Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 23:17
मी सध्या नाॅर्थ कॅरोलीना मध्ये रहात आहे आणि गेल्या ४ महिन्यांपासून घर खरेदीच्या प्रयत्नात आहे.. आधी वाटलेलं घराच्या किंमती कमी होतील पण तस काहीच झालेलं दिसत नाहीए. फक्त इंटरेस्ट रेट कमी झालाय पण रिस्क फॅक्टरही वाढला आहे.. एखादे घर बघून आले की निर्णय घेईस्तोवर विकलं जात आहे.. त्यामुळे घर घ्यावे का थोडं हे वर्ष जाऊ द्यावं हा विचार करतेय. कोणी सध्याच्या परीस्थितीत घर घेतलय का? जाणून घ्यायला आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घर मार्केटमध्ये आले रे आले कि
घर मार्केटमध्ये आले रे आले कि रियल्टर बरोबर बघायला जायला अपॉइंटमेंट ठरवा... ओपन हाऊस ची वाट बघू नका...
क्रिटेरिया फिक्स ठेवा... क्रिटेरिया मध्ये बसले ... आवडले लगेच ऑफर टाका... नॉर्थ कॅरोलिना चांगला एरिया आहे... शॉर्लेट किंवा राले डरहॅम असेल तर बिंदास... बाकी तुमची जॉब किंवा बिझिनेस सिक्युरिटी बघून निर्णय घ्या... शुभेच्छा ....
रहायला घर घ्यायचं असेल तर
रहायला घर घ्यायचं असेल तर च्रप्स +१.
रहायला घर घ्यायचं असेल तर
रहायला घर घ्यायचं असेल तर च्रप्स +१.>> सहमत!
सध्याची अनिश्चित परीस्थिती बघता तुमचे स्थलांतरीत म्हणून स्टेट्स काय हे देखील विचारात घ्या. कुणाला घाबरवायचा हेतू नाही पण ग्रीनकार्ड प्रोसेस सुरु होती, रिजेक्ट झाल्यामुळे सगळे तडकाफडकी आवरावे लागले अशा काही केसेस बघण्यात आल्या म्हणून लिहिले.
सगळ्यांचे धन्यवाद रिप्लाय
सगळ्यांचे धन्यवाद रिप्लाय केल्या बद्दल-
सध्या रालेमधेच आहोत.. अजून पर्यंत क्रायटेरीया पक्का नव्हता. आता पक्का झाला आहे.. ग्रीनकार्ड प्रोसेसिंग चालू आहे पण येत्या ५ महिन्यात कशी परिस्थिती असेल माहित नाही. रियल्टरला हाताशी घेतलं आहे .. पण काही मित्रांनी बुक केलेली घरे कॅंसल केलीत तर काही नविन घेत आहेत म्हणून थोडासा गोंधळ होतोय
कालच बघितल्या प्रमाणे
कालच बघितल्या प्रमाणे इंटरेस्ट रेट खुप कमी झालेत. तसं आधीच्या पण एका चर्चेत हेच म्हटले होते - रहायला घर घ्यायचं असेल तर घ्या
त्यातसुद्धा लोन घेताना १५ वर्षे / ३० वर्षे वगैरे बघून घ्या. सध्या तरी बातमी होती की बर्याच घरांचे खरेदी विक्री व्यवहार झालेत म्हणजे अजूनतरी घरांच्या किंमती पडलेल्या नाहीत.
