दिवाळी विशेष लेख - बोगी-वोगी रेस्टॉरंट

Submitted by पराग१२२६३ on 3 November, 2021 - 22:22

अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे. हे रेस्टॉरंट लोकांच्या सेवेत 24x7 सुरू असते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील रेस्टॉरंट ऑन व्हिल्ससाठी रेल्वेच्या सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या डब्याचा वापर करण्यात आलेला आहे. त्या डब्यातील मूळच्या सर्व सीट आणि बर्थ काढून टाकून त्या जागी 10 टेबल बसवण्यात आलेली आहेत. तिथे खाद्यप्रेमींच्या मागणीनुसार पदार्थ बनवून दिले जातात.

या डब्याचा अंतर्गत भाग अतिशय आकर्षक बनवण्यात आलेला आहे. मुंबईतील रेल्वे वाहतुकीच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटनांशी संबंधित चित्रे, छायाचित्रे इथे लावलेली आहे. या रेस्टॉरंटमध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, इटालियन, दक्षिण भारतीय अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. या पदार्थांचा दर्जा, चव अतिशय चांगली असून त्यांचे दरही किफायतशीर ठेवण्यात आलेले आहेत.

रेल्वेच्या जुन्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची संकल्पना याआधी पश्चिम बंगालमधील पूर्व रेल्वेच्या आसनसोल जंक्शनवर राबवण्यात आली. देशातील अन्य बऱ्याच ठिकाणीही असे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रातीलही अनेक ठिकाणांचा यात समावेश आहे. रेल्वेच्या डब्यात रेस्टॉरंट सुरू करण्याची ही संकल्पना लवकरच लोकप्रिय होईल, यात शंका नाही. मी जेव्हा या रेस्टॉरंटमध्ये पोहचलो, तेव्हा तिथे बसायला जागाच नव्हती. काही वेळ वाट बघितल्यावर मला तिथे जागा मिळाली होती.

सविस्तर माहितीची लिन्क
https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_2.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
आमच्या कडे एका रेस्टॉरंटमध्ये अर्धाभाग रेल्वे डबा आणि प्लॅटफॉर्म सारखा केला आहे. डब्यातल्या टेबल साठी ऍडव्हान्स बुकिंग करावे लागते.

त्यापेक्षा या खऱ्याखुऱ्या डब्यात अधिक मजा येईल.

छानच संकल्पना. माहितीबद्दल आभार. ब्लॉगमध्ये छायाचित्रे असतीलच. डब्यात गाडी चालताना जो आवाज येतो तो आहे का? मंजुळ आवाज असल्यास जास्त मज्जा येईल.

किशोर मुंढे जी, या रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर गाडीच्या चाकांचा आवाज ऐकू येण्याबद्दल तुम्ही मांडलेल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे.

तुमचे लेख आवडतात. त्यात नेहमीच भारतीय रेल्वेंचे सुंदर वर्णन असते. या लेखात फोटो असते तर जास्ती आवडले असते.