Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
जास्त लाल झाल्या त्या वेगळ्या करून काळ मीठ, जीरा पावडर, हिंग लावून उन्हात ठेवले, बाकीचे कमी लालसरचे लोणचे केले
कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या
कोल्हापूरला श्री अंबाबाईच्या देवळा बाहेर , बहुतेक महाद्वारासमोर जिथे दगडु बाळा भोसले यांचे पेढ्याचे दुकान आहे, तिथेच काही बायका आवळ्याच्या वाळवलेल्या चकत्या विकतात. पण त्या इतक्या पांढर्या शुभ्र कशा रहातात देव जाणे. कोणाला माहीत आहे का याबद्दल? कारण ताजी सुपारी वा चिरलेला आवळा लाल काळाच पडतो. आम्ही मागे गेलो होतो तेव्हा घेतल्या होत्या, पण विचारायचे राहुन गेले.
आवळा नुसते मीठ घालून उन्हात
आवळा नुसते मीठ घालून उन्हात ठेवला तर लाल किंवा काळा नाही पडत.आमचा पांढरा राहतो(पण वाळण्या पूर्वी संपतो.
ओके अनु. थॅन्क्स. करुन बघते.
ओके अनु. थॅन्क्स. करुन बघते.
सुपारी अजून मुलीने खाल्लेली नाही. बहुतेक असे केल्यावर नक्कीच संपेल.
पण वाळण्या पूर्वी संपतो.>>>>
मी आवळ्याचे पाचक मात्र करते. ताजा किसलेला आवळा+ अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस + किसलेले आले + चमचा साखर आणी थोडा ओवा असे एकत्र करुन काचे च्या बाटलीत घालुन फ्रिझ मध्ये ठेवते. जास्त प्रमाणात करत नाही, कारण सर्व कच्चे आहे.
रश्मी, मीठ लिहायचं राहिलं.
रश्मी, मीठ लिहायचं राहिलं. (साध्या मिठाऐवजी रॉक सॉल्ट मस्त लागतं).
लहानपणी किंवा अगदी लग्न होईपर्यंत हे प्रकरण मला अतिशय आवडायचं. ते मुरलं की त्याला पाणी सुटतं, ते पण मी चमच्याने प्यायचे. आता हा पदार्थ पुर्ण विसरले होते. तुझ्या पोस्टने आठवण आली, आता नक्कीच करेन.
रश्मी मी करताना आवळा, मध,
रश्मी मी करताना आवळा, मध, सैंधव आणि साधं मीठ आणि आलं रस घालून करतो मस्त लागतं. लिंबू नाही. 3 आवळ्यांचं 3 दिवस आरामात पुरतं मी हापिसला ठेवतो बॉटल. पित्त थोडे दिवस तरी कंट्रोल मध्ये रहातं.
कोणीतरी आवळ्याचे पदार्थ असा
कोणीतरी आवळ्याचे पदार्थ असा धागा काढा ना... त्यात जुन्या लिंक आणि नवीन कृती असतील असा..
तुम्हीच काढा आणि हे वरचे
तुम्हीच काढा आणि हे वरचे डिस्कशन कॉपी पेस्ट करा
साबा स्पेशल पदार्थ
साबा स्पेशल पदार्थ
त्याला शेणवडी म्हणतात.
आवळे शिजवून, त्याला बिया काढून कणकेसारखे मिरची, काळे मीठ,हिंग याबरोबर मळून पापड्या सारख्या आकाराच्या वड्या प्लास्टिक वर थापून वाळवायच्या. वाळल्यावर काळ्या होऊन शेणाच्या गोवरी चा रंग दिसतो.
अतिशय जबरदस्त लागतात.
हो लागतात छान. पण ......
हो लागतात छान. पण ...... जाउद्या!
