मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

जय ने विशालचा मोबाईल चार्ज केला नाहीच उलट जमीनीवर रागाने फेकला, पण विशालने त्याला उचलायला लावलं ते भारी होत Wink

बाकी हा व्हिडिओ पाहाच
https://fb.watch/8r-L8fuJSV/

कमकुवत लोकांना नॉमिनेट करायचे हे थोडे नंतर करायचे होते. सगळे हुकुमाचं एक्के पहिल्या महिन्यात संपवून टाकले तर कसे चालेल. जेष्ठ नागरिक सगळी सिंपथी घेतील आता.
मिराने खूप वाईट पणा घेतला. खूप डोके लढवलेलं खेळाडू नाही आवडत सगळ्यांना. नेहा शितोळे म्हणून मागे पडली.

स्प्लिट्सविला फिनाले एपिसोड पाहिला, तिथेही जयला घोडा बनून पाठीवर मुलगी घेऊन रांगत धावावे लागले Proud
जोक्स अपार्ट पण त्याचे ते फिनाले टास्क ज्या लेव्हलचे होते, मीरा पाठीवर बसल्यावर नक्कीच अ‍ॅक्टिंग करत होता त्रास झाल्याचा Happy
स्प्लिट्सविला फिनाले मधे घोडा पळून मग पार्टनर बरोबर ऑबस्टॅकल वॉल्स चढून त्यानंतर एरीयल स्टंट्स सगळे २ मिनिट ११ सेकंद मधे केले जय आदितीनी.
बिबॉ भरपूर फुटेज देतेय जय ला, तो जिंकला तर बिगबॉस ब्रँड ला कदाचित फायदा होईल !

भांडी न वापरता पत्रावळी वापरायची का या लोकांनी आता?
जय आणि स्नेहा खुष झाले असतील मनातल्या मनात..... भांडी कमी पडतील आता त्यांना घासायला!

बिबॉ भरपूर फुटेज देतेय जय ला, तो जिंकला तर बिगबॉस ब्रँड ला कदाचित फायदा होईल ! >>> मला हे कालचा एपिसोड बघून वाटलं, जास्त वेळ जयच होता समोर.

>>तिथेही जयला घोडा बनून पाठीवर मुलगी घेऊन रांगत धावावे लागले Proud

हो मी पण बघितला तो टास्क तेंव्हा मलापण आश्चर्य वाटले!

टास्क्स रद्द होणं हे या सिझनमध्ये एक अचिव्हमेंट समजतात कंटेस्टंट्स. पहिल्या सिझनमध्ये राडे व्हायचे पण निदान टास्क्स पूर्ण तरी व्हायचे.

आविष्कारने स्नेहाला टि- शर्ट दिला वाढदिवसाची गिफ्ट म्हणून. त्याला अजूनही होप्स आहेत का तिच्याकडून? स्नेहा त्याला व्यायामावरुन चिडवत होती. आजही हिची जयबरोबर फ्लर्टिन्ग चालूच! आविष्कारच्या डोक्यात जय जातो अस तोच म्हणाला.

विशाल काय स्वत: शी बडबडत होता? कुणाला तो दारु प्यायलासारखा वाटला नाही का? का मला तसाच वाटला?

मी मीरा ला सांत्वन काराईला जातो, आधी सोनालीला मस्का लावत होता लव्ह अँगल साठी, आणि आता सांगतो की माझी बाहेर relation शिप आहे ते >>>>>>> अगदी अगदी आज ह्याच सोनालीशी फ्लर्टिन्ग चालू होत ' सोना सोना' म्हणून.

कालच्या एपिसोड वर एक पण पोस्ट नाही ?
काल फारच बोअर झाले मला...तसे बाकीच्यांना पण वाटले का ?
मी काल गम्मत म्हणुन मेघा सई चा जुना राडा टास्क वाला एपिसोड आणि त्याचा वीकेंड डाव पाहिला....मजा आली :-).
त्यावेळी मांजरेकरांनी फारच प्रेमाने समजावले होते दुसर्‍या टीम ला....या सिझन मधे नुसता आरडाओरडा करत आहेत....
सगळेच टास्क रद्द होत राहिले तर हा सिझन फार बोअर होइल....
जय चा आरडाओरडा, सतत उघडं फिरणं बघवत नाहिये.... युक्ती ने खेळुच देत नाहिये तो कोणाला....नुसती तोडफोड च चालु आहे सारखी.

