्यासायचे आहे.

वरील काहीच करणे शक्य नसल्याने, जेव्हा माझ्या नशिबात एखादी परमोच्च भ्रष्टाचारी व्यक्ति सामोरी येते, व मला तिचीकुंडली बनवायची संधी माझ्या नशिबाने जर मिळालिच, तरच मी असली सान्ख्यिकी करू शकतो हे वास्तव आहे.

घाटपान्डेसाहेबांचा धाग्याचा उद्देश वरकरणी स्त्युत्य दिसत / भासत असला तरी इये मराठीचीयए नगरी पुण्यनगरित, ज्योतिष/फलनिर्देश याबाबत कोणतेही काम अधिकृत करण्याची सोय नाही/शक्यता नाही/कायदे तर नाहीच नाहीत. शिक्षणात त्याचा सहभाग नाही. आत्यंतिक प्रतिकुल परिस्थितीत हे ज्ञानशाखा मार्गक्रमण करत आहे. व असे असताना कोणत्याही प्रकारे कायद्याच्या कचाट्यात सापडून आयुष्य उद्ध्वस्त करुन घेण्याचा मूर्खपणा होण्याइतपत बुध वा शनि बिघडला असेल अशी व्यक्ति मूळात ज्योतिषी असेलच वा नाही याबद्दल स्वतंत्र संशोधन करावे लागेल मला.... Wink Proud असो.

विचार पटले limbutimbu .मी एक ढोबळ अभ्यासू आहे .आता प्रथम धाग्याच्या विषयाला धरून विचार करू .वैज्ञानिक पध्दत किती वेळखाऊ आणि अवघड आहे ते पाहिलेच आहे .केवळ संस्थाच कार्य करू शकते .एखाद्याला वैयक्तिक काम करायचे असेल तर ज्या भाकिंतांचा प्रत्यय पाच एक वर्षाँत येईल असे प्रश्न निवडता येतील .

तुम्ही ज्या प्रश्नांचा विचार करू इच्छिता जसे १चंद्रबल आणि मानसिक दुर्बलता ,२ लाचार/नेक सरकारी माणसाचा रवि ,३सैन्यातल्या मंगळप्रभावी व्यक्तिँचा गुरू ग्रह नक्की काय फल देतो इत्यादिंसाठी सांख्यिकी वि० पुरेसे आहे .ते मिळेल तसे नेटवर (जातकाची गोपनियता राखून )टाकून ठेवा .
(यावरची चर्चा मात्र दुसऱ्या धाग्यावर बरी दिसेल .)
बरेच मुद्दे आहेत पण दुसऱ्या धाग्यावर बरे दिसतील .

>>>> बरेच मुद्दे आहेत पण दुसऱ्या धाग्यावर बरे दिसतील . <<<<<<
अगदी अगदी, अन याचबरोबर मूलतःच बायस्ड /पूर्वग्रहदुषित पद्धतीने "ज्योतिष/धर्मशास्त्र" वगैरे सर्व थोताण्ड व अन्धश्रद्धा असे मानणार्‍यान्च्या पोस्टी देखिल दुसर्‍या धाग्यांवर बर्‍या दिस्तील, नै? Wink

srd, limbutimbu यांचे मुद्दे चांगले आहेत या पुर्वी चर्चेत ही आलेले आहेत. एसार्डी यांचा मुद्दा वि म दांडेकरांनी थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडला होता. त्यात पंचमातील गुरु असलेली व्यक्ती शिक्षण क्षेत्राशी किती निगडीत आहे हा पहाण्याचा प्रयत्न. मला वाटत महारष्ट्राचा कुंडली संग्रह या म दा भटांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत तो त्यांनी लिहिला आहे. दांडेकरांनी घटस्फोटीतांच्या कुंडल्या हाही विषय घेतला होता. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)
लिंटींचा मुद्दा खरच तपासला पाहिजे. तो चाचणी या पातळीवर घ्यायचा झाल्यास येरवडा मनोरुग्णालयात असलेल्या रुग्ण लोकांच्या कुंडल्या व सर्वसाधारण आयुष्य जगत असलेल्या लोकांच्या कुडल्या यातून त्यांचे वेगळे ठळकपण काही सांगता येते का? अशा पद्धतीने तो घेतला पाहिजे. जसे आम्ही मतिमंद व हुषार मुलांच्या केले होते. अजेंड्यावर हा विषय आहेच.कितपत शक्य होते आहे ते पाहू या.
मुख्य काय आहे कि तपासता येईल अशा संख्याशास्त्रीय चाचणीच्या पातळीवर स्वीकारार्ह असे मुद्दे हवे आहेत.

