मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विरोधी पक्षाची बाजू खरी आहे असं गृहीत धरून केलेल्या युक्तिवादाला डे. अॅ म्हणतात. ममा कुठंही वापरतात असं वाटलं काल.

वाइल्ड कार्ड आता आणूच नका, त्यांना घालवून देतात उगाच.

स्नेहा सोना दोघी असतील नेक्स्ट वीक तर सोनाला घालवतील, सारंगे बाईला ठेवतील.

दोन वि चं कौतुक सो मि वर होत असताना म मां ना काही पडलेच नाही त्याचं.

यावेळी वाइल्ड कार्ड्सना जस्टिस नाही दिला, थोडं वाचवायचं कि , वेळ तर द्यायचा रुळायला !
आदिश मधे तर सॉलिड दम होताच पण नीथाही आत्ता आत्ता चांगली वाटायला लागली होती , दोघांची यंग एनर्जी- स्क्रीन प्रेझेन्स फ्रेश होता.. दादुस- स्नेहा सारख्या लाचार माणसांना पाहून कंटाळा आलाय आता .
आता खरच वाटतय कि टॉप ७ पर्यन्त रहाणार दादुस !

थँक्स अन्जु,
वाइल्ड कार्ड्स असे येतात आणि जातात.. नेक्स्ट टाइम कोणी मोठी नावं आणा ज्यांना ऑलरेडी मोठ्ठा फॅन बेस आहे.. लग्गेच नॉमिनेशन मधे आले तरी जाणार नाहीत !
पाहिजे तर त्यांना फिनाले मधे ५ नंबरवर काढा पण वाइल्डकार्ड असे कोणी हवे जे आल्याने बाकीच्या स्पर्धकांना थ्रेट जाणवली पाहिजे , अगदी एंट्री पासून टेन्शन आलं पाहिजे जसे रिंकु राजगुरु, मेगा युट्युबर मोस्ट्लीसेन ची प्राजक्ता कोळी, भाडिपाचा आलोक राजवाडे ज्यांना फिनाले पर्यन्त जाण्याइतके फॅन फॉलॉइंग ऑलरेडी आहे आणि एन्टरटेनर आहेत !

सगळ्या वाईल्ड कार्डचा एक बीबॉ सीजन केला पाहिजे. शर्मिष्ठा तर एका पायावर तयार आहे परत यायला. तिथे त्यागराजपासून सगळे आले पाहिजेत.
आज निथा छान दिसत होती एखाद्या परीसारखी. मला तिच्यात फॅशन मधल्या कंगनाचा भास होत होता. गायत्रीने भयाण मेकअप केला होता. पूर्वी गालाला रुज लावायचे किंवा लहान मुलांना गॅदरिंग मध्ये करतात तसे लाल गाल आणि निळा आयशॅडो.
स्नेहा आणि जयची नक्कल नाही बघितली मी. आजच होती ना. वूटवर जाऊन बघण्यासारखी आहे का.

नीथा छान दिसत होती हेच लिहायला मी आले, चंपा करेक्ट अगदी, परी. तिला उगाच काढलं. मी पहिला भाग बघितला. मला मीराही आवडली दिसण्यात. स्नेहाचा हेअरकट छान होता.

म मां स्नेहाला चांगलं सुनावत होते पण नंतर ती उलट बोलायला लागल्यावर घाबरले बहुतेक तिला आणि हसण्यावारी नेत होते, तिची वागणूक, जय स्नेहा नाटके फक्त त्यांनाच आवडतात का, बाहेर कोणाला आवडतात, सगळे तर नावं ठेवत असतात.

त्यांनी नंबर सांगितल्यावर गा दा चा चेहेरा पडला, स्नेहा पण समजून गेली पण सोनाने फार काही मनावर घेतलं नाही. स्नेहाला काढा मात्र लवकर, नंतर गा दा ला. ती सोना त्यानंतर जाऊदे. दादुस जाणार नाहीतच, उतक्या पण नाही, votes असतो किंवा नसोत. नीथाबद्दल स्नेहा काहीही बोलली. स्वत: कशी वागतेस ते बघ. हिला कोणाचीच पडली नाहीये.

