मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जय खरच चिडचिड् करत होता त्याला स्नेहाशी बोलताना पाहून >>> आणि मीरा त्याला सांगत होती,स्नेहा पण ढील देतेय त्याला. अधे मध्ये उत्कर्ष होताच,फोडणी टाकाय.तो दादुसला तर बोलुच देत नव्हता.
दादुसला गेम जास्त कळतो तृप्ती, कुडची पेक्षा,तो म्हणाला की स्नेहाच उतरणार आणि ह्या दोघी म्हणे , तिला जय नाही उतरू देणार.तेव्हा दादुस म्हणाले तिथं जाऊन फक्त ** टेकवून यायचं आहे Wink .विशाल गाडीत बसल्यावर , अवघडला होता फार.तीच अवस्था नंतर स्नेहाची झाली.उत्कर्ष स्वतःला शहाणा समजतो पण फक्त गॅंग सोबत असली की इतरवेळी त्याच काय चालत नाही.आविष्कार safe झाल्यावर जय ‘ अरे,हा सेफ झाला म्हणतं खिदळाय लागला.हा माज नडणार त्याला.
विशाल काल सोनालीला - “ वर बघ,शेंबूड आलाय की बघू " काय काय बोलतात ही. Voot extras व्हिडिओ छान असतात. Jay- स्नेहाची ओढूताणून केलेल्या लव स्टोरी ऐवजी ते दाखवाव. सोनालीचा पोह्याचा किस्सा बेस्टंच.

कालचा टास्क ए टीम सगळीच्या सगळी गाडीत पोचल्यामुळे गंडला.
बी टीम वाले निवांत कसे काय होते इतके ? एकालापण बॅग नाही घेता आली.
"एका फेरीत गाडीत बसलेला माणुस लगेच पुढच्या फेरीत उतरु शकत नाही" असा काहीतरी क्लॉज टाकला पाहिजे होता रुल मधे.मग मजा आली असती.
जय, मीरा आणि गादा सुरवातीला गेल्यामुळे अगदीच एकतर्फी झाला टास्क आणि बोअर झाला....
स्नेहा ला असं वाटतय का की आदिश तिच्यावर लाइन मारतोय ? ती त्याच्याशी उगीच पंगा का घेतेय...त्याची पुढे गरज लागु शकते तिला....स्पेशली काल जेव्हा जय ने तिची काहीही बाजु न घेता तिला गाडीतुन उतरु दिले तेव्हा तर तिला कळायला हवे की जय तिचा तारणहार नाहिये या घरात.... अगदीच विचार करत नाहिये ती खेळताना.....
काल विकास, मिनल पेक्षा पण आदिश झळकला ...पण फार बोलतो राव...

जयला आता विलनचे रोल मिळत जातील. >>> अगदी अगदी.

आदिश फारच असह्य बडबड करतो बुवा. स्नेहाला किती इरिटेट करत होता, किचनमधे. >>> त्याला पढवून पाठवलं असणार, किंवा गुम है किसिके प्यारमे मधे कमी डायलॉग्ज असायचे, गप्प उभं रहावं लागायचं बराच वेळ आणि गुडी गुडी रोल होता त्या सर्वाची कसर भरुन काढत असेल, हाहाहा पण मला तिथे आवडायचा तो.

चला कालचा एपिसोड एकंदरीत बघायला नको, इथे वाचून अंदाज आला, धन्यवाद सर्वांना.

<<"एका फेरीत गाडीत बसलेला माणुस लगेच पुढच्या फेरीत उतरु शकत नाही" असा काहीतरी क्लॉज टाकला पाहिजे होता रुल मधे.मग मजा आली असती.<< अगदी अगदी.. आणि प्रत्येकाने एकदा तरी गाडीतुन उतरलेच पाहिजे असा काहितरी असता तर टफ झाला असता टास्क! हा अगदीच एकतर्फी झाला टास्क!