>> वाळल्यावर काळ्या होऊन
>> वाळल्यावर काळ्या होऊन शेणाच्या गोवरी चा रंग दिसतो>>
>> हो लागतात छान. पण ....>> कुठे शेण खायला गेली होतीस असं विचारायची सोय नाही रहाणार
माझ्या कडे स्वयंपाकाला येणारी
माझ्या कडे स्वयंपाकाला येणारी मुलगी आवळ्यखची चटणी करते. आवळे थोडे उकडून घ्यावेत. ( गिच्चगाळ नाही शिजवायचे. गर निघू शकेल एवढे मऊ करायचे.)
मग बिया काढून गर, मिरची, कोथिंबीर आणि सैंधव घालून वाटून घ्यायचे.
आपण हवाबाण हरडे किंवा हाजमोला
आपण हवाबाण हरडे किंवा हाजमोला गोळ्या घाण युआय असून खातो तसं
<<<>माझ्या कडे स्वयंपाकाला
<<<>माझ्या कडे स्वयंपाकाला येणारी मुलगी आवळ्यखची चटणी करते. आवळे थोडे उकडून घ्यावेत. ( गिच्चगाळ नाही शिजवायचे. गर निघू शकेल एवढे मऊ करायचे.)
मग बिया काढून गर, मिरची, कोथिंबीर आणि सैंधव घालून वाटून घ्यायचे. >>>
अशीच चटणी आवळे न शिजवता किसून पण करता येते. ओले खोबरे घालून अजूनच छान लागते.
शिजवलेल्या आवळ्याच्या बारीक
शिजवलेल्या आवळ्याच्या बारीक फोडी करायच्या. त्यात फेसलेली मोहरी, दही, मीठ, हवी तर थोडी साखर आणि हिरवी मिरची घालून केलेलं आवळ्याच् रायत ही छान लागत.
फेसलेली मोहरी>>?? पिवळी?
फेसलेली मोहरी>>?? पिवळी?
(माहित नव्ह्ते तेच बरे होते 
शेणवडी खल्ली आहे पण नाव माहित नव्हते
ताजा किसलेला आवळा+ अर्धा छोटा चमचा लिंबाचा रस + किसलेले आले + चमचा साखर आणी थोडा ओवा असे एकत्र करुन काचे च्या बाटलीत घालुन फ्रिझ मध्ये ठेवते.>>> हे मी नक्की करणार. वाचता वाचताच तों.पा.सु.
हो की अनु. मीठाबद्दल विसरलेच
हो की अनु. मीठाबद्दल विसरलेच होते. थँक यु.
यात काळे मीठच घालते मी.
आशु, करुन बघ. ताजे छान लागते. माझी आई यात साखर घालुन ठेवायची त्यामुळे ते मुरुन दाट व्हायचे. डायबेटीस मुळे साबा साखर घालत नाहीत.
https://www.maayboli.com
https://www.maayboli.com/hitguj/messages/103383/94293.html?1163495391 सगळीकडे शोधल्यावर शेवटी हे सापडले.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/52339
आवळा टक्कु/तक्कु
माझीच रिक्शा
फेसलेली मोहरी>>?? पिवळी?
फेसलेली मोहरी>>?? पिवळी? नाही, डाळ नाही , अख्खी मोहोरी.
मिक्सर मध्ये घालून पावडर करायची मग थोडंस पाणी घालून पुन्हा फिरवायच.
लाल असेल तर जास्त चांगलं पण नेहमीची काळी ही चालते.
खरे आहे हवाबाण हरड्यांचा युआय
खरे आहे हवाबाण हरड्यांचा युआय म्हणजे अक्षरक्षः उंदीर , शेळी आठवतात.
आम्हीतर लेंड्याच म्हणायचो
आम्हीतर लेंड्याच म्हणायचो
कविताज् किचन वरून आवळ्याचे लोणचे केले होते , मस्तच झाले होते.
