लग्नासाठीची पूर्वतयारी

Submitted by अमृताक्षर on 1 October, 2021 - 09:03
Birds in love

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून या उक्तीप्रमाणे लग्न व्यवस्थापन हा अतिशय कठीण विषय आहे त्यात आता पूर्वीच्या काळी व्हायचे तसे लग्न म्हणजे फक्त पारंपारिक रीती रिवाजानुसार होणारे राहिले नाही..
बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लग्नाच्या पूर्वी ते लग्नापर्यंत केल्या जातात जसे की प्रे वेडिंग शूट, theme wedding, destination wedding, नवरी नवरदेव आणि फॅमिली चा छान बसवलेला प्रॅक्टीस केलेला डान्स, नवरीचे ते हळदीचे फुला फुलांचे दागिने, जोडप्याने matching कपडे घालणं etc etc
ही यादी न संपणारी आहे..
तर मायबोलीकरांनो तुमच्याकडे लग्नाळू लोकांसाठी खास काही टिप्स असतील किंवा नवीन काही theme असतील तर येथे टाका सगळ्यांच्या ते उपयोगी येईल..
यात ज्वेलरी, कपडे, theme, decoration, best shopping centre, pre wedding ideas, photographer, destination wedding places असं आणि या प्रकारचं काहीही असू शकत..
तुमचे अनुभवाचे बोल सगळ्या लग्नाळू लोकांना नक्कीच कामी येतील..

सगळ्यांचे प्रतिसाद वाचून मी स्वतःसाठी एक यादी बनवली आहे (शॉर्टकट मधे) ती इथे संकलित करतेय यात मग प्रतिसादानुसार update करता येईल..

1)सामाजिक भान
2)दोघांचा छान कट आऊट सेल्फी पॉईंट
3)मेक अप day night different
4)daily use बॅग
-घरी घालायचे कपडे ३-४ सेट्स
-बाहेर घालायचे कपडे ६-७ सेट्स including साड्या, ब्लाऊज, परकर
- २ बेडशीट्स (हो. लागतात.)
- टॉवेल्स
-कॉस्मेटिक्स
-टूथब्रश-पेस्ट
-सेफ्टीपिन्स खूप सारे
5) लग्न बॅग वेगळी
म्हणजे आऊटफिट+ज्वेलरी+ सेफ्टीपिन्स+ accessories. ज्यावेळी जे कपडे घालणार त्यासोबत सगळ्या वस्तू एकत्र मिळतील.
6)हनीमूनला जाताना मिनिमम सामान घेऊन जा.
7)डेस्टिनेशन वेडिंग्ज-रिसॉर्ट
8)फोटोग्राफर
9)ब्राय्डल पूर्व तयारी: लग्नाच्या आधी सहा महिने वजन कंट्रोल डाएट, तीन महिए आधी ब्रायडल पॅकेज, स्किन व हेअर उत्तम डेली रुटीन.
10) प्लॅनिंग- साड्या कपडे व अ‍ॅक्सेसरीज,घरून न्यायच्य बॅग प्लॅन हनिमूनला न्यायचे कपडे नीट, हे सुंदर पण मजबूत बांधणीचे
11)एक एक आउट फिट प्लस परकर ब्लाउज व अ‍ॅक्सेसरीज पाउच
12)साडी ड्रेपिन्ग ला पार्लर वाली
13)मेहंदी चे फुलाचे दागिने
14)बैठकीचा गायनाचा कार्यक्रम विनोदी प्रहसने
15)hens party
16)मेकप गेटप ट्रायल
17)फेसबुक वर रेडिमेड रुखवत-
१) स्टीलचा भांड्यांचा सेट.
२) काचेच्या जरा जास्त नाजूक कप बश्यांचा सेट व किटली.
३) काचेच्या बर्ण्यां मध्ये भरलेले डाळ तांदूळ व धान्ये सहा बरण्या किंवा मालत्या गव्हले असे पाच प्रकारचे.
4) मुलीने भरतकाम केलेले टेबलक्लॉथ. विण लेली क्रोशा केलेली कव्ह रे, डबलबेड् शीट चा सेट. व पिलो दोन पिलो कव्हर. त्यावर दोन लाल गुलाब व स्वीट ड्रीम्स असे भरत काम केलेले.
६) सप्तपदीची वचने लिहिलेले ( नव वधूस गोड सूचना लिहिलेले) कार्ड शीट किंवा जाडा चांगला ड्रॉइन्ग पेपर येतो त्यावर स्केच पेन्स ने लिहिलेले. अशी सात पेपर ची पावले.
७) सुके खोबरे कोरुन बनवलेले आर्ट.
८) साखरेचे ताट व तांब्या भांडे.
९) फॅन्सी अन्न पदार्थ. मोठे लाडू रंगी बेरंगी करंज्या चिरोटे. असे ठेवलेला एक बोल
१०) रंगीत कागदावर सोनेरी बुट्टे व काठ पदर चिकटवून केलेली साडी व त्रिकोणी खण हे जाड पुठ्ठ्यावर लावलेले.
११) रुखवताच्या टेबलाला खाली जोडलेले विणलेले किंवा मण्यांचे तोरण.
18)कोणत्याही प्रकारे स्वतःची तब्येत कॉम्प्रो करून दुसऱ्याचा कम्फर्ट ही सवय लावणे आधीपासून टाळणे.
19)दागिने ठेवायची पेटी व व्हॅनिटी केस
20)खरेदीची लिस्ट बनवावी..प्रत्येक लहान सहान गोष्ट कॅटेगरीवाईज मानपानाची , वैयक्तिक सामानाची , रिटर्न गिफ्ट , विधीप्रमाणे कपडे, दागिने ,लग्नाची खरेदी .
21) हनिमून साठी comfortable shoes, artificial light weight jwellery आणि कपडेे
22)मेडिकल check-up
23) जियो और जीने दो पॉलिसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साड्यांची shopping झाली की सांगा Happy>> हा तर माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे इथे फोटो टाकणार..

