Submitted by मेधा on 1 December, 2021 - 09:24
आधीच्या धाग्यावर २००० पेक्षा जास्त पोस्टी आल्या म्हणून हा नवा धागा
आधीच्या धाग्यांचे दुवे :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा -३ https://www.maayboli.com/node/38475
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी करते उद्घाटन आता. pumpkin
मी करते उद्घाटन आता. pumpkin puree चा कॅन उघडला मधे. थोडी घालून पराठे केले. आता शिल्लक राहिलेल्यापासून काय करता येईल?
पाय! त्याचेच तर दिवस आहे
पाय! त्याचेच तर दिवस आहे सध्या. एकदम सोपा आणि बेस्ट होतो.
भरीत
भरीत
त्याचं ऑलरेडी भरीतच झालेलं
त्याचं ऑलरेडी भरीतच झालेलं आहे

आधी छान तूपात परता आणि खीर
आधी छान तूपात परता आणि खीर बनवा
पँम्पकीन प्युरीचा कॅन ऐकून
पँम्पकीन प्युरीचा कॅन ऐकून हसूच आले
तो काय हापूस आंबा आहे
आमच्या भारतात एक मोठा भोपळा 10 रु ला चतुर्थीच्या चंद्रागत तुकडे तुकडे कापून देतात
पंपकिन बिस्कोटी छान होते.
पंपकिन बिस्कोटी छान होते.
हो अगदी
हो अगदी
आणि मग त्या भोपळ्याचे लहान तुकडे करून सालं काढताना सूरी दमते.
गाजर भोपळा सूप किंवा भोपळा टोमॅटो सूप चांगले होते
भोपळा कैरी सूप पण मस्त होते.
भोपळा कैरी सूप पण मस्त होते. माबोवर रेसिपी आहे.
त्यात गूळ घालून कणीक भिजवून
त्यात गूळ घालून कणीक भिजवून घारगे करा.
केकचे रेडीमिक्स आणायचे नि
केकचे रेडीमिक्स आणायचे नि त्यात पंमकिन प्युरी घालून मफीन करू शकता. अर्थात मूळात पंप्कीन मफीन आवडायला हवे. कुणाकुणाला तेच आवडत नाहीत मग हे उपयोगाचे नाही. https://youtu.be/2hLxYsBkrHg?t=78
काय त्रास आहे. जुन्या
काय त्रास आहे. जुन्या धाग्याला कुलुप लावून मोकळे. असो.
>>>
पण आतून फार घट्ट व अगोड होती
<<
जामोप्यांची पपई.
कच्ची पपई किसून वाळवून पूड करून ठेवावी. ओला पल्प पण वापरता येतो. हे मटणाच्या मॅरिनेशनमधे चमचाभर घातले तर अ ती शय सुंदर टेंडराईज होते.
आले लसूण पेस्ट फ्रीज मधे किती
आले लसूण पेस्ट फ्रीज मधे किती दिवस टिकते? आणि कणिक पण किती दिवस टिकते?
वरील सगळे करून प्युरी शिल्लक
वरील सगळे करून प्युरी शिल्लक राहिली तर परत पराठे करा.
आशु, कणिक फ्रिझ मध्ये २
आशु, कणिक फ्रिझ मध्ये २ दिवसाच्या वर ठेऊ नकोस. आपल्याला पाहीजे तेवढी भिजवावी. डोक्याला ताप आहे, पण आरोग्य महत्वाचे.
आलं लसूण पेस्ट बनवल्यानंतर
आलं लसूण पेस्ट बनवल्यानंतर चमचाभर तेल गरम करून पेस्टवर टाकून मिक्स करून एअर टाईट डब्यात ठेवावे.महिनाभर छान राहते फ्रिजमधे.
कणिक फक्त आज भिजवलेली उद्या करू शकतो.परवा काळी पडते आणि चव पण बदलते.
कणकेचा गोळा उरलाच तर तो बुडेल
कणकेचा गोळा उरलाच तर तो बुडेल इतके पाणी घालून डब्यात ठेवावा. पांढरा शुभ्र राहतो.मुद्दाम कणीक मळून ठेऊ नये.
