Submitted by च्रप्स on 29 December, 2021 - 22:40
नवीन वर्षात किंडल घ्यायचा विचार आहे.... जे किंडल वापरतात त्यांनी कृपया अनुभव शेयर करावा... किंडल पॅकेज वर्थ आहे का?
कोणकोणती पुस्तके वाचली तिथे आणि काही टिप्स ट्रिक्स असतील तर सांगा प्लिज...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी घेतलंय एक महिन्यापासून.
मी घेतलंय एक महिन्यापासून.
199/- महिना.kindle unlimited.खूप पुस्तके आहोत फ्रि.
काही विकत घ्यावी लागतात पण नगण्य किमतीत.मी अजून तरी विकत नाही घेतले. 199/- मधे भरपूर पुस्तके आहेत.
मी वाचलेली किंडलवर मागील महिन्यात
सुधा मुर्ती-
१. अस्तित्व
२.पित्रुऋण
3.परिघ
४.बकुळा
५.3000 टाके. सध्या सूरू आहे
नारायण धारप-
१. अनोळखी दिशा १,२,३
२.चेटकीण
३.लुचाई
डॉ.एस एल भैरप्पा
१.आवरण
२.परिशोध
रत्नाकर मतकरी
१.म्रुत्युंजयी
२.अंतर्बाह्य
3.संदेह
4.एडम
वि.स.खांडेकर
१.सुर्यास्त
2.सुखाचा शोध
१.काबुलीवाल्याची बंगाली बायको - सुस्मिता बैनर्जी
कोणत्या डिव्हाईसवर वाचता?
कोणत्या डिव्हाईसवर वाचता?
(च्रप्स, हवी ती माहिती मिळाली की कृपया मागेच्यावेळी सारखा धागा मजकूर शीर्षक बदलून डिलीट करू नका.)
मला दोन तीन वर्षांपूर्वी
मला दोन तीन वर्षांपूर्वी किंडल पेपर व्हाइट गिफ्ट मिळाले. तेंव्हापासून बरीचशी पुस्तके मी त्यावरच वाचते. किंडल अनलिमिटेड चे वार्षिक subscription घेते मी. बऱ्यापैकी फ्री books वाचायला मिळतात. पण मला वाचायची आहेत अशी पुस्तकं सहसा फ्री नसतात . पूर्वी मी ईबुक विकत घेत नसे. पैसे देवून पुस्तक घ्यायचे आणि ते संग्रही नाही हे मला झेपायचे नाही इतके दिवस.
हल्ली हल्ली मात्र मी विकत घ्यायला लागले आहे ईबुक. तसेही हार्ड कॉपी पेक्षा स्वस्तच असतात.
मी किंडल घ्यायच्या आधी माझ्या मोबाईलवर किंडल ॲप वर पण वाचायचे. But Kindle paperwhite experience is way better than mobile app. It's as good as physical book. बऱ्याचदा त्यापेक्षा चांगले कारण फाँट मोठा करून वाचता येते. Dictionary हाताशी असते. पूर्वी जर नवा शब्द आला तर अंदाजे अर्थ लावून मी पुढे जायचे. इथे तिथल्या तिथे शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ कळतो.
मी पण किंडल घेतलं होतं पण
मी पण किंडल घेतलं होतं पण पुस्तक वाचल्याचा फील नाही येत. मोबाईलवरच टीपी करतोय असं वाटतं आणि डोळ्यांना थोडाफार त्रास होतोच. त्यापेक्षा लायब्ररी बेस्ट वाटते.
काही वेबसाइट्स आहेत ज्या
काही वेबसाइट्स आहेत ज्या किंडल अनलिमिटेड वर येणाऱ्या पुस्तकांची लिस्ट आणि रेटिंग देत असतात. मी अगदी सुरवातीला कोणतीतरी वापरली होती 1-2 वेळा. पण नाव विसरले. जुनी मराठी पुस्तकं बरीच आहेत अनलिमिटेड वर आणि मराठीत भाषांतर झालेली पण खूप आहेत.
पण नवीन पुस्तक हवे असेल तर बहुदा विकतच घ्यावे लागते. किमान 100-200 रुपये स्वस्त असते हार्डकॉपी पेक्षा किंडल बुक.
गेल्या वर्षी ललिता प्रिती ने बऱ्याच किंडल बुक्स चे review ओळख लिहिली होती इथे/ तिच्या फेसबुक पेजवर किंवा व्हॉट्स ॲप स्टेटस वर. मी ते फॉलो करायचे.
