मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मध्ये मांजरेकर अतिशय सुमार होस्ट आहे.>>> मला नाही वाटत असं. यावेळी मांजरेकर एकदम जबरदस्त शाळा घेताहेत आणि मला तरी ते आवडतं. शाळेत असताना एक कडक मास्तर असतो त्याला सगळे घाबरून असतात तसे वाटतात ममा.एक दहशत आहे यावेळी त्यांची आणि यावेळी कंटेस्टंटनी पण ते बोलून दाखवलं. त्यांच्यामुळेच चावडी बघावीशी वाटते. आणि ते रंगत पण आणतात. फक्त शनिवारी शाळा घेतल्यावर रविवारी जे एकदोन गेम खेळायला लावतात ते अगदीच पांचट असतात. बिग बॉस टीमने कल्पनाशक्ती वापरून अजून रंगतदार गेम्स आणावेत.

मलाही मांजरेकर आवडतात, या सिझनला तर एकदम रॉकिंग अनबायस्ड आहेत , मला नाही वाटत स्नेहा किंवा कोणालाही फेवर करतायेत, सगळ्यांना सुनावतायेत व्यवस्थित !
वाइल्ड्कार्डची गंमत अशी आहे कि यावेळी दोन्ही वाइडकार्ड्स चांगली असून लवकर आउट झाली आणि जी शर्मिष्ठा सगळ्यांना आजुन लक्षात आहे ती खरं तर अतिशय अ‍ॅव्हरेज स्पर्धक होती, त्यावेळी मेघा एकटी पडली होती, तिला साथ दिली, तिला चिकटून राहिली म्हणून त्यावेळी चांगली वाटली इतकच !
पहिल्या सिझनला तसही मेजॉरीटी पब्लिकला गेमच माहित नव्हता त्यामुळे जरा कोणी बरं खेळल तरी चांगले वाटायचे !
लास्ट सिझनला हिना पांचाळ आणि आरोह सुद्धा चांगले होते आणि बरेच पुढे गेले !
यावेळी गायत्री स्नेहा सोडून स्पर्धक बर्‍यपैकी तयारीचे आहेत त्यामुळे वाइल्ड कार्ड खूप उठून दिसायला, त्यांचे फॅन फॉलॉइंग बनणे अशक्य झालय कमी वेळात !

विकास खुपच चांगला अभिनेता आहे. उत्क्या पण अफलातून एंटरटेनर आहे.
मीनलला विशाल जितका हिडीसफिडीस करेल तेवढी मीनलला सिंपथी मिळेल.
विशालच्या भाषेची बोंब असली तरी तो नेहमीच पब्लिकला आवडेल असंच बोलतो.
स्नेहा दर आठवड्यात अधिकाधिक डंब वाटते.

ममा आजवर कायम रूड आणि अतिशहाणपणा करणारं एक माजोरडं व्यक्तिमत्व वाटायचे. ह्यावेळेस मात्र खूप आवडले. एकदम डाऊन टू अर्थ प्रेमळ आणि संवेदनशील वगैरे वाटले.

शर्मिष्ठा सगळ्यांना आजुन लक्षात आहे ती खरं तर अतिशय अ‍ॅव्हरेज स्पर्धक होती, >>> माझ्या डोक्यात जायची मात्र, सिरियलमध्येही आणि bb तही.

आर्याला माझ्यासारखंच वाटतंय, मीरा स्नेहा आणि म मां बोलणी याबद्दल. मीराने सांगून टाकले काय ते बरं झालं, आता तिला उगाच अति बोलू नका.

मला ममां आवडतायत. या सीझन ला तर फारच.
मीराला जास्त बोलतात हे वाटतं पण. स्नेहाला तसेही काय बोलणार. ते नांगी टाकतात असे नाही वाटले, जयसोबत जे चालते त्यावर झालेय की डायरेक्टली अन इन्डायरेक्टली सांगून, त्यापलिकडे ते दोघे अ‍ॅडल्ट आहेत. बाकी टास्क्स मधे किंवा कुठे स्ट्रॅटेजी वगैरे ती काही करतच नाही फार त्यामुळे त्यात तिला बोलण्यासारखे नसतेच काही.
कालचा एपिसोड बरा होता गेल्या रविवारपेक्षा. मला विकास- गायत्री चे स्किट आणि उत्कर्ष -मीराचेही आवडले. विकास विशेष एंटरटेनिंग वाटला एकूण!

