मायबोलीकरांचे आभार - कथाकारीला पुरस्कार

Submitted by बेफ़िकीर on 22 November, 2021 - 09:50
kathakari

नमस्कार मायबोलीकर,

माझ्या कथाकारी या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.

या सर्व कथा प्रथम मायबोलीवरच लिहिल्या गेल्या. त्यातील निवडक कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला.

या सर्व कथांवर आलेले अभिप्राय हे मला आधीहून अधिक बरे लिहिण्याचा प्रयत्न करण्यास प्रोत्साहीत करत होते. एका अर्थाने, येथील वाचकवर्गाने केलेला लोभ आणि येथील प्रशासनाने दाखवलेले औदार्य हेच या पुरस्कारास कारणीभूत आहेत.

गझल लेखनाने मला अनेक पुरस्कार दिले, पण गद्य लेखनाला मिळालेला हा पुरस्कार मला एक वेगळाच आनंद देऊन गेला.

येथील प्रशासक, वाचक, प्रोत्साहक, सकारात्मक टीकाकार यांचे मी मनापासून आभार मानत आहे.

येथे मिळालेला स्नेह मला या वळणावर घेऊन आला आहे याची नम्र जाणीव मनात ठेवून थांबतो.

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन बेफिकीर!

तुमच्या कथा प्रचंड वाचनीय आणि खिळवून ठेवणार्‍या आहेत. अजूनही लिहीत राहा. आवडेलच वाचायला.++111

हार्दिक अभिनंदन.... !!
भविष्यातील पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा ..!!

अभिनंदन बेफिकीर.

शैली, आशय आणि व्यक्तिचित्रांचं बांधीव असणं- याबद्दल चर्चा आणि मतभेद होऊ शकतील, मात्र आकर्षक कथानकं आणि त्यांतली नाट्यं याबाबत तुम्ही इथं नेहेमीच लक्षात राहिलात. मायबोलीवर आणि एकंदरच सोशल मेडियावर विस्मयजनक वेगाने कादंबर्‍या लिहिणारे माझ्या मते तुम्हीच पहिले होतात. आमची एखादी बारकी कथाही कंटाळा, साचलेपण, अडकलेपण आणि असंख्य गोंधळातून वाट काढत कशीबशी १-२ आठवड्यांत पूर्ण व्हायची, त्यामुळे कंटेंट देणं, तेही जबरदस्त स्पीड आणि फ्रिक्वन्सीने- याबद्दल तुमचं नेहेमीच कौतुक वाटलं आहे. याबद्दल मित्रांत आणि काही गटगला तुमच्या बाजूने हिरीरीने बोलल्याचंही आठवतं.

हार्दिक शुभेच्छा. Happy

हार्दिक अभिनंदन बेफिकीर!! पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा! तुमच्या यशाचा आलेख असाच चढता राहू देत.

जबरदस्त बातमी... जरी वाचलेल्या कथा असतील तरीसुद्धा पुस्तक नक्कीच विकत घेऊ...
अभिनंदन बेफिकीर !!!

शैली, आशय आणि व्यक्तिचित्रांचं बांधीव असणं- याबद्दल चर्चा आणि मतभेद होऊ शकतील, मात्र आकर्षक कथानकं आणि त्यांतली नाट्यं याबाबत तुम्ही इथं नेहेमीच लक्षात राहिलात. मायबोलीवर आणि एकंदरच सोशल मेडियावर विस्मयजनक वेगाने कादंबर्‍या लिहिणारे माझ्या मते तुम्हीच पहिले होतात.

अचूक निरिक्षण साजिर्‍या .
अनुमोदन.

<< आणि एकंदरच सोशल मेडियावर विस्मयजनक वेगाने कादंबर्‍या लिहिणारे माझ्या मते तुम्हीच पहिले होतात. आमची एखादी बारकी कथाही कंटाळा, साचलेपण, अडकलेपण आणि असंख्य गोंधळातून वाट काढत कशीबशी १-२ आठवड्यांत पूर्ण व्हायची, त्यामुळे कंटेंट देणं, तेही जबरदस्त स्पीड आणि फ्रिक्वन्सीने- याबद्दल तुमचं नेहेमीच कौतुक वाटलं आहे. >> +११

साजिरा, अनुमोदन !

पुस्तकाच्या कव्हरपेजचा फोटो इन्सर्ट करून धागा मुखपृष्ठावर घेतल्याबद्दल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार!

सर्व प्रतिसाददात्यांचेही मनापासून आभार!

पुरस्कार सोहळा आत्ताच पार पडला.

साजिरा यांना अनुमोदन

बेफिकीर यांच्या लिखाणावर दाद देण्यासाठी म्हणून मायबोलीकर झालो.
अभिनंदन
इथे ही लिहायला सुरुवात करा पुन्हा

Pages