लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा धागा मी सगळ्यां लग्नाळू साठी काढलाय त्यामुळे बाकी सगळेजण पण आपले प्रश्न किंवा इतर काही विचारू शकता..
>>>>>>>>>>>>>>

छे छे.. आधी लग्न अमृताचे त्यानंतर मग..... बाकी तसेही कोण आहे म्हणा. ९८ टक्के माबोकर जनता विवाहीत असेल Happy

by ऋन्मेऽऽष माझ्या लग्नाची इतकी चर्चा बघून आधीच मला खूप गहिवरून आलंय Proud म्हणून मी म्हंटले की माझ्या जोडीला कुणीतरी करा की राव लग्न..पण हाय रे माझे भाग्य Sad
आज भारी सेलिब्रिटी वाली फिलिंग आलीय मला.. लग्नापर्यंत घरचे पण खूप लाड करतात ( बळी जाणारा बकरा असतो आपण म्हणून कदाचित Lol )

ऋन्मेऽऽष तुमचा डान्स मी पहिला आहे खरा खुरा शाहरुख आम्हाला परवडणार नाही तुम्हीच या की डान्स करायला.. तेवढेच आम्हाला तुमचे दर्शन होतील.. नक्की या लग्नाची तारीख पक्की झाली की इथे आमंत्रण देते..
>>> ऋन्मेष चा डान्स लाईव्ह बघायला लाखोंची गर्दी व्हायची भीती आहे... ट्रक टेम्पो भरून भरून लोक येतील... परत विचार करा...

अमृताक्षर : हार्दिक अभिनंदन. हे गुलाबी दिवस छान एन्जॉय करा. तुम्ही लग्नाची तयारी छान करालच.
इतर सर्वांनी लिहिल्याप्रमाणे भावी वराशी जरुर गप्पा मारा. गप्पा मारताना एकमेकांचे आर्थिक विचार, पार्टनरबद्दलच्या, करीअरसंबंधी अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मुलं कधी/किती हवी/नको याविषयी चर्चा होऊ शकली तर उत्तम.

लग्नापूर्वी गायनॅकला जरुर भेटा व कुटुंबनियोजनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती घ्या. याविषयी बहिण, मैत्रिण यांच्यावर अवलंबून राहणे टाळा.

बॅग भरायला घे. ::डोमा:: (अगं तूगंच करतेय, लहान असावीस म्हणून). रोजच्या गरजेस लागणारी छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी गोष्ट सासरी हाताशी मिळणार नाही असा समज करून लिस्ट काढ. वेळ आहे खूप त्यामुळे रोज आठवेल तशी लिस्ट अपडेट करत जा आणि साधारण लग्नाआधी आठवडाभर बॅग भरून रेडी ठेव.
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
-
-
-
असं सगळं
प्लस लग्नासाठी वेगळी बॅग भर. त्यात लग्नात लागतील ते कपडे सेट करून ठेव. म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा. बॅगा नाचवण्याइतकं कंटाळवाणं काहीच नाही.
आता गर्दी करायची नसल्याने डेस्टिनेशन वेडिंग्ज खूप फेमस आहेत. एखादं छान रिसॉर्ट पण बघू शकता.
फोटोग्राफर निवड.

अभिनंदन अमृताक्षर. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

लेखावरच्या चित्रात चिमणीने डोळे वटारलेले आणि चिमणरावांचे केस उभे राहिलेले आतापासूनच दिसताय्त. :). तेवढ जरा सांभाळा. Happy

अमृताक्षर अ‍ॅडमिन ना सांगून अनावश्यक प्रतिसाद काढून टाका.

ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट सिरीअसली चालू करणे. तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज सुरु करणे. म्हणजे लग्नात विदाउट मेक अप पण ब्राइड सुरेखच दिसते. हे फार महाग खर्चिक पॅकेज घ्यायची गरज नाही. स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन करून मॅनेज करा. अवांतर काहीत अरी नव्या ट्रीटमेंट ट्राय करू नका.

साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज सामान सर्व नीट प्लॅन करा. घरून न्यायच्य बॅग प्लॅन करा. हनिमू न ला न्यायचे कपडे नीट प्लॅन करा. हे सुंदर पण मजबूत बांधणीचे घ्या नक्की. माझे फार लवकर लग्न झाले असा सल्ला द्यायला कोणीच नव्हते. तेव्हा कपडे पण कमीच असत. आई बाप वयस्क त्यामुळे त्यांनाही फार माहीत नव्हते व चुलत बहिणी फार हेल्पफूल नव्हत्या. मी कँपातून सुरेख ड्रेस व छान चपला घेतल्या होत्या.
हनिमु न ला गेल्यावर साइट सीइन्ग ला जीपने जायचे होते तर चढताना चपला तुटल्या व सलवारीला ती जरा साटिन टाइपची होती. शिवणीत एकदम फाटून गेली. पारच पोपट झाला. त्यात गोव्यात हॉटेल मध्ये इतक्या नटलेल्या फॅन्सी ललना होत्या त्यामुळे मला अगदीच कसेत अरी झाले.

एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच मध्ये असे सेट तयार करा म्हणजे लग्नाच्या वेळी धावपळ होणार नाही.

साडी ड्रेपिन्ग ला पारलर वाली नक्की बोलवा. त्याने फार फरक पडतो. साडी चांगली नेसवतात त्या. तुम्ही, ताई, तुमच्या साबा, नणंद व आई आणि इतर महत्वाच्या बायकांचे साडी नेसविण्याचे गृप पॅकेज नक्की करून घ्या डिस्का उंट मिळेल.

लग्नाचे किती फंक्षन आहेत तेही आधी थोरले ठरवतीलच. त्याप्रमाणे प्लॅनिन्ग करावे लागेल. तरु णांसाठी एक पार्टी ज्यात कॉकटेल्स डान्स व डिनर ठेवा. इथे तुम्हाला गाउन घालता येइल. व पुरुषांना वेस्ट्रण कपडे सूट्स ब्लेझर्स शूज इत्यादि.

मेहंदी चे फुलाचे दागिने मागवा. ह्या दिवशी ज्येना व इतर भारतीय सवयीच्या नातेवाइकांसा ठी बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने वगिअरे ठेवता येइल तिकडची मंडळी हिंदी प्रदेशातील आहेत. तर एखादा हिंदी विनोदी कवी मिळा ला तर बघा फार मजा येते. इथे देशी डान्स करता येइल माझा आव्डीचा प्रकार. !!

वेस्टर्न थीम ची पार्टी एक प्रकारे बॅचलरेट व बॅचलर पार्टी संयुक्त प्रकारची असेल. तरूण लोकांची इथे ज्येना आजे साबा वगैरे ना बोलावू नका.

बाकी माहीत असेलच पण
1. हल्ली मेकप गेटप ट्रायल घेता येते बहुतेक आधी आणि ठरवता येते.फेसबुकवर खूप ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहेत.त्यांचे आधी मेकप फोटो बघून घे."मेकप छान उठून दिसला नाही पाहिजे,मेकप च्या साहाय्याने जिला मेकप केला ती व्यक्ती आणि तिचे चांगले फीचर्स उठून दिसले पाहिजेत,ओके फीचर्स थोडे कंसिल झाले पाहिजेत"
(माझ्या लग्नात माझं शोल्डर लेंथ केसांवर खोटा आंबाडा चिकटवलेलं,त्यावर गजरे सोडलेलं आणि स्किन टोन न बघता पांढरं फाउंडेशन भरपूर प्रमाणात(म्हणजे मेकप जास्त काळ टिकावा म्हणून बऱ्याच प्रमाणात) लावलेलं, लाल भडक्क लिपस्टिक लावलेलं भूत झालं होतं.फोटो म्हणून चांगले दिसतात पण मी पाहून फार कळवळते. एकदा जमल्यास मस्त मिनीमल मेकप,नऊवारी रेशमी 25000 वगैरे वाली पैठणी,ढेपे वाडा किंवा फोर्ट जाधवगडला(म्हणजे घर रिनोव्हेशन विसरा), आधी आकाशापर्यंत फ्लो होणारा वन पीस गाऊन घालून फोटोशूट वगैरे करून परत एखादे लग्न(माणूस तो च ठेवून) करावे की काय Happy

एखादे लग्न(माणूस तो च ठेवून) करावे की काय >> जरूर आणि लेख पण लिहा त्यावर. दुसरे लग्न कसे करावे? असा आज काल ते व्हाउज रिन्यु करतात ना तसे मस्त होईल फंक्षन.

