मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पहिल्या आठवड्यात मीरा जशी डोक्यात जायची तशी आता ती मीनल जायला लागले. तिला लवकरात लवकर बाहेर पाठवा.

आत्ता कलर्सच्या fb पेजवर वाचायला गेलेले, तर तिथे विशाल, विकास, मिनलला सपोर्ट जास्त दिसतोय.

पहिल्या आठवड्यात मीरा जशी डोक्यात जायची तशी आता ती मीनल जायला लागले. तिला लवकरात लवकर बाहेर पाठवा.
<<<
मिनल कि गायत्री ??
मिनलचा सपोर्ट समोरच्या निगेटिव टिम मुळे अचानक वाढलाय .

आज जय आणि गायत्री जिंकले. काल जसे विकास आणि विशाल जिंकले तसेच. मिनल आणि स्नेहा - मिरा मध्ये मिनल सारखी हाड हाड करते तसेच तिने मिठाची पिशवी दाताने फोडली म्हणून वादावादी झाली

आज काही काम धंदा नसल्यासारखं रँडम व्हिडिओ बघत होते. एकात या स्पर्धकांची शिक्षणं सांगत होते- स्नेहा, अक्षय, विशाल, आणि मीनल यांनी मास्टर्स डिग्री घेतलेली आहे म्हणे. डॉ उत्कर्ष बद्दल तो "डॉक्टर" म्हणून माझा एक वेगळाच समज होता पण तो मास्टर्स इन होमिओपथी निघाला! असोच Happy
गायत्रीने मनाली येथून माउंटेनिअरिंग मधे डिग्री घेतली आहे?? ( अँ? व्हिडिओ च्या विश्वासार्हतेबद्दल आता शंका येते आहे )

गायत्रीने मनाली येथून माउंटेनिअरिंग मधे डिग्री घेतली आहे??
>>थेअरी मध्ये पास झाली असेल.

हो त्या ‘डॉ’ उत्कर्षच्या डॉक्टरीचा सगळे उद्धार करत आहेत, टॉर्चर मधे मिर्ची चालते पण मीठ हानीकारक म्हंटल्यामुळे Biggrin
पुष्करला मेघा म्हंटली होती ना ‘नक्की पैसे देऊन डॉ झाला असणार’ ते आठवलं Rofl

उत्कर्ष grp निगेटिव्ह म्हणूनच पुढे येतोय, जाम नावं ठेवली जातायेत तिथल्या सर्वांना. बरं आहे एकंदरीत. याचा फायदा विशाल, विकास, मिनल, सोनालीला होईल. सुरेखाताईंना पण नावं ठेवतायेत.

विशाल विकास छान खेळतायत. विकासची बेल्ट डिसकनेक्ट करण्याची आयडिया खरच नियमान्च्या विरुद्द होती का? गायत्री आज छान खेळली. तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

मीरा शेवटी पूर्वपदावर आली.

सुरेखाताई ' ए टिम जिन्कावी' म्हणून हरल्या अशी कुजबूज होत आहे बी टिममध्ये.

शिवलीला इमेज बाहेर खराब झाली आहे म्हणून ती घराबाहेर पडली असावी. सुशान्तच्या बाबतीत अस केल होत बिबॉने.

बादवे, कॅप्टन्सी टास्क रद्द झाला म्हणे.

बादवे, कॅप्टन्सी टास्क रद्द झाला म्हणे.
<<
हो, मी सुद्धा पाहिली न्युज, गायत्री जय दोन्ही पैकी कोणीही कॅप्टन होऊ नये म्हणून टिम बी ने मुद्दाम रद्द करण्याच्या दृष्टीने प्लॅन केला म्हणे, बघु शनिवारी समजेल !

हो, मी सुद्धा पाहिली न्युज, गायत्री जय दोन्ही पैकी कोणीही कॅप्टन होऊ नये म्हणून टिम बी ने मुद्दाम रद्द करण्याच्या दृष्टीने प्लॅन केला म्हणे, बघु शनिवारी समजेल ! >>>>>>> हो. उद्या विकास आणि जयमध्ये फिजीकल राडा होणार आहे. प्रिकॅपमध्ये दाखवलय.