<<स्नेहा ला असं वाटतय का की आदिश तिच्यावर लाइन मारतोय ? ती<<< पण हा आदिश तरी का इतके मागेपुढे करतोय तिच्या.. आधी तिलाच बोलुन परत परत सॉरी म्हणाय्ला जातोय. आता फोकस काय ते कर ना.. आधी पुरेपुर अभ्यास करुन आला असणारच तो. सोनाली काय ती पुन्हा जयच्या नादी लागतेय. फुटु नका म्हणावं आता कोणी.. dokyawar%20hat%20marun%20ghene.gif

जय एवढा काही हँडसम वाटत नाही, सगळे मागेपुढे का करतायेत. आता तर स्वभाव पण आवडत नाही. फार फार तर नेहा होईल त्याची, पब्लिक विशालमागे उभी आहे.

बाय द वे जय आदिश दोघे स्नेहाला फुटेज देत असतील तर bb ची स्नेहा लाडकी आहे का, कित्ती बोअर आहे ती. दोघांची ताई वाटते.

काल टीम बी ने माती खाल्ली. एकालाही पहिल्या हॉर्न ला जीप मधे बसता येउ नये?! त्यामुळे नंतर करण्यासारखं काही नव्हतंच.
स्नेहाला आता कळायला हवं तिचं स्थान काय आहे त्या ग्रुप आणि जय साठी. प्रोमो मधे उगीच दाखवत होते की जय स्नेहासाठी त्याग करणार का वगैरे. त्याने तो विचार कन्सिडर सुद्धा केलेला दिसला नाही Happy पण स्नेहाने काही धडा घेतला असे दिसत नाही. काल तिची चिड्चिड झाली उतरावं लागल्याने पण ती तो राग आदिशवरच काढत होती. ग्रुप ए नेही सेफ होण्यातच धन्यता मानली. कोणाला तरी वाचवून पब्लिक च्या आणि घरातल्यांच्या नजरेत स्वतः हिरो बनणे इ. स्ट्रॅटेजी कुणालाच सुचली नाही. तसेही त्या जय चा समज आहेच की नुसते बायका/मुलींशी फ्लर्ट केल्याने त्यांना मॅनिप्युलेट करता येते. अन स्नेहा, सुरेखा( सोनाली पण?) त्याच्या चार्म ला भुलून माती खातातच कायम. सुरेखा काल पुन्हा अ‍ॅज युज्वल पॅसिव अ‍ॅग्रेसिव कांगावा करत होती. तिला नक्की काय वाटत होते समजले नाही.

काल जीपमध्ये पहील्यांदा कोण बसणार हे बिगबॉसने बऱ्यापैकी मॅन्युपलेट केल..... कारण हॉर्न कधी वाजवायचे ते त्यांच्याच हातात होते!
हॉर्न वाजला तेंव्हा तृप्ती, स्नेहा, गायत्री आणि मीरा टेबलच्या इतक्या जवळ होत्या की त्यांना बॅग मिळाल्या नसत्या तरच आश्चर्य होते.... उरलेली एक जयने लांबून येऊनही पटकावली!

बहुमताने निर्णय म्हंटल्यावर कोअर A ग्रूप तिथून हलणार नव्हताच!
त्यातल्या त्यात उत्कर्षला पाठवून स्नेहाला A टीममधली तिची जागा दाखवायचा मस्त प्रयत्न केला पण तिला बहुदा ते अपेक्षितच असावे!
पण त्यानंतर विशाल आणि विकासला पाठवायला नको होते.... एकदाची त्या सुरेखाताईंची गोव्याची हौस भागवून घ्यायची होती.... त्यांनापण त्यांची जागा कळली असती आणि मग सावकाश कोअर B टीममधले एकेक गेले असते तरी चालले असते!
काल एकूण सगळ्यांशीच उत्कर्ष तुसडेपणाने बोलत होता..... पुन्हा ये पुन्हा ये वगैरे काय!
आविष्कार अगदीच बिन कण्याचा माणूस वाटतो...... त्याला इतके घालून पाडून बोलल्यावर पण तो त्या A टीमबरोबर हसतखेळत फोटो काढून घेत होता.

आदिश जयला समोरुन भिडत असल्यामुळे एकदम सगळा लाईमलाईट त्याने स्वतावर घेतला आहे..... सामनेवालेका गुरुर तोडो वो अपनेआप टूट जायेगा हे त्याला माहित आहे..... स्नेहाला जयच्या नाकखालून उडवून त्याला नाजूक जागी मारायचा प्लॅन दिसतोय आदिशचा म्हणूनच तो स्नेहाच्या एवढ्या मागे पुढे करत होता पण ती मात्र इतके होऊनही "जयजयकारा" मोडमध्येच होती!

