Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
>>अक्षय जावासा ही वाटत होता
>>अक्षय जावासा ही वाटत होता अन गेला तेव्हा वाईटही वाटले.
अगदी अगदी! कुणाच्या अध्ध्यात मध्ध्यात न पडता हा गेम खेळता येत नाही हेच खरे!
महेश मांजरेकरांना पण त्याच्याबद्दल एक सॉफ्टकॉर्नर होता हे पहिल्या दिवसापासून जाणवत होते!
शनिवारच्या एपिसोड मध्ये सगळे
शनिवारच्या एपिसोड मध्ये सगळे missing Card मध्ये दादुस चे नाव घेत होते तेव्हा दादुस - “ हाे,हो"
मिसिंग कार्ड मध्ये उभे राहिल्यावर ....
ममां - उद्यापासून तुम्ही.....
दादुस - नाही दिसणार
कालच्या एपिसोड मध्ये अक्षयला दाराजवळ निरोप देताना
सोनाली - तुला खूप मिस करेन.........दोन दिवस
आरती विशालकडे पब्लिक कल आहे,
आरती विशालकडे पब्लिक कल आहे, साधारण सत्तर टक्के मतं त्याला एकट्याला असतात.
अक्षयला घरच्यांनीच काढा म्हणून सांगितलं की काय, कारण दादुस, कुडची यांना ठेऊन त्याला कसं काय काढलं. तो लास्ट असेल असं वाटत नाही.
मी आत्ता कालचा भाग बघितला
मी आत्ता कालचा भाग बघितला पळवत पळवत, मला अक्षय गेला बाहेर, ते बघून वाईट वाटलं. कुडचीच जायला हवी होती.
काल तो भ्रमाचा भोपळा टास्क
काल तो भ्रमाचा भोपळा टास्क बळेच वाटला.... एकालाही धड मुद्देसूद कारणे देता येत नव्हती..... अविष्कार तर काय बोलला त्याचे त्याला माहित!
विशालला शोची आणि प्रेक्षकांची नस कळली आहे.... त्याने मीनल चिडल्यावर तिला राजाचे पद देवून मनाचा मोठपणा दाखवला आणि प्रेक्षकांना परत एकदा खिशात घातले!
विशाल आणि सोनालीचा डान्स अगदीच कॉमेडी.... सोनालीने त्याला थोबाड इकडे कर म्हंटल्यावर मांजरेकरांना पण हसू आवरले नाही!
जे काही प्रोमो बघितलेत त्यावरुन आदिश एकदम खडूस वाटतोय.... विशाल विकास च्या ग्रूपमध्ये जरी आत्ता तो गेला असला तरी विशालचे आणि त्याचे पटेल असे काही वाटत नाही..... जयला मात्र अरे ला कारे करणार गडी असे दिसतेय...... मुख्य म्हणजे स्वच्छ आणि स्पष्ट मराठी बोलताना दिसतोय आणि क्लिअरली मुद्दे मांडतोय..... विनिंग मटेरियल वाटत नाही पण थोडे दिवस तरी बऱ्यापैकी फुटेज खाईल हा! ..... मज्जा येणारेय असे वाटतेय!
कालचा चावडी एपिसोड त्या
कालचा चावडी एपिसोड त्या मानाने डल होता. विशाल खरंच जेन्युइन तसा "नाइस गाय"आहे किंवा अगदीच हुषार तरी आहे. प्रत्येक मूव्ह पब्लिक ला आवडण्यासारखीच करतो तो.
आदिश ला टेम्टेशन रूम मधे पावर कार्ड मिळालेय. आता तो टेंपररी कॅप्टन त्याने आल्या आल्या जय शी पंगा घेतलेला दिसतोच आहे प्रोमो मधे. ते छान पण जरा जास्तच एन्थु दिसतोय. टेक इट ईझी असे म्हणावे वाटले त्याला. कदाचित बिबॉ ने सांगून पाठवलेले असू शकते. बाकी त्याचा खरा खेळ काही दिवसांनी कळेल बहुतेक. कितीही ठरवून गेले तरी आत गेल्यावर कोणाशी पटेल न पटेल, कोण त्याला सामावून घेतेय त्यावर बरेच अवलंबून असेल. असा ओवर अॅग्रेसिव वागत असेल तर दोन्ही ग्रुप्स २ हात लांब राहू शकतात किंवा संधी मिळताच त्याला बाजूलाच टाकू शकतात.