>>>>> जसे आम्ही मतिमंद व हुषार मुलांच्या केले होते <<<<<<
तुम्ही एकाच वेळेस जर वरील दोन प्रकारच्या व्यक्तिन्च्या कुन्डल्या घेउन "आव्हान"बिव्हान देणार असाल, इव्हन एकाचवेळेस सान्ख्यिकी बघणार असाल तर ते अवघड/अशक्य आहे.
येरवडा/मुक्तांगण येथिल व्यक्तिंच्या कुंडलीचा अभ्यास करुन, सान्ख्यिकी दृष्टीने त्यात कोणती समानता आढळते ते आधी तपासुन, मग तीच परिस्थिती सामान्य माणसान्चे बाबतीत कितीक आढळते हे बघावे लागेल.
शिवाय, वर जसे तुम्ही घटस्फोटीत/ मनाने विभक्त पण एकत्र रहाणे हे जसे उदाहरण घेतले आहे, तत्द्वतच, एखादी व्यक्ती एखाद्या विषयात हुषार असली तरी अन्य विषयात ती "मतिमंदही" असू शकते हा भाग वरील मतिमन्द/हुषार मुलान्चे बाबतीत करणे आवश्यक राहिल. अन जर अपवाद असतीलच, तर ते का आहेत याचाही शोध घ्यावा लागेल, न की केवळ अपवाद आहेत म्हणजे "शास्त्रच खोटे" हा नि:ष्कर्ष काढणे.
समाजधारणा अशी की प्रत्येक व्यसनाधीन व्यक्ति ही "नालायक/मवाली/बेजबाबदारच" असली पाहिजे, प्रत्यक्षात तसे नसते, व सज्जनपणाच्या मूल्यमापनाशी व्यसनाधीनता जोडणे हेच मुळात चुकीचे ठरते, तरीही, निव्वळ व्यसनाधीनता, व्यसनाधीनता अधिक लंपटपणा, व्यसनाधीनता अधिक उधळेपणा, व्यसनाधीनता अधिक शारिरीक आक्रमकता, व्यसनाधीनता अधिक व्यभिचारीपणा, व्यसनाधीनता अधिक शामळूपणा, व्यसनाधीनता अधिक सज्जनपणा, इत्यादी अनेक अंगाने या आकडेवारीचे विश्लेषण, त्या त्या ग्रहांच्या कुन्डलीतील अंशात्मक स्थानाशी/गुणावगुणाशी सांगड घालून ठरवावे लागेल व निश्चित करावे लागेल.
केवळ द्वितियात मंगळ /राहू तत्सम ग्रह म्हणजे फटकळ्/उधळ्या हे नक्कीच, पण उधळ्या कशाकरता? रंडीबाजी/बाईबाटली करता की दानधर्माकरता की अजुन कशाकरता? फटकळ म्हणजे तरी नेमके काय ? लोकमान्य टिळकान्चे मी शेन्गा....... उचलणार नाही हे विधान देखिल मग कुणाला फटकळ वाटू शकेल.
तेव्हा यावर अतीशय सूक्ष्म व कोणताही पूर्वग्रह न ठेवताच काम करायला लागणार आहे हे निश्चित, अन्यथा जादुटोणाविरोधी कायद्याच्या पुढिल पायरी म्हणजे ज्योतिषावर बन्दी आणण्याची एक चाल यापेक्षा वेगळे स्वरुप या कडून अपेक्षिता येणार नाही...... या अपेक्षेकरता मी कोनतीही कुण्डली बघितली नसून, केवळ तर्काधारित विचार करुन सान्गतोय.