स्नेहा saranghae बिग बॉस असे ऐकू येत. Saranghae म्हणजे आय लव्ह यु इन कोरियन langauge. मी पण विशाल ला वोट दिल

शारीरिक इजा पोचेल अशी चिन्हं ही दिसत नव्हती, तरी बिग बॉस खडबडून जागे झाले.
मीरा बरोबर सांगत होती. पण गरम डोक्याच्या विशाल आणि जयला समजून घ्यायचं नव्हतं.
अक्षय आणि उत्कर्ष यांनी विशालला स्वतः:घ्या डोक्याने चाल असं म्हटल्यावर तो जरा बदललाय. त्याचे टीममेट्सही त्याला डोकं नाही असंच धरून चालत होते.

स्नेहा बिग बॉसला गुडमॉर्निंग करताना नक्की काय म्हणते?
गेल्या वेळी अभिजीत केळकर आणि किशोरी आधीच उठलेले असतं, तसं यंंदा कोणी दिसत नाही

स्नेहा बिग बॉसला गुडमॉर्निंग करताना नक्की काय म्हणते>> saranghae! K-pop चं फॅड आहे सध्या त्यातली भाषा.
परवा un मध्ये पण झाला Kpop बँडचा परफॉर्मन्स

Oh. Ok

विशाल काय स्वत: शी बडबडत होता? कुणाला तो दारु प्यायलासारखा वाटला नाही का? का मला तसाच वाटला?
<<<
फुटेज साठी करत होता पण मलाही खूप हसु आलं, अगदी सेम वाटलं मला कि पाण्याच्या बॉटल मधून स्वस्तातली नशा केली काय Rofl

आज बिबॉने पूर्णच शफल केल्या टिम्स , २ गरम डोक्याचे बॉडी बिल्डर्स जय-विशाल एका टिम मधे आणि डोकं चालवणारे विकास उत्कर्ष मीनल एकत्रं !
नुसती फोडाफोडी केली जयच्या टिमने, आज मीरा बरोबर बोलली, या विकेंडला तिला बोलणी खायची नाहीयेत.
मिनल चांगली स्ट्रॅटेजीज करत होती!
पण शेवटी सगळेच तोडफोड करायला लागले, मला विशाल अक्शय मारामारी पहायची होती , कशाला एडिट केली Proud
स्नेहाला अचानक खूप फुटेज देतायेत, जयने फ्लर्ट करायला लागल्यापासून !
आता गायत्री कमी आणि स्नेहा जास्त दिसते !

स्नेहाला अचानक खूप फुटेज देतायेत, जयने फ्लर्ट करायला लागल्यापासून !
आता गायत्री कमी आणि स्नेहा जास्त दिसते ! >>

स्नेहा आणी जय ची लव्ह स्टोरी सुरु करुन अविष्कार ची रीअ‍ॅक्शन दाखवणे असं काही असेल स्क्रीप्टेड Wink
स्नेहा ला बघणं बरं वाटतय पण गायत्री पेक्षा ....तिचा वावर फ्रेश आहे...
फक्त तिने टास्क करताना घालायला वेगळे स्पोर्टवेअर मागवुन घ्यावे...पायघोळ झगे घालुन कोण टास्क करतं ?

<<स्नेहा ला बघणं बरं वाटतय पण गायत्री पेक्षा ....तिचा वावर फ्रेश आहे...<< अगदी, अगदी! म्हणुनच पुढे केले असावे बिबॉने तिला. पण तिचा कपडेपट का शेक्सपियरच्या नाटकातील बायकांसारखा वाटतो कुणास ठाउक! Proud

एक मात्र खरे की तिचं साध बोलणे, कोणाशिही बोलतांना करते ते हातवारेही इतके ग्रेसफुल वाटतात ना! आणि सहज हावभाव वाटतात, नाटकी नाही.

होना, स्नेहा कधीही टास्क साठी अ‍ॅक्टिव्ह वेअर घालत नाही, विचित्रं दिसते अगदी !
तिला पाठवलच कशाला तिथे टास्क मधे , मीराला पाठवायला हवं होतं !

जय कुठल्याही क्षणी टारझन सारखी आरोळी ठोकुन बाळाराम मार्केट जाहीरत सुरु करेल की काय असे वाटत होते. स्न्हेहाने लिप जॉब केलाय का?