त्याची आधीच कोणासोबत काही
त्याची आधीच कोणासोबत काही इक्वेशन्सही असतील.
गेल्या वेळचा वाइल्ड कार्ड शिवानी नेहाचा मित्र होता.
दादुस, कुडची यांना ठेऊन
दादुस, कुडची यांना ठेऊन त्याला कसं काय काढलं. तो लास्ट असेल असं वाटत नाही.
>>> डॅडी चा फोन आला असेल बिग बॉस ला..
जय हललाय.
जय हललाय.
आदिश तयारी करून आलाय. Power enjoy करतोय
आदिश -जय राडा प्रोमो पाहिला,
आदिश -जय राडा प्रोमो पाहिला, मज्जा
विशालने लग्गेच मीनलला नं दान केला, सगळ्यांना खुष नाही ठेवले तरी चालेल पण तो बरोबर गेम खेळतोय प्रेक्षकांची रिअॅक्शन डोळ्यासमोर ठेऊन !
मीनल प्रत्येक वेळी कामासाठी
मीनल प्रत्येक वेळी कामासाठी नकारघंटा वाजवते.
गायत्रीनं आजही तिचा खडूसपणा
गायत्रीनं आजही तिचा खडूसपणा दाखवलाच. जयला सांगत होती...बस तू...त्याला करूदे काय करायचं ते
मला आजच्या भागातला जय आणि
मला आजच्या भागातला जय आणि आदिशचा तो राडा पहिल्यांदाच या सिझनमध्ये स्क्रिप्टेड वाटला.
जय आणि स्नेहा फ्लर्टिंग का झेलायच आम्ही?
बिबॉसने जय तुपारेची पेअर लावली होती ना,मग मध्येच ही बया कुठे आली.
जय स्वतःवर कॅमेरा ठेवायला
जय स्वतःवर कॅमेरा ठेवायला काहीपण करू शकतो. आधी स्वतःच म्हणाला होता की टास्कबुक मध्ये लिहिलंय उभं राहायचं , म्हणजे bum नाही टेकवलं की झालं.
नंतर असं कुठे लिहिलंय म्हणत भांडला
स्नेहाचं काय आल्या आल्या
स्नेहाचं काय आल्या आल्या तिघांना त्रास दिला, मी असते तर वेगळी वागले असते. काय केलं असतं तिने. मीनल आणि सोनालीचे रुसवे फुगवे चालूच असतात एखाद्या कपल सारखे. गायत्री डबल ढोलकी. आदिश आणि जयची हुज्जत उगाच. दोघेही अटेन्शन सिकिंग. जय तर डोक्यात जातो.
जय आणि टीम खरच खूप कुचके आहेत
जय आणि टीम खरच खूप कुचके आहेत. आदीश चं येणं बाकी लोकांनी चांगल्या पद्धतीने accept केलं पण टीम ए वाले वैतागले होते.
मीनल उगीच कुरकुर का करते ? उलट असे टास्क म्हणजे जास्त फुटेज ची संधी आहे. तीच्यासारख्या हुशार मुलीला हे कळायला हवं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणाली ती की मजा आली म्हणून. दादूस हॅट्स ऑफ. ना तक्रार करता छान केला त्यांनी टास्क. रात्री 12.30 ते सकाळी 6 दादूस ने टास्क केला. मान गये उनको. खरंतर या टास्क मध्ये मजा मजा करता आली असती. अंताक्षरी किंवा यमक जुळवणे खेळ पण भांडण केलं की च प्रेक्षकांना आवडतं असा गैरसमज झालाय या लोकांचा.
गायत्री नारदमुनी आहे. आगळावी..
मीनल, सोनाली एकमेकींच्या चांगल्यासाठी भांडत होत्या.मीनल ला कंपनी म्हणून सोनाली ला जागायचं होत आणि तिला जागरण करून त्रास नको म्हणून मीनल ओरडत होती की आत जाऊन झोप. मला आवडलं ते.