पण खरोखरच असा अभ्यास्/संशोधन होऊ शकले, तर अनेकानेक नविन ज्योतिषशास्त्रीय सिद्धान्त नव्याने कळतील याचीही खात्री वाटते.

आता घाटपांडेसाहेब तुम्ही पुढच्या पायरीवर आहात .परदेशात जसे कोणत्याही गोष्टीचे प्रमाणीकरण करतात तसे वर्षात एक दोनदा भेटून प्रश्नांचे ,पध्दतीचे ,चाचण्यांचे प्रमाणीकरण हवे .उदा: पंचागकर्त्यांनी तिथि आणि सणवार बद्दल केले .भाउबिज यमद्वितिया ,लक्ष्मिपुजन अमावस्या सूर्योदयानंतर आली तर त्यादिवशी घ्यायची का नाही .

संशोधन आणि चाचण्यांची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता सर्व एकाच ठिकाणी (जर्नल /वेबसाईट)यायला हवे .

तुम्ही पुढाकार घेऊन हे कराच .
आज तुम्हाला उत्साह आणि संयोजकता आहे त्याचा उपयोग होईल .

आज भारतातल्या पाच वेधशाळा ज्या राजपूत राजाने बांधल्या तो एक चांगला सज्जड पुरावाच करून ठेवला .दहा सुंदर देवळांपेक्षा त्यांचे महत्त्व अधिक आहे असे मी मानतो .
वरती आणि एक चर्चा होत आहे .याकरीता प्रश्नाचे प्रमाणीकरण आणि ठोसपणा नसेल तर दोन अनुमानांची तुलना नाही होऊ शकत असे माझे मत आहे .एक ज्योतिषी म्हणून नाही तर तिसरी व्यक्ती या कोनातून मत आहे .

याची म्हणजे कशाची ?विश्लेषण का प्रमाणिकरण का एका ठिकाणी आणण्याबद्दल आक्षेप आहे ?

पूर्वी विज्ञानात नोंदी घेत असत आणि मग सिध्दांत शोधायचे आता उलट चालले आहे .

म दा भटांच्या महा० कुंडली संग्रहातून बऱ्याच जणांना खाद्य मिळाले आहे .

>>चाचण्यांचे प्रमाणीकरण हवे .उदा: पंचागकर्त्यांनी तिथि आणि सणवार बद्दल केले <<
? काही संदर्भ देता येतील का? भारतीय सौर पंचांग हे अजून कागदावरच आहे. संदर्भ - पंचांग एक अवलोकन
असो हा मूळ विषय नाही.

आपल्याकडे सूर्योदयाला जी तिथि येईल ती दिवसभर त्यादिवसाची धरायची असा नियम पंचागासाठी पूर्वापार आहे .मग ती तिथि भले सूर्योदयानंतर बदलो .या नियमाला चिटकून पंचागकर्ते सणवार देत होते .काहींचे असे मत पडले लक्ष्मिपुजनासारखे सणांचे महत्त्व संध्याकाळीच आहे तर ते त्यांच्या पंचांगात तो दिवस देऊ लागले .इतरजण नियमाप्रमाणे दुसरा दिवस .

असं होऊ नये म्हणून त्यांनी ठरवले की दिवाळी अगोदर पुढल्या वर्षीच्या तिथिंचा निर्णय करायचा आणि सर्वाँनी ठरलेली इंग्रजी तारीखच द्यायची .फारतर तळटीप द्या .दुमत नको .१९८५ आसपास कोल्हापूरच्या लाटकरांकडे बहुतेक हा निर्णय झाला .

तुमच्या ज्योतिषांतसुध्दा काही गोष्टीचे वाद असतील तर सर्वमताने त्यावर निर्णय घ्या .उदा:सायन रवि का निरयन ? आणखी दोन हजार वर्षाँनी दोन राशींचा फरक पडणार आहे .

ग्रह आपण सांगू तसे भ्रमण करणार नाहीत तर आपल्याला काहीतरी प्रमाणिकरण करायला लागेल .