मीराला काही गोष्टी योग्य सांगत होते. गा दा ला एव्हाना कळून चुकलं असेल की मीरा महत्वाची आहे, आपली पोझिशन खाली आहे. मीराला सुनावताना बिनधास्त असतात म मां. स्नेहासमोर नांगी टाकतात असं वाटलं, आवेश होता आधी नंतर नरमले. मीनललाही जास्त सुनावले, तिथेही नरमपणा नव्हता.

मीनल सोडून सर्वांना बांडगुळे म्हणाले ते एक बरं झालं.

स्नेहा आणि जयची नक्कल नाही बघितली मी. >>> मी प्रोमो बघितला. छान केलं विकास आणि गा दा ने.

स्नेहाला नंबर कळला, आता ती जास्तच जय जय करेल मग फायनलला पोचवतील bb, राग येतो अगदी.

ए टीमवाले सतत बी टीम बद्दल बोलत असतात, बी टीमवाले तसं कधीच करत नाहीत हे मात्र म मां बोलले.

विकासला जरा जास्तच सुनावले अस वाटतं.

>>म मां स्नेहाला चांगलं सुनावत होते पण नंतर ती उलट बोलायला लागल्यावर घाबरले बहुतेक तिला आणि हसण्यावारी नेत होते<<
आजचा एपिसोड अजुन पाहिलेला नाहि, पण मांजरेकर काल जरा फाफलले, मीराचं काउंटर आर्ग्युमेंट ऐकल्यावर. शी साउंडेड जेन्युइन/सिंसियर.. असो...

बाकि, काल मांजरेकर वाज स्पॉट ऑन अबौट विकास अँड विशाल. विकास इज ए पथेटिक लूझर. म्हणे कदाचित स्नेहाने विशालला वोट दिलं असतंं. डुड, आर यु लिविंग अंडर ए स्टोन... Lol

>>आजचा एपिसोड अजुन पाहिलेला नाहि, >>> पहिला भाग बघून वाटलं, दुसरा अजून नाही बघितला.<<
ओके, मग कालच्याच एपिसोडमधे स्नेहा चाचपडत होती, तर मीरा वाज ट्राइंग टु पुट हर पॉइंट अ‍ॅक्रॉस. अँड शी मेड मांजरेकर अ‍ॅकनोलेज (फाफलले) हर पॉइंट,. व्हेअरॅज, स्नेहा नुसती हाहा हिहि करत होती...

मला मीराला उगाच जास्त बोलतात, कालही बोलले अस वाटलं. मीराने मुद्दे मांडले तरी फार लक्ष देत नाहीत आणि स्नेहा फालतू काहीतरी सांगते, बोलते, हाहाहीही करतेच तर लगेच तिच्याबाबत गरज नसताना सॉफ्ट होतात अस वाटलं.

बाकी मीराला तू महत्वाची आहेस म्हणून मी सहा नंबर दिला, हे सांगितलं ते पटलं मला थोडं (म्हणून मी मीराला काही गोष्टी योग्य सांगितल्या अस वर लिहिलं). उलट तिचा नंबर पाच वाटतो मला. उतक्याचा नाही वाटत. तिने individual खेळावे, बांडगूळ होऊ नये अस सांगायचा प्रयत्न करत होते अस एकीकडे वाटलं मला. मागेही मीनलनंतर तुझ्याकडून अपेक्षा आहेत, मी माझ्या टीममध्ये आधी मीनल आणि नंतर तुला घेईन अस म्हणाले होते.

पण मांजरेकर काल जरा फाफलले, मीराचं काउंटर आर्ग्युमेंट ऐकल्यावर. >>> मी परत बघेन ते सीन्स नीट ह्या angle ने. मी बघताना निसटले असेल काहीतरी कदाचित.

त्या जयने आता जरा त्या स्नेहाचा नाद सोडावा. जाऊदे तिला बाहेर.

स्नेहाला स्नेहाकाकू म्हणाले ते मात्र आवडलं मला, हाहाहा.