>>>आम्हीतर लेंड्याच म्हणायचो
>>>आम्हीतर लेंड्याच म्हणायचो
खी: 
खी:
कच्च्या आवळ्या आल्याची चटणी
कच्च्या आवळ्या आल्याची चटणी पण मस्त होते, फक्त तिखट मीठ एवढं घातलं तरी चालतं, किंचित साखर गूळ पण चालतो. आवळे जास्त आंबट असतील तर थोडा जास्त गूळ किंवा साखर घालायची. बाकी जिरं, हिंग, मीरपूड वगैरे घातलं तर अजून छान लागते.
बाकी नुसत्या मिठाच्या पाण्यात आवळे घालून ठेवतातच आमच्याकडे, मी दरवर्षी करतेच थोडे.
आम्हीतर लेंड्याच म्हणायचो>>+१
आम्हीतर लेंड्याच म्हणायचो>>+१
हवाबाण हरडे म्हणजे हवा बाणासारखी येते.
अन्जू, किती पाणी,मीठ आणि आवळे
अन्जू, किती पाणी,मीठ आणि आवळे यांचे प्रमाण लिही ना.आवळे बुडतील इतके पाणी असावे,पण मीठ किती ते लिही.
मीठ भरपूर म्हणजे भरपूरच
मीठ भरपूर म्हणजे भरपूरच घालावं लागत त्यात, खूप खारट लागायला हवं पाणी. आवळे पूर्ण बुडायला हवेत पाण्यात त्या साठी भांड उभं घ्यायचं. प्लस भांड काचेचं किंवा चिनी मातीचं घ्यायचं. स्टील मिठा मूळे खराब होऊ शकत.
आमच्या कडे ही मिठातले आवळे खूप आवडतात.
कोणीतरी आवळ्याचे पदार्थ असा
कोणीतरी आवळ्याचे पदार्थ असा धागा काढा ना... त्यात जुन्या लिंक आणि नवीन कृती असतील असा..
लंपन, सुचवल्याबद्दल धन्यवाद. पण मला नवीन लेखन करण्याचा पर्याय दिसतच नाही माझ्या log in मधे.
धन्यवाद ममो!
धन्यवाद ममो!
संजीव कपूरच्या रेसिपीनेआवळ्याचे लोणचे करून पहा.फार सुरेख लागते.मी लोणचेवेडी नसूनही आवडीने खाल्ले.
Olya haldiche lonache kase
Olya haldiche lonache kase karayche?
त्याला फेसलेली मोहरी का
त्याला फेसलेली मोहरी का म्हणतात
अस्मिता,
अस्मिता,
कविताज् किचन वरून आवळ्याचे लोणचे केले होते , मस्तच झाले होते.>> आवळे भारतीय दुकानातून फ्रोझन सेक्शन मधून ? मी CA मधे असते.
मी ओली हळद , थोडी आंबेहळद ,
मी ओली हळद , थोडी आंबेहळद , आवळे किसले. त्यात मीठ, लिंबाचा रस आणि केप्र चा कैरी लोणचे मसाला घालून एक दिवस ठेवले. दुसऱ्या दिवशी मोहरी, हिंग, हळदीची फोडणी गार करून घातली. 2 दिवसांनी खायला काढले . बाहेर किती टिकेल माहीत नाही म्हणून फ्रीज मध्ये ठेवले आहे .
आवळे आणि थोडे आले , गूळ घालून
आवळे आणि थोडे आले , गूळ घालून मुरांबा पण छान होतो . आवळे आणि आले कच्चेच मिक्सर ला फिरवून घ्यायचे . बारीक वाटणात गूळ जास्त , साखर कमी घालून अर्धा तास ठेवायचे . गूळ विरघळ्यावर शिजवायला ठेवायचे . साधारणपणे 15-20 मिनिटात शिजते . वरून वेलची पूड घालायची . हे आमच्याकडे पित्तावर खूप उपयोगी पडते .
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/80752
आवळ्याचे पदार्थ
जमले एकदाचे
वरचे प्रतिसाद copy paste केले तर चालतील का ?
