Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मिराने आज काडी लावली टिम बि
मिराने आज काडी लावली टिम बि मध्ये आणि खुष होऊन सांगत होती कौतुकाने सगळ्यांना, अजिबात नाही आवडलं, उत्कर्ष ही दुजोरा देत म्हणाला मस्तं कॉमेडी चालू आहे.
Yes Zimma team trolled ,
Yes Zimma team trolled , Movie demotion , not promotion
हाहाहा. बाहेरून बघून जाऊन पण
हाहाहा. बाहेरून बघून जाऊन पण मूर्खपणा करतात हे लोक. टीम बी चे कौतुक केलं असतं जास्त तर पिक्चर सुपरहिट झाला असता ना. समहाऊ आता सिद्धार्थ वगैरे सांगतायेत की bb नी दाखवले नाही. मी काही आज बघणार नाहीये, पिक्चर प्रमोशन टीम येते तेव्हा बोअर होतं. सिद्धार्थ आवडतो तरी बघणार नाही.
ते इतकेही येडे बसतील. प्रमोशन
ते इतकेही येडे नसतील. प्रमोशन ला गेले होते तर त्यांनी सगळ्यांची नावे घेतली असतील अन गुडि गुडी बोलले असतील हे जास्त चान्सेस वाटतात. बिबॉ च खेळतात असले गेम्स. पब्लिक ला काय, सापडले आयतेच ट्रोल करायला
कूणितरी व्युहरने अगदी मिनिट
कूणितरी व्युहरने अगदी मिनिट तु मिनिट व्हिडियो बघुन सान्गितल की मिरा म्हणत होती की झिम्मा टिम त्याच्याविषयी ( टिम बी ) काहिच बोलले नाही झिम्माच अस
आणी त्रुप्ती ताई,सुलेखा ताइ,अक्षय म्हणतायत की सोनाली काही करत नाही,फक्त मेकप करते इनडायरेक्टली तिला बाहेर काढायला सान्गत होते स्वतः पडले ना बाहेर तरी टिम लॉयल्टी काहि सुटत नाहि.त्रुप्ति ताइना तर पटतच नाही अजुन त्याना कस बाहेर काढल, स्नेहा विषयी काही फार बोलताना दिसल्या नाही
या वीक मधे तरी टास्क्स चांगले
या वीक मधे तरी टास्क्स चांगले करते आहे सोनाली. होपफुली यापुढे तरी खेळेल नीट. काय असेल ते असो, सोमि वर खूप जास्त सपोर्ट आहे तिला, वोटिंग ट्रेन्ड मधे टॉप ला आहे ती या वीक मधे ! टीम ए चे जजमेन्ट चुकत आहे की सोनाली वीक आहे तिला टाकू नॉमिनेशन मधे. त्यांना हे लक्षात येत नसावे की ती एकटी नॉमिनेटेड असेल तर तर टीम बी चे सगळे फॅन तिला सपोर्ट करत आहेत.
अर्थात बिबॉ कुणालाही एलिमिनेट करतायत वोटींग काहीही असले तरी. नुस्ता वोटिंगचा ट्रेन्द्ड पाहिला तर दादुस ना गायत्री आणि स्नेहा दोघींपेक्षा जास्त वोट्स मिळताय्त म्हणे सध्या
वेगळया बेडवर झोपली ती मीरा
वेगळया बेडवर झोपली ती मीरा होती, गायत्री नव्हती. आज दाखवल हे.
आजचा टास्क राडा करण्यात वाया गेला. जय- स्नेहाच वेगळच चालू होत टास्कमध्ये.
सोनाली छान खेळली.
उद्याही राडा कन्टिन्यू. विकास विरुद्द जय आहे.
तिकडून हा आला तर आम्ही काही
तिकडून हा आला तर आम्ही काही करणार नाही, तो आला तर सपोर्ट करू असे आधीच मॅच फिक्स केली तर काय उपयोग? कोणाला उमेदवारी द्यायची ते बोलून ठरवायचे आणि मारामारी दाखवण्यासाठी टास्क करायचा!
सोना अचानक जास्त वेळ दिसायला
सोना अचानक जास्त वेळ दिसायला लागली याचं कारण तीने सगळीकडे सहभाग वाढवला हे आहे की एडीटींग टीम ची कृपा ?