A टीम b टीम दोन्ही चांगल्या आहेत. सगळे गेम खेळायला आले आहेत. आपापल्या परीने/ वकुबाने खेळत आहेत. फक्तं काही स्पर्धकांना काही तरी कारणाने किंवा अजिबात आवडत नाहित या कारणास्तव विनाकारण शिव्या दिल्या जातात मुद्दामून त्यांच्या वागण्यात काही तरी खुसपट काढून वाटेल तस बोललं जातं ते चुकीचं आहे.

टिम बी प्रेक्षकांमधे नक्कीच पॉप्युलर झाली आहे पण युनिटी, टिम स्पिरीट, दंगा आणि व्हर्बल अर्ग्युमेन्ट्स करण्यात कमी पडली, मुळात त्या स्टुपिड सुरेखाचं ऐकल ही चूक, तिला सिनियॉरीट बद्दल रिस्पेक्ट वगैरे देण्याची गरज नव्हती , उगीच भावनेच्या भरात बसु दिलं तिला !
जय आणि गायत्रीने खर तर टास्क केलाच नाही , बाइक वर ‘बसून रहाणे’ आवशक होते, ते बाइक वर झोपले होते त्यामुळे खरं तर टास्क मधून ते बादच होते , पण टिम बी ने यावर ऑब्जेक्शन घेतल नाही !
सोनालीचा तर काहीही सहभाग नव्हता, यांची टिम फक्त ३ लोकांची होती !
एनिवेज तो उत्कर्ष तर कै च्या कै ऑब्जेक्शन घेत होता त्यामुळे तसही नसते जिंकली टिम बी !

विशाल-विकास फेमस होत आहेत. विकास नीट मुद्देसुद बोलतो आणि विशाल फेअर खेळतो. चीट न करता.
सोनाली आणि सुरेखा फिरतील असं दिसतय. सोनाली ने विशाल ला पकडुन राहवं तर तीचा टिकाव लागेल.
विशाल-विकास-सोनाली-मीनल एक चांगला ग्रुप बनु शकतील.
गायत्री-जय फुल बॉडीसुट घालुन आणि बाईक वर झोपुन होते त्यामुळे खुप फरक पडला. आणि उत्क्या ने हे नाही चालणार, ते नाही चालणार करुन हात बान्धुन ठेवले टीम बी चे.....गायत्री ने परवा डायरेक्ट तोंडावर डीओ मारला तेव्हा डॉ उत्कर्ष ना त्यात काहीही चूक नाही वाटलं..शेवटी बीबॉ ना सांगावं लागलं वापरु नका म्हणुन....डीओ च्या बाटलीवर स्पष्ट लिहिलेलं असतं की नाकातोंडात आणि डोळ्यात गेला तर सिरीअस मेडीकल इन्ज्युरी होउ शकते म्हणुन.....आणि काल मिठाचं पाणी डेंजर म्हणे...आयुष्यात कधी समुद्रात गेला नाही का हा माणुन...किंवा तिथले कोणीच कसं यावर बोललं नाही ? बेसिक मुद्दा आहे हा....
टीम बी च्या सोनाली आणि सुरेखा मुग गिळुन गप्प होत्या त्यामुळे टीम ए जास्त अग्रेसिव्ह झाली आणि विशाल-विकास दोघं लढुन लढुन किती लढणार....
टीम ए अग्रेसिव्ह आहेच..शिवाय आवाज पण आहे....प्लेयर म्हणुन भारी आहेत.....पण बायस्ड वागतात म्हणुन शिव्या खात आहेत...आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचं ते कार्टं असं झालय टीम ए च...
कॅप्ट्नसी साठी आज काय राडा आहे बघु

स्नेहा सुरवातीला आवडली होती, आता आवडेनाशी झालीय! एकवेळ मीरा परवडली पण गादा नको. तिला बिबॉ ने पीन काय मारली , इरिटेट करू लागलीय. तोंड झाकून बसली म्हणून पाण्याचे सपके बसले नाही! नाहीतर उठली असती.
विकास आवडलाच होता. विशाल-विकास- मीनल -सोनाली ही टीम आवडू लागलीय.

