मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल ज्याप्रमाणे विशाल आणि विकास खेळले तो रडीचा खेळ होता. काहीही न करता त्यांची अपेक्षा होती की उत्कर्षने त्यांच्या बाजूने खेळावं. यामुळे ते दोघे सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताहेत आणि टीम ए च लोक कौतुक करताहेत.

गायत्री दातार, मीरा हे लोक टास्क नंतर पण खुन्नस ठेवतात जसे पहिल्या सिझनला सुशांत शेलार- राजेश आणि दुसऱ्या सिझनला शिवानी वगैरे लोक ठेवायचे.
अशा लोकांवर पब्लिकचा नेहमीच जास्त राग असतो.

टीम बी ला माहीत आहे की जय खूपच स्ट्रॉंग प्लेयर आहे. त्याला सहजपणे हरवणं शक्य नाही. त्यामुळे जयला उसकवून हात उचलायला भाग पाडायचं आणि त्याने तसं केलं की आरडाओरडा करून त्याला बाहेर पाडायचं. आता त्या विकासला चांगलंच माहीत होतं की हा प्लॅन सफल झाला आणि जय भडकला की तो बाहेर जाणं वैगरे नंतर पण जो हे करेल तो जयचे चांगलेच रट्टे खाईल. त्यामुळे तो मिनलला बोलला की तू उसकव त्याला म्हणजे हा सेफ. तर असो असं काही झालं नाही. उलट जयवर काहीही परिणाम होत नाही हे बघून टीम बी च आक्रमक झाली आणि अपशब्द वापरायला लागले. आता अजून दोन चार दिवसात जय भडकला नाही तर हेच दोन चार जण डिप्रेशनमध्ये जाऊन एकमेकांची डोकी फोडतील असं वाटायला लागलंय. Lol

बाईक वर जय अणि गायत्री ने बुड टेकाल होत म्हणजे ते बसले होते आणि बसावं का झोपाव हे बिग बॉस ने नियमात लिहिलेलं नव्हतंच फक्त बाईक वर असावं त्यामुळे ते बाईक च्या खाली उतरले नव्हते म्हणजे ते जिंकलेच होते

मला वाटले जय आणि गायत्रीने मस्त खेळला टास्क. मला गायत्रीने नंतर विशाल ला उत्तर दिले तेही आवडले. टीम बी ने उगीच त्या सुरेखाला संधी दिलीतीच त्यांची मोठी चूक ठरली. तिला काहीही सिरियसनेस नव्हता गेम चा. नंतर चर्चा दिसली की ती टीम ए च्या बाजूने होती वगैरे पण मला तेही वाटत नाही. तेवढा इंटरेस्ट घेऊन स्ट्रॅटेजी वगैरे करतच नाहीये ती.टीम बी चा ग्रुप फक्त ३ लोकांचा आहे. बाकी कुणी कन्सिस्टन्ट नाहीत.
मला तृप्ती आणि दादुस ची जोडी आवडली Happy काल यमकाच्या खेळा मुळे वातावरण हलकं केलं जरा त्यांनी.
मीनल ने तोंडाने मीठ उघडले ते आणि त्यवरचे एक्सक्यूजेस पटण्यासारखे नव्हते. वीकेन्ड ला ऐकावे लागेल त्यावर बहुतेक. उत्कर्ष, जय, अक्षय, सोनालीलाही नक्कीच ऐकावे लागणार काही ना काही. गायत्रीचे बहुतेक कौतुक होईल यावेळी असे दिसते.

जय गायत्री झोपून खेळले असतील त्यावर टीम बी ने ऑब्जेक्शन घेतलं नसेल तर कोण काय करणार, त्यामुळे ते न बसता झोपून चांगलं खेळले म्हणावं लागेल, चूक असेल तर म मां बोलतील त्यांना, खरंतर त्यांनी चांगली शक्कल लढवली आणि पळवाट काढली असं मला personally वाटतं आणि तोही गेमचा एक भाग आहे (मी बघितलं नाहीये अजून) .

कलर्स fb पेजवर मात्र टीका होतेय याबद्दल आणि उत्कर्ष बायसड आहे अशीही टीका होतेय.

