Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
शिव बैलबुद्धी होता.. वीणा शिव
शिव बैलबुद्धी होता.. वीणा शिव रोमान्स मुळे जिंकला तो...
विशालचे सोनालीबरोबर
विशालचे सोनालीबरोबर जुळवण्याचे प्रयत्न चालू झालेले दिसले
हो chraps बरोबर आहे. आणि
हो chraps बरोबर आहे. आणि लोकांना तो भोळा का वाटायचा ते अजून समजलं नाही. रोडीज मध्ये त्या राखीच्या पाठीमागे लागून आपल्याच टीमचं नुकसान केलं होतं. त्या शो ची अँकर पण बोलली होती शिव येडा बनून पेढा खातोय. मुद्दामून भोळेपणाचा आव आणायचा तो. पण हेही खरं होत की त्या सीझनमध्ये त्याच्यापेक्षा चांगला स्पर्धक न्हवता.
जय विशालचे confidence बद्दल
जय विशालचे confidence बद्दल आभार मानत होता,पण त्याला depression द्यायचं याबद्दल प्लॅनिंग पण करत होता.
शिव बैलबुद्धी होता.. वीणा शिव
शिव बैलबुद्धी होता.. वीणा शिव रोमान्स मुळे जिंकला तो... >>>> agree
शनीवारचा म मां च्या चावडीचा
शनीवारचा म मां च्या चावडीचा भाग आज बघितला. छान होता.
अविष्कारला जीम कर सांगितलं ते चुकीचं नव्हतं पण बॉडीशेमिंग आधी दोन तीनदा उगाच केलं.
अविष्कार आणि गायत्री अजिबातच आवडत नाहीयेत मला. गायत्रीने आवर्जून सांगितलं तिलाही डोकं आहे, बोलण्यात पुढे मीरा दिसत असली तरी, हाहाहा.
शिव बैलबुद्धी होता.. वीणा शिव रोमान्स मुळे जिंकला तो... >>> मला असं नाही वाटत, त्याचे स्वतःचे फॅन्स खूप होते त्यामुळे वोटींग त्याला जबरदस्त होत होतं. एक इनोसन्स होता त्याच्यात आणि शिव वीणा फॅक्टर आहेच, ज्याचा दोघांना उपयोग झाला पण तो अनेक फॅक्टरमधला एक फॅक्टर वाटतो मला.
गायत्री का कुणास ठाऊक पण
गायत्री का कुणास ठाऊक पण अजिबात आवडत नाही. स्नेहाला काय धमकी देत होती संबंध बिघडतील वगैरे, जशा काही नणंद भावजयाच आहेत स्नेहालाही कसं रिऍक्ट व्हावं काही कळत नव्हतं इतकं ते बालिश होतं. सोनालीशी काय कचाकचा भांडत होती, म्हणे माझ्या स्माईलचे फॅन आहेत. एकंदर जय, मीरा, गायत्री या भांडखोर लोकांचा ग्रुप आहे. शिवलीला फार इमेज जपणारी वाटते. अविष्कार इतका घाबरून आहे की ही त्याच्यासाठी मोठी संधी असावी परत करिअर चालू करायची असे वाटते. सुरेखाच्या तोंडावर बारा वाजलेले असतात हे अति वाटले. टोमणे गाणी मध्ये मध्ये फारशी समजली नाहीत.
अविष्कारने फिटनेसकडे मात्र
अविष्कारने फिटनेसकडे मात्र लक्ष द्यायला हवे, बॉडीशेमिंग नाही करत पण त्याच्याकडे बघवत नाही अजिबात. गायत्री फार कोणाला आवडत नाही खरं तर पण लवकर जाईल अस वाटत नाही. हे दोघे लवकर जायला हवेत खरंतर.
मला आठवतंय मागच्यावेळी धनूडी,
मला आठवतंय मागच्यावेळी धनूडी, भरत, शुगोल हे कमेंट्स लिहायचे इथे. यावेळी बघत नाहीयेत का.
