उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही स्वच्छ दिवस, चांगले तापमान वगैरे बघून बार्बेक्यू करणं इथं खूप कॉमन आहे. कबाब वगैरे कोळशाच्या बार्बेक्यूवर करता येतात पण कोळशावर भाजलेले नान, रोटी किंवा तत्सम प्रकार करून बघण्यासाठी तंदूर घ्यावा असं वाटत होतं. किंमती बघितल्यावर 'कुठे इतका वापरला जाणार आहे' म्हणून आपसूकच ऑप्शनला टाकलं जात होतं. एकदा यूट्यूबवर कोणीतरी घरी तंदूर केलेलं पाहिलं तेव्हापासून डोक्यात घरीच तंदूर करायचं घोळू लागलं. त्यातच एका क्लायंटनं 'outdoor kitchen' डिझाईन करण्याबद्दल विचारलं. त्याला मोठ्या आकाराचा तंदूरही हवा होता. बरंच संशोधन वगैरे करून, मिनोतीला माती बद्दल, तंदूर भाजण्याबद्दल काही माहिती विचारून घरीच प्रयोग करून बघायचं ठरवलं. सामानाची जमवाजमव केली. चुकत माकत, दुरूस्त्या करत तंदूर बनवला.
बेसिक आकारासाठी टेराकोटाच्या कुंड्या वापरल्या.
त्याचे बेस कापून टाकले.
कुंड्या एक्मेकांवर उपड्या ठेवून मातीनं लिंपन करायचं ठरवलं.
त्यासाठी लागणारं सामान - वाळू, माती, फायर क्ले, सिमेंट, गवत वगैरे जमवलं
सगळं कालवून लिंपण करायला सुरूवात केली.
दोन्ही कुंड्यांमधल्या फटी नीट बुजवून आतून आणि बाहेरून लिंपण केलं.
या कुंड्या एका पत्र्याच्या ड्रममधे ठेवल्या.
आजूबाजूची जागा वाळू, मीठ, perlite घालून वरून सीमेंट लावून बंद केली.
तंदूरला तेल, पालक, ताक वगैरे मिश्रणाचा लेप देऊन 'सीझन' केलं. मंद आचेवर तंदूर आतून 'भाजला'.
सुरवातीला नान चिकटत होते पण जसं जसा तंदून सीझन होत गेला, तसतसे नान छान निघू लागले.
धन्यवाद अंजली! हे फारच भारी
धन्यवाद अंजली! हे फारच भारी काम झालेलं आहे!
हां बरोबर. तो कापलेला चौकोन
हां बरोबर. तो कापलेला चौकोन नंतर दिसला नाही त्यामुळे लक्षात आलं नाही. भारी झालेलं आहे हे प्रकरण.
Pages