मांजरेकरांना काहीही सा़गितलं तरी विविनी केस कशासाठी कापले , कॅप्टनसीसाठी कापले का, हे त्या दोघांना आणि बहुतेक प्रेक्षकांना माहीत आहे.

त्यामुळेच जयला कॅप्टनसी मिळाल्यावर फक्त आपल्या पाठीराख्यांबद्दलच नव्हे , तर सगळ्या हाउसमेट्सबद्दल बोलावं लागलं.

स्नेहा आणि गायत्री एव्हिक्ट होणाऱ्या प्रत्येकाची औपचारिक माफी मागणार का?

मीरा आणि जयच्या रडारडीबद्दल, उत्कर्षच्या मोटिव्हेशनल भाषणांबद्दल मांजरेकर हिंट देऊन थांबले.

दादूस फारच भाबडे आहेत. इथे रुबी सारखी कोण आहे म्हटल्यावर
त्यांनी शेजारीच बसलेल्या स्नेहाचं नाव घेतलं.
स्नेहा आता कोडगी झाली असल्यामुळे त्यावरही खदाखदा हसली.

स्किट्सबद्दल या लोकांना आधी सांगितलं असणार. नाहीतर इतकं सगऴ उत्स्फूर्तपणे सुचणं कठीण आहे. विकास गायत्रीचं स्टिक तर खूप वेळ चाललं.

एव्हिक्शननंतर मीनल नीथाबद्दल बोलत असतानाच्या प्रोमोत सोनालीचे angry looks घुसवले.

बाहेर तगडा फॅन बेस असलेल्या कुणाला आणले तरी अशा लोकांना हा खेळ खेळता येईल याची गॅरंटी नाही. त्यांचे फॅन्स हे बघून व्होटिंग करतील हे पण पक्के सांगता नाही येत. उगाच पैसे मात्र खूप मोजावे लागणार.
नीता आणि आदिश चांगले खेळाडू होते, अति आगाऊपणा करून बाहेर गेले. ओव्हर कॉन्फिडन्स अंगाशी आला. आदिशने विकासला नॉमिनेशमधे टाकून आचरटपणा केला. नीताने दिड आठवडे डबल डिल करत होती. मीराने तीला रडवल्यावर तिचे डोके ठिकाणावर आले. बाहेर खेळ बघून येऊनही तुम्ही असे वागत असाल तर बिग बॉस टीम तरी काय करणार?
मग दादूस हुशार, उत्क्या नॉमिनेशन पासून वाचवू शकतो हे लक्षात आल्यावर सुमडीत त्याच्या बरोबर गेले.

मला वाटत स्नेहा,दादुस्,सोनाली,गादा याना आपण जिन्कणारच नाही ह्याची स्वतःबद्दल खात्रीच आहे त्यामुळे हे सगळेजण याला त्याला लटकुन जास्तित जास्त आठवडे काढण्याच्या प्रयत्न करणार, नॉमिनेशन मधुन वाचवायला ग्रुप थोडाफार तरी कामास येतोच त्यामुळे याचे हात दाब त्याचे बिस्किट दाब हे चालु असत.
सेन्हा लहानपणिचे व्हिडियो बघुन वाटतय की ती फार लाडे लाडे वाढलेली असावी.

सोशलमिडियावरचे ट्रोल्स आणि शो चे होस्ट यांच्यात काही फरक असूद्या!! >>>
अगदी अगदी ! मी प्रथमच पर्वा थोडा वेळ चावडी पहिली. माझ्या मध्ये मांजरेकर अतिशय सुमार होस्ट आहे. त्यांच्या स्वतःच्या बोलण्यावर अजिबात सेल्फ कंट्रोल नसतो. एकदम चिडून बोलतात असे वाटते. होस्टने calm राहायला पाहिजे व इमपार्शलही.
आता इतक्या सिझन नंतरही सुद्धा होस्टमध्ये काहीच सुधारणा नाही. मराठीत कोणी चांगला होस्ट नाहीच का.