गायत्रीच्या आवाजावर पण टीका होतेय.

एनिवे पहिल्या सीझन मध्ये रे रा सुशांत आणि आ काळे आणि दुसऱ्या सीझनवेळी शिवानी नेहा grp जसा निगेटिव्ह वाटत होता सेम हा तसाच वाटतोय पब्लिकला.

याचा फायदा घ्यायला हवा विशाल, विकास, मीनल ने. अर्थात त्यांना कसं समजणार, बाहेर कोणाला पाठिंबा आहे ते.

अजूनतरी विकास आणि विशाललाच सपोर्ट आहे.
आणि तो राहिल.तेच तर बिबॉसला हव होत.
पहिल्या सिझनमध्ये याच टास्कमध्ये मेघाला पूर्ण सपोर्ट मिळवून देऊन दुसर्या ग्रुपला पूर्ण निगेटिव्ह केल.सिझन 2 मध्ये परागला काढून नेहाला पूर्ण निगेटिव्ह केल
आणि तीच परंपरा कायम ठेवत आतापर्यंत कुठेच न दिसणार्या विशाल आणि विकासला चक्क विनरच्या रेसमध्ये आणून पूर्ण सपोर्ट मिळवून दिला.
आता ममा गायत्री ग्रुपच कौतुक करो वा न करो,सोशल मिडियावर त्यांच कौतुक होवो अगर न होवो,काहीही फरक पडणार नाही.
शेवटी आपण बिचारे प्रेक्षक इनव्हॉल्व्ह होऊन बघतो,आपापल्या आवडत्या कंटेस्टंट ला सपोर्ट करतो.पण प्रत्यक्षात गेम बिबॉस खेळतात.त्यांना हव त्यांना पुढे आणणार,गरज संपली की काढतात सुध्दा.
मागच्या वेळी नाही का, त्या शिवानीने एवढ्या धमक्या देऊन ,गेम सोडून गेली,तरी शेवटी कंटेंटसाठी यानी तिलाच परत आणल आणि टॉप 6 मध्ये नेल.
तसच आताही होणार आहे.अगदी त्या सुशांतने पण सांगितलं होत की ममांना पण जेवढ दाखवल जात ,त्यावरच बोलायला सांगतात.आता गायत्री टीमच कौतुक या विकमध्ये करा ,अस जर सांगितले असेल,तर ममा तेच करणार.शेवटी काय, बिबॉसच ठरवणार.
आता बघू नेक्स्ट टार्गेट कोणाला करत आहेत ते.

मीनल ने तोंडाने मीठ उघडले ते आणि त्यवरचे एक्सक्यूजेस पटण्यासारखे नव्हते. >>> असं असेल तर, तिला बोलणी खावी लागतील विकेंडला.

मेघाने पहील्या सीझनला चिंग चायनीजचं काहीतरी करताना पटापट तोंडाने पॅकेटस फोडल्याचं आठवलं, अस आठवायला नको खरंतर पण असं होत रहाणार, हाहाहा. पहीले दोन सीझन नीट फॉलो केल्याने पटकन काही गोष्टी आठवतात.

लोक जय आणि गायत्रीबद्दल बोलतायत पण मला विशाल आणि सोनाली यांचे प्रकरण जमताना दिसतेय.... कधीकधी सोनाली आणि मीनल पण एकमेकांच्या प्रेमात असल्यासारख्या वाटतात किंवा कदाचित ह्याच तिघांच्यात प्रेमत्रिकोण पण बनू शकतो Happy

मुलींना सगळ्यांनाच जय बद्दल थोडा सॉफ्ट कॉर्नर किंवा क्रश आहे, सोनाली, मीनल पण त्यात आली. हल्ली स्नेहासुद्धा जय सोबत फ्लर्ट करताना दिसते कायम. बाकी तसं खरी खुरी केमिस्ट्री नाही दिसत कोणात.

जय खूप श्रीमंत आहे असं वाटतं. ह्या लोकांच्या बाहेरच्या श्रीमंतीचं आतल्यांना दडपण येत असेल का? किंवा बाहेर,गेल्यावर काही लभ्यांश असेल अशा कल्पनेनं टास्कवेळी अधीकउणे होऊ शकेल का?