उरलेल्या पंपकीन प्युरेमधे
उरलेल्या पंपकीन प्युरेमधे मिल्कपावडर टाकुन छोटे छोटे गोळे बनवा आणी त्यांना तळुन गरज वाटल्यास साखरेच्या पाकात टाकुन गुलाब जाम (पंपकीन-जाम) बनवा.....गोड नको तर
उरलेल्या पंपकीन प्युरेमधे म्ल्टीपर्पज फ्लार नी एक हिरवी मिरची नी लसुण पाकळ्या वाटुन कबाब तळा. नुसते किंवा टोमॅटो ग्रेव्हीत टाकुन खावु शकाल.
(अजून संपला नसेल तर) सांबार
(अजून संपला नसेल तर) सांबार ला दाटपणा आणायला वापरता येईल.
मूळ पावभाजीचा आत्मा हरवणार नाही इतक्या लहान प्रमाणात पावभाजीतही वापरता येईल.
गुलाबजाम
गुलाबजाम
कणीक फ्रीजरमध्ये व्यवस्थित
कणीक फ्रीजरमध्ये व्यवस्थित रहाते.. एक - दोन आठवडे ठेवली आहे. म्हणजे आस्वपुचा एक भाग म्हणून. आठवड्यात साधारणपणे जेवढ्या पोळ्या करायच्या असतील तेव्हढी कणिक एकदाच भिजवून घ्या. फ्रीजरमध्ये ठेवताना मात्र एका वेळी जेव्हढ्या पोळ्या करायच्या असतील तेव्हढ्याच पोळ्यांसाठी लागणारा गोळा glad wrap मध्ये व्यवस्थित बांधून ठेवा. कणिक अजिबात उघडी रहाता कामा नये! इथे (मेलबर्न) मी संध्याकाळी पोळ्या करायच्या असतील तर सकाळी ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी कणिक फ्रीजमध्ये ठेवते. सकाळी करायच्या असतील तर रात्री झोपण्यापूर्वी फ्रीजमध्ये. ओट्यावर पण काढुन ठेवते. पण पटकन थॉ होते. अर्थात हे सगळं दोन वर्षांपूर्वी करायचे! गेली जवळपास दोन वर्षे पोळ्या करण्यापूर्वी कणीक भिजवून घेते (इतरांकडून).
हल्ली बाजारात 5 रु पासून
हल्ली बाजारात 5 रु पासून गुलाब जामुन मिळतात
ते पाव , मैदा , कशाहीपासून बनत असतील
कागदाच्या लगद्यापासूनही असतील
शुद्ध खवा गुलाब जामुन खाऊन कित्येक दशके उलटली आहेत
धन्यवाद सगळ्यांना, खूप छान
धन्यवाद सगळ्यांना, खूप छान छान रेसिपीज मिळाल्या भोपळ्याच्या.
आधी सोप्या करून बघीन
हल्ली बाजारात 5 रु पासून
हल्ली बाजारात 5 रु पासून गुलाब जामुन मिळतात
ते पाव , मैदा , कशाहीपासून बनत असतील>>रूपालीने (बिग बॅास२ मधे) ४ थेंब तेलातले गुजा बनवले होते.
चार थेंब तरी कशाला मग?शून्य
चार थेंब तरी कशाला मग?
शून्य तेलातले गुलाब जाम.
हे म्हणजे मग वेगळ्या प्रकारचं
हे म्हणजे मग वेगळ्या प्रकारचं बिस्किट किंवा नानखटाईच झाली मग ती.
(तेलाचं पाप टाळलं, शुगर सिरप च्या पापाचं काय? खजूर गोड चिंच पाक करुन त्यात घोळवणार का?)
(No subject)
साखरे ऐवजी म्हाळसाच्या मोदक
साखरे ऐवजी म्हाळसाच्या मोदक रश्शात बुडवली की शुगर सिरपचं पाप पण नाही लागणार.
गुलाब जाम नव्हे पण एकंदरीत शून्य तेल पाकृ किंवा कमीतकमी तेल वापरुन एअर फ्रायरवर कुकिंग काही वाईट नाही. (डिस्क्लेमर: जबरदस्ती कोणावरही नाही, ज्यांना ते करायचे आहे त्यांच्यासाठी. असे पदार्थ अनेकांना चव पाहून नावडू शकतात तर काहींना केवळ कल्पना करूनही.)