सध्या इन्टरेस्ट रेट चांगला
सध्या इन्टरेस्ट रेट चांगला आहे (प्रायमरी होम करता). नोकरीच्या बाबतीत "सध्या तुम्हाला जितकी माहिती आहे त्यानुसार" खात्री असेल तर घ्या. इतर राज्यांच्या मानाने नॉर्थ कॅरोलीना मधे घर विकत घेणार्यांना जास्त फ्लेक्झिबिलिटी आहे. Diligence amount आणि Earnest money deposit व त्याच्याशी संबंधित नियमांची माहिती करून घ्या. रिअल्टर सुद्धा हे सांगेल
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.. कालच एक घर बघून आले.. पहिल्यांदा एखादं घर मनापासून आवडलंय.. स्कुल डिस्ट्रिक्ट, लोकेशन, किंमत .. सगळ्याच कायटेरियात व्यवस्थित बसतंय.. पण आज लक्शात आलं कि प्रवेशद्वार नैऋत्येकडे आहे. . डिरेक्शन्सवर माझा फारसा विश्वास नाही पण सगळे सांगत आहेत की रिसेलमधे प्राॅब्लेम येऊ शकतो.. तुमचे काय मत आहे? कोणी नैऋत्य किंवा दक्शिणेकडे तोंड असलेले घर विकले आहे का?
कटप्पा यांचा अमेरीकेत घर
कटप्पा यांचा अमेरीकेत घर घेणेबाबत धागा होता.
मला लिंक देता येत नाही अन्यथा शोधले असते. त्यातली काही चर्चा कदाचित कामाला येईल.
शुभेच्छा.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/72197
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/51638
वरील दोन्ही धाग्यांमधे बरीच
वरील दोन्ही धाग्यांमधे बरीच माहिती दिसत आहे.. धाग्यांची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद.
डिरेक्शन्सवर माझा फारसा
डिरेक्शन्सवर माझा फारसा विश्वास नाही पण सगळे सांगत आहेत की रिसेलमधे प्राॅब्लेम येऊ शकतो.. तुमचे काय मत आहे? >> बरेच देशी दक्षीणाभिमुख घरे टाळतात. डॅलस मधे बरेचदा बिल्डर पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख घर्यांच्या किमती अधिक ठेवतात.
तुम्ही देसी सेलरला टारगेट
तुम्ही देसी सेलरला टारगेट करून घर विकणार नसाल तर बिन्धास्त घ्या. माझ्या जवळच्या नात्यात एकानं साऊथ फेसिंग घर घसघशीत फायद्यानं विकलंय.
म्हाळसा @ नैऋत्य किंवा
म्हाळसा @ नैऋत्य किंवा दक्शिणेकडे तोंड असणारे असे घर नका घेऊ त्याच ठिकाणी दुसरे बघा घर लवकर घेणे होत नाही म्हणून विचार करुन निर्णय घ्या.
आम्ही गेल्या वर्षी अर्वाईन
आम्ही गेल्या वर्षी अर्वाईन (ऑरेंज काऊंटी) मध्ये घर घेतलं. ४-५ घरांवर ऑफर दिलेली पण प्रत्येक वेळी घर मिळाले नाही. शेवटी आवडलेले घर किंमतीच्या बर्याच वरची ऑफर दिल्यावर मिळाले. गेली काही वर्षं बहुतेक भागांमध्ये घरं ही लावलेल्या किंमतीपेक्षा चढ्या किंमतीत विकली जात आहेत. तर लावलेल्या किंमतीच्या वर जाण्याची तयारी आहे का, असल्यास किती, हे सर्व एजंटशी बोलून ठेवा.
बाय द वे, आमचे घर दक्षिणाभिमुख आहे. तरी सेलरला एवढ्या चढ्या किंमतीत विकता आलए...आम्हालाही विकण्यात काही अडथळा येणार नाही अशी आशा आहे. ( एवढ्यात १०-१२ वर्षं तरी हे घर विकू अस वाटत नाही. )
अमेरिकेत दक्षिण मुखी घर जास्त
अमेरिकेत दक्षिण मुखी घर जास्त डिमांड मध्ये असते.. सूर्यप्रकाश मुळे...