जय मला आवडतो, मीराही आवडते पण गायत्री आणि स्नेहा नाही आवडत.
स्नेहा दिसते मात्र चांगली बरेचदा !
जय-मीरा एकत्रं बेटर दिसतील .
विकास , मिनल, विशाल आवडतात पण त्यांच्याकडे जय सारखी जिंकायची जिद्द, ऑरा , गेम बद्दल पॅशन दिसत नाहीये अजुन !
इट्स टु अर्ली टु से पण मी ऑलरेडी जय आणि विशाल टॉप २ मधे इमॅजिन करु शकतेय, त्या आधी त्यांचा फेसऑफ परफॉरमन्स , मांजरेकर मधे आणि दोन बॉडी बिल्डर्स दोन्ही बाजुला वगैरे सगळे मोमेंट्स Happy

डीजे आरामात Happy

विशाल आणि जय फायनल असेल तर मस्तच असेल...

जय हिंदी बिग बॉस मटेरियल आहे खरे तर...

जय हिंदी बिग बॉस मटेरियल आहे खरे तर...
<<
हो खरय पण इथे तो जास्त शाइन होतोय इतर मराठी क्राउड मधे, हिन्दी मधे एंट्रीला कदाच्गित फारच वशिलेबाजी आणि पॉलिटिक्स चालत असणार !
उद्या सुरु होतय बिबि १५ , बघुया ओटीटी मास्टरमाइंड आपला मराठी निशान्त कसा खेळतोय , दुसरी मराठी मुलगी तेजस्विनी ऑलरेडी चर्चेत आहे !

जय-मीरा एकत्रं बेटर दिसतील . >>> एक्झाक्टली. मी तेच लिहीलेलं परवा. गायत्रीबरोबर जय चांगला दिसत नाही आणि त्याचा तोटाही होऊ शकेल. गायत्रीचा फायदा होईल त्याच्याबरोबर.

कदाचित जय गायत्री बाहेरून ठरवून आले असतील एकत्र खेळणे !
नुसतेच सोशल मिडिया फॅन फॉलॉइंग नंबर पाहिला तर १. जय २. गायत्री असल्यामुळे !

आजचा टास्क रद्द झाला आणि कोणीच कॅप्टन झालं नाही हे आवडलं मला, विकास संचालक म्हणून जशास तसा वागला डोकं लावून. त्यांनी ठरवलेली स्ट्रॅटेजी work झाली, शांत राहिले so ते लोकांमध्ये पण चांगले दिसले, पुढे आले. जय आणि अक्षय ला चांगलच उचकवलं, ते बाहेर ( आपल्याला) भडकू दिसले. दादूस आणि तृप्ती ताईंना पण त्यांनी A टीमविरोधात सांगायला सुरुवात केली आहे, एकंदर विकास चांगलाच गेम खेळतोय.
मीरा डोकेबाज आहे, पण negative दिसते. गायत्री अती कचकच करते सो कधीकधी अतिशहाणी वाटायला लागते. सगळ्यात जास्त negative दिसतोय तो उत्कर्ष, डबल ढोलकी तर तो आहेच , पण आता थोडा आगलाव्या पण वाटायला लागला आहे. या सगळ्या negative इमेज चा विकास आणि टीम फायदा करून घेणार आणि public ची sympathy मिळवणार हे नक्की Happy

