Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा
क्रमवार पाककृती:
१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा
मगच त्यावर तुटून पडा Happy
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265
हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केक व आधीचे सगळेच पदार्थ
केक व आधीचे सगळेच पदार्थ मस्तच.
मी आज बदामाचे स्लिव्हर्स (ऊभे
मी आज बदामाचे स्लिव्हर्स (ऊभे काप) घालून ओटमील केले होते. नटस शुड बी पार्ट ऑफ डायेट.
मुलांचे डबे (हे असे खणांचे
मुलांचे डबे (हे असे खणांचे बेन्टो बॉक्स मिळतात>>>>>>
हे असे भरलेले मिळतात का??
आता मसाला ओट्सची रेसिपी पण सांग..प्लेन ओट्स आणि फोडणी चे ओट्स खाऊन कंटाळा आला.
मसाला ओट्स मस्त दिसताहेत.
नाही , आपल्याला रोज सकाळी
नाही , आपल्याला रोज सकाळी भरावे लागतात.
मसाला ओट्स
एक वाटी क्विक ओट्स
एक वाटी भाज्या
कांदा आलं हिरव्या मिरच्या, गरम मसाला, तिखट ,मीठ किंवा कुठलाही मसाला.
उपम्यासारखे सरबरीत शिजवून खायचे.
धन्यवाद.
धन्यवाद.
हो हो हो हो मी ऐकणार आहे
हो हो हो हो मी ऐकणार आहे सामो चं मसाला ओटस् ची रेसिपी भारी आहे.
हे असे भरलेले मिळतात का??>>> मृ थोडे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात
अस्मिता मसाला ओट्स जबरी
अस्मिता मसाला ओट्स जबरी दिसताहेत...
बदामाची चर्चा लोल विसरायला होतं हे खरंंय.. सुरवातीला गजर लावावा का ? :p
गजर लावावा का ?>. त्यापेक्षा
गजर लावावा का ?>. त्यापेक्षा गाजर पण खा.
विसिं- हा हा येस. गाजर हा
विसिं- हा हा येस. गाजर हा योग्य पर्याय आहे.
गाजरही नियमित खाणे होत नाहीच.
गाजरही नियमित खाणे होत नाहीच.
जर गजर झाला आणि त्यात "Time
जर गजर झाला आणि त्यात "Time to soak
almonds", असे लिहिले नाहिये आणि तुम्हाला कशाला बरं गजर लावला होता हे आठवत नाहीये, तर म्हणता येईल की स्मरणशक्तीची समस्या आहे, त्यासाठी काही करावे (खावे) लागेल.
आपण इतरत्र एवढे गुंग होऊन जातो काम असो की विरंगुळा की ठराविक वेळी इतर काय काम करायचे होते याचे भान रहात नाही, त्याला स्मरणशक्तीची समस्या म्हणता येणार नाही, त्याचे उपाय करून या समस्येचे समाधान होणार नाही, कितीही बदाम, गाजर खा.
कशाला बरं गजर लावला होता हे
कशाला बरं गजर लावला होता हे आठवत नाहीये, तर म्हणता येईल की स्मरणशक्तीची समस्या आहे, >>> बापरे! कधीतरी मला मी काय घेण्यासाठी फ्रीज उघडला आहे तेच पटकन आठवत नाही.
पटकन नसेल, पण जरा वेळाने
पटकन नसेल, पण जरा वेळाने आठवते ना? मग नो प्रॉब्लेम.
हो
हो
@मानव - हो, गजर नावासहित
@मानव - हो, गजर नावासहित लावायचा असेच अपेक्षित.
आज सकाळचा नाश्ता वडा रस्सा. मी पहिल्यांदा ट्राय करतेय .:-)
(No subject)
वाह वडा रस्सा हाच तर असतो
वाह वडा रस्सा हाच तर असतो सकाळचा नाश्ता.. मस्त झणझणीत सुरुवात व्हायला हवी दिवसाची. माझ्या तर तोंडाला फारशी चवच नसते सकाळी त्यामुळे मिळमिळीत चवीचे खायला होत नाही.
वाह वडा रस्सा हाच तर असतो
डुप्लिकेट पोस्ट..
चला आता ईथे आजचा मेनूच टाकतो...
.
वडा रस्सा मस्त
वडा रस्सा मस्त
अंडा बिर्याणी तोंपासू
बिर्याणीला झब्बू, कालचा फोटो
बिर्याणीला झब्बू, कालचा फोटो आहे.
हा sssss काय एकेक बिर्याणी
हा sssss काय एकेक बिर्याणी तोंपासु
बिर्याणीज् तोंपासु. व्हेज
बिर्याणीज् तोंपासु. व्हेज बिर्याणी करायला हवी.
@ऋन्मेष - येस कधीतरी सकाळीच चमचमीत खायची लहर येते. काल तर सकाळचा भाजी खरेदीचा कार्यक्रम आटोपून मी एकटी गेलेले..
ह्याच त्या भाज्या ज्यांच्या श्रमपरिहारार्थ वडा रस्सा खाल्ला.
वरचा फोटो बघून विचारावेसे
वरचा फोटो बघून विचारावेसे वाटतेय...
ताई कसा दिला वाटा
तोंपासु भाजी! पटकन उचलून
तोंपासु भाजी! पटकन उचलून तोंडात टाकाविशी वाटतेय.
मस्त रंग आलाय
मस्त रंग आलाय
भाजीचा फोटो मस्तच आलाय.
भाजीचा फोटो मस्तच आलाय.
गेल्या वर्षीच्या कडक लॉक डाउन मध्ये जवळ जवळ तीन आठवड्यानी मला घरपोच भाजी मिळाली होती. ती मी व्यवस्थित धुवून वैगेरे अशीच वाळत घातली होती. ( वांगी टोमॅटो सोशल distancing चे नियम पाळून बसलेत ) त्या भाजीचं मला फारच अप्रूप वाटलं होतं म्हणून फोटो काढून ठेवलाय.
हेमाताई, भरपूर भाजी आणली तर
हेमाताई, भरपूर भाजी आणली तर मीपण अशीच धुवून मांडून ठेवते कापडावर
भाजीला माझपण झब्बू.
भाजीला माझपण झब्बू.
आठवड्याची भाजी आणुन धुवून अशी वाळायला ठेवतो. हे लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून. त्याआधी भाजी सरळ फ्रीज मध्ये जायची आणि रोज लागेल तशी धुवायची.
उंधीयो
उंधीयो
@ऋन्मेष - घ्या की दादा, लै
@ऋन्मेष - घ्या की दादा, लै न्हाई घेणार तुमच्याकडून.
@ मानव &मृ- थ्यँक्युच बरंका
@ममो काकू - आईशप्पथ, मला ह्या भाज्यांचा फोटो काढला ना तेव्हाच तुमची आठवण आली.. असंच.. आणि पाहते तर तुमची कमेंट.. टेलीपथी..
बाकी तुमच्या आणि मानव ह्यांच्या भाज्या मस्तं दिसतायेत. अशा ताज्या भाज्या घरात असल्या की प्रसन्न वाटतं.
Pages