मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तरी गा दा आता टीम बी मधे नकोच. हिंमत असेल तर एकटी खेळूदे. उगाच विकासवर आरोप करते, स्वत:च्या टीमला वाचवते, त्यांच्यामुळे लागलं तरी.

मांजरेकरांनी आज गायत्रीला बाकी तिघांबद्दल बरंच काही सांगितलं. ते तिच्याबद्दल काय बोलतात, कसं वागतात. ती या आठवड्यात बाहेर जायला हवी इ. इ. पण तिचा चेहरा मख्ख होता.

मांजरेकरांनी विशालला आपल्याच टीम मेंबर्स ना बोलण्यावरून सांगितलं आणि त्याचा परिणाम म्हणून यापुढे विशाल एकटा खेळेल..
ऑडियन्सशी असं कनेक्ट व्हायचं ते त्याला बरोबर कळंलंय.
कमाल म्हणजे टीमला सपोर्ट करण्याबाबत त्यांनी जयचा आदर्श दाखवला. त्यांना जयबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे - तो चांगला प्लेयर आहे .

इथे लिहिलेलं स्नेहा acting dumb आणि दादूसचं बेटा बेटा पण होतं मांजरेकरांच्या बोलण्यात.

गायत्रीला कपडे आणि सामान मिळाले का परत?

आज जय् बिलकुल ऑपोलोजाटिक वाटला नाही, इव्हन मिरा! उत्कर्ष या कानाने एकुण तिकडुन सोडुन देतो. दे ऑल गिव्ह अ डॅम ऑन व्हॉट मान्जरेकर सर सेज.... खरतर नेमक याच सिझनला ममा इतका डीटेल मधे गेम उलगडून सान्गत आहेत.
विशालच नक्की काय कराव ते कळत नाही, मी खुप ऑनेस्ट आहे हेच चालु असत त्याच ते दिसत रे भावा पण ममा त्याला ज्या हिन्ट देत होते ते तो रॉन्गवे ने घेत होता.
स्नेहाशी तो जरा जास्त अदबिने बोलतो हे अगदी परवा मी नोटिस केल ती टास्क खेळायला बसली तेव्हा अपसेट असल्याच दाखवत खुर्चित बसली आणी हा तिला चिअर अप करायला म्हणतो तुम्ही क्विन आहात,क्विन सारख बसा, समोर आरश्यात बघुन हसा बर!
एवढ प्रेमाने तो सोनाली किवा मिनलशी कधी बोलतो?? तिथे तर वाकड्यातच जातो की. तेच बोलले की ममा, असच खेळत राहिला तर विकास पुढे जाउ शकतो.
स्नेहाला ममा म्हटले बाकी सगळ कळत फक्त हे कळत नाही?? त्यावरही तिने परत साळसुद अस्ल्याचाच आव आणला.
सोनालीला थोडक्यात उत्तरे द्या जमतच नाही,किती गोलगोल बोलत राहते. ती आणी मिरा पटकन मुद्द्यावर येतच नाहित.
मागच्या शनिवारी ममा निवान्त एकेकाचा समाचार घेत होते आज जरा घाइत असल्यासारख सगळ एकत्र मिसळुन चालल होत. सोनाली सेफ होणारच होती, या विक मधे तीने फुल टु राडा घातला आहे पण इथे तिथे जाउन काय काय बोलण तिने बन्द केले पाहिजे ते अन्गाशी येणार तिच्या.
गायत्रीच्या विरोधात काय चालल आहे हे तिला कळतच नव्हत आता ममानी सान्गुन सुद्धा ती काय ग्रुपसाठी खेळायच बन्द करणार नाही.

आता ममानी सान्गुन सुद्धा ती काय ग्रुपसाठी खेळायच बन्द करणार नाही.>>> असेच वाटते आहे. मग पुढच्या आठवड्यात ती जाईल बाहेर. हाडतूड केले तरी चिटकून राहेलेले प्रेकक्षक तरी किती दिवस बघणार!

ती कॅप्टन झालीय ना, मग पुढच्या आठवड्यात सेफ आहे ऑलरेडी. नंतरच्या विकमधे नॉमिनेट झाली तर शक्यता.

पण बसून करणार काय. या आठवड्यात संचालक असेल पण नंतर तर खेळावच लागेल. चार आठवडे राहिलेले असताना एक स्पर्धक बसून राहिलेला कसा परवडेल. मीरा आणि टीम सोनालीला फार कमजोर समजतात म्हणून ती सेफ आहे ते आधी सांगितले असेल. विशाल फक्त निमित्त शोधत होता असे वाटतेय. शेवटी शेवटी एकटे खेळले तर सहानुभूती मिळते जशी मेधाला मिळाली होती. बघू विशालचे काय होते कारण इथे तो वाईट झालाय आणि स्वतःला एकटा पाडतोय. स्नेहाचं पितळ म मां नी उघडे पाडायला हवे होते, ती स्वतः थोडीच कबूल होणारे.

विशालच डोकं का अस तीरपागड चालत काही कळत नाही. सरळ सरळ मीनल सोनाशी नीट बोलायला सांगत आहेत ममां. तरी आपलं याच उलटंच डोक्यात काही भरून घेतोय! स्नेहासारखं अदबीने राहू दे, पण मिळून मीसळून तरी बोल की त्यांच्याशी भावा! त्यांची बाजू घे टास्क मध्ये! त्यांच्या बाजूने भांडायला उभा रहा! टीम ए वाले कसे , त्यांचा प्लेअर चुकीचा असला तरी त्याची बाजू घेऊन भांडतात! हा आपला विकास भांडतोय, मीनल भांडतेय.. अन हा आपला मजेत बसून राहतोय, टीमचा हिस्सा नसल्यासारखा.
अर्थात सोनाही मुद्देसूद न बोलता पिरपीर करत फार इरिटेट करते बुवा. बी टीम वाले एकमेकांना समजावत नाहीत की दुसरा समजावतो आहे ते ऐकून ही घेत नाही. पहिल्या सिझनला, मेघा सईला किती सांभाळून घ्यायची!
मिनलशी भांडतांना जय असो, की मीरा.. किती हिडीसफिडीस करतात तिला, तुसड्यासारख बोलतात. विकासशी भांडतांना आवेशात बोलतात पण मिनलला जास्तच टाकून बोलतात अस वाटलं.

या धाग्यावर २०००+ प्रतिसाद झाल्यामुळे मुक्काम पुढल्या धाग्यावर हलवला आहे.
https://www.maayboli.com/node/80593

या पुढे फक्त त्याच धाग्यावर प्रतिसाद द्या.

Pages