फेसबुक वर रेडिमेड रुखवत करून देणारे बरेच आहेत. एक सजविलेले रुखवत टेबल होउन जाउ द्या.

अलोकनाथांचा कार्यक्रम आवर्जून ठेवा. आणि सलमान सुद्धा असलाच पाहिजे. त्याशिवाय लग्नाला महत्व राहणार नाही. बूट लपवण्याची प्रॅक्टिस आत्तापासूनच करा. आणि प्लांनिंग चांगला करा म्हणजे थोडे जास्त पैसे उकळता येतील.

लग्नापूर्वी गायनॅकला जरुर भेटा व कुटुंबनियोजनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती घ्या. याविषयी बहिण, मैत्रिण यांच्यावर अवलंबून राहणे टाळा.

Submitted by MazeMan >> धन्यवाद..महत्वाचा मुद्दा..

Submitted by @Shraddha >> धन्यवाद मेडिकल चेक अप करून घ्यायचं डोक्यात होत पण जास्त आयडिया नव्हती

Submitted by मी चिन्मयी >> धन्यवाद तुम्ही खूप बारीक सारीक पण महत्वाचे मुद्दे सांगितले आता वाटतंय बर झालं धागा काढला खूप गोष्टी नव्याने समजतात ज्या आतापासून करायची गरज आहे

अभिनंदन अमृताक्षर. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. >> धन्यवाद

लेखावरच्या चित्रात चिमणीने डोळे वटारलेले आणि चिमणरावांचे केस उभे राहिलेले आतापासूनच दिसताय्त. :). तेवढ जरा सांभाळा. Happy >> Lol Lol

Submitted by विक्रमसिंह

अमृताक्षर अभिनंदन..!

वर सगळ्यांनी छान सल्ले दिलेत ते तुम्हांला कामी येतीलचं.. पण लग्नाच्या तयारीत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका कारण घरातलं लग्नकार्य म्हटलं म्हणजे खूप धावपळ असते, त्यामुळे शारीरीक थकवा येतो. लग्नाची खरेदी लवकरच सुरु करा. लग्न किंवा साखरपुडा होण्याच्या दोन-तीन दिवस आधी छान झोप घ्या कारण नंतर एकदा का लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले की, कामाच्या,पाहुण्या- रावळ्यांच्या गडबडीत झोप आणि आराम ह्याचं खोबरं नक्कीच होणार..

कार्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाहेर उन्हात फिरणं टाळा.

बाकी घरचे सांभाळून घेतीलच..!

शुभेच्छा तुम्हांला आणि हो .. लग्नाला बोलवा..!!

अमृताक्षर अ‍ॅडमिन ना सांगून अनावश्यक प्रतिसाद काढून टाका. >>
अ‍ॅॅडमिन मी हा धागा माझ्या एकटीसाठी काढला नसून सर्वांसाठी काढलाय आजकाल लग्नासाठी थोडी पूर्व तयारी करावीच लागते त्यात नवीन ट्रेंड्स काय आपण अजून काय स्पेशल करू शकतो हे कळावे आणि आपले लग्न अगदी अविस्मरणीय व्हावे असे वाटण्यात काही चुकीचे नाही तर या धाग्यावर येणारे अवांतर प्रतिसाद उडवून टाका म्हणजे धागा भरकटणार नाही माझ्या मनात कुणाचा काही राग वगैरे नाही बस धागा भरकटू नये ही अपेक्षा आहे Happy

ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट सिरीअसली चालू करणे. तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज सुरु करणे. म्हणजे लग्नात विदाउट मेक अप पण ब्राइड सुरेखच दिसते. हे फार महाग खर्चिक पॅकेज घ्यायची गरज नाही. स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन करून मॅनेज करा. अवांतर काहीत अरी नव्या ट्रीटमेंट ट्राय करू नका. >> तुम्ही मला हे डिटेल्स विपू करू शकता का माझा आणि पार्लर चा कधी जास्त संबंध आला नाही त्यामुळे कुठल पॅकेज काय वगैरे सांगा.. वजन कमी करायचं आहे पण ते काही जमत नाहीये Sad

साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज सामान सर्व नीट प्लॅन करा. घरून न्यायच्य बॅग प्लॅन करा. हनिमू न ला न्यायचे कपडे नीट प्लॅन करा. हे सुंदर पण मजबूत बांधणीचे घ्या नक्की. माझे फार लवकर लग्न झाले असा सल्ला द्यायला कोणीच नव्हते. तेव्हा कपडे पण कमीच असत. आई बाप वयस्क त्यामुळे त्यांनाही फार माहीत नव्हते व चुलत बहिणी फार हेल्पफूल नव्हत्या. मी कँपातून सुरेख ड्रेस व छान चपला घेतल्या होत्या.
हनिमु न ला गेल्यावर साइट सीइन्ग ला जीपने जायचे होते तर चढताना चपला तुटल्या व सलवारीला ती जरा साटिन टाइपची होती. शिवणीत एकदम फाटून गेली. पारच पोपट झाला. त्यात गोव्यात हॉटेल मध्ये इतक्या नटलेल्या फॅन्सी ललना होत्या त्यामुळे मला अगदीच कसेत अरी झाले. >> लक्षात न येणारा पण महत्वाचा मुद्दा..

Submitted by अमा >> thank you अमा

मेहंदी चे फुलाचे दागिने मागवा. ह्या दिवशी ज्येना व इतर भारतीय सवयीच्या नातेवाइकांसा ठी बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने वगिअरे ठेवता येइल तिकडची मंडळी हिंदी प्रदेशातील आहेत. तर एखादा हिंदी विनोदी कवी मिळा ला तर बघा फार मजा येते. इथे देशी डान्स करता येइल माझा आव्डीचा प्रकार. !!

Submitted by अमा >> सगळे मुद्दे लक्षात ठेवनार जमेल त्या सगळ्या गोष्टी करणार.. thank you so much अमा Happy

बाकी माहीत असेलच पण
1. हल्ली मेकप गेटप ट्रायल घेता येते बहुतेक आधी आणि ठरवता येते.फेसबुकवर खूप ब्रायडल मेकअप आर्टिस्ट आहेत.त्यांचे आधी मेकप फोटो बघून घे."मेकप छान उठून दिसला नाही पाहिजे,मेकप च्या साहाय्याने जिला मेकप केला ती व्यक्ती आणि तिचे चांगले फीचर्स उठून दिसले पाहिजेत,ओके फीचर्स थोडे कंसिल झाले पाहिजेत">> हे माहिती नव्हत की असे मेकप गेटप ट्रायल करता येतात thank you Happy

(माझ्या लग्नात माझं शोल्डर लेंथ केसांवर खोटा आंबाडा चिकटवलेलं,त्यावर गजरे सोडलेलं आणि स्किन टोन न बघता पांढरं फाउंडेशन भरपूर प्रमाणात(म्हणजे मेकप जास्त काळ टिकावा म्हणून बऱ्याच प्रमाणात) लावलेलं, लाल भडक्क लिपस्टिक लावलेलं भूत झालं होतं.फोटो म्हणून चांगले दिसतात पण मी पाहून फार कळवळते. एकदा जमल्यास मस्त मिनीमल मेकप,नऊवारी रेशमी 25000 वगैरे वाली पैठणी,ढेपे वाडा किंवा फोर्ट जाधवगडला(म्हणजे घर रिनोव्हेशन विसरा), आधी आकाशापर्यंत फ्लो होणारा वन पीस गाऊन घालून फोटोशूट वगैरे करून परत एखादे लग्न(माणूस तो च ठेवून) करावे की काय Happy>> करा एकदा लग्न आजकाल anniversary ला बरेच लोक करतात तसे..तुमची सुंदर नवरीवाली इच्छा पूर्ण होऊन जाईल आम्हाला ही फोटो पाठवा इथे

Submitted by mi_anu >> अनु same माझ्या ताईसोबत झाले होते तेव्हा मेकअप वगैरे इतकं trending नव्हत आणि parlour वाली ने तिला भूत बनून टाकले होते..२०१२ ची गोष्ट.. आता ते फोटो पाहून वाईट वाटतं Sad lifetime memory असतात अशा खराब होऊन जातात म्हणूनच मी हा धागा प्रपंच केलाय Happy

Pages