थँक्यु देवकी मॄणाली रश्मी
थँक्यु देवकी मॄणाली रश्मी वत्सला.
देवकी, पाण्यात बुडवलेली कणिक टिकेल पण लाटताना माझे फार जब्बर हाल होतील
देवकी, पाण्यात बुडवलेली कणिक
देवकी, पाण्यात बुडवलेली कणिक टिकेल पण लाटताना माझे फार जब्बर हाल होतील>> नाही काही होत, भिजवलेली कणीक पाण्यात विरघळत नाही की सैल पडत नाही, ती बाहेर काढुन अगदी थोडे पिठे लावुन सारखी करायची आणी नेहमीसारख्या पोळ्या करायच्या.
मी फ्रिज मधे नाही ठेवलि पण भिजवुन अर्धा तास पाण्यात बुडवुन मग पोळ्या करायचा प्रयोग केला होता, अजुन मौसर होतात पोळ्या (माबोकर सईने लिहली होती हि यक्ति०)
नतर काही केल नाही एवढ जमत नाही, मी जेव्हा पोळ्या करायच्या तेव्हाच भिजवते.
माबोकर सईने लिहली होती हि
माबोकर सईने लिहली होती हि यक्ति०)..... येस!
ग्रेट आणि थँक्स
दिवाळीत राहिलेले थोडे घरातले
दिवाळीत राहिलेले थोडे घरातले बेसनाचे लाडू , कुठून कुठुन फाराळात आलेले, थोडे दुकानातले पण सगळे बेसनाचेच
शिल्ल्क आहेत फ्रीजमधे. त्याचं काय करता येईल. स्टफ गोड पोळ्या ऑप्शन ट्राय करावा का?
मला पाठवा.
मला पाठवा.
फोडणीचा लाडू करा आता.... आहे
फोडणीचा लाडू करा आता.... आहे धागा तर काहीही विचारता बरं
.... चांगले बेसनाचे लाडू आहेत तर खायचे ना....
मला पाठवा.>>>>>> घरीच या
मला पाठवा.>>>>>> घरीच या त्यापेक्षा
आहे धागा तर काहीही विचारता बरं >>>> असंच जरा मजेमजेच रिप्लाय येतात का ब्घायला
तुम्हीच पहिल्या 
बेसन पोळी मस्त होईल. तूप
बेसन पोळी मस्त होईल. तूप सोडून खरपूस भाजून घ्या.
त्याचे सारण करून गोड करंज्या, साटोर्या, किंवा कचोरी ट्राय करता येईल.
(तसा मला प्रश्न पडला आहे की, बेसन लाडू शिल्लक राहतातच कसे
)
साबांकडून पण गोड पोळीचीच
साबांकडून पण गोड पोळीचीच फर्माईश झालेली आहे.
साटोर्या>>>>>>>>>>> यात खवा पण असतो का?
बेसन लाडू शिल्लक राहतातच कसे Lol )>>>>>>>>> हे नका विचारू बै
यात खवा पण असतो का? >> हो
यात खवा पण असतो का? >> हो जनरली खव्याच्या करतात पण आपल्याकडे बेसन लाडू आहेत म्हणून त्याचे सारण करायचे आणि नविन प्रकार आहे असे सांगायचे
हाकानाका
हे नका विचारू बै >> नेशन वाँट्स टू नो
मला पण हाच प्रश्न पडला आहे
मला पण हाच प्रश्न पडला आहे की शिल्लक राहिलेच कसे बेसन लाडू ? नुसतेच संपत नसतील तर रीमिक्स करण्यात पण वेळ, श्रम आणि जास्तीचे पदार्थ घालून फरक पडेल काय
साखरे ऐवजी म्हाळसाच्या मोदक
साखरे ऐवजी म्हाळसाच्या मोदक रश्शात बुडवली की शुगर सिरपचं पाप पण नाही लागणार.>> हो पण तेलाचं पाप लागेलच
मेधाला पडलेला प्रश्न मलाही
मेधाला पडलेला प्रश्न मलाही पडलाय
त्यापेक्षा आधिचा करोना आता कमी झालाय नविन व्हेरियन्ट वाढुन रिस्ट्रिक्शन यायच्या आत एक टिपार्टी करा किवा माबो गटग करा , सगळे लाडू चुटकिसरशी सन्पतिल.
