सध्याच्या परीस्थितीत घर घेणे किती योग्य आहे?

Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 23:17

मी सध्या नाॅर्थ कॅरोलीना मध्ये रहात आहे आणि गेल्या ४ महिन्यांपासून घर खरेदीच्या प्रयत्नात आहे.. आधी वाटलेलं घराच्या किंमती कमी होतील पण तस काहीच झालेलं दिसत नाहीए. फक्त इंटरेस्ट रेट कमी झालाय पण रिस्क फॅक्टरही वाढला आहे.. एखादे घर बघून आले की निर्णय घेईस्तोवर विकलं जात आहे.. त्यामुळे घर घ्यावे का थोडं हे वर्ष जाऊ द्यावं हा विचार करतेय. कोणी सध्याच्या परीस्थितीत घर घेतलय का? जाणून घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Use group defaults

गरीबीमुळे जागा वाचवणारे असे फर्निचर बनवायला मला तरी आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=WkbtvG4DKto

जमल्यास गुप्त खोल्या, भुयारं, गुप्त मार्ग घरात बनवायची इच्छा आहे. पुन्हा पहिल्यासारखी हलाखीची परिस्थिती झाल्यावर जमेल कदाचित.

दोघांना तेव्हढा वेळ लागला. एकतर पॅकिंग खोलून कश्याला काय-कसे लावायचे ते बघण्यातच एक दिड तास गेला. त्यातून आमचे पिल्लू घरभर बागडत होते. टेबलचे भाग इतके जड होते कि एक व्यक्ती फक्त धरायला. टेबलची तीन पाने त्याला खालून जोडणारी फळी, चार जड पाय, त्याचे प्रत्येकी ३-४ स्क्रू. सहा खुर्च्यांचे २४ पाय, त्या प्रत्येक पायाचे २-३ स्क्रू. त्यात घरच्या स्क्रू बीट, मशिनचा फारसा उपयोग झाला नाही. सगळा अनुभवच नवीन होता. पण टेबल मजबूत आणि चांगला आहे. घेतल्याचे दु:ख नाही झाले.

@अस्मिता - धन्यवाद! तूस्सी ग्रेट हो
@पा.आ सॅारी शां.मा -
वास्तुशांतीला संपूर्ण मायबोलीला जेवण ठेवले तर सगळे सुरळीत होईल.>> नुसतं जेवणच काय, सगळ्यांनी मुक्कामालाच यावे
घरात पाळण्यासाठी एक पाघो किंवा गेंडा माझ्याकडून भेट>> सोबत एक तंदूर पण द्या.. कबाबांसाठी Proud
@च्रप्स आणि सियोना - खूप खूप धन्यवाद

अभिनंदन !!!
फर्नीचर वर एखादा धागा काढा कोणी तरी... सद्या अस्मिता सारख्या फेज मधुन जात असल्यामुळे वाचायला आवडेल Happy

अभिनंदन.
आता घर घेतलंय तर पहिले अनेक महिने वीकडेला फर्निचर, कर्टन/ ब्लाईंड आणि अशाच असंख्य गोष्टी घेणे आणि वीकेंडला ते जोडत बसणे हे काम असणारे. कंटाळा आला की होम डिपो, लोज, होमसेन्स, बाथ बॉडी पासून बियॉंड पर्यंत चक्करा मारणे हा विरंगुळा आहे हे लक्षात असू द्या.
त्या रामतीर्थकर बाई अमेरिकेला येत्या तर म्हणत्या .. फर्निचर. जोडता. आलंच. पाहिजे. Proud
My-IKEA-Christmas-tree-has-arrived-I-dont-even-know-where-to-start-meme-8600.png

अभिनंदन!

घर घेतल्यावर फर्निचर व इतर गोष्टी आपोआप यायला सुरूवात होते. त्यासाठी आवर्जून काही करावे लागत नाही Happy तेव्हा त्याबद्दल इतका विचार करू नका.

खुर्च्या वगैरेंसकट डायनिंग टेबल सेट असेल तर पाच तास काही अगदी जास्त नाहीत, अनपॅकिंग पासून. काही दुकानांच्या इन्स्ट्रक्शन्स क्लिअर नसतात. काही वेळा आपली अलाइनमेण्ट बिघडते. मी अनेकदा टीव्ही लावून त्यासमोर हा उद्योग करायचो. मग मधेच एखादे पॅनेल उलटे लागणे, नंतर पुढे ४-५ पाने गेल्यावर ते कळणे, मग पुन्हा तेवढा भाग काढून परत लावणे वगैरेमधेही वेळ गेला आहे. त्यात मधे चहाचे ब्रेक्स ई.