सध्या घराचा विचार बाजूला
सध्या घराचा विचार बाजूला ठेवलाय आणि रेंटवर टाऊन हाऊस मधे शिफ्ट झाले आहे.. एक p.o.c पण होऊन जाईल..तसंही वर्षभरात परिस्थिती बदलली तर घर घेता येईलच असा विचार करून सध्या डाऊनपेमेंटसाठी ठेवलेले पैसे शेअरमार्केटमधे गुंतवलेत.
जे पैसे पुढच्या १ ते ५
जे पैसे पुढच्या १ ते ५ वर्षात लागू शकतात ते मी कधीच शेअरमार्केटमधे गुंतवत नाही. ज्यासाठी माझी ७-१० वर्षे थांबायची तयारी आहे असेच गुंतवतो. कारण मार्केट कोलमडले तर पैसे परत मिळवण्यासाठी तितका वेळ लागू शकतो. प्रत्येकाची धोका घेण्याची मानसिकता वेगळी असते. मी घरासाठी लागणारे पैसे, मुलीच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे, सीडी आणि मनी मार्केट मधे साठवून ठेवले होते. मला त्यातून काही परतावा मिळाला नाही पण शेअरमार्केटमधे काही होऊ दे मला चांगली झोप लागली हे माझ्यासाठी जास्त महत्वाचे होते.
जे पैसे पुढच्या १ ते ५ वर्षात
जे पैसे पुढच्या १ ते ५ वर्षात लागू शकतात ते मी कधीच शेअरमार्केटमधे गुंतवत नाही.
>>+१ हे मार्केट कम्प्लिटली गवमेंट मॅनिप्युलेटे आहे. खुप रिस्की. वर पण जाइल पण खाली पण फास्ट येउ शकते.
घर घेणे पण रिस्की आहे जॉब स्टॅबिलीटी असेल तरच हरकत नाही.
घर घेणे सेफ आहे... लोकेशन
घर घेणे सेफ आहे... लोकेशन चांगले असेल तर...
जसे की चांगल्या शाळा असतील किंवा कम्युनिटी सेंटर असेल किंवा ट्रेन स्टेशन जवळ ..
रेंट वर जाईल असे...
इथे अपडेट्स द्यायला जरा उशीरच
इथे अपडेट्स द्यायला जरा उशीरच झालाय.. पण तुम्ही तर माझ्या भावनाओंको समझताच
गेल्या वर्षी घर घ्यायला जमलं नाही पण ह्या जूनला कॅरी एरियात घर बूक केलं .. अर्थात, जेव्हा बूक केलं तेव्हा इथले भाव आसमान छू रहे थे .. जे घर ४५० k ला मिळाले असते ते ५४५ k ला घेतले..ते ही बिडिंग करून. घराचं लोकेशन आणि प्लॅन आवडला म्हणून जास्तच किंमत मोजावी लागली पण आजच समोरचं घर ६१५ k ला विकले गेले तेव्हा कुठे जीवात जीव आला.
आता सगळ्यात बोरिंग पार्ट सुरू होणार आहे..फर्निचर घ्या, पडदे घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या.. असं वाटतंय घर लवकर मिळूच नये
अभिनंदन.
अभिनंदन.
आता सगळ्यात बोरिंग पार्ट सुरू होणार आहे..फर्निचर घ्या, पडदे घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या>>> हा तर उलट इंटरेस्टिंग पार्ट आहे. ऑफिसमध्ये बसून काम न करता वेगवेगळ्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वेबसाईटना भेटी देणं कोणत्या वस्तू घेणं ठरवणं हा माझा आवडता उद्योग आहे.
असं वाटतंय घर लवकर मिळूच नये
असं वाटतंय घर लवकर मिळूच नये >>>>> समोरच्या घरापेक्षा जास्त किंमत लाऊन विकून टाका मग आत्ताच म्हणजे भानगडच नाही
घेतलय घर चांगल तर कशाला रडकेपणा करताय ? उलट ते शॉपिंग एन्यॉय करा.. मजा येते..