जय अशा पध्दतीने वागून कधीच जिंकणार नाही हे त्याला कोणीतरी सांगायला पाहिजे. डोक्यात जातो त्याचा राग आणि attitude
जय स्नेहा flirt पण वैताग आहे. जय रोमँटिक होतो तेव्हा स्नेहा चं हसणं भयंकर.
या टास्क मध्ये मजा मजा करता
या टास्क मध्ये मजा मजा करता आली असती. अंताक्षरी किंवा यमक जुळवणे खेळ
>>> केलेही असेल... बिग बॉस ने कापले असेल...
दादूस हॅट्स ऑफ..... बिग बॉसने
दादूस हॅट्स ऑफ..... बिग बॉसने सांगितलेय ना मग करायचे!
एकदम भक्तिभावाने केला त्याने तो टास्क!
बाकी बिग बॉसमधली वन टू वन भांडणे बघितली की मला हंगामाची आठवण येते..... ये सिर्फ बातोंके शेर है एक दुसरेको हाथ भी नही लगायेंगे
सोनाली ते काय विकासशी बोलत बसलेली? A टीमचे फारच मनावर (रादर सगळ्यांचेच) घेते ती..... तिने आपल्या टेचात खेळावे!
जय एवढा फिटनेसाठी शायनिंग
जय एवढा फिटनेसाठी शायनिंग मारत असतो. पण उभे राहून लगेच कंटाळून गेला. दादूस मात्र लेडीजना नाही बोलावणार म्हणाले. एकदम आदर वाटला त्यांच्या बद्दल.
जय दिवसेंदिवस गडद खलनायक होत चालला आहे त्या बायकांच्या नादात.
दादूस हॅट्स ऑफ..... बिग बॉसने
दादूस हॅट्स ऑफ..... बिग बॉसने सांगितलेय ना मग करायचे!
एकदम भक्तिभावाने केला त्याने तो टास्क!>> +111111 बिग बॉस साहेबानी सांगितल आहे ना..मग करायच असं म्हणाले.. एवढा वेळ उभ राहण आणि ते पण रात्री...खरच कठिण आहे..
>>जय दिवसेंदिवस गडद खलनायक
>>जय दिवसेंदिवस गडद खलनायक होत चालला आहे त्या बायकांच्या नादात.
हो ना! आधी तो नीट करत होता पण मीरा आणि गायत्रीने उचकावले त्याला!
त्यांची टीम कायम गिरे तो भी टांग उपर मोड मध्ये असते म्हणून अजुन शिव्या खातात ते!
सोनाली ते काय विकासशी बोलत
सोनाली ते काय विकासशी बोलत बसलेली? >> विकास ची विचार करण्याची पद्धत आवडली.. तिला म्हणाला की तुला स्वताला कस पोट्रे झालेल आवडेल.. एक माणूस म्हणून कशी आहेस ते दाखवायच आहे...की कस...परत आपल्याला बाहेर जाऊन काम करायच आहे... जय च ठिक आहे...त्याचा बिजनेस आहे..(म्हणजे त्याचा काय फार सम्भंध येणार नाही बाकिच्या लोकांसोबत..आपला येणार आहे..सो कस वागायचं हे तू ठरव)
दादूस ने आदीशचे आभार मानले
दादूस ने आदीशचे आभार मानले पाहिजे. त्याच्या मुळे ते एका रात्रीत हिरो झाले.
विकास खरेच खूप बॅलन्सड आहे.
स्नेहा सुरेखा वयाच्या मानाने खूप उथळ वाटतात . आविष्कार दुसऱ्यांना समजावून सांगताना छान वाटतो.
कामं वाटताना आदीश कॅप्टन कमी,
कामं वाटताना आदीश कॅप्टन कमी, बॉस जास्त वाटला.
पण त्याला त्याचं म्हणणं नीट मांडता येतंय.
स्नेहाच्या तिघांना जखमी केलंस या मुद्द्यावर त्याने दिलेलं उत्तर पर्फेक्ट होतं.
टीम ए , विशेषत: ज्याने ठरवून पंगा घेतलाय. त्यामुळे शनिवारसाठी मांजरेकरांना भरपूर खाद्य मिळालंय.
टीम ए ला त्याला आपल्याकडे वळायची संधी होती खरं तर.