हो
हो
समप्रमाणात ओली हळद, आंबे हळद,
समप्रमाणात ओली हळद, आंबे हळद, आले यांचे बारीक जुलीयन्स करायचे. त्यात चवीपुरते मीठ आणि भरपूर लिंबाचा रस घालायचा. सर्व नीट मिसळून काचेच्या बाटलीत भरून फ्रीज मधे ठेवायचे. मी साधारण १०-१२ दिवसात संपेल इतकेच बनवते.
फार पूर्वी काही ज्ये नांना भाटिया हॉस्पिटलमधे रहावे लागले होते. तिथे दर जेवणात हे लोणचे असायचे आणि ज्ये नाआवडीने खात असत. तिथल्या स्टाफने सांगितलेली रेसिपी. सर्जरी झालेल्या पेशंटना आवर्जून देत असत ( म्हणे).
याला पाचक म्हणतात
याला पाचक म्हणतात, थोडे पादेलोण घातले तर अजून चांगले लागते
हो वृषाली , तेच ...खरंतर ते
हो वृषाली , तेच ... खरंतर ते
फ्रोजन आवळे संपवायचे म्हणूनच लोणचे केले पण आवडले आणि पुन्हा करणारे. मी जरा कमी उकडले कारण फ्रोझन असेही कडक नसतात. त्यात मेथ्या आणि मोहरीची पूडही आहे. खूप मस्त आणि वेगळे लागले. फ्रिझमधे ठेवावे लागते, बाहेर रहाणार नाही. (टेक्ससमधे काहीच टिकत नाही).
धनवन्ती, हाच प्रतिसाद तिकडेही देते.
मस्त दिसतंय अस्मिता.
मस्त दिसतंय अस्मिता.
हेमाताई थॅंक यु. देवकी मला उत्तर देता आलं नसतं. अंदाजपंचे दाहोदरसे. मी थोडेच करते आणि मीठ थोडं जास्त घालते. यात मी सोबत आलं घालते कधी कधी. छोट्या कैऱ्या पण छान लागतात मिठातल्या आणि कच्ची हिरवी चिंचही.
खूप थँक्यू गं अस्मिता! करून
खूप थँक्यू गं अस्मिता! करून बघायची हिम्मत करते
आमच्या घरी कच्चे बीट किंवा
आमच्या घरी कच्चे बीट किंवा बीटाची कोशिंबीर वगैरे खाल्ली जात) नाही. सध्या बीट धिरडे, पराठे वगैरे मधून घालायचा माझा प्लॅन आहे. पहिला पदार्थ यशस्वी झाला तर बीट घरच्यांच्या गळी उतरवता येईल, नाहीतर पुढच्या प्रत्येक प्रयोगाला विरोध होईल. मी बऱ्याच रिसीपी बघून त्यातली एक फायनल केली आहे. हिरवे मूग रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी त्यात बीट किसून घालून धिरडी हा प्रकार चवीला बरा लागेल आणि बीटाचा उग्रपणा जाणवणार नाही, अशी आशा आहे.
यात बीट किसून किंवा कच्चे बीट मिक्सर मधून काढून किंवा बीट शिजवून घेऊन मिक्सरमधून काढून प्युरी असे तीन चार प्रकार करता येतील.
मला प्रश्न आहे की यातला कुठला प्रकार बीटाचे फायदे देईल आणि चवीला उग्रपणा किंवा बीटपणा कमी करेल.
टीप्स प्लीज.
बीट उकडून घ्या व कुस्करून
बीट उकडून घ्या व कुस्करून त्यातच कणीक लसूण कोथिन्बीर मिरची मीठ जिरे वाटलेली गोळी घालून पराठे पीठ भिजवता येइल.
हिरवे मूग वेगळे सलाड केले तर बरे होईल. हायपर पौष्टिक पदार्थ नको.