आतापर्यंत टीम ए मधले सगळे नॉमिनेशन झाले आहेत. दादूस, मीरा, गायत्री आणि उत्कर्ष.
टीम बी मधले तिघे सेफ.
जय संचालक असल्याने खेळात नाही आणि टीम बी ची शक्ती + युक्ती

दादूस, मीरा, गायत्री आणि उत्कर्ष.
<<<
ओह ओके, सोनाली स्नेहा आहेतच ऑलरेडी नॉमिनेशन मधे, आता बिबॉने कॅन्सल करुनये एलिमिनेशन !
स्नेहा जावी अशी फार इच्छा आहे पण यावेळी एकुणच एलिमिनेशस्न्स वेगळीच चालु आहेत त्यामुळे काही आपेक्षा न करता बघावं !

जय शिवाय सगळी टीम ए फेल गेली. दादूस, मीरा , गादा , उत्कर्ष सगळे नॉमीनेट. उतक्या ला युक्ती वापरून एकदम भारी लॉक करून घालवला आत्ताच्या फेरीत. कोणाची आयडिया माहिती नाही पण टीम बी रॉक्स आज

एक दिवस जय नाही तर काय झाले यांचे? आता त्यांना वाटत असेल उगाच त्याला कॅप्टन केला. तो खेळत असता तर सगळी टीम वाचली असती.

बघायला हवं उद्या, टीम बी साठी.

मीराला वोटिंग करेन मी. बाकी कोणाला करावे अस वाटत नाही. थोडेच देईन पण देईन. सोनाबाबत ठरवलं नाही. फार काही करत नाही ती.

मीराला जास्त बोलतात हे वाटतं पण. स्नेहाला तसेही काय बोलणार. ते नांगी टाकतात असे नाही वाटले, जयसोबत जे चालते त्यावर झालेय की डायरेक्टली अन इन्डायरेक्टली सांगून, त्यापलिकडे ते दोघे अ‍ॅडल्ट आहेत>>> +१

खरतर इमोशनली ब्लॅक्मेलिन्ग करतात हे स्नेहा बोलली होती ते फक्त मिराने रिपिट केल पण बोलणे सगळे तिलाच बसले, मला वाटत मिरा इन जनरलच घरात प्रत्येक गोश्टित कुरकुर करते त्यामुळे असेल.

विकास आणि नंतर सोनालीने मस्त उचकवलं जयला. जय संचालक असूनही टीम ए च्या प्लानिंग प्लॉटिंगमध्ये सहभागी होत होता यावरून सोनालीने सुनावलं.
टीम ए मध्ये गायत्री चांगली खेळली.

टीम बी कडून सोनाली एकटीच नॉमिनेटेड आहे. त्यामुळे इतर तिघांचे सपोर्टर्स तिला व्होट करतील तर टीम ए मधला एक बाद होऊ शकेल.‌
मग ५-४ असं बलाबल राहील

एपिसोड पाहिला नाही पण हे पब्लिक जयला कायम राइट प्रुव्ह करतात, तो आहे म्हणून ए टिम आहे !
बी मधे तसे सोनाली सोडून एकमेकांवर कोणी अवलंबून नाही , इंडिव्हिज्युअली स्ट्राँग आहेत विशाल विकास मीनल !

मीरा गायत्री उत्कर्ष मध्ये व्होट डीव्हाईड होऊन गायत्री बाहेर पडेल. स्नेहा दादूस यांचे पर्सनल व्होटस त्यांना वाचवतील.
विशाल विकास चे व्होटर सोनाली ला वाचवु शकतात.
मला एक नाही कळले गायत्रीने जसे दादूस ची बाटली हिसकावून घेतली तशी मिराने उत्कर्ष ची का नाही घेतली?

विशाल निकमने कुस्ती चे ट्रेनिंग घेतलेले असावे. त्याच्या काही पकडी फक्त प्रोफेशनल मल्लच खेळू शकतात. मागच्या आठवड्यात पण त्याने जयला जे लॉक केले होते त्यात कळत होते की तो हे कोचकडून शिक्षण घेऊन आलाय.कारण फक्त ताकद पाहिली तर जय कधीही सरस आहे.

मला वाटत यावेळी दादूस जातील.ऑलरेडी नीथाला काढल्यामुळे पब्लिक सॉलिड वैतागल आहे.आता सोनालीला काढल तरी भडकणार आणि दादूसला काढल तरी भडकणार टीम ए ला वाचवण्यासाठी.
पण दादूसलाच घालवाव लागेल.