अमित - ख्रिसमस ट्री असेम्ब्ली Lol माझ्या डोळ्यासमोर काहीतरी स्वीडिश नाव असलेले सेक्शन आले आयकिया मधले.

खूप खूप धन्यवाद!!
IKEA वरचे सगळेच जोक्स भारी. माझी सुरूवातही पॅांग चेअरच्या असेंबली पासूनच झाली आहे..पण आता IKEA चे फर्निचर फारसं आवडत नाही

चांगले फर्निचर हवे असेल तर ikea नकोच... पॉटरी बार्न आहे का तुमच्या इथे... तिथून घ्या.. महाग असते पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे...

घराबद्दल अभिनंदन म्हाळसा. आमच्या सुकडू सुताराला पाठवू का? आयकियाच्या तोंडात मारेल असा रंधा मारून देतो.

नविन घराबद्दल अभिनंदन म्हाळसा! Costco मधे सगळ फर्निचर मिळेल, होलिडे सिझन सम्पला की ते फर्निचरच आणतात. वन स्तोप शॉप.
आताही भरपुर डिस्काउन्ट असेल सगळिकडे

अभिनंदन म्हाळसा. चला अमेरिकेत एक हक्काचे घर झाले. तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा केक खाऊ घालायला लवकरच येइन. Happy

मीही same phase. फक्त जागा आमची भारतात आहे.
पुण्यात स्वतःचा flat मिळाला finally, मागच्या आठवड्यात.
आता shift व्हायचं असेल तर कपडे आणि भांडी वगळता सगळंच नवीन घ्यावं लागणार आहे.
Furnitore आणि नवीन घर असा धागा काढूच का मग?

अभिनंदन म्हाळसा! छान घर सजव.

मीही same phase. फक्त जागा आमची भारतात आहे.>>>>> अभिनंदन किल्ली!

Furnitore आणि नवीन घर असा धागा काढूच का मग?>>> नक्कीच काढ. वाचायला मजा येईल.

म्हाळसा, अभिनंदन! फोटो टाकत रहा... उगीच आपली उत्सुकता राहील ... काय फर्निचर, पडदे वै घेतले त्या आपल्या #अमुचे लग्न सारखं Happy कुठपर्यंत लग्नाची तयारी ? तिच्या धाग्याच्या निमित्ताने माबो *रंगकोश* तयार झाला होता.... सॉरी जरा अवांतर झालं ... अति अवांतर झालं नाही पडद्याचे रंग निवडताना कामाला येईल ...

घर ताब्यात मिळाल्यावर आणि घराचा नट्टाफट्टा झाला की टाकेनच इथे फोटो.. तो पर्यंत हे खालचे दोन फोटोज.. ३ महिन्यात तयार होईल असं कळालंय आज.
A73FA877-E00B-447F-918F-897B4B50D50C.jpeg

अरे व्वा
अभिनंदन म्हाळसा आणि किल्ली.

असं गिफ्ट रॅप सारख कव्हर केलेलं घर बघून मज्जा वाटतेय मला Happy

समोरचं लॉन वगैरे करून देतात की ते आपलं आपण करायचं?

घर आलिशान दिसतंय. अभिनंदन.
(एका कोप-यात वडापावसाठी जागा मिळेल का ?)

( मी शांमा च आहे. अन्य कुणी नाही याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती).

असं विक्रीसाठी असणारे घर ,लपेटून ठेवतात का तिथे?का एजंटची जाहिरात असते?
छान मोठे आहे.सजावटीकरिता गुडलक!

असं विक्रीसाठी असणारे घर ,लपेटून ठेवतात का तिथे>> लपेटुन नाहि ठेवलय, बान्धकाम चालू आहे पण वाळू-विटा नाही तर लाकुड आहे, अमेरिकेत सगळिकडे लाकडी घर असतात.व्हाईट आहे ते insulation असणार अजुन यावर आउट लेयर येइल.
म्हाळसा ! नविन बान्धकाम असणार्‍या घरात जायला मिळतय, मजा आहे की
टेक्सास मधली मोठी मोठि घर कॅलीफोर्नियाच्या १/३ किमतित मिळतात ते बघुन चलो टेक्सास म्हणावस वाटत मग परत उकाडा, हरिकेन वैगरेचा विचार करुन वाटत ठेविले अनते तैसेची राहावे.

Pages