बीट उकडून किंवा किसून थालीपीठ
बीट उकडून किंवा किसून थालीपीठ पराठ्यात घालता येईल.पण प्रमाण कमी.बीटाचा रंग खूप लवकर पसरतो.(बीट, गाजर,कोबी, बीन्स असं सगळं थोडं थोडं घालून कटलेट चांगले होतील.
आता इतकं भाषण ऐके
लहान मुलांची त्या पदार्थाची आठवण खराब होते.(म्हणजे आज बीट जास्त असलेलं थालीपीठ खाल्लं आणि उग्र वाटलं तर मुलं आधी 3-4 वेळा खाल्लेल्या साध्या आणि आवडलेल्या भाजणी थालीपीठ ची आठवण विसरून फक्त हीच लक्षात ठेवतात.)
त्यापेक्षा हॉलिवूड पटात त्या गुन्हेगारांना पोलीस 'कम क्लीन' वगैरे सांगतात तसं कम क्लीन करून 'मी या पदार्थात आजपुरतं अगदी थोड्या प्रमाणात बीट घालणार आहे.नेहमी आपल्याला तो आवडतो.ही चवही आपल्याला आवडेल.न आवडल्यास पुढच्या वेळी आपण भाज्या घालून वेगळं काही करून बघू.पण आज हा पदार्थ तुम्ही मनात बीट, भोपळा,गाजर याचे दृष्टिकोन न ठेवता ओपन माईंड ठेवून खावा.' असं काही
पर्यंत समोर कोण थांबणार हा प्रश्न आहे मात्र.
अमा म्हणतात ते बरोबर.मूग उकडलेला बटाटा थोडा कांदा मिरची टोमॅटो असं सॅलड वेगळं करता येईल.
शिजवून किंवा तसेच तुकडे करून
शिजवून किंवा तसेच तुकडे करून मुकाट्याने खावे
त्याला कमी वेळ लागतो
साल काढून मगं उकडल्याने तो
साल काढून नंतर उकडल्याने तो अर्दी नट्टी फ्लेवर कमी होतो. मगं किसून कोशिंबीर करता येते.
बिटाचे सूप करून बघा. छान
बिटाचे सूप करून बघा. छान रंगामुळे मुले पितील ( असे वाटते
). वरून थोडे क्रीम/ चीज घालून बघा.
https://www.maayboli.com/node/41744
पाकृ पेक्षा प्रस्तावना जास्त भारी आहे..
बीट उकडून घेऊन बारीक फोडी
बीट उकडून घेऊन बारीक फोडी करायच्या , कांदा ही बारीक चिरून घ्यायचा. हिरवी मिरची, कढीपत्ता ,जीरं ,फोडणीत घालून मग कांदा घालायचा. कांदा मऊ झाला की मग बिटच्या फोडी, मीठ, साखर, थोडी धन्याची पूड ,थोडं दाण्याचं कूट आणि खोवलेला नारळ घालून परतायचं थोडा वेळ. झाली भाजी. खूप छान लागते. जरा ही उग्र लागत नाही .पण लाल रंग बघूनच मुलं हात लावणार नाहीत एखाद वेळेस. चांगली लागतेय हे एक घास खाल्ला तर कळेल ना !
बीटाची बर्फी करतात. नारळ
बीटाची बर्फी करतात. नारळ घालून किंवा बटाटाही घालतात.
बीटाची प्युरी , एक चमच
बीटाची प्युरी , एक चमच व्हिनेगर , तिखट , चमचाभर साखर , मीठ - सगळं चांगलं उकळवून शिजवून घ्या . आंबट गोड तुरट मस्त चटणी . Sandwichमध्ये छान लागते. हवं तर थोडं पाणी घालून केचपला पर्याय.
शेफ रणवीरची रेसिपी आहे. रगडा-पाटीस , कटलेट , मिसळ , भेळ , sandwich साठी आतापर्यंत य वेळा बनवली आहे मी. आमच्या घरी एकदम हीट आहे.
Pages