दादूस आणि स्नेहा ने मला इतक्या वेळा तोंडावर पाडले आहे की माझी हिम्मत नाही होत ते जातील म्हणायची. Happy

करेक्ट. विशाल, विकास आणि मीनल कितीही वेळा नॉमिनेट झाले तरी फरक पडणार नाही. ते टॉप ५ मधे असणार आहेत. टीम बी मधे धोका कुणाला असेल तर फक्त सोनाली ला. टीम ए चे तसे नाहीये. तिथे बांडगुळे जास्त Happy ते खूष असतील आधी आदिश, आविष्कार, नीता गेले म्हणून. पण आता यापुढे एकेक करून गुडबाय समारंभ त्यांच्याच लोकांचा होणार.
आता सगळेच टीम ए नॉमिनेट झाले म्हटल्यावर बिबॉ कदाचित अशाच साठी राखीव ठेवलेल्या दादुस ला निरोप देतील का? किंवा मग सोनाली .

गादा खरे तर चांगली खेळली आज. पण खूप उशीर झालेला आहे. अगदी दया आली तर लोक वाचवतील.
नीताचे पण तेच झाले डील करण्यात वेळ घालवला आणि बाय द टाईम पब्लिक ला कळाले की चांगली खेळते व्होटिंग संपल्यात जमा होते.

टिम ए ने आता दादुसला वाचवण्याच्या भानगडित पडु नये नाहितर नक्किच कुणाचा तरी आदिश व्हायचा.

मजा आली आज. मध्ये शारीरिक दुखापत वरून बी बॉ ओरडले तेव्हा भीती वाटली की टास्क रद्द होईल पण तसे काही झाले नाही. उत्कर्ष ज्या काही लाथा घालत होता ते बघून गंम्मत वाटली. जयच्या माकडउडया बघायला मिळाल्या खूप दिवसांनी. जय आणि सोना ब्रेकअप झाल्यासारखे भांडत होते. मध्येच जय इंग्लिश मध्ये काय बोलत होता. त्याउलट सोनाली कोल्हापुरी टोनमध्ये त्याला सुनवत होती. विशाल काय तात्याला जाऊन सॅल्यूट मारत होता Biggrin मीरा मीनलला जे बोलत होती त्यावरून ती जळकुकडीच वाटत होती
धमाल होती एकंदरीत.

मीरा मीनलला जे बोलत होती त्यावरून ती जळकुकडीच वाटत होती.. मीरा मला ओव्हर रेटेड वाटते. गायत्रीला बॉडी लॅंगवेज मध्ये आत्मविश्वास दाखवता येत नाही हिला येतो. नाही तर ती आणि गायत्री सम पातळीवर आहेत. उलट गायत्री स्वतः चे मुद्दे मांडायच्या टास्क मध्ये सरस आहे.

हो मज्जा आली आज..पहिल्यांदाच b टीम जिंकली...विकास म्हणाला ना..फ़र्स्ट हाफ त्याचा होता ..आता सैकेण्ड हाफ (पुढिल 50 दिवस) सुरु झालाय तो आपलाच... संपुर्ण A टीम नोमिनेट झाली.. जय नाही तर सगळी बान्डगूळ खाली पडली.. तात्या ला विशाल चा सलाम एकदम कडक..

तुरू जय टास्क मध्ये नव्हता म्हणून, तो आला की येरे माझ्या मागल्या.
स्ट्रॅटेजी म्हणून बी टीमने प्रत्येक वेळी जयला कॅप्टन केले तर मजा येईल. अर्थात ते एव्हढे डोके लावतील असे नाही वाटत.

टीम ए मध्ये गायत्री चांगली खेळली. >>>>>>> सहमत.

उत्कर्षने गाण्यावरुन टास्क करेक्ट ओळखला.

राडा काय झाला जय विकासमधे. >>>>>>>>>> विकास 'टास्कमध्ये डोके फुटले तरी चालेल' म्हणाला त्याचा ईश्यू केला जयने. लास्ट आठवडयात जय पॉझिटिव्ह वाटला आज पुन्हा येरे माझ्या मागल्या.

जय संचालक आहे की टीम ए चा आहे. >>>>>>>> सन्चालक होता पण टिम ए च्या बाजूने होता. अनफेअर सन्चालक!

बादवे, गायत्रीला भयानक कपडे देऊन बिबॉने इनडायरेक्टली तिचा फॅशन सेन्स किती भयाण आहे हेच सुचवल होत.

बी टीम जिन्कली हे छान झाल.

विशाल काय तात्याला जाऊन सॅल्यूट मारत होता . >>>>>>>> अगदी अगदी. एन्टरटेनर होता टास्कचा.

उत्कर्ष ज्या काही लाथा घालत होता ते बघून गंम्मत वाटली >>>>> हो ना. मान्जरीची पिल्ले खेळताना एकमेकान्वर लाथा मारतात ते आठवल.

आज जय स्नेहाच्या अन्गावर पडला. ह्यान्चा राजेश-रेशम होण्याआधी स्नेहाला हाकलाव.

उद्या मीरा-गायत्रीला भिडवणार आहेत एकमेकात.

Pages