मला काल मजा आली अ‍ॅक्चुअली बघायला. टीम रीशफलिंग मुळे इक्वेशन्स बदलत आहेत. काल मीरा बरोबर सांगत होती पण जय आणि विशाल ने लक्ष दिले नाही. राडा होत असला तरी तो टास्क पूर्ण होऊ शकला असता. टीम्स पण इव्हन होत्या तशा, पण त्या मठ्ठ अक्षय ने मारामारी सुरु केली. त्या अक्षय ला गेम अजिबात कळत नाहीये काहीच. माठ बैल आहे नुसता. बाकी काही करत नाही नुसत्या शिव्या आणि ही आता मारामारी!
या आठवड्यात मुद्दाम की काय माहित नाही पण उत्कर्ष दिसत नाहीये फारसा टास्क्व्यतिरिक्त. भावाने पंगा घेतला म्हणून बिबॉ ने फुटेज कापले की काय Happy
मीनल पण भारी खेळते. मीराने तिच्याशी पंगा घेतल्यावर तिने दुप्पट जोरात "काय करशील , कर" म्हटल्यावर मीरा मागे हटली. ती असाच पंगा जय किंवा इतर बैलांशी पण घेते न घाबरता, ते आवडतं मला. मुलगी आहे म्हणून कोणी इन्टिमिडेट करू शकत नाही तिला. मीराचा जोर सगळा बोलण्यात आहे असे वाटते. टास्क खेळण्याची फिजिकल स्ट्रेंग्थ दिसत नाहीये तिच्यात.
विशाल आणि इतर स्पर्धक एकटेच बोलत असतात तेव्हा अर्थातच ते प्रेक्षकांना काही गोष्टी कळाव्या म्हणून मुद्दाम बोलतात. याच नव्हे तर सगळ्याच सीझन्स मधे असतात की असे. विशाल एकूणच बरोब्बर खेळतोय सो फार. आणि मीनल, विकास, सोनाली ला विशाल आहे म्हणुन फायदा होतो आहे. तो जर फुटला त्यांच्यातून तर सगळेच बदलेल.

स्नेहा जयची ताई वाटते, गायत्रीपेक्षा बरी एवढंच. जयला मीरा का नाही दिसत, मला ते दोघे आवडतील एकत्र Wink .

>>जयला मीरा का नाही दिसत, मला ते दोघे आवडतील एकत्र
एका म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत.... दोघांनाही आपले तेच खरे करायचे असते!!

>>ते प्रेक्षकांना काही गोष्टी कळाव्या म्हणून मुद्दाम बोलतात.
एक्झॅक्टली..... तेव्हढ्यातल्या तेव्हढ्यात जय आणि उत्कर्षने दिलेले वचन पाळले नाही हे परत एकदा बोलून दाखवले त्याने!

अक्षयने मात्र फारच निराशा केली..... "मै है हूं नही इस दुनियाका" मोडमध्ये असतो तो कायम!

विशाल फुटला तर विकासला जास्त फायदा होइल. सिंपथी त्यांना मिळते ज्याम्च्या बरोबर गद्दारी होते.
बिग बॉस मधे टास्क फिट लोक जिंकणार हे सहाजिक आहे. त्यामुळे हरणार असले तरी मनापासुन खेळणार्‍या लोकांना लोक सपोर्ट करतात. स्मिता गोंदकर पॉप्युलर झाली त्यात एक कारण हे पण होते की तीने टीम नाही बदलली. बर्‍याच मेघा फॅन्सनी देखील शेवटच्या टप्प्यात स्मिताला मत दिले होते.

विशाल - विकास मध्ये पण वाजलय अस ऐकलं. विशाल ‘तुझा वापर होतोय ’ हे ऐकल्यापासून थोडा विक्षिप्त वागतोय. चावडीनंतर सगळी समीकरणे नव्याने मांडणी होतायेत.

मागे हिन्दी बिबॉ मधे सलमान खान करणवीर व्होराच्या ड्रेसिंग वरून आणि इन जनरलच त्याची दर विकेंडला टिंगल करायचा , त्याच्या बायकोनी बरेचदा त्यावर नाराजी व्यक्त केली, मग ओपन लेटर पोस्ट केलं असच आदर्श शिन्दे सारखं , हे केल्यावर एका विकेंडला सलमान खाननी करणवीरला सांगितले कि इथून पुढे मी तुझ्याशी आणि तुझ्या विषयी काहीही बोलणार नाही विकेंडला, तुझ्या फॅमिलीला आवडत नाही.
सलमनने पूर्ण इग्नोअरच केले बरेच विकेंड त्याला, तसच् काहीसं होईल असं वाटतय !

तो जर फुटला त्यांच्यातून तर सगळेच बदलेल.
<<
हो , सई पुष्कर पासून मेघा फुटल्यावर मेघाला अजुन जास्त सपोर्ट मिळाला आणि सई पुष्की सर्वात मोठे व्हिलन ठरले !

Pages