गायत्री सांगत होती ना, की
गायत्री सांगत होती ना, की चेहरा मीराचा आहे पण त्यामागे डोकं दोघींचं आहे..तेव्हा 3 idiots मधलं...बोल तो वो रहा है पर शब्द मेरे है आठवलं. फारच बावळट आहे ती.
गायत्री सांगत होती ना, की
गायत्री सांगत होती ना, की चेहरा मीराचा आहे पण त्यामागे डोकं दोघींचं आहे..तेव्हा 3 idiots मधलं...बोल तो वो रहा है पर शब्द मेरे है आठवलं. फारच बावळट आहे ती.
<<<<
खरय, असही नाही कि चांगल्या गोष्टीचं क्रेडित घेतेय, म.मां उलट मीराला रागवत होते आणि गायत्री म्हणे माझही डोकं होतं त्यात
>>बोल तो वो रहा है पर शब्द
>>बोल तो वो रहा है पर शब्द मेरे है आठवलं.
मेधावि :लोल:
मेधावि
बोल तो वो रहा है पर शब्द मेरे
बोल तो वो रहा है पर शब्द मेरे है आठवलं. फारच बावळट आहे ती. >> हा हा हा.... अगदी...
स्नेहा ला कळतच नव्हतं की तिला नक्की काय म्हणायचय ते असं वाटलं....
गायत्री ओठाला ओठ न चिकटवता (स्वतःच्या ) जे काही बोलते ते काहीही ऐकु येत नाही....नुसतच कुचुकुचु....
तॄप्ती ने उगीच शिवलीलाशी भांडण उकरुन काढलं. बहुतेक बिबॉ ने आधीच सांगितलं होतं की कोणाच्या फोटो शी काय बोला....नवीन कंटेंट देण्यासाठी.
जय आणि मीनल मधे जोरात पंगे होणार आहेत पुर्ण सिझन भर असं दिसतय...
अविष्कार परत एकदा स्नेहा शी फ्लर्ट करायचा प्रयत्न करतोय का ? मला समजुन घ्या वगैरे बोलत होता कानात.
स्नेहा खरच डीसेंट आणि गोड वाटली वीकेंड एपिसोड मधे. तिच्याबद्दल घरच्यांची मतं अजुनतरी चांगली आहेत. जय आणि विशाल ला टास्क साठी आपल्या बाजुला घेउ शकली आणि मेघा सारखं नीट स्टंड घेउ शकली तर खुप पुढे येइल. टास्क पण चांगले खेळली पाहिजे.
आज नुसता टाइमपास होता, न
आज नुसता टाइमपास होता, न बोलणार्यांना बोलकं करायला !
शिवलीला तृप्ती उगीच वाद घालत होत्या .
विशाल वि. जय , विशाल वि. उत्कर्ष पुन्हा प्रयत्नं केला गेला पण फार काही घडलं नाही , अनपेक्षितपणे पुन्हा एकदा जय-मिनल वाद मात्रं पेटला !
पुढच्या आठवड्यात सतत जोडीने फिरणे प्रकार आहे , बघु काही अन्युज्वल जोड्या करतात का !
( आह जस्ट होप जय-गायत्री जोडी करु नये )
काल संगीत मुकाबला अगदीच
काल संगीत मुकाबला अगदीच एकतर्फी झाला!!
उत्कर्ष आणि टीमचे सवाल-जवाब एकदम ॲप्ट होते..... एकेकाची गुणवैशिष्ट्ये एकदम चपखल बसवली होती गाण्यात..... त्यातही मीनल, शिवलीला आणि सोनालीबद्दल गाताना "तीन तिघाडा, काम बिघाडा" आणि सुरेखा, तृप्ती आणि स्नेहाबद्दल गाताना "तिघींनी केलीय धम्माल" असा बदल एकदम चातुर्याने केला उत्कर्षच्या ग्रूपने.