कदाचित ती नेहेमीच अशी वागत असेल पण तिचे तितके फुटेज हे लोक दाखवतच नाहीत. आणि आता ती वोटींग मधे नम्बर वन ला आल्यामुळे अचानक तिचं जास्त फुटेज दाखवावं लागतय या लोकांना. बिबॉ फार म्हणजे फार मॅनिप्युलेटीव्ह आहे.
काल सोना च्या वेळी विशाल चा स्टँड पटत होता.... विकास चालु वाटला...उगीच सामोपचाराने पाईप मागायचं नाटक करत होता...त्याला पण सोनाली उमेदवार व्हावी अशी इच्छा नव्हती.....भिडायचं की बिंधास्त जय ला.... असं दे ना दे ना म्हणुन मागुन कोण देणारे याला पाईप्स...इतके सज्जन आहेत का समोरचे लोक... ?
विशाल चं कसं आहे ना...तो भांडायच्या वेळी भांडतो सोना, मिना शी...पण वेळ आली की जीव तोडुन खेळतो पण त्यांच्यासाठी... याउलट विकास नुसतं गुडीगुडी बोलतो सोना मिना शी, पण मनातुन त्याला स्वतः चा स्वार्थ च हवा असतो...मग टीम ए चे पाय धरयची वेळ आली तर तो ते पण करेल....
विशाल मला पुरुषांमधला मेधा धाडे वाटतो कधीकधी
मी या आठवड्यात दोनदा लाइव्ह
मी या आठवड्यात दोनदा लाइव्ह पाहिलं. एकदा उत्कर्ष चपात्यांसाठी कणीक मळत होता.
दुसऱ्या वेळी तो कणकेचे गोळे करून देत होता आणि मीरा चपात्या लाटत व भाजत होती. शेवटी उत्कर्षनेही भाजल्या चपात्या.
>>आणि आता ती वोटींग मधे नम्बर
>>आणि आता ती वोटींग मधे नम्बर वन ला आल्यामुळे
ही माहिती कितपत खरी असते? आणि जर खरी असेल तर लोकांना सेफ/अनसेफ जाहिर करताना त्याच क्रमाने का नाही करत?
सोना एक नंबरला हे खरं असावं,
सोना एक नंबरला हे खरं असावं, बी टीममधले बाकी सेफ आहेत त्यामुळे हिरीरिने votes देणारे सोनाला देणार.
काढताना शेवटच्या तिघांतलया एकाला काढतात. यावेळी कालपर्यन्त स्नेहा शेवटी होती पण तिला काढणार नाहीत, मागे जसे दादुस शेवटी असून काढलं नव्हतं.
अर्थात वोटिंग ट्रेंडस बाहेर येतात ते खरे असतात की नाही ही शंका रास्त वाटते. ते डायरेक्ट बघायला मिळत नसतील तर चॅनेल दाखवते तेच बाहेर येत असावं.
बाय द वे शकुनीमामाचा भाऊ कलर्सवर नाही स्टार प्रवाहवर येतोय, महागुरु पण आहेत बहुतेक त्यात, singing show असावा. त्यामुळे उतक्याला काही भाव देणार नाही चॅनेल. पाचवा किंवा सहावा ठेवतील.
खरंतर मला दोघे भाऊ आवडायचे आधी, या शो मुळे तेवढा आदर राहिला नाही.
विशाल चं कसं आहे ना...तो भांडायच्या वेळी भांडतो सोना, मिना शी...पण वेळ आली की जीव तोडुन खेळतो पण त्यांच्यासाठी... >>> म्हणूनच तो विनर आहे आणि व्हायला हवाय.
विकास चुकीचे वागत असेल तर तो चौथाच येईल बहुतेक.
विशाल जय मीनल असा असेल नंबर. मीनल दुसरी आली तर आवडेल मला.
परत काकू होणार काय कॅप्टन.
परत काकू होणार काय कॅप्टन. यूट्यूबवर टायटल बघितलं विशाल का स्नेहा कोण होणार कॅप्टन. किती मूर्खपणा हा.
हो विशाल च्या टीम ने पाइप्स च
हो विशाल च्या टीम ने पाइप्स च टास्क जिंकलेला दिसतो. तेही ते स्वतः एकमेकात नेहमीप्रमाणे भांडत असताना आणि टीम ए फुल्ल फोर्स ने उतरलेले असताना, हे भारीच!
एक म्हणावे लागेल, सोनाली ने नक्कीच गेम उंचावला आहे या आठवड्यात. आता कुठे कोल्हापुरी ठसका अॅक्चुअल गेम मधे बघायला मिळतोय. काल गायत्रीला आणि विशेषतः मीराला सॉलिड नडत होती ती, मीराला सुटता येत नव्हतं म्हणून तोंड चालवत होती अॅज युज्वल.