अभिनंदन!
अभिनंदन!
वेगवेगळ्या फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वेबसाईटना भेटी देणं कोणत्या वस्तू घेणं ठरवणं>>> या सगळ्याचा आनंद घ्या. एकदा मोठ्या वस्तूंची खरेदी झाली कि पुन्हा ती वेळ लवकर येणार नाही. आवडत नसेल तर सगळे एकदम खरेदी करायचीही गरज नसते. घरात राहताना कोणत्या जागी कोणती वस्तू लागेल, छान दिसेल तसे ठरवत खरेदी करत रहायचे.
१० दुकाने फिरून शेवटी आम्ही डायनिंग टेबल ॲानलाईन घेतला होता. तो संपूर्ण सेट लावायला ५ तास लागले होते.
अनपॅकींग पासून ते संपूर्ण टेबल सेट पर्यंतचे फोटो काढले होते मी मग पुन्हा अशी ॲानलाईन खरेदी करायची नाही हे ठरले.
@धन्यवाद बोकलत, पराग, sonalis
@धन्यवाद बोकलत, पराग, sonalis
घेतलय घर चांगल तर कशाला रडकेपणा करताय ? उलट ते शॉपिंग एन्यॉय करा.. मजा येते..>> बरोबर आहे..ज्यांना घरासाठी शॅापिंग, सजावट ह्याची आवड नसेल त्यांना माझ्यासारखं रडूच येत असावं
मग पुन्हा अशी ॲानलाईन खरेदी करायची नाही हे ठरले.>> माझा पण ॲानलाईन खरेदीचाच विचार होता..असेंबल करायला इतका वेळ लागत असेल तर मग झालंच
वास्तुशांतीला संपूर्ण
वास्तुशांतीला संपूर्ण मायबोलीला जेवण ठेवले तर सगळे सुरळीत होईल.
घरात पाळण्यासाठी एक पाघो किंवा गेंडा माझ्याकडून भेट.
म्हाळसा, मनापासून अभिनंदन
म्हाळसा, मनापासून अभिनंदन
मी कंटाळा घालवायला हेच घर नव्या फर्निचरने सजवावे व सामान कमी करावे म्हणतेय. तुमचा एरिआ भयंकर महाग आहे असं दिसतंय. एन्जॉय, दोन मुलं असतील तर घर असलेले बरे अपार्टमेंट लहान पडते.
पाच तास फारच झाले हो डायनिंग
पाच तास फारच झाले हो डायनिंग टेबल सेट असेंम्बल करायला.
काय रंधा वगैरे पण आपणच मारायचा असतो का?
घर घेतल्याबद्दल अभिनंदन.
घर घेतल्याबद्दल अभिनंदन.
<< असेंबल करायला इतका वेळ लागत असेल तर मग झालंच >>
नवरा त्यासाठीच असतो ना घरात.
ऋन्मेष नाही का ? रेडीमेड
ऋन्मेष नाही का ? रेडीमेड फर्निचर की सुतार बोलावून घरी बनवायचे यावर याप्रसंगी एक धागा निघाला असता.
भारतात तरी रेडीमेड फर्निचर इंजिनिअरिंग वूडचे बनवतात. इंजिनिअरिंग वूड हे कुठल्याही लाकडाचे नाव नाही. कोणत्याही लाकडाला इंजिनिअरिंग वूड म्हणता येते. हे फर्निचर टिकत नाही. स्वस्तात म्हणून घेतले तरी ते पैसे पाण्यात जातात. एलडीएफ किंवा एमडीएफचे चुकून घेऊ नये. एकदा का बिजाग-या निघायला सुरूवात झाली कि त्या तिथे पुन्हा बसत नाहीत.
इंटिरीअर वाल्याच्या ताब्यात घर देऊन गरजेप्रमाणे बनवून घेणे सर्वात मस्त. सुरूवातीला त्रास होईल.
Pages