मीराला काय ओरडत होते कि तू कशाला बोलतेस सगळ्यांबद्दल, जाऊदे ना. अहो तिने बोलले तरच बिग बॉसचा शो चालेल ना ! सगळे छान गुण्यागोविंदाने राहा म्हणे. राजश्रीचा सिनेमाचं पाहू ना मग. तुमचा शो कोण पाहिल?
मग ती म्हणाली मग मी काही बोललेच नाही तर राहूच शकणार नाही. मग एकदम स्वतःची चूक लक्षात आल्यावर गप्प झाले.
धन्य आहे !

माझा एक प्रॉब्लेम आहे.मला नेहमी नेगेटिव्ह दाखवणाऱ्या टीमबद्दलच नेमकी आत्मीयता वाटते. आता इतके सिझन पाहिल्यावर जाणूनबुजून तसे एडिटिंग केले जाते हे माहित आहे, नाहीतर कोणीच तसे खूप चांगले वा वाईट वागत नसते. पण शोची स्ट्रॅटेजी प्रमाणे टीम्स वाईट व चांगल्या दाखवल्या जातात.
म्हणून मला मीराबद्दल सहानुभूती आहे.

स्नेहा मिनिमम gurantee घेऊन आलीच असणार. कारण ती एकमेव फेमस कलाकार होती व सर्व हिंदी मराठी सिझनवर ट्विटरवर ऍक्टिव्ह होती. शो काय आहे तिला पूर्ण माहित आहे (पण म्हणून ती चांगली प्लेअर होईलच असे नाही)
पण त्यामुळे ती जिंकली नाही तरी फिनालेत जाणारच. unless रेशम सारखी लोकांनी तिच्या character वर शिंतोडे उडवले तरच २/३ आठवडे आधी जाईल. किंवा खूपच काही केले नाही तर....
चॅनेल साधारण २/३ कॉन्टेस्टन्ट वर भिस्त ठेऊन असतात कॉन्टेन्टसाठी.(उदा जय) आणि नंतर कोणता प्लेअर नंतर चॅनेलसाठी उपयोगी होईल त्याप्रमाणे आडाखे बदलत असतात. विकास व विशाल हे बोनस ठरतात

मिरा सुरवातीला स्वतंत्र खेळायची. मांजरेकरांनी तीला आरडाओरडा करून डिमॉरलाईज केले. ती घाबरून जय उत्क्या ला चिकटली. आता तेच तीला बांडगूळ म्हणतात.
मला वाटत स्नेहा,दादुस्,सोनाली,गादा याना आपण जिन्कणारच नाही ह्याची स्वतःबद्दल खात्रीच आहे त्यामुळे हे सगळेजण याला त्याला लटकुन जास्तित जास्त आठवडे काढण्याच्या प्रयत्न करणार... अगदीच.

ममां, स्नेहाला 'स्नेहा काकू' म्हटले, ते भारी वाटलं!
तिचं हसणं खरच हॉरिबल आहे.
मीरावर फारच ओरडतात ममां! स्नेहापुढे नांगी टाकतात, ती जरा लाडेलाडे बोलली की विरघळले हे!
मीरा जेन्यूइंली सांगत होती. अन खरच आहे, ती काही बोलली नाही तर मिळमिळीत गेम काय कामाचा!

स्नेहा डोक्यावर पडली आहे का ? दादुस तिला चक्क माकड म्हणाले तरी दात काढुन हसते काय.... विकास आणि गादा ने स्किट मधे स्नेहा ची पार इज्जत घालवली तरी हसते...विकासने गायत्री ला स्किट मधे उचलले तर जय ला म्हणते तुम्ही मला असं उचललं नाहिये अजुन..आपलं हे राहिलय... माणसाने किती बावळट असावं.... अविष्कार आणि तिच्या मधे नक्की काय झालं होतं खरच तपासुन पहायला पाहिजे. व्यक्ती म्हणुन मला स्नेहा अजिबातच आवडत नाहिये. त्यामानाने अविष्कार खुपच डीसेंट वाटला.
कालचं एलिमिनेश नाहीच पटलं मला.. दादुस खरच काहीही करत नाहीत. नीथा अजुन एक आठवडा राहिली असती तर मीनल सोबत पुढे आली असती चांगली.

Pages