गायत्रीने केलेली आदिशची नक्कल अगदीच सवंग होती..... ते सगळेच आतून आतून खुप इनसेक्युअर वाटतात!

A टीम आणि त्याच्या आसपासची मंडळी बाहेर वाईट दिसतायत ह्याच्या इतक्या हिंट मिळूनही स्नेहा आणि सोनाली जयच्या मागेपुढे करत असतील तर त्यांना गेम कळलेलाच नाही असे म्हणायला हरकत नाही!

स्नेहाला आता कळायला हवं तिचं स्थान काय आहे त्या ग्रुप आणि जय साठी.>> खाली उतरल्यावर पण सुरेखा तिला म्हणाली की काय झाल काल एवढी जागलीस..कळाल का..एवढं होऊन सुध्हा ही सारन्गी परत जय सोबत नीट बोलताना दिसली आजच्या प्रोमो मध्ये... एकाने पण नाही विचारल की तू का नाही उतरलास आमच्या साठी.. कुडची चा तर तो सोन्या च आहे

सुरेखा आणि चॅनेल करार असावा मिनिमम ५० दिवस इम्युनिटी. नाही तर आली नसती ती. त्रुप्ती तिच्या पुढे असणारे व्होटिंग मध्ये. मी तर माझे सगळे व्होटस त्रुप्ती, दादूस, विकास मिनलला दिली. विशालला सांगलीच्या पब्लिक वर सोडून दिले Happy

एकाने पण नाही विचारल की तू का नाही उतरलास आमच्या साठी.. कुडची चा तर तो सोन्या च आहे: तो श्रीमंत आहे. पुढे मागे त्याची गरज लागु शकते खऱ्या आयुष्यात. हा खेळ ३ महिन्यात संपतो. लोक गेम पलीकडे विचार करून खेळत आहेत

जय ला जास्तीत जास्त टशन देण्याच्या कामगिरीवर आदेश आलेला आहे. ते काम तो व्यवस्थित करतोय असं वाटतय. ते झालं की जय आणि आदेश दोघेही बाहेर जातील कदाचित आणि विकास, विशाल, मीनल चा मार्ग सुकर होइल.
सिनिअर सिटिझन्स मध्ये दादूस बेस्ट, त्यानंतर देसाई आणि मग इकुडची तिकुडची.
आविश्कार कधीतरी कंटेंट देईल या आशेवर असलेले बिबॉ, स्वतःच घर सोडून जातील पण आविश्कार कडून काहीच होणार नाही.

ए टीम इनसिक्युअर आहे म्हणूनच बसून राहिले संपूर्ण वेळ! Biggrin बिबॉलाही माहीत आहे बाहेर टीम बीला सपोर्ट आहे ते, ते नॉमिनेशन मध्ये आले तरी कसेही करून वाचतीलच!
चौकडी मधले मात्र त्यांना कोणी जायला नकोय... काँट्रॅव्हरशीयल लोक हवेच असतात बिबॉना

परवा जय बाहेरच्या दाराला टेकून उभा होता तेव्हा असं वाटत होता आत्ताच्या आत्ता दार उघडावं आणि हा बाहेर निघून जावा... Lol

मलाही वाटतं की कलाकार लोकांना जयच्या श्रीमंतीचा दबाव येत असेल का? एकदा कुडची मजेतच म्हणाली पण जयला तुझ्या जिम मधे पार्टनरशिप देओस का मला म्हणून..

स्नेहा मठ्ठ आहे तिला गेम बिलकुल कळत नाही, आदिश फुल तयारिने आलाय
काल टिम बी अगदी बावळट सारखी वागली ,निदान स्वतःला बॅग मिळवता नाही आली तर उत्कर्शला तरी पोहोचु द्यायच नाही ना.
जय सारखे स्पर्धक शोचे लाडके असतात ते फिनाले पर्यत पोहचतिल याची शो वाले काळजी घेतात पण जिन्कु देत नाहित, जय सेम कॅटेगरी आहे.