धन्यवाद हाडळीचा आशिक..
आज माझ्यावर इतका अभिनंदनाचा वर्षाव झालाय की मी भारावून गेलीये.. Happy

लग्न तर ठरले आता इथून पुढील वाटचालीला पण अशीच सोबत राहू द्या या धाग्यावर छान छान आयडिया सुचवा.. म्हणजे लग्न पण एकदम मस्त होईल..

अभिनंदन आणि शुभेच्छा. सरकारी नियमांचे पालन करून विवाह सोहळा पार पडला जाईल अशी तळटीप लग्नपत्रिकेत छापायला लागू नये अशी परिस्थिती येण्यासाठी शुभेच्छा. कमीत कमी नातेवाईकांची निवड म्हणजे मोठीच डोकेदुखी ठरतेय सध्या.

किशोर मुंढे धन्यवाद..माझा परिवार तर खूपच मोठा आहे त्यामुळे कमीत कमी लोकांना बोलवायचं म्हंटले तरी जास्तच होणार Lol

लग्नाचे असो नसो शॉपिंग म्हटलं की दिल्लीला करोल बागला गेले नाही आणि तिथे काही खरेदी केले नाही की फाउल धरतात.

शाहरूखचा डान्स ठेवा. त्याचे आता वय झाले वाटत असल्यास रणवीरसिंगला विचारा. हे बजेटबाहेर जात असेल तर घरगुती संगीतचा प्रोग्राम ठेवा. झाल्यास डीजे ठेवा. जमल्यास वरातीला बेंजोवाल्यांना बोलवा. ईच्छा असल्यास आम्हालाही नाचाचे आमंत्रण द्या. पण नाचल्याशिवाय नवरदेवाला घोडी चढू देऊ नका Happy

शॉपिंग म्हटलं की दिल्लीला करोल बागला गेले नाही...
>>>>
हे पुणे वगळता उर्वरीत महाराष्ट्राला लागू अशी तळटीप टाका Happy

ऋन्मेऽऽष तुमचा डान्स मी पहिला आहे खरा खुरा शाहरुख आम्हाला परवडणार नाही तुम्हीच या की डान्स करायला.. तेवढेच आम्हाला तुमचे दर्शन होतील.. नक्की या लग्नाची तारीख पक्की झाली की इथे आमंत्रण देते..

अमृताक्षर, खूप अभिनंदन. हे क्षण खूप हौशीचे असतात. थाटात लग्न, फाईव्हस्टार मेन्यू, आलियासारखं 'मूड के ना देखो दिलबरो'छाप एंट्री इ इ मज्जा आहे एका मुलीची... ह्या सगळ्यात कुठे काही थोडे सामाजिक भान जपता आले तर बघ. उदा: एखादे बॉक्स पीपीई डोनेट करणे, करोनामुळे अनाथ मुलांना मदत, वृद्धाश्रमात जेवण इ. जे शक्य असेल, जशी आवड असेल तसं.

हे पुणे वगळता >> दिल्लीतल्या शॉपिंग बद्दल विचारतायत त्या. त्यासाठी लिहिलंय.

बाकी इथे पहिला नंबर भारताचा आहे आणि त्यात कुठली शहरं आहेत ते पहा.