दिवाळीत राहिलेले थोडे घरातले
दिवाळीत राहिलेले थोडे घरातले बेसनाचे लाडू , कुठून कुठुन फाराळात आलेले, थोडे दुकानातले पण सगळे बेसनाचेच शिल्ल्क आहेत फ्रीजमधे. त्याचं काय करता येईल. स्टफ गोड पोळ्या ऑप्शन ट्राय करावा का?>>> माझ्या फ्रिजमध्ये पण आहेत बेसन लाडू शिल्लक, पत्ता द्या पाठवून देते, तुमच्या लाडवांबरोबर यांच पण करा काय ते.
नुसतेच संपत नसतील तर रीमिक्स
नुसतेच संपत नसतील तर रीमिक्स करण्यात पण वेळ, श्रम आणि जास्तीचे पदार्थ घालून फरक पडेल काय Happy>>>>>>>>>>> घरच्या ज्येना हा मुद्दा पटवून द्या
तुम्हाला बेलाडू बक्षिस
माझ्या फ्रिजमध्ये पण आहेत बेसन लाडू शिल्लक, पत्ता द्या पाठवून देते, तुमच्या लाडवांबरोबर यांच पण करा काय ते.>>>>>>>> बघा इकडे यांचे पण राहिले ना? आजच झाल्या पोळ्या करून... फोटू टाकते थोड्यावेळात.
बेसन लाडू उरु शकतात की, इतर
बेसन लाडू उरु शकतात की, इतर कुणी दिलेले किंवा विकत चे नेहमी उरतात माझ्याकडे
मला फार क्वचित इतर कोणाच्या हातचे बेसन लाडू आवडतात! कधी तूप चांगले नाही, कोणी बेसन नीट भाजले नाही, कुणाची साखर फार जास्त, कधी वेलची जायफळ फार कमी /जास्त यामुळे बेसन लाडू फारच वेगवेगळे लागू शकतात. आणि संपत नाहीत मग. असो. मीही फॉलो करते आता हे डिस्कशन.
मै, अनुमोदन. मला आता स्वतः
मै, अनुमोदन. मला आता स्वतः केले किंवा हल्दिरामकडचे ताजे लाडू आवडतात फक्त. एरवी मी अजिबात बेसन लाडू खात नाही.
बेसनाचा शीरा ???
बेसनाचा शीरा ???
मी करून बघितला नाही , पण आयत बेसन भाजलेल आहे , एक लाडू कुस्करून जरा गरम करून घ्या. त्यात दुप्पट गरम पाणी हळूहळू घालून ढवळून घ्या.
एक लाडू जरा चपटा करून
एक लाडू जरा चपटा करून ओव्हनमधे ठेवा. बेक करून बघा. नानकटाईसारखं होईल काहीतरी.
मला फार क्वचित इतर कोणाच्या
मला फार क्वचित इतर कोणाच्या हातचे बेसन लाडू आवडतात....... +१.
मी यावेळी दुसऱ्यांकडून आलेला फराळ गोळा करून,बागेत नेऊन दिला.sweeper,chaukidar hote.amachyakade सगळेजण बाहेरून विकत आणून देतात.नशीब प्रत्येक जिन्नस छोट्या पिशव्यात भरलेले होते.
आमच्या आईचा फराळ कसा होत असे
आमच्या आईचा फराळ कसा होत असे ते आता आठवत नाही पण मला लहानपणी दुसऱ्यांकडचा फराळ, तिळगुळाचे लाडू वैगेरे काही ही अजिबात आवडत नसे. मी आईला विचारायचे, "आपला आहे का , " आई नाही म्हणली तर मग पुढचं वाक्य ठरलेलं , "मग मला नको ". आता एवढे नखरे नाहीयेत पण नावडीनेच खाते.
ह्या स्वानुभवावरून कोणाला फराळ द्यायच्या भानगडीत पडत नाही. कायम ड्राय फ्रुट च देते फराळाऐवजी.
Pages