आणि विशाल के क्या कहने!! बाप रे ! काल एका वेळी आख्खी टीम ए, इन्क्लुडिंग जय त्याच्यावर एकत्र तुटून पडले होते आणि विशाल ने कबड्डी स्टाइल सगळ्यांना आपल्यासोबत फरपटत नेऊन पाइपलाइन तोडलीच !!
पण स्नेहा येडा बनके पेडा खाणार. सुमडीत कॅप्टनशिप ची कंटेंडर झाली. ती दोन्ही ग्रुप्स ना धरून आहे.
सोमि ट्रेन्डस बघायचे तर स्नेहाच बॉटम ला आहे आणि थोडी वर गायत्री. एकूण गायत्रीलाच जास्त एविक्शन ची भिती अहे असे वाटते. दादुस एविक्शन ची शक्यता आता मी विचारतच घेणं सोडलंय
>>दादुस एविक्शन ची शक्यता आता
>>दादुस एविक्शन ची शक्यता आता मी विचारतच घेणं सोडलंय Happy
हो ना!!
दादूस तेल लावलेला पेहलवान निघाला!!
विकास चालु वाटला...उगीच
विकास चालु वाटला...उगीच सामोपचाराने पाईप मागायचं नाटक करत होता...>>>+१११११
दादुस एविक्शन ची शक्यता आता
दादुस एविक्शन ची शक्यता आता मी विचारतच घेणं सोडलंय >>> हाहाहा, सही पण यावेळी काकुबाई जाऊदेत अस वाटतंय मला. पुढच्या वीकमध्ये कॅप्टन झाली ती तर नॉमीनेट होणार नाही.
काढताना शेवटच्या तिघांतलया
काढताना शेवटच्या तिघांतलया एकाला काढतात. यावेळी कालपर्यन्त स्नेहा शेवटी होती पण तिला काढणार नाहीत, मागे जसे दादुस शेवटी असून काढलं नव्हतं. > असं असेल तर यावेळी गादा ला काढतील तसही ती आता टीम ए ला पण नकोशी झालीच आहे.... बी वाले तिला घेणार नाहीत..ना घर का ना घाट का....मग झिम्मा बघयला बाहेर तरी जौदेत..
हाहाहा, सही पण यावेळी काकुबाई
हाहाहा, सही पण यावेळी काकुबाई जाऊदेत अस वाटतंय मला. पुढच्या वीकमध्ये कॅप्टन झाली ती तर नॉमीनेट होणार नाही. >> त्या नाही जाणार...जय सोबत चाळे चालु आहेत ना....काल खेळता खेळता पण चालु होतं....परवा तर जय थेट अंगावर "घसरुन" पडला तिच्या.... आता यावरुन शनिवारी नवीन गाणं येणार आहे ममांचं.... " आज रपट/फिसल जाये तो हमे ना उठय्यो.."
गाणे सुचलं नसेल टीमला तरी इथे
गाणे सुचलं नसेल टीमला तरी इथे वाचून हेच गाणं म्हणतील, भारी आहे
मी voot वर बघते एपिसोड चांगला झाला तर, ते इथे समजतं. तिथली एक सुविधा आवडते, नको ते बघायला लागत नाही, काकु माकड सीन्स पुढे ढकलता येतात, त्यासाठी चार ऍडस voot वर जास्त बघायला लागल्या तरी परवडते.
यावेळी गादा ला काढतील तसही ती
यावेळी गादा ला काढतील तसही ती आता टीम ए ला पण नकोशी झालीच आहे.... बी वाले तिला घेणार नाहीत..ना घर का ना घाट का..>>> पण मला वाटते तिला ठेवावे आणि अ गट तिच्याशी कसे वागतात याची चुगली दाखवावी (किती दूष्टपणा माझा!). पुढचा एक आठवडा तिने लाचारी सोडून द्यावी. कोणताही टास्क तिला एकटीला खेळता आला नाही तरी ती काय स्टॅंड घेते त्याला महत्व आहे. अ गट तिच्याशी चांगला वागला नाही तर अ गट अजूनच वाईट ठरेल….आपल्याच गटातल्या सदस्याशी हे लोक कसे वागतात ते दाखवता येईल.