चांगल्या फ्री किंडल बुक्स किंवा किंडल अनलिमिटेड वरच्या पुस्तकांबद्दल update देणारा धागा इथे कोणी काढला तर आवडेल.
मी मोबाईलवरच वाचतेय सध्यातरी
मी मोबाईलवरच वाचतेय सध्यातरी.किंडल पेपरव्हाईट घ्यायचंय
लायब्ररी कधीही बेस्टच पण मला ऑप्शन नाही.
चांगल्या फ्री किंडल बुक्स
चांगल्या फ्री किंडल बुक्स किंवा किंडल अनलिमिटेड वरच्या पुस्तकांबद्दल update देणारा धागा इथे कोणी काढला तर आवडेल.>>>>>>>
मी काढू ???
मी किमान 3-4 वर्षे ॲप वापरले
मी किमान 3-4 वर्षे ॲप वापरले होते. किंडल घ्यावे की नको, उगाच इतका खर्च कशाला असे करत दोन वर्षे ढकलले. मग नवऱ्याने सरप्राइज गिफ्ट दिले वाढदिवसाला. मी स्वतः कदाचित घेतलेच नसते.
लायब्ररी मधून मला पण मराठी वाचायला मिळत नव्हते. आणि तिथून आणलेली ईंग्रजी पुस्तकं मी बऱ्याचदा न वाचता परत करायचे. त्या तुलनेने किंडल वर जास्त वाचन होते. प्रवासात, मुलाला खेळायला सोडून वाट बघत बसताना खूप उपयोग होतो.
काढ ना.
काढ ना.
माझ्या डोक्यात पटकन टिंडर आले
माझ्या डोक्यात पटकन टिंडर आले.. धागा विभाग कोणाशी तरी बोलायचेय बघून आणखी कुतूहल चाळवले.... निराशा झाली
धाग्याला शुभेच्छा, मी वाचनमात्र
Sorry for English, mobile var
Sorry for English, mobile var Marathi nahi type karta yet.
I used Kindle last year took yearly subscription and it's worth it, no need to buy Kindle device just download the app on PC, Tab, mobile, when you will login on the device all the books you taken will be available on any device.
I read all Narayan Dharap books almost 10-12 books are free only 2-3 are paid, also many more good books for free like ruchira recipes, Rujuta Diwekar books, various recipe books with all over the world recipes, I liked book - Not without my Daughter, Malala, books by Chetan Bhagat 2 murder mysteries I read was really good (will give names if you want), there are many more good books in Marathi (Sane guruji all books free, Hindi (I read many Premchand novels) and the English books (Panchatantra and many story books are also free to read).
In short it's worth, In lockdown when I was feeling low, the books really helped me, sometimes I read 3 books a day and spent many nights only sleeping 2-3 hours to finish a book.
मोबाईलवर जास्त वाचणे जीवावर
मोबाईलवर जास्त वाचणे जीवावर येते आणि प्रवासात तसेच रात्री उशिरा बेडवर आडवे होऊन लॅपटॉपवर वाचणे सोयीस्कर नाही. म्हणुन डिव्हाईस घ्यायचा विचार आहे. टॅब / पेपर व्हाईट.
Tab घेण्यापेक्षा पेपर व्हाईट
Tab घेण्यापेक्षा पेपर व्हाईट घ्या. Tab चा वापर फक्त पुस्तकं वाचायला होणार नाही. मग इतर टाईमपास होत राहतो. शिवाय ॲप वरून वाचणं आणि पेपर व्हाइट वर वाचणं यात खूप फरक आहे.
किंडल घ्या. पुस्तक लगेच येते
किंडल घ्या. पुस्तक लगेच येते विकत घेतले की. वाट पहावी लागत नाही. पुस्तके स्वस्त आहेत. बॅगेत टाकले की कधीही कुठेही पुस्तक वाचत येते. पुस्तक घ्यायला विसरलो असे होत नाही. वायफाय असलेलं घेतले तरी चालेल. एक सिम कार्ड असलेले मॉडेल होते. ते सध्या आहे की माहीत नाही. पण त्याचा फार उपयोग नाही. वायफाय पुरेसे असते.
अमेरिकेत तर अजून स्वस्त मिळेल
अमेरिकेत तर अजून स्वस्त मिळेल चर्प्स तुम्हाला
किंडल अक्षरशः वसूल आहे जर तुम्हाला खरोखरच वाचनाची आवड असेल तर
पेपरव्हाईत साठी अनुमोदन
Oasis वगैरे लै महाग आहे आणि त्याची गरजही नाही एवढी
धन्यवाद अल्पना.
