खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाली मलाही मेधाविसारखेच वाटले होते.पण भात बासमती अथवा दिल्ली राईस पाहिल्यावर कळले.

बाकी ते गुलाबजाम काय भन्नाट आहेत.

खिचडीतलं भाताचं शित मात्र कणभर कच्चं असावी असं दिसतंय फोटोत. >> अगदी अगदी . मलाही वाटलं .
बिर्याणीसाठी भात पूर्ण शिजवत नाही तसं Happy .
ते पापडाच्या वरती डब्यात काय आहे ?

नवरतन , वाशीचं का ??? फार फार वर्शांपूर्वी ( जेन्व्हा रियायेन्स नॉलेज सिटी ची पायाभरणीही झाली नव्हती ) ऐरोलीला ऑफिस होतं , तेन्व्हा वाशीला लंच पार्टी करायला जायचो ( म्हणजे आमचे सिनिअर्स घेउन जायचे , आम्ही कच्चा लिम्बू होतो त्यावेळी) , तेन्व्हा तिथे जेवल्याचं , नाव ऐकल्याच आठवतेय .
अवांतर , आणखी एक पंजाबी हॉटेल होतं , तिथे तलवारीला तंदूरी कबाब/चिकन लावून वाढायला आणायचे .

हलकेच घेतलंय.

सुपरवायझर नाही पण रसिक म्हणू शकता. खाण्यापिण्यावर मनसोक्त प्रेम करणा-यांना फोटो पाहूनही छान वाटतं. कौतुकही करतोच की.

केक मस्त झालेत दोन्ही.
गुजा आणि मोदक मस्त.
मला पण खव्या चे गुजा आवडतात रेडीमिक्स पेक्षा.
पण अचानक ठरले गुजा करायचे तर रेडीमिक्स बरे पडते.

नवरतन / नवरत्न वाशीचेच. तसे चांगले असते जेवण..
पण.... माझी आताची बायको जी एकेकाळची नेट फ्रेंड होती तिच्या घराच्या जवळ असल्याने पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिथेच जेवायला गेलेलो. या कारणामुळे मी शक्यतो तिथे पुन्हा पुन्हा जात नाही.

तलवारीवाले पंजाबी हॉटेल कुठले. याच्याच मागच्या गल्लीतले गोल्डन पंजाब का.. मी एकदाच गेलेलो तिथे. किंमत चव आणि क्वांटीटीच्या मानाने फारच जास्त वाटल्याने पुन्हा गेलो नाही.

पापडाच्या वरच्या डब्यात मटण वा चिकन असावे. घरात सध्या फार पदार्थ झालेत. गोंधळ उडतो. ते मटण/चिकन मुंबईच्या हॉटीलातील आहे. काल उरलेल्या दालखिचडीत मी त्या मटणाची ग्रेव्ही आणि शिल्लक फोड टाकली तर ते फार भारी कॉम्बिनेशन लागले.

क्षीरसागर, The Creek Restaurant & The Cottage bar, Big Splash, कांचन रेस्टॉरंट अँड बार, सायबा (गोमांतक सी फूड) , अभिजीत
हे अजून आहेत का वाशीत?

आहेत की.. कांचन रेस्टॉरंट बार कुठले ते माहीत नाही..

बरी आठवण केलीत.. मला वाशी सी शोअर आणि सागर विहार परीसरावर एक प्रकाशचित्रांचा धागा काढायचा होता.. शोधायला हवेत लॅपटॉपमध्ये फोटो..

या गरमागरम दामोदर भज्या खायला...
चटणी एक नंबर...
सोबत सामोसे आणि कचोऱ्यासुद्धा आहेत. ते याच चटणीसोबत खायचे आहेत. एकेका कचोरीसोबत मी जवळपास तेवढीच चटणी खातो Happy

1637771385293.jpg

आहेत की.. कांचन रेस्टॉरंट बार कुठले ते माहीत नाही >>>
वाशी जुना बस डेपो (1990-91 साल) तो डावीकडे ठेवुन पुढे सरळ जायचे आणि पुढे गेले की सेक्टर १६ च्या आत जायला उजवीकडे वळावे लागते त्याच्या डाव्या बाजूला.
दोन रेस्टॉरंट्स होते तिथे. एक कांचन आणि त्या आधी एक उडुपी रेस्टॉरंट, नाव विसरलो. तेव्हा तिथे गोविंदा सारखा दिसणारा एक वेटर असायचा, पण तो सारखा नाकात बोट घालायचा म्हणुन तिथे जाणे बंद केले होते.

एवढे धडाधड फोटो कसे टाकले पब्लिक ने ? माझ्याकडे तर माबो उघडतच नाही आहे.

मृ, गुलाबजाम मस्त लुसलूसीत दिसतायेत. कच्चे नसतील तर रंगाने काही फरक पडत नाही.

ऋ, केक मस्त दिसतायेत, बॉम्ब केक म्हणजे?

घेतले दोन
आता पाच शिल्लक राहिले..

सगळे फोटे मस्त आहेत. इथे आले कि भूक नसली तरी भूक लागल्या सारखे वाटते.

नवरतन / नवरत्न वाशीचेच. तसे चांगले असते जेवण..>>> +१ तिथले जेवण आवडले होते.

इथे आले कि भूक नसली तरी भूक लागल्या सारखे वाटते.
>>>>>
मी तर दर रात्री कॉफी प्यायच्या आधी ईथे एक चक्कर टाकून जातो.... आताही तेच करायला आलोय Happy

मस्त मस्त सगळेच पदार्थ. केक, साबुदाणा वडा, गुजा, आणि अस्मिता च्या अंगात संचारलेल्या अन्न पूर्णेच्या कृपेने छान छान फोटो बघायला मिळाले. म्हाळसेनेपण मोदक केलेत, पण हे गोड मोदक ना? मला तर तिची ची मोदक रश्श्याची रेसिपीच आठवली. अमुपरी ताट मस्त दिसतय, पिहू उपवासाचे पदार्थ छान.
चिकन बिर्याणी, शिख कबाब , ब वडे आता माझा डबा कसा संपणार?

नवीन Submitted by अमुपरी on 30 November, 2021 - 22:03
<<

पोळ्या मैद्याच्या आहेत की रेडिमेड आटा?

नसेल तर गहू कोणता आहे? खूपच पांढर्‍या शूभ्र आहेत.

Pages