धन्यवाद अमृताक्षर आणि तुम्हालाही शुभेच्छा Happy
मॉरल ऑफ द स्टोरी ईतकेच की लग्नात वा कुठल्याही समारंभात वा पार्टीत माहौल बनवायचा असेल तर डान्स हवाच. लोकं मोकळे होतात, एकमेकांत मिसळतात, एनर्जी लेव्हल वाढते वगैरे वगैरे आणि पुढेही त्याची आठवण काढली जाते. अन्यथा भलामोठा एसी हॉल, स्टेज आणि लाखोंचे डेकोरेशन ईतर लोकांच्या कामाचे नसते. ते फक्त त्यांना कम्फर्ट देते, एंजॉयमेंट नाही. आणि लोकं एंजॉय करतील तरच मजा असते. म्हणजे हे मायबोलीच्या धाग्यासारखेच असते. प्रतिसादात लोकांनी मजा केली तर धागा हिट Happy
बाकी एकेकाळी चांगले जेवण लक्षात ठेवले जायचे. हल्ली लोकांना त्याचेही फार कौतुक राहिले नाही.
पोशाखावर खर्च मात्र आवड असल्यास जरूर करावा. प्री वेडींग फोटोशूटही जरूर करावे. ते फोटो पुढे आयुष्यभर दर ॲनिवर्सरीला व्हॉटसप स्टेटसला ठेवता येतात Happy
हल्ली काही पार्टीजमध्ये सेल्फी पॉईण्ट बनवलेले असतात. लोकंही मस्त तिथे फोटो काढतात. तिथे तुम्हा दोघांचा छान कट आऊट लावा. लग्नाला आलेले लोकं त्यासोबत फोटो काढतील Happy

दिल्लीतल्या शॉपिंग बद्दल विचारतायत त्या.>> ओके. मी ते वाचले नाही. मला वाटले संपुर्ण भारतातले सांगत आहात. माझी लग्नाची शॉपिंग दुबई. कॅनडा, दादर आणि क्रॉफर्ड मार्केटला झालेली. बरेच फॅमिलीमध्ये लग्नाच्या शॉपिंगच्या जागा ठरलेल्या असतात आणि ईमोशनली बांधलेल्याही असतात. आताच्या मॉल्सना त्यात थारा नसतो.

ब्रायडल मेक अप खर्चिक प्रकार आहे. आमच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात तिने घेतलेल्या पैशाचा आकडा ऐकून पायथॉन व सी प्लस प्लस ऐवजी ब्रायडल मेक अप चा कोर्स करावा असे माझ्या मनात आलेले ! लग्न भर दुपारी आहे की संध्याकळी ?, हॉल ए सी आहे का ? लग्न उन्हाळ्यात आहे का? यावर ही अवलंबून आहे, जो मेक अप रात्री छान दिसेल तोच दिवसा छान दिसत नाही.

तिथे तुम्हा दोघांचा छान कट आऊट लावा. लग्नाला आलेले लोकं त्यासोबत फोटो काढतील Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष >>
कट आऊट सेल्फी पॉईंट वाली आयडिया भारी आहे..नक्की करणार
Thank you

by सीमंतिनी चांगला मुद्दा आहे मला सुद्धा आवडेल असे काही करायला..यावर पण नक्की विचार करेल की आपण काय करू शकतो आणि अमलात आणेल thank you..

पार्टीत माहौल बनवायचा असेल तर डान्स हवाच>> शादी हो और डांस नही शक्यच नाही मला सुध्दा डान्स ची भारी आवड आहे मी specially मेरे सैंया सुपरस्टार वर डान्स बसवून माहोल करणार आहे Proud

ब्रायडल मेक अप खर्चिक प्रकार आहे. आमच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नात तिने घेतलेल्या पैशाचा आकडा ऐकून पायथॉन व सी प्लस प्लस ऐवजी ब्रायडल मेक अप चा कोर्स करावा असे माझ्या मनात आलेले ! लग्न भर दुपारी आहे की संध्याकळी ?, हॉल ए सी आहे का ? लग्न उन्हाळ्यात आहे का? यावर ही अवलंबून आहे, जो मेक अप रात्री छान दिसेल तोच दिवसा छान दिसत नाही.

Submitted by vijaykulkarni>> मला सुद्धा मेकअप वर खूप खर्च करायची इच्छा नाही पण लग्न म्हंटल्यावर थोडफार करून घ्यावं लागेल..प्रयत्न केला होता मी पण मला मेकअप चांगला दिसत नाही जास्त Sad
लग्न रात्रीच आहे mostly February मधे होईल..पण बघू कधी ठरतंय अजून साखरपुडा नाही झाला Lol

अभिनंदन अमृताक्षर! लग्न ठरल्यापासून हनीमून पर्यंतचे दिवस भुर्र्कन उडून जातील. या दिवसात एकमेकाचा स्वभाव, आवडी निवडी जाणून घेणे महत्वाचे .

https://www.nytimes.com/2015/01/09/style/no-37-big-wedding-or-small.html... इथले प्रश्न एकदा वाचून त्यावर चर्चा करुन पहा .

हा धागा मी सगळ्यां लग्नाळू साठी काढलाय त्यामुळे बाकी सगळेजण पण आपले प्रश्न किंवा इतर काही विचारू शकता..

Pages