साहित्य
1) उडदाची डाळ : 1 वाटी
2) बाजरी पीठ : 2 वाट्या
3) इडली रवा: 1 वाटी
4) 1 जुडी कच्च्या पालकाच्या प्युरी
5) मीठ चवीनुसार
6) मेथ्या 1 छोटा चमचा
कृती :
उडदाची डाळ व मेथ्या सहातास भिजवून वाटून घ्यावी. त्यात बाजरीचे पीठ,रवा व आवश्यक तेवढे पाणी घालून (भज्यांच्या पीठाप्रमाणे) 8/10 तास आंबवायला ठेवावे . इडली करतेवेळी पालक प्युरी व मीठ घालून छान मिसळून घ्या. इडलीपात्राला तेल लावून मिश्रण घाला. 15 मि. वाफवून घ्या. ह्या प्रमाणात 36 इडल्या झाल्या. आवडीच्या चटणी बरोबर खा.
सोसायटीच्या गणपती प्रसादासाठी पालक न घालता इडल्या केल्या. ढोकळ्यासाठी फोडणी करतो तशी तीळ,मोहरी, जिरं 1 पळी तेल घालून फोडणी करायची. आच बंद करून 48 कापांसाठी 2 वाट्या पाणी व साखर (आवडीप्रमाणे). उकळी आली की व साखर विरघळली की आच बंद करून त्यात इडल्या ( चार भागात इडली फ्रायला करतो तश्या कापून) हिरवी मिरची पुदिन्याची चटणी टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचे. ट्रे/ताटलीत टूथपिक (करोना) लावून खायला दिल्या. फारच हीट झाला हा प्रकार.
ह्याच पीठाचे ढोकळे एक/दुरंगी करून मध्ये चटणी लावून सैन्डविच ढोकळाही करता येईल.
गणपतीच्या गडबडीत फोटो काढायला मी विसरले पण तुम्ही मात्र विसरू नका.
पाककृती स्पर्धा 2 पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ - पालक इडली - मंजूताई
Submitted by मंजूताई on 26 September, 2021 - 03:43
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मस्तच रेसिपी मंजू ...फारच
मस्तच रेसिपी मंजू ...फारच कल्पक... पौष्टिक आणि टेस्टी दोन्ही ...नक्की करून बघणार.
मस्त आहे पालक इडली. चटणी पण
मस्त आहे पालक इडली. चटणी पण टेम्पटींग .
मस्त..
मस्त..
भारीच Healthy आहे पाकृ
भारीच
Healthy आहे पाकृ
छानच इडल्या
छानच इडल्या
मस्त.
मस्त.
पाकृ आवडली
पाकृ आवडली
सगळ्या प्रतिसादकर्त्यांना मन
सगळ्या प्रतिसादकर्त्यांना मन:पूर्वक धन्यवाद! पौष्टिक व चविष्ट पाककृती आहे. नक्की करुन पहा. खूप फोटो काढले नाहीत त्यामुळे टाकू की नको विचार करत होते... हेच प्रमाण घेऊन बाजरीच्या ऐवजी नाचणीचं पीठ घेऊन ही करते. नाचणी,तांदूळ व बाजरी असे तीन रंगात सैन्डविच ढोकळा करायचा होता खरंतर .... जाऊ दे! आयड्या देऊन ठेवते.... करा आणि फोटो नक्की काढा व टाका.
मस्त वाटतेय पाककृती.
मस्त वाटतेय पाककृती.
करून बघणार.
मस्त दिसताहेत इडल्या , अशाच
मस्त दिसताहेत इडल्या , अशाच गाजराच्या केशरी पण बघितलेल्या आहेत. बाजरी पीठ आहे घरी करून बघते. सोप्या वाटताहेत.
मस्त. नक्की करणार या इडल्या.
मस्त. नक्की करणार या इडल्या...
छान रेसिपी आहे मंजुताई..tooth
छान रेसिपी आहे मंजुताई..tooth pick version जास्त आवडलं .
कसली सॉलिड आहे ही रेसिपी,
कसली सॉलिड आहे ही रेसिपी, फार छान. फोटोही सुंदर.
मस्त वाटतीये.
मस्त वाटतीये.
मस्त वाटतोय हा प्रकार.. ट्राय
मस्त वाटतोय हा प्रकार.. ट्राय करता येईल
मस्त! शेवटचा फोटो तोंपासू!
मस्त! शेवटचा फोटो तोंपासू!
एकच नम्बर रेसिपी मन्जुताई!
एकच नम्बर रेसिपी मन्जुताई!
छान दिसताएत इडल्या. बाजरी
छान दिसताएत इडल्या. बाजरी पिठाच्या पहिल्यांदाच बघतेय. काल श्रवू ने पण एक वेगळी रेसिपी सांगितली, आणि खायला पण दिली.
मस्त मंजू ताई, फोटो पण छान आलाय
छान रेसिपी...!
छान रेसिपी...!
सुरेख रेसिपी. फोटोही मस्त
सुरेख रेसिपी. फोटोही मस्त आहेत.
******* अभिनंदन मंजूताई
******* अभिनंदन मंजूताई *******
मन:पूर्वक धन्यवाद!
मन:पूर्वक धन्यवाद!
अभिनंदन मंजूताई!
अभिनंदन मंजूताई!
अभिनंदन !
अभिनंदन !
मंजूताई अभिनंदन.
मंजूताई अभिनंदन.
अभिनंदन मंजूताई!
अभिनंदन मंजूताई!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन मंजूताई
अभिनंदन मंजूताई
मंजू अभिनंदन
मंजू अभिनंदन
Pages