दादूसला ठेवले तर दासूस फक्त होला हो आणि ‘आज या ठिकाणी मी बिगबॅास साहेब आणि माझ्या चाहत्यांमुळे आहे’ म्हणतील.
" आज रपट/फिसल जाये तो हमे ना
" आज रपट/फिसल जाये तो हमे ना उठय्यो..">>> बरोबर गाणं आहे
दादूसला ठेवले तर दासूस फक्त
दादूसला ठेवले तर दासूस फक्त होला हो आणि ‘आज या ठिकाणी मी बिगबॅास साहेब आणि माझ्या चाहत्यांमुळे आहे’ म्हणतील. >> हा हा हा.... आज या ठीकाणी....
पण दादुस ला काढले तर ए टीम लगेच गादा ला घोळात घेणार...त्यांना कोणीतरी लागणारच ना मेजॉरीटी ला...आणि जुने रेकॉर्ड बघता बाई लगेच जातील मागे मागे...ती स्वतंत्र खेळेल अशी अपेक्षाच नाहिये तिच्याकडुन.... दादुस किंवा गादुस कोणीही गेलं तरी सेम च आहे टीम ए साठी
गादा ला घोळात घेणार..>>>
गादा ला घोळात घेणार..>>> म्हणूनच तिला चुगली दाखवायची. आणि ती लाचारी सोडेल ही फारच मोठी अपेक्षा/ स्वप्नरंजन आहे.
स्नेहा काकू परत ?? देवा!
स्नेहा काकू परत ?? देवा!
यावेलेस तरी विशाल व्हावा केप्टन
महेश मांजरेकर ह्यांनी रेटिंग
महेश मांजरेकर ह्यांनी रेटिंग सांगितल्यामुळे उत्कर्ष आणि मीरा जरा हवेत आहेत असं वाटलं का कोणाला?
त्यामुळेच मीरा nominate झाली तरी खुश झाली. उत्कर्ष सेफ झाला म्हणून.
मीराने सोनालीसोबत पंगा घेईन असं एक discussion केलं होतं उत्कर्ष सोबत. त्यावर तो म्हणत होता की तू असे करून तिला लिफ्ट करशील.
लैच गोड गैरसमज झालेत त्यांचे.
कारण मीरा 6 नंबर आणि सोना 11 नंबर. महेश सरांच्या मते. त्यांनी हेच साधारणपणे voting trends आहेत असं पकडलेलं दिसतंय.
स्नेहाला जयने ओरडलेलं चाललं पण सोनालीने तिला तू मध्ये पडु नकोस वै बोललेलं आवडलेलं दिसत नाहीये.
हा मुद्दा येऊ शकतो चावडीवर.
उत्कर्ष नीट उत्तरं देत नाही म्हणून सोनाली चिडली आणि म्हणत होती एकदा येउदेच हा भांडायला मग बघेन, पण येतच नाही म्हणे. फार हसलो त्या वेळी।मी.
काही।लोकांना।पाहिल्या पाहिल्या वाटतं की हे फार फार चालू असणार. उत्कर्ष ला पाहिल्यावर पहिल्यांदा तसंच वाटतं. त्यात बिग बॉस मध्ये तो जसा वागतो त्यामुळे ते मत अजून घट्ट झालं.
बाकी आदर्श शिंदे गायक म्हणून आवडतो.
विकास एकटा भिडतोय टीम ए ला
विकास एकटा भिडतोय टीम ए ला
जय+मीरा आणि उत्कर्ष आळीपाळीने
जय+मीरा आणि उत्कर्ष आळीपाळीने विकासशी भांडत होते. जय आणि उत्कर्षचे आवाज बसले. विकास मध्ये पाणी पिऊन आला. पण त्याचा आवाज या तिघांना पुरून उरला.
अरे वा पण विकासला टीम बी
अरे वा पण विकासला टीम बी मधल्या कोणी मदत नाही केली, भांडणात.
कालच विकासच लॉजिक अगदी शेबडया
कालच विकासच लॉजिक अगदी शेबडया पोराला पण पटणार नव्हत म्हणे गोड बोलुन पाइप काढुन घेणार होतो, अॅहॅ रे जय आणी मिरा असताना गोड बोलुन??
प्रोमोत पाहिल की स्नेहाने जयला अॅग्रेसिव्ह बिहेव्हियर साठी punishment दिलि त्यामुळे म्हणे तो तिच्याशी बोलत नाहिये आणी ही रडुन त्याला मनवतिये.
Pages