श्रीमंतीचा कसला दबाव ? मला नाही वाटत !
बिबॉ चालु झाले तेंव्हा स्प्लिट्सविला अजुन चालु होते, त्याची पॉप्युलॅरीटी होती ऑडियन्स मधे , त्यात तो तिथे विनर झाल्यामुळे आणि या सर्वांपेक्षा कैक पटींनी जास्त फॅन फॉलॉइंग असल्यामुळे प्रत्येक जण त्याच्या अवती भवती असायचे/असतात आणि म्हणूनच त्यालाही सुपिरियॉरीटी कांप्लेक्स/ माज आहे आय थिंक !

स्नेहा मठ्ठ आहे तिला गेम बिलकुल कळत नाही.. तसं नसावं. तिला खेळ खेळता येत नाही हे लक्षात आले. मग गायत्री प्रमाणे जयच्या बलशाली बाहुंना लोंबकळत जितके शक्य आहे तितके पुढे जाइल ती. तिचा तो प्लान असणार.
जुई गडकरी, रुपाली भोसले असे बरेच खेळाडू होते जे दुसऱ्यांचे कव्हर घेऊन बरेच आठवडे टिकून राहिले.

मग गायत्री प्रमाणे जयच्या बलशाली बाहुंना लोंबकळत जितके शक्य आहे तितके पुढे जाइल ती. तिचा तो प्लान असणार.<<< हो ना म्हणूनच माज करतेय, मिरा पण काय समजते स्वत:ला. स्नेहा तरी काय परी असल्यासारखी गाऊन घालून जयच्या मागे मागे
मीनल विकास ग्रूप बरे वाटतात.

गायत्रीने केलेली आदिशची नक्कल अगदीच सवंग होती >>> हो ना, मी तो सीन बघितला.

मला जय राजा त्या टीमचा आणि बाकी सगळे भाट वाटतायेत त्याचे. आदिशला नावं ठेवली की तो खुश होतो. त्याची स्तूती केली की तो खुश होतो.

माज आहे आय थिंक ! >>> अगदी अगदी आणि तो उतरणार नाही.

आज आदिशने शेवटी मस्त उचकवल तृप्तीताईन्ना. उत्कर्षच खर रुप बाहेर आल.

दादूस पुन्हा कनफ्युजड मोडमध्ये, स्नेहा रडली म्हणून स्टार तिला दिला म्हणे.

आदिशला गायत्रीच गुदगुल्या प्रकरण माहीत होत. मीरा आणि गायत्री आदिशला झीममध्ये असल्यापासून ओळखतात. त्याच्या एन्ट्रीला दोघीन्नी चीअरअप केल.

उद्या आदिश- सुरेखाताईन्चा राडा आहे.

स्प्लिटसविलाबद्दल मी कधी काही ऐकला नव्ह्ता , पण ह्या ए टीममधे सगळ्यांच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात असलेला कुचकेपणा त्यांना आपोआप एकत्र ठेवत असावा.
दादुस कनफुझड नसतात .त्यांना जे वाटते ते करतात. ही हॅज नथिंग टू लूझ. शोमधुन बाहेर पडावे लागले तरी निवांत बाहेर पडतील.
फक्त उत्कर्ष जेव्हा त्यांना ते कुणीतरी माठ व्यक्ती आहेत अशा पध्दतीने ट्रीट करत होता तेव्हा फार राग आला बघताना.
तो स्वत। इतका डंब दिसतो . त्यांना डॉमिनेट करतो वर.

omg जय दुधाणेला बाहेर काढला. कॅप्टनशिप टास्कमध्ये विकाससोबत धक्काबुक्की केली. >> हे कुठे पाहिलं ?

उत्कर्षनी सरप्रायझिंग्ली बरं घेतलं लेक्चर, दादुसलाही मॅनिप्युलेट केलं, पण माणुस म्हणून तो इतका अनॉयिंग वाटतो, काही चांगल केल तरी व्हरच्युअल चप्पल द्यावीशी वाटते Proud
आजही टिम बी कमी पडली, ए वाल्यांनी स्नेहाला चढवलं उगीच , इथे मीरा गायत्री का अडून बसल्या नाहीत स्वतः साठी ?
जयचं ऐकतात सगळे टिम ए मेंबर्स !
आदिश आजही चांगला वाटला, भरपूर फुटेज घेतलं , उद्याही घेणार असं दिसतय !

Pages