धन्यवाद अल्पना.
चिडकू, सिमकार्ड नसण्याबाबत सहमत. जिथे गेलो तिथे वायफाय नसले तरी सोबत मोबाईल फोन असतोच, त्याचे हॉटस्पॉट वापरता येईल तशी गरज पडली तर.
8 GB storage पुरेसे आहे का? साधारण 300 पानी एक पुस्तक साईझ किती MB असते किंडल एडिशन?
8 जीबी मध्ये दोन अडीच हजार
8 जीबी मध्ये दोन अडीच हजार पुस्तके बसतील
आणि काही पुस्तकांच्या पीएडिएफ असतील तर त्याही azw3 फॉरमॅट मध्ये कन्व्हर्ट करून किंडल वर वाचता येतात
Cool!
Cool!
वाचायचा किडा असेल तर किंडल
वाचायचा किडा असेल तर किंडल उपयोगाचे आहे असा माझा मैतुर म्हणतो. मला वाचायची आवड नाही. म्हणून किंडल नाही, अनुभव नाही.
किंडलवरील वाचलेल्या
किंडलवरील वाचलेल्या पुस्तकांच्या अपडेट्स साठी नवा धागा काढला.
https://www.maayboli.com/node/80821
च्रप्स, हवी ती माहिती मिळाली
च्रप्स, हवी ती माहिती मिळाली की कृपया मागेच्यावेळी सारखा धागा मजकूर शीर्षक बदलून डिलीट करू नका.)
>>> चालेल...
Tab घेण्यापेक्षा पेपर व्हाईट
Tab घेण्यापेक्षा पेपर व्हाईट घ्या>>>> पेपर व्हाइट हा नक्की काय प्रकार आहे?
किंडल ची सुधारित आवृत्ती
किंडल ची सुधारित आवृत्ती
डोळ्याला त्रास होणार नाही अशी रचना
त्यामुळे रात्रभर वाचले तरी चालते
हेखात्रीने सांगूंशकतो कारण मी वाचतो
अच्छा. अमेझॉनवर पेपर व्हाइट
अच्छा. अमेझॉनवर पेपर व्हाइट या नावाने सर्च करू का ?
पुस्तकाची pdf file मिळाली तर
पुस्तकाची pdf file मिळाली तर . . .
मोबाईल app असेल तर . .
Root directory>> android >>data >>Kindle>> files>> इथे पेस्ट करायची, move करायची.
डाउनलोड new books मध्ये pdf दिसते आणि उघडते.
मी दुसरे अॅप वापरतो. फ्री
मी दुसरे अॅप वापरतो. फ्री आहे. पीडीएफ पुस्तके तसेच नेहमी लागणारी कागदपत्रे पण त्यात साठवता येतात. डिजीलॉक पेक्षा पटकन ट्रॅफिकवाल्याला दाखवता येतात. दोन तीन अॅप्स आहेत. त्यातले रीड एरा हे बरेच दिवस आहे वापरात. पुस्तक वाचताना पांढर्या ऐवजी मळकट बॅक ग्राऊंड आणि कमी उजेडामुळे डोळ्याला कमी त्रास होतो. तरी पण पुस्तक वाचताना जेव्हढे सुरक्षित वाटते तितके किंडल पण नाही. लायब्ररीत कधीच हवे ते पुस्तक मिळत नाही. आधी बरीच पुस्तके विकत घेतली. आता फ्री पीडीएफ नाईलाजाने वापरतो.
शामा, सहमत.
शामा, सहमत.
मी मूनप्लस रीडर, लिब्रेरा, लिथिअम तीन ठेवली आहेत.
कागदपत्रांचे स्क्रीन शॉट्स घेऊन पटकन दाखवता येतात.
पुस्तकाची pdf file मिळाली तर
पुस्तकाची pdf file मिळाली तर . . .
किंडल अकाउंटचा एक इमेल अड्रेस असतो , अमेझॉन किंडल वेबसाईटवर सेटिंग करताना दिसेल xyz@kindle. com असा
त्या वर पीडिफ इमेल केली की किंडल वर सिंक करता येते.
मुलगी बाहेरगावी असेल तेव्हा मी तिला यावरून अभ्यासाचे काही आले असेल ते पाठवते क्वचित तर पत्र लिहून पीडिएफ करून ते पण पाठवते
बरोबर.
बरोबर.
टॅबवर वाचताना भरकटणे होते.