जय आणि गायत्रीने खर तर टास्क केलाच नाही , बाइक वर ‘बसून रहाणे’ आवशक होते, ते बाइक वर झोपले होते>>> ती त्यांची एक चांगली स्ट्रॅटेजी होती. पाणी मारताना जय फक्त मग चा वापर करत होता याउलट विशाल बादलीनेच जोरात पाणी फेकत होता त्यामुळे जय गायत्रीला दुखापत झाली असती. एकदा तर विशालच्या हातातून बादली सटकून गायत्रीला लागली. ती खाली होती म्हणूनच वाचली. नंतर कंटाळून हताश होऊन विकासाने काहीतरी खूपच घाण शिवी दिली. त्यावरून बराच गोंधळ झाला. बिगबॉस ने पण ते म्युट केलं. नंतर विकासने दोघांचा बेल्ट वेगळा केला. त्याला तो युक्तीचा वापर बोलत होता. ते खूपच हास्यास्पद होतं. तो याला युक्ती बोलून जे काही बिगबॉस ला अभिमानाने युक्तीचा वापर केला हे सांगत होता ते पाहून हा माणूस शाळेत पास कसा झाला असेल असा विचार मनात आला.

बेल्ट सेपरेट करणे खरच फन्नी होतं टॉर्चर अजुन अ‍ॅग्रेसिवली करायला हवं होतं पण हे येडे सुरेखाला प्रॉडक्त्स अ‍ॅप्रुव्ह करु देत होते आणि बाकी प्रॉडक्ट्स उत्कर्ष फिल्टर करत होता, गिव्हप करयला नको होतं टिम बी ने .
जिम मधली वेट्स अंगावर ठेवणे, वेट्स दोरीला बांधून मानेला लटकत ठेवणे वगैरे काहीच नाही केले.
गायत्रीवर बादली पडली असेल तर यांनीही काल दुसर्‍यांवर मग फेकले, अंडी फेकून मारली !
शिव्या वगैरे गोष्टींचा इश्यु केला तर या पब्लिकला बिगबॉस मधे रहायच्या पेशन्स नाहीये.
तो बहुदा उत्कर्षने केला, जय स्प्लिट्सविला मधून आल्याने बहुतेक नाही करणार शिव्यांचा इश्यु!
आस्ताद, राजेश,शिवानी, बिचुकले, सुरेखा पुणेकर पब्लिक तर अशक्य शिव्या द्यायचे , हिन्दी मधे तर विचारुच नका !

सोशल मीडियावर टीम a पुन्हा फेमस झाली आहे. मीनल, विकास, विशाल याना लोकं पुन्हा वाईट बोलत आहेत.-- ट्विटर,fb वर अनेक ग्रुप आहेत त्यातील पोल मध्ये तर टीम B खुप खुप पुढे आहे. एवढंच काय उत्कर्ष साठी आदर्श शिंडेला फेबुवर पोस्ट करावी लागली.त्यातही कमेंट section पाहा.

>>त्या स्टुपिड सुरेखाचं ऐकल ही चूक,
हो ते बोलला पण विशाल काल की ती चूक झाली आणि आता तो शिकतोय वगैरे!!

जय आणि गायत्री चांगले टिकून राहिले आणि टास्क संपल्यानंतर गायत्रीने विकासला दिलेले खुन्नसवाले उत्तर पण भारी!
टीम बी ने वापरलेली जोडी सोडवण्याची युक्ती मला तरी आवडली.... ते काही ना काही लूपहोल शोधत होते पण त्यांनी नंतर बसून न राहता काही ना काहीतरी प्रयत्न करत रहायला हवे होते.
मीरा अचानक आवडायला लागलीय आणि स्नेहा आवडेनाशी होतेय!!