प्रकाशजी,

अतिषय उत्तम धागा. मला वाटते की अश्या प्रकारच्या संशोधनाची गरज आहे.

एखादा सोपा विषय घेऊन सुरवातीला असे संशोधन करण्यास हरकत नाही.

महाराष्ट्र ज्योतिष परीषदेने ज्योतिषशास्त्री परिक्षेच्या अभ्यासक्रमात हजारो परिक्षार्थिंकडुन असे संशोधनपुर्ण निबंध लिहुन घेतले आहेत.

माझ्या वेळेस १९९६ साली आम्ही मतिमंदत्वाचे योग यावर ३० कुंडल्या शोधुन, ( मतीमंद मुलांच्या पालकांना भेटुन ) असा उपक्रम केला होता.

किमान वर्षाला एक विषय घेऊन १००० कुंडल्या तपासुन निष्कर्ष काढले तर कितीतरी मोठे काम होईल.

माझ्या मते

१) अनेकदा विवाहगुण मेलनावरुन विवाह रखडतात. यावर संशोधन करायला हवे.
२) यातील एकनाड दोष यावरही संशोधन करायला हवे.
३) एक एक जन्मनक्षत्र किमान २४ तास असते. जन्मवेळ बरोबर आहे का हा मुद्दा इथे निकालात निघतो.

माझ्या जन्मनक्षत्र आणि शांतीप्रयोगाच्या लेखावर खुप राळ उडाली. अपेक्षीतही होते.

नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.

वरील नक्षत्रापैकी आश्लेषा ,जेष्ठा आणि मुळ ही नक्षत्रे २४ तास असणारी आहेत.

या तीनच नक्षत्रांवर जन्माला आलेले १००० स्त्री पुरुष यांच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा अभ्यास केल्यास काही निष्कर्षापर्यत पोहोचता येईल.

>>माझ्या वेळेस १९९६ साली आम्ही मतिमंदत्वाचे योग यावर ३० कुंडल्या शोधुन, ( मतीमंद मुलांच्या पालकांना भेटुन ) असा उपक्रम केला होता.<<
या उपक्रमात आपल्याला काय आढळल? ते ही लिहावे.
यावर फलज्योतिष चाचणीच्या निमित्ताने ही पोस्ट पहावी. विशेषतः त्यातील व.दा.भटांचा विचार.

हे सर्व प्रकरण वाचले. मेल्यानंतर वैर संपते पण मी सुध्दा नरेंद्र दाभोळकरांच्या अभ्यासपुर्ण नसलेल्या ( फलज्योतिष हे शात्रच नाही ) विधानाचा समाचार घेण्यासाठीच माननीय धुंडिराज पाठकांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिष शिकले होते.

कदाचित अनिस आणि दाभोळकरांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणुन या प्रतिक्रिया आल्या असतील पण १९९६ च्या सुमारास ज्योतिषाच्या निष्कर्षाचा संख्याशास्त्रीय अभ्यास किमान धुंडीराज पाठकांना मान्य होता. आता त्यांच्या विचारात काही बदल झाला असेल तर माहित नाही.

अनिसने सुरवातीच्या काळात जे वर्तन केले त्याचा परिणाम म्हणुन आणि गेला १८-२० वर्षात ज्योतिष विषयाला अफाट मान्यता मिळाल्याने या संशोधनाची आवश्यकता राहिली नसल्यामुळे या प्रतिक्रिया आल्या असतील.

आता मतीमंद मुलांच्या पत्रीकांबाबत.

पंचमेश जर शनी असुन वक्री असेल. सोबत बुध आणि चंद्र बिघडले असतील तर मतिमंदत्व प्राप्त होते. याला महादशासुध्दा महत्वाच्या. जन्मतः पंचमेशाची महादशा असणे काल निर्णयाच्या द्रुष्टिने महत्वाचे.

हे सर्व योग असुन जर महादशा जन्मतः पंचमेशाची नसेल तर काय हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.

फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी अशक्या व अनावशक आहे. कलपव्यय करू नक!
कारण
Astrology is ‘speculative fad’ with no possibility ever of proving it right in 100 million years!

Astrology is the most FAKE of subjects / fads, worse than religions, or religious superstition!
It is a wicked mockery of astronomy & mathematics.
Calling oneself 'Ass-troll-ogre' is like admitting to fraud as well as being an ass, a troll and an ogre!

Ass-trology is a 7-story palace of cards that is blown away by a small fart of doubt.
Ass-trologers build palaces of hope in the air and collect the rent from their gullible customers!

1.- It originated when earth was believed to be flat, before the globe was charted with meridians, Satellite Navigation (SatNav / TomTom) and before Google-earth-mapping satellites! It is centred on earth, which is a spec of cosmic dust! For the real scale of universe, go to: http://htwins.net/scale

2.- The 9 ‘Astral bodies’ is a hotchpotch of 1 star, 5 planets, 1 earth-satellite bunched with a comet & an imaginary beast! Except earth with its just-15-mile-thin ‘veneer of life’, all these are inanimate: from burning hot rocks, dead deserts or frozen gas-balls!

3. - The 12 ‘star signs’ constellations are groups of totally unrelated stars that are billions of miles from each other! They ‘look in that particular pattern’ only from earth (aka ‘parallax’)!

4.- How stupid it is to divide 7 billion humans in only 12 horoscope-groups, with billions of permutations!?

5.- Everything moves with time, always! Thus busting any idea that the ‘precise’ (? Get real!) position of the rapidly moving celestial bodies could influence anything at all ‘at the time of one's birth’ (which is not an instant, but a process that can last from 20 minutes to 18-24 hours! Add to this the facts that (a) it is impossible to precisely determine the moment of human conception & (b) human gestation takes 40 weeks from conception to birth, that is 3/4th of the orbit of earth covering 9 horoscope-signs!)

6.- Even stupider it is to IMAGINE that 5-6 super-powerful but DISTANT giant celestial bodies could influence 7 billion specs of duct (humans) on a cosmic spec of dust (earth) individually and against each-other, again, with billions of permutations! W H A T ? (WTF!)

7.- And FINALLY, we hit the penthouse-terrace of this a 7-story palace of cards! A mere mortal, THE astrologer (= conman = charlatan = 'Ass+troll+ogre') always has some remedy to ‘manipulate & change the customer’s) fate totally controlled by such super-powerful giant celestial bodies: just buy some gemstone from them and fit it inside your arse-ring-hole; or perform bizarre rituals to appease s*hit!

Bling! Presto! Your misfortune will explode & also your 'fortune' will ‘implode’, or ‘take off’ (to the pocket of the gemstone merchant & percentage cut to your trusted 'Ass-troll-ogre'!)

पंचमेश जर शनी असुन वक्री असेल. सोबत बुध आणि चंद्र बिघडले असतील तर मतिमंदत्व प्राप्त होते. >>> नितिनचंद्र या प्रकारचे अजून योग / नियम जर आपल्या संग्रहात असतील तर ते हवे आहेत.

वरती बऱ्याच जणांनी अमुक प्रकारचा डेटा गोळा करून तमुक निष्कर्ष वगैरे काढायचा प्रयोग करणार असे लिहिले होते. आता बरीच वर्षे झालीत तरी काही घावलं का त्यांना ? असेल तर वाचायला आवडेल. आजपर्यंत असे अमुकतमुकवाले प्रयोग बरेच वाचनात आलेत पण प्रत्यक्षात त्यांचे निष्कर्ष कधी सापडत नाहीत. बाकी उपलब्ध ज्योतिष गबाळात हजारो नियम सापडतात हजारो प्रकारच्या गोष्टींसाठी म्हणजे समजा अमुकतमुक ग्रहस्थती असेल तर अमुकतमुक फळ मिळते आणि त्यासाठी दोन चार उदाहरणे दिली जातात. पण त्याचवेळी तेच ग्रहमान असताना अमुकतमुक फळ न मिळता भलतेच फळ मिळते कारण त्या अमुकतमुक ग्रहस्थितीचा परिणाम बदलवणारी दुसरी एखादी अमुकतमुक ग्रहस्थिती त्या पत्रिकेत असु शकते जीचे नियम अर्थातच माहित नसतात पाहणाऱ्याला. त्यामुळे हे असले अमुकतमुक सांख्यिकी प्रयोग करण्यात वेळ घालवू नये. अमुकतमुक योग दाखवण्यासाठी दहा-बारा उदाहरणे दिली तरी तोच योग असून तशी फळ न मिळणारी शेकडो उदाहरणे असतातच त्यामुळे असे फुकाचे प्रयोग करण्यात कोणी आपला अमूल्य वेळ वाया घालू नये. रिकामटेकडे असाल तर ठीक आहे.
बाकी मी विवेकी-विज्ञानवादी असून हे ज्योतिष वगैरे थोतांड आहे असे मानतो.