त्यापुढे दादूस आणि टीमचा परफॉर्मन्स एकदम फुसका होता.... निम्मे शब्दच कळत नव्हते!!
कानउघाडणीत सुरेखाताईंनी सोनालीची मिमिक्री छान केली, तृप्तीने उगाच काहितरी आपले कीर्तनकार, प्रबोधन करा वगैरे अपेक्षा घुसडल्या पण शिवलीलाने चांगलेच डिफेंड केले. मीनलने जयवर राग काढल्यावर जय डबल आग ओकेल असे वाटलेले पण त्याने शिवलीलाला सल्ला देवून मांजरेकरांनाच गुगली टाकला (अनुल्लेखाने अपमान तो बहुतेक मायबोलीवर शिकला असावा) आणि मीनलला ते जास्त लागले असावे.
गायत्रीने सोनाली सोयीस्कर भाषेचा बाज बदलते तो मुद्दा मस्त पकडला आणि गायत्रीच्या दातावरच्या टिपण्णीचा विषय सोनाली जेंव्हा अक्षयला, स्नेहाला मध्ये घेऊन फिरवत होती तेंव्हापण गायत्रीने तिला बरोबर पकडले.
स्नेहाने अविष्कार च्या ऐवजी सोनालीला सुनावले आणि अविष्कार मीराला सुनावेल अशी अपेक्षा असताना त्याने स्नेहाला विनवणी केली.
बाकी ते मांजरेकर म्हण्टल्यानंतर मला खरच अविष्कार दिलिपकुमारसारखा दिसायला लागला
चुगल्यांमध्ये काही फारसा दम नव्हता.... त्यामुळे त्या टास्कमध्ये मजा नाही आली.
एकुणात पहिला आठवडा आणि वीकांताची चावडी झाल्यानंतर असे वाटतेय की जय, मीरा आणि उत्कर्ष योग्य ट्रॅकवर आहेत, गायत्री आणि स्नेहाला हळूहळू आवाज फुटतोय, तृप्ती आणि सुरेखा पुरेश्या आक्रमक असल्या तरी कुठला ग्रूप पकडायचा का आपलाच ग्रूप तयार करायचा याचा अजुनही अंदाज घेतायत. अक्षय आणि विकास अगदीच दुर्लक्षित होते त्यांना काहीतरी चमकदार करावे लागेल. सोनाली आणि मीनलने पंगे घेउन चर्चेत राहण्याची पुरेशी काळजी घेतलेली आहे, शिवलीलानेही तृप्तीला तोडीस तोड उत्तर दिले आहे. अविष्कार जय-उत्कर्ष-मीराच्या ग्रूपला लटकण्याचा प्रयत्न करतोय. दादूस ओकेओके आहेत; त्यांचा कुणाला थ्रेट वाटत नसल्याने सगळ्यांच्या गुडबुक्समध्ये आहेत ते!
विशालला बहुतेक काय विचारतायत आणि काय बोलायचेय ते चटकन समजतच नाही. बऱ्याचदा गोंधळलेला असतो तो!!
जय-उत्कर्ष-मीरा-गायत्री यांचा एक कोअर ग्रूप तयार होताना दिसतोय. दुसरा ग्रूप कुठला तयार होतोय ते बघायची उत्सुकता आहे.
सोनाली विरुध्द गायत्री आणि सुरेखा
जय विरूध्द मीनल
तृप्ती विरुद्ध शिवलीला
स्नेहा विरुद्ध अविष्कार
विशाल विरूध्द उत्कर्ष
असे ऐवीतेवी खटके उडालेच आहेत तर त्यांच्याच जोड्या बनवून बिगबॉसने पुढच्या आठवड्यात खेळवावे.... मस्त कंटेट निघेल!
पण प्रोमोमध्ये जे काही दिसले त्यानुसार जोड्या वेगळ्याच दिसतायत!!