बहुदा या वीकेंडच्या चावडीवर टीम बी चे कौतुक होईल फक्त सुरेखाताईंना आणि आविष्कारला कानपिचक्या मिळतील..... गायत्रीचे कौतुक होईल!!
अक्षय दिसतच नाहिये त्याबद्दल त्याला बोलले जाईल.... मीरा, स्नेहा परफॉर्मन्सवाइज ओक्के ओक्के!! (अर्थात अजुन एक दिवस व्हायचाय म्हणा)
तृप्ती आणि दादूसचा वावर चांगला आहे!

उत्कर्षबद्दल काय बोलतायत ते ऐकायचेय..... त्याने उघडउघड पार्शिएलिटी केली पण मुद्दे बऱ्यापैकी शांतपणे मांडले आणि मुख्य म्हणजे दोन्ही टीमचे म्हणणे तो नीट ऐकून घेत होता!!

तो मीठाचा पॉइंट मात्र काहीच्या काही होता..... लोक सॉल्टवॉटर ने मुद्दाम आंघोळ करतात आणि हा शहाणा म्हणतो की ते हानिकारक आहे म्हणून!!

हस्ताय काय. खरच आहे. आमच्या शेजारी कालच सासू सुनेच भांडण झालं तेव्हा सासू सुनेला बोलली त्या मीनल सारखी तोंड चालवू नको हात पण चालव जरा. सून सासूला बोलली तुम्ही पण सुरेखा ताईंसारखी सिनीअरीटी दाखवू नका. सिनिअर असल्यासारख्या वागा जरा.

तुम्हाला जे सोशल मीडियावर दिसतंय की टीम बी चांगली आहे ते चुकीचं चित्र उभं केलं आहे. अनेक फेक अकाऊंट ओपन करून टीम ए ला बदनाम केलं जात आहे. टीम ए बेस्ट आहे.

टिम ए ला व्हरच्युअल जोडे पडतायेत , बाकी फेमस म्हणायचं तर जय आहेच फेमस आणि स्ट्राँग .
त्याचे बाकी टिममेट्स ट्रोल होतायेत जसे राजेश रेशम सुशान्त झाले होते .
जयला फरक नाही पडत ट्रोल झाल्याने, टॉप २ मधे तो असणारच आहे इतक्या फॅन फॉलॉइंग आणि इन्फ्लुअन्सर्स च्या सपोर्टमुळे !

टास्क संपल्यानंतर गायत्रीने विकासला दिलेले खुन्नसवाले उत्तर पण भारी!
<<
पण हे तो स्नेहा मीराला म्हंटला होता कि तुम्ही दोघी बसा पहिल्या कारण त्या दोघी व्हर्बल अब्युज करत होत्या .
गायत्रीचा काही संबंध नव्हता खर तर !

मला गायत्री दातारची वैशाली माडे होईल अस वाटत आहे.गायत्रीला ट्रोल तर.केल जातच आहे,पण वैशालीसारख्याच प्रचंड निगेटिव्ह कमेंट्स मिळत आहेत.जस वैशालीला बहुतेक बाहेर काय चालू आहे ते कळल असाव म्हणून जियच्यि दोन आठवडे आधी ती पूर्णपणे लॉस्ट होती.
तसच गायत्रीच होऊ शकत,आणखी पुढचे तीन चार आठवडे हे असच राहिल, तर बाहेरच्या परिस्थितीची समज देत असावेत.
सुधारली तर ठेवतील,जसा आस्ताद बबर्यापैकी सुधारला आणि राहिला ,फण सुशांतला काढल होत बाहेर, अगदी शराजेशला पण काढल होत बाहेर
शिवलीला पण त्याच कारण्यासाठी काढल्याची चर्चा आहे.
पण कालच्या टॉर्चर टास्क मध्ये ना टीम ए जिंकली ना टीम बी जिंकली,जिंकले ते बिबॉस।
कुठेही नसणार्या ,चाचपडणार्या विशाल आणि विकासला एकदम विनिंग रेसमध्ये नेऊन ठेवल.आता काय हे मागे फिरून बघणार नाहीत.
ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास, तो सफल झाला.
आता नेक्सट मूव्ह बिबॉसचा काय आहे ,बघू.

Pages