सी टीमचं काय झालं? स्नेहा आणि सुरेखा टीम एच्या कच्छपि लागल्या.
दादूस आणि तृप्ती स्वतः:घ्या बाण्याने लागताहेत.
दादूस जमेल तिथे टास्क ही चांगलं करतोय. दोघे पुढे जाऊ शकतील.
सोमवारी नॉमिनेशन्स असतात ना? आज दाखवतील.
कोअर टीम ए मधलं कोणीतरी बाहेर जायला हवं म्हणजे त्यांना धक्का बसेल. अक्षय , सुरेखा यांच्या जाण्याने काही होणार नाही
त्रुप्ती डे वन पासून स्वतंत्र
त्रुप्ती डे वन पासून स्वतंत्र खेळत होती पण फिल्मी बॅकग्राउंड नसल्याने बुजलेली होती. ह्या लोकांचा फुसकेपणा तिच्या लक्षात आला आणि ती फ्रंट फूट वर येऊन खेळायला लागली.
जय मुद्दाम आदिशला इन्स्टिगेट
जय मुद्दाम आदिशला इन्स्टिगेट करायला आणि फुटेजसाठी टीपी करत होता आणि त्यात तो सक्सेसफुल झाला
दादुसने टास्क खूप मस्त केले पण बिबॉ ला नुसतं उभा राहिलेला माणुस चालत नाही , दादुस पेक्षा कॅमेरा जय काय करतोय बघत राहिला कारण तो काहीतरी हॅपनिंग करत होता !
आज बिचार्या विशालला फुटेज नाही मिळालं, त्याला हा टास्क हवा होता , त्यानी हातही वर केला होता
मिनलने आज फुटेजचा मिळालेला चान्स सोडला, दादुसला जास्त झोपायला देऊन तिनी पहारा दिला असता तर टास्क जास्त इंटरेस्टिंग झाला असता !
सोमवारी नॉमिनेशन्स असतात ना?
सोमवारी नॉमिनेशन्स असतात ना? आज दाखवतील.>> प्रोमो आला.. आजही स्नेहा पायघोळ झगा घालून टास्क करतेय..सांगा या बाई ला.. शेक्सपियर च नाटक नाही करायच आहे..पळायच आहे..bdw ती हसते किती भयानक... काल बाथरूम मध्ये जय सोबत असताना..आवाज किती घुमला असेल... त्या मुळेच जय ला झोप नाही लागली बहुतेक..
विकास खरेच खूप बॅलन्सड आहे.
विकास खरेच खूप बॅलन्सड आहे.
स्नेहा सुरेखा वयाच्या मानाने खूप उथळ वाटतात . आविष्कार दुसऱ्यांना समजावून सांगताना छान वाटतो.>> हो..विकास आणि आविष्कार mature वाटतात.. वीकेन्ड च्या दिवशी पत्त्याच्या खेळात त्याला दिलेल्या नम्बर वर काही बोलला नाही..कारण तो जस्ट एक खेळ होता...त्याने काही फरक पडणार नव्हता... तेच मीनल,मीरा उसळून आल्या....परवा आविष्कार छान समजावत होता विशाल ला..की बाकिच्याना खुष ठेवण ही तुझी जबाबदारी नाही...स्वताला खुष ठेवण ही आहे... अविष्कार मनमौजी जगतोय तिथे.. गेल्या आठवड्या मध्ये nominate नाही झाला..त्याला स्वताला जास्त अपेक्षा नसावी..सो आला दिवस तो एन्जॉय करतोय..जगून घेतोय बिग बॉस चे दिवस..
जुनं झालयं पण राहवलं नाही
जुनं झालयं पण राहवलं नाही म्हणून टाकलच शेवटी इथे.
काल आदिश आल्यावरचे काही रीअ
काल आदिश आल्यावरचे काही रीअॅक्शन
सोनाली - तुम्ही सगळे शेळपटलेली पोरं आहात..बरं झालं नवीन पाठवला :-):-):-)
विशाल - मी त्याच्याकडे चांगला माणुस म्हणुन बघणार आणि तसाच वागणार तरच मला कळेल की तो नक्की कसा आहे
मीनल - confused
जय - पाय तोडीन, आडवा करीन ई ई...
Pages