टॅबवर वाचताना भरकटणे होते. किंडल वर होत नाही हा फायदा आहे. पण टॅबवर मायबोली, वर्तमानपत्रे, वेब आर्टिकल, EPUB पुस्तके अशा अनेक गोष्टी वाचता येतात. पुस्तकात चित्रे आकृत्या असतील तर सहज पाहता येतात. फॉन्टचा रंग बदलता येतो. हे टॅबचे फायदे.
किंडलवर बाहेरच्या पीडीएफ कशा
किंडलवर बाहेरच्या पीडीएफ कशा वाचणार ?
काल पेपर व्हाईट घेतले आणि 3
काल पेपर व्हाईट घेतले आणि 3 मंथ स्बस्किप्शन...
पहिल्याच दिवशी चेतन भगत चे " गर्ल इन रूम 305" अक्खी वाचून काढली.... एकदम रियल पुस्तक वाचण्याचा फील आहे...
तुमची विपू पाहणार का च्रप्स?
तुमची विपू पाहणार का च्रप्स?
पुण्यात कोणी ७ जनरेशन चा
पुण्यात कोणी ७ जनरेशन चा किंडल स्वस्तात विकणार असेल तर कळवणे (३ ते ३.५ पर्यन्त)
परवा ऑफर होती की वर्षभराची
परवा ऑफर होती की वर्षभराची 2रु मध्ये
कोणी नाही घेतली का
हो काय??
हो काय??
अरेरे,माहिती नव्हतं..मी आजच महिना 199/- घेतलं.
नवीन वर्षाची भेट म्हणून
नवीन वर्षाची भेट म्हणून मर्यादित कालावधी साठी होती
पण आधीच्या ऑफर मध्ये असलेल्याना नव्हती म्हणून नवीन आयडी घेतला आणि त्यावर ट्राय केला तर मिळालं
मी डिसेंबर-२०१९ पासून किंडल
मी डिसेंबर-२०१९ पासून किंडल (ओएसिस - टेन्थ जनरेशन) वापरते आहे. आणि त्याच्या टोटल प्रेमात आहे.
मीवापु धाग्यावर मी गेलं वर्षभर त्याबद्दल वेळोवेळी लिहिलेलंच आहे.
डोळ्यांना अजिबात त्रास न होता सलग आणि भरपूर वाचता आलं पाहिजे ही माझी पहिली गरज होती. त्यासाठीच टॅब न घेता किंडल घेतलं. फाँट मोठा करून वाचण्याची मोठी सोय आहे.
आपण सेट केलेल्या वेळेत स्क्रीन सेपिया मोडमध्ये जातो. तो मोड खूप सूदिंग आहे.
अगणित पुस्तकं बघता येतात. विश-लिस्ट करून ठेवता येते. किंडल स्टोअरमध्ये हरवायला होतं. पुस्तकं खूप स्वस्त मिळतात.
८ जीबी स्टोरेजही भरपूर होतं.
मी २०१७ मध्ये किंडल
मी २०१७ मध्ये किंडल पेपरव्हाईट घेतले. फारच छान एक्सपेरियन्स आहे. मराठी पुस्तके पण भरपूर आहेत किंडल अनलिमिटेड वर.
मुख्य म्हणजे बुकमार्क्स करता येतात. शब्दार्थ शोधायला फार सोपे आहे. विकी पण चेक करता येते.
मी पेपरव्हाईट ११वी पिढी, ६.८"
मी पेपरव्हाईट ११वी पिढी, ६.८" घेतले. किंमत १४ हजार आहे. यात ऑडिओ बूक्स प्ले बॅक नाहीय. ब्लु टूथ हेडसेट वरून व्हॉइस कमांड देता येतात.
डिव्हाईसची उंची ६.९" आणि रुंदी ४.९" आहे (खिशात मावणार नाही) तर स्क्रीनची उंची ५.५" आणि रुंदी ४.०५" आहे. E ink display चा डोळ्यांना अनुभव छापील पुस्तकाच्या जवळचा वाटला. डोळ्यांवर ताण येत नाही.
आणि यात वेब ब्राउझर सुद्धा आहे.
पुढचे चार दिवस प्राइम
पुढचे चार दिवस प्राइम मेम्बर्ससाठी किंडल अनलिमिटेड - ३ महिने - ९९ रुपये असं रिपब्लिक डे डील आहे.
इच्छुकांनी लाभ घ्या.
.mobi एक्स्टेंशन बुक्स किंडल
.mobi एक्स्टेंशन बुक्स किंडल मध्ये टाकता येतात, जर तुमच्याकडे कॉपीज असतील तर.