प्रकाशजी तसा हा धागा आता खूप पूर्वीचा आहे आणि चर्चाही थांबली आहे पण भविष्यात कुणी वाटसरू इकडे आलाच तर त्याला वाचायला मिळावे म्हणून मी अलीकडे अगदी याच विषयावर लेख लिहिला आहे त्याची link इथे अडकवतो.

संदर्भ -
ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
लेखक = डॉ. नागेश राजोपाध्ये
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021
https://www.sudharak.in/2021/08/7477/

तुम्हाला हा लेख माहिती आहेच कारण तुमचाही लेख त्याच अंकात प्रकाशित झाला आहे.
त्याचप्रमाणे या चाचणीचा उपयोग करून आलेल्या निष्कर्षां वरील मायबोलीमधील लिखाणाची link पण चिकटवतो

ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन गुलमोहर - ललितलेखन

https://www.maayboli.com/node/80793

तुम्ही स्वतः यालेखात उल्लेख केलेल्या ‘मतिमंद विरुद्ध हुशार’ या चाचणीत स्वतः सहभागी होऊन योगदान दिलेले आहे. तुमच्या सहकार्याशिवाय आणि योगदानाशिवाय हि चाचणी झाली नसती. त्याबद्दल मनःपूर्वक आभार.

घाटपांडे सर, काल मी मानवमामांना सांगितल्याप्रमाणे नवीन वर्षात ज्योतिषावर काहीतरी लिहिण्याचे सांगितलेच आहे तर ते याच धाग्यावर होऊद्या. रँडम कुंडल्या पाहत बसण्यापेक्षा आपण एक करू तुम्ही अश्या दिवंगत व्यक्तींच्या कुंडल्या गोळा करून ठेवा ज्यांची अचूक जन्मपत्रिका तुमच्याकडे आहे. अचूक म्हणजे कमीतकमी जन्मलग्न आणि नक्षत्र-त्याचे चरण बरोबर असेल अश्या. त्यावरून आपण मग त्यांच्या मृत्यूचे भाकीत किती प्रमाणावर बरोबर काढता येते ते पाहू. बाकी कोणावर जास्त विश्वास नाही पण तुम्ही जुने चिकित्सक असल्याने योग्य डेटा द्याल ही खात्री आहे. अगदी दिवस नाही जमला समजा तरी आठवडा,महिना, वर्ष इथपर्यंत बरोबर येतेय का ते बघू. अजून काही महिने मला बाकी झन्झटी असल्याने लगेच शक्य नाही पण जितके लवकर शक्य होईल तितक्या वेळात जमवण्याचा प्रयत्न असेल. फक्त मी जेव्हा इथे डेटा मागेल तेव्हा तो द्या. नंतर मी त्या प्रत्येकाची संभाव्य कैलास गमनाची वेळ इथे डकवेल. समजा माझी गणितं चुकलीच तर परत या साईटवर ज्योतिषावर एक शब्द लिहिणार नाही. आता नवीन वर्षात धिंगाणाच करतो Proud

मुळात विज्ञान नावाचा काही प्रकार अस्तित्वात नाही
वैण्यानिक काही नाही.
सर्व भास आहेत .
खरे काय आहे कोणालाच माहीत नाही.

