खाऊगल्ली - आजचा मेनू - (४)

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 May, 2021 - 09:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला सुंदरसा खाद्यपदार्थ आणि मोबाईल कॅमेरा

क्रमवार पाककृती: 

१. आपल्या आवडीचा कुठलाही खाद्यपदार्थ बनवा.
२. खाद्यपदार्थ सुबक पद्धतीने मांडा
३. फोटो काढा
४. अपलोड करा

मगच त्यावर तुटून पडा Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/77265

हि सुद्धा तशीच तुडुंब भरू द्या Happy

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांचे डबे (हे असे खणांचे बेन्टो बॉक्स मिळतात>>>>>>

हे असे भरलेले मिळतात का??

आता मसाला ओट्सची रेसिपी पण सांग..प्लेन ओट्स आणि फोडणी चे ओट्स खाऊन कंटाळा आला.
मसाला ओट्स मस्त दिसताहेत.

नाही , आपल्याला रोज सकाळी भरावे लागतात.
मसाला ओट्स
एक वाटी क्विक ओट्स
एक वाटी भाज्या
कांदा आलं हिरव्या मिरच्या, गरम मसाला, तिखट ,मीठ किंवा कुठलाही मसाला.
उपम्यासारखे सरबरीत शिजवून खायचे.

हो हो हो हो मी ऐकणार आहे सामो चं Happy मसाला ओटस् ची रेसिपी भारी आहे.
हे असे भरलेले मिळतात का??>>> Lol मृ थोडे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात

अस्मिता मसाला ओट्स जबरी दिसताहेत... Happy
बदामाची चर्चा लोल Happy विसरायला होतं हे खरंंय.. सुरवातीला गजर लावावा का ? :p

जर गजर झाला आणि त्यात "Time to soak
almonds", असे लिहिले नाहिये आणि तुम्हाला कशाला बरं गजर लावला होता हे आठवत नाहीये, तर म्हणता येईल की स्मरणशक्तीची समस्या आहे, त्यासाठी काही करावे (खावे) लागेल.
आपण इतरत्र एवढे गुंग होऊन जातो काम असो की विरंगुळा की ठराविक वेळी इतर काय काम करायचे होते याचे भान रहात नाही, त्याला स्मरणशक्तीची समस्या म्हणता येणार नाही, त्याचे उपाय करून या समस्येचे समाधान होणार नाही, कितीही बदाम, गाजर खा.

कशाला बरं गजर लावला होता हे आठवत नाहीये, तर म्हणता येईल की स्मरणशक्तीची समस्या आहे, >>> बापरे! कधीतरी मला मी काय घेण्यासाठी फ्रीज उघडला आहे तेच पटकन आठवत नाही.

हो Happy

@मानव - हो, गजर नावासहित लावायचा असेच अपेक्षित. Happy
आज सकाळचा नाश्ता वडा रस्सा. मी पहिल्यांदा ट्राय करतेय .:-)

वाह वडा रस्सा हाच तर असतो सकाळचा नाश्ता.. मस्त झणझणीत सुरुवात व्हायला हवी दिवसाची. माझ्या तर तोंडाला फारशी चवच नसते सकाळी त्यामुळे मिळमिळीत चवीचे खायला होत नाही.

बिर्याणीज् तोंपासु. व्हेज बिर्याणी करायला हवी. Happy
@ऋन्मेष - येस कधीतरी सकाळीच चमचमीत खायची लहर येते. काल तर सकाळचा भाजी खरेदीचा कार्यक्रम आटोपून मी एकटी गेलेले..
IMG_20211023_093625_copy_1192x1060.jpg
ह्याच त्या भाज्या ज्यांच्या श्रमपरिहारार्थ वडा रस्सा खाल्ला. Lol

भाजीचा फोटो मस्तच आलाय.

गेल्या वर्षीच्या कडक लॉक डाउन मध्ये जवळ जवळ तीन आठवड्यानी मला घरपोच भाजी मिळाली होती. ती मी व्यवस्थित धुवून वैगेरे अशीच वाळत घातली होती. ( वांगी टोमॅटो सोशल distancing चे नियम पाळून बसलेत Happy ) त्या भाजीचं मला फारच अप्रूप वाटलं होतं म्हणून फोटो काढून ठेवलाय.

IMG_20200408_135542882.jpg

भाजीला माझपण झब्बू.
आठवड्याची भाजी आणुन धुवून अशी वाळायला ठेवतो. हे लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून. त्याआधी भाजी सरळ फ्रीज मध्ये जायची आणि रोज लागेल तशी धुवायची.
Screenshot_20211024-140217_WhatsApp.jpg

@ऋन्मेष - घ्या की दादा, लै न्हाई घेणार तुमच्याकडून. Lol
@ मानव &मृ- थ्यँक्युच बरंका Wink
@ममो काकू - आईशप्पथ, मला ह्या भाज्यांचा फोटो काढला ना तेव्हाच तुमची आठवण आली.. असंच.. आणि पाहते तर तुमची कमेंट.. टेलीपथी.. Happy
बाकी तुमच्या आणि मानव ह्यांच्या भाज्या मस्तं दिसतायेत. अशा ताज्या भाज्या घरात असल्या की प्रसन्न वाटतं.

Pages