तृप्ती अचानक बऱ्याच सेन्सिबल वाटायला लागल्यात..... आणि त्यांना मोठेपणा मिळायला लागताच सुरेखाताईंची चांगलीच चिडचिड झालेली दिसली!!
बाकी त्या टेबलवरच्या सीनमध्ये जय जेंव्हा सुरेखाताईंना मस्का मारायला आला होता तेंव्हा त्या मला एकदम सुकन्या मोने कुलकर्णींसारख्या वाटल्या..... असे अजुन कुणाला वाटले का?
सुरेखाताई आणि सोनालीचे ते किचन काम करण्यावरुन आज झालेले वाद एकदम टिपिकल सासू-सुन वादासारखे होते Wink
विकास आज एकदम मस्त खेळला.... संचालक म्हणून तो एकदम ठाम होता.... एरवी कदाचित तो पार्शल वाटला असता पण आधीच्या संचालकाने बेंचमार्क सेट केलेला असल्यामुळे विकासने दिलेले जश्यास तसे उत्तर आवडले!!
सोनाली तिच्या मुद्द्यावर ठाम राहिल्यामुळे दुसरी फेरी रद्द झाली पण तिसऱ्या फेरीत तिने गायत्रीला नंबर देऊ केल्यामुळे विशालला एकदम तिच्याबद्दल ट्रस्ट इश्यू का वाटायला लागला म्हणे?
एक फेरीत सुरेखाताईंच्या हाताला लागू नये म्हणून सोनालीने नंबर टेबलच्या दुसऱ्या बाजूला ढकलला ते पण एकदम भारी होते!!

आता उद्या मांजरेकर बहुतेक टीम Aला विचारतील की विकास संचालक म्हणून कसा होता आणि मग त्यांचेच मुद्दे घेऊन ते उत्कर्षवर उलटवतील!!

स्नेहा आणि मीराचे काय बिनसले म्हणे? मीरा काहीतरी जयला सांगत होती!

जयचं जावा जावा ऐकून कान किटले आज. इंग्रजीपण किती बोलतात. गोंगाट फार असतो त्यामुळे पूर्ण बघत नाही. अक्षयने खरच शिवी दिली का आज, तो म्हणत होता ही शिवी नाहीचे. गायत्री कॅप्टन झाली नाही याचा आनंद झाला मला.

शिवी नव्हती तर बिग बॉसने म्युट का केलं.
जय सांगत होता की ही काय शिवी आहे का तेव्हा देखील mute केलं.

विशाल विकासला पब्लिकचा कसला सॉलिड पाठींबा आहे, सो मि वर आणि गायत्री सर्वात नावडती आहे. तिची शिवानी होणार बहुतेक. शिवानीचे पण फॅन्स बरेच होते की पण बिग बॉसमधे व्हिलन ठरली.

कधीकधी सोनाली आणि मीनल पण एकमेकांच्या प्रेमात असल्यासारख्या वाटतात >>>>>>>>> अगदी अगदी. काल त्यान्च वॉशरुममध्ये जे काय चालू होत ते बघून सुरेखाताई त्यान्च्याकडे 'अरे देवा' टाईप लुक देत होत्या. Lol अस जर झाल तर मराठी बिबॉच्या इतिहासात ' पहिली लेस्बियन लव्हस्टोरी' म्हणून ह्याची नोन्द होईल. पण मराठी प्रेक्षकान्ना चालेल का हे सगळे?

बाकी तृप्तीताईन्चा आणि सोनाली दादूसचा यमक जुळवणे गेम छान झाला होता.

आजचा टास्क रद्द झाला आणि कोणीच कॅप्टन झालं नाही हे आवडलं मला, विकास संचालक म्हणून जशास तसा वागला डोकं लावून. >>>>>>>> सहमत

वोटिंग लाईन्स बंद व्हायच्या आधी विशालच एक नंबरवर होता अस एका youtube वर बघितलं. त्या youtuber ने असही सांगितलं की जयला देशभर सपोर्ट असूनही, महाराष्ट्राने विशालला नं वन ठेवलं आहे. जय दुसरा होता, विकास तिसरा, मिनल चौथी, गायत्री पाचवी, आविष्कार सहा आणि शिवलीला सात नंबरवर होते.

बिगबॉसने आपेक्षेप्रमाणे खुर्ची आणि पॉपकॉर्न घेऊन ‘संचालक का बदला संचालकसे’ खेळ पाहिला Biggrin
#बिगबॉसखेलगए

विकास खरंच खूप हुशार आहे आणि good ऍक्टर सुद्धा आहे म्हणूनच कोणीच कॅप्टन होणार नाही असं जाहीर केल्यानंतर खूप आनंद झाला असतानाही त्याने काहीच react केले नाही याच्या उलट तो जय टाळ्या वाजवून मुर्खासारखा हसत होता..., तृप्ती आणि दादूसला पण मस्त भडकावलंय त्याने...

Pages