जिद्दू एक अनुभव सांगतो. हे ज्योतिषांना खुल आवाहन होते. आव्हान नव्हे.Dhanurdhari May 2000 001.jpgएका गृहस्थाच्या मुलाने तरुणवयात अमेरिकेत आत्महत्या केली. आम्ही त्याची प्रथितयश ज्योतिषाने बनविलेली कुंडली एका ठाण्याच्या ज्योतिषाला त्याच्या मागणीवरुन पाठविली. त्यासोबत जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख ही पाठविली. आम्ही सगळी माहिती खरी दिली व फक्त मृत्यू हा कसा व १९८० ते १९९० या काळात कुठल्या वर्षी झाला असेल एवढेच विचारले. त्याला ज्योतिषाने तयार केलेली कुंडली पाठविली. ती कुंडलीसुद्धा चुकीची निघाली. त्याने ती स्वत: तपासून नवीन बनविली व त्यावरुन एक वर्ष दिले ते मृत्यू वर्षाच्या जवळपाससुद्धा नव्हते. सदर आवाहन हे धनुर्धारी मे २००० चा अंक या ज्योतिषांच्या व्यासपीठावरच मांडले गेले होते.

छान ! अजून काही मिळतील तसे टाकत रहा म्हणजे मला पण सोपे जाईल. मी ना ज्योतिषी आहे ना मला कोणाला काही आवाहन करण्यात किंवा आव्हान देण्यात इंटरेस्ट आहे. मला फक्त विरंगुळा म्हणून आणि मी किती पाण्यात आहे हे पाहण्यासाठी वरील मृत्युच्या भाकितांमध्ये रस आहे. मी माझे उत्तर तयार झाल्यावर इथे टाकेलच फक्त थोडा निवांत वेळ मिळू द्या Happy

हे वरचं उदाहरण अगदि प्रातिनिधिक आहे; फलज्योतिषाच्या मर्यादा, गैरवापर (एक्स्प्लॉयटेशन?) आणि तोच मुद्दा पकडुन घाटपांडे यांच्यासारख्या चिकित्सकाने केलेली चिरफाड. माझ्या अल्पशा माहितीनुसार ज्योतिष हे एक्स्ट्रपलेशन आहे - हिस्टॉरिकल डेटा, आकडेमोड इ.च्या मदतीने केलेलं. आता मूळात डेटा आणि आकडेमोडंच चूकिची असेल तर निश्कर्ष चूकिचाच येणार ना? उद्या तुम्हि मिटियॉरलजीला स्टोर स्पेस प्रॉडक्टिविटि इंडेक्स ऑप्टिमाय्ज कसा करावा, हा प्रश्न विचारलांत तर त्याची फाफलेल ना? असो...

एखाद्या थियरी/विषयाची टेस्ट करताना त्याचा डोमेन (सब्जेक्ट एरिया) काय, त्याची व्याप्ती काय, याचा विचार न करता टेस्ट केसेस बनवल्या तर रिझल्ट्स हास्यास्पद येणारंच. वरच्याच उदाहरणात ज्योतिषा ऐवजी त्या तरुणाची सगळी कुंडली, त्याचा सोशल एफ्बिआयच्या डेटाबेसला देउन काढता येइल. अगदि तो केंव्हा/कुठे जन्मला, अमेरिकेत कधी/कुठे आला/राहिला सगळ्याची माहिती मिळेल; ट्रॅफिक वायोलेशन सकट. आणि तो डेटा हेल्थकेर डेटाशी (हिपाला डावलुन) इंटिग्रेट केला कि त्याच्या आत्महत्येची कारणं देखील सापडतील...

फलज्योतिषाला तो पल्ला, मचुरिटि लेवल गाठायला अजुन अवकाश आहे. हौवेवर, इट्स जस्ट ए मॅटर ऑफ टाइम अंटील इट बिकम्स ए ट्रु डेटासेंट्रिक, डेटाड्रिवन सब्जेक्ट मॅटर. तोवर थोडि कळ काढा... Wink

Pages