उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही स्वच्छ दिवस, चांगले तापमान वगैरे बघून बार्बेक्यू करणं इथं खूप कॉमन आहे. कबाब वगैरे कोळशाच्या बार्बेक्यूवर करता येतात पण कोळशावर भाजलेले नान, रोटी किंवा तत्सम प्रकार करून बघण्यासाठी तंदूर घ्यावा असं वाटत होतं. किंमती बघितल्यावर 'कुठे इतका वापरला जाणार आहे' म्हणून आपसूकच ऑप्शनला टाकलं जात होतं. एकदा यूट्यूबवर कोणीतरी घरी तंदूर केलेलं पाहिलं तेव्हापासून डोक्यात घरीच तंदूर करायचं घोळू लागलं. त्यातच एका क्लायंटनं 'outdoor kitchen' डिझाईन करण्याबद्दल विचारलं. त्याला मोठ्या आकाराचा तंदूरही हवा होता. बरंच संशोधन वगैरे करून, मिनोतीला माती बद्दल, तंदूर भाजण्याबद्दल काही माहिती विचारून घरीच प्रयोग करून बघायचं ठरवलं. सामानाची जमवाजमव केली. चुकत माकत, दुरूस्त्या करत तंदूर बनवला.
बेसिक आकारासाठी टेराकोटाच्या कुंड्या वापरल्या.
त्याचे बेस कापून टाकले.
कुंड्या एक्मेकांवर उपड्या ठेवून मातीनं लिंपन करायचं ठरवलं.
त्यासाठी लागणारं सामान - वाळू, माती, फायर क्ले, सिमेंट, गवत वगैरे जमवलं
सगळं कालवून लिंपण करायला सुरूवात केली.
दोन्ही कुंड्यांमधल्या फटी नीट बुजवून आतून आणि बाहेरून लिंपण केलं.
या कुंड्या एका पत्र्याच्या ड्रममधे ठेवल्या.
आजूबाजूची जागा वाळू, मीठ, perlite घालून वरून सीमेंट लावून बंद केली.
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं. मंद आचेवर तंदूर आतून 'भाजला'.
सुरवातीला नान चिकटत होते पण जसं जसा तंदून सीझन होत गेला, तसतसे नान छान निघू लागले.
धन्य हो !! मेहेनत रंग लायी.
धन्य हो !! मेहेनत रंग लायी. हॅट्स ऑफ !
तुला नि मिनोतीला माझा दंडवत!!
तुला नि मिनोतीला माझा दंडवत!!
भारीच... किती छान तंदूर
भारीच... किती छान तंदूर बनवलात हो अंजली..!! डेडीकेशन्स हां..
तंदूर नान तर बनतीलच पण चिकन तंदूर, कबाब्स, तंदूरी बटाटा पण छान बनेल यात.
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं.
हे नक्की का करावं लागतं , म्हणजे फक्त मातीवर रोट्या, नान इ. नीट चिकटत नाहीत म्हणून कि इतर काही कारण?
तुसि धन्य हो ___/|\___ बयो
तुसि धन्य हो
___/|\___ बयो
कसलं भारी!!
कसलं भारी!!
यातल्या रोटी चा पण फोटो पाहिजे, क्लायंट ने दिले तर.
अमेझिंग आहे हे! एखाद्या नानचा
अमेझिंग आहे हे! एखाद्या नानचा फोटो पण टाका ना.
एकूण खर्च किती आला तरी? आणि विकतचा आयता तंदूर कितीला येतो? ही आपली उगीचच चौकशी
हे खूपच मस्त झाले आहे. नथिंग
हे खूपच मस्त झाले आहे. नथिंग लाइक तंदुरी एनि थिंग. पेटं ट घेउन टाका. व छान छान पदार्थांचे पण फोटो द्या.
अंजली आणि मिनोती, तुम्ही
अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! फारच भारी आहे हे! शेवटचा रसरशीत तापलेल्या तंदूरचा फोटो मस्त!
भारीच
भारीच
अंजली आणि मिनोती, तुम्ही
अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! >>> +१
अंजली, काय पेशन्स आहे तुझ्यात _/\_
भारीच झालयं हे...
भारीच झालयं हे...
याला तंदूर च म्हणतात कि तंदूरची भट्टी ?
कमाल भारी झालंय हे..hats off.
अशक्य भारी झालंय हे..hats off...
अंजली आणि मिनोती, तुम्ही
अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! >>> +१
धन्य आहात तुम्ही दोघी ...मनो
धन्य आहात तुम्ही दोघी ...मनो
अंजली आणि मिनोती, तुम्ही
अंजली आणि मिनोती, तुम्ही दोघीही ग्रेट आहात! फारच भारी आहे हे! शेवटचा रसरशीत तापलेल्या तंदूरचा फोटो मस्त! +१
खरंच धन्य आहात!
खरंच धन्य आहात!
विस्तव नेमका कुठे पेटवायचा?
सुपर्ब! काय भारि दिसतय, नान
सुपर्ब! काय भारि दिसतय, नान भाजतानाचा एखादा लाइव्ह व्हिडीयो पण टाक जमल तर..
_/\_ _/\_ _/\_ त्रिवार
_/\_ _/\_ _/\_ त्रिवार दंडवत तुम्हा दोघींना.
ते मॅरिनेटेड कोंबडी घेऊन कधी येऊ म्हणता ?
कसलं भारी DIY प्रोजेक्ट आहे
कसलं भारी DIY प्रोजेक्ट आहे हे. ग्रेट.
इतक्या मेहनतीनंतर ते भाजलेले खरपूस नान खायला काय मज्जा येत असेल ना!
भारी झालं आहे हे DIY !!
भारी झालं आहे हे DIY !!
शहरी ब्लॉक पद्धतीच्या घरांत
शहरी ब्लॉक पद्धतीच्या घरांत वापरणे शक्य नाही. त्यासाठी gas तंदुर हवा.
चेंबुर camp भागांत बिस्किटाच्या मोठ्या डब्यांना माती लिंपून बनवलेला वापरत.
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं.
हे नक्की का करावं लागतं , म्हणजे फक्त मातीवर रोट्या, नान इ. नीट चिकटत नाहीत म्हणून कि इतर काही कारण?>>>>>
तंदूरची आतली बाजू 'नॉनस्टीक' व्हावी म्हणून हा लेप द्यावा लागतो. रेस्टोरंटसमध्ये रात्री किचन बंद झाले की लेप लावतात आणिअगदी मंद आच ठेवतात.
अनु, हा मी शेवटी आमच्यासाठीच ठेवला. क्लायंटला पुढच्या उन्हाळ्यात करून देणार आहे.
एकूण खर्च किती आला तरी? आणि विकतचा आयता तंदूर कितीला येतो? ही आपली उगीचच चौकशी >>> साधारण $१५०. काही सामान उरले आहे, त्यात अजून चार तंदूर होतील . या आकाराचे तंदूर कमर्शिअल आकाराचे समजले जातात. त्यांची किंमत साधारण $२००० च्या आसपास असते. छोटे घरगुती वापराचे तंदूर $७५० पर्यंत मिळतात. पण आकार अगदीच लहान असतो.
हा गॅस बर्नरवर पण चालू करता येईल. पुढच्या उन्हाळ्यात तो प्रयोग करून बघणार आहे.
(No subject)
पण अनुभवावरून कळलं की
पण अनुभवावरून कळलं की कबाबसाठी कोळशाचा बार्बेक्यू उत्तम. तंदूर नान रोट्यांसाठी चांगला आहे.
धनि,
धनि,
ती मॅरीनेट केलेली कोंबडीपण मिळेल इकडे.
विस्तव नेमका कुठे पेटवायचा? >
विस्तव नेमका कुठे पेटवायचा? >>> चौथ्या फोटोत खालच्या बाजूला (बेसला) चार इंचाचा (तीन बाजू असलेला) चौकोना सारखा आकार कापलेला दिसतोय. ड्रममधे तंदूर ठेवल्यावर त्या चौकोनाच्या समोर येईल असा चौकोन ड्रमला देखिल पाडायचा. तिथून कोळसा, लाकूड वगैरे घालता येतं. विस्तव पेटवता येतो, राख काढता-साफ करता येते. ते ओपनिंग कमी जास्त झाकून आच मोठी - कमी करता येते. चुलीसारखंच टेक्निक आहे.
क्या बात.. मी येते ह्या
क्या बात.. मी येते ह्या विकेंडला
सुपर्ब आहे सगळं प्रकरण.
सुपर्ब आहे सगळं प्रकरण.
फायनल प्रॉडक्ट्स तोंपासू.
आह!! कसले मस्त फोटो तंदूर
आह!! कसले मस्त फोटो तंदूर रोटी आणि इतर रेसिपीज चे.
धन्यवाद अंजली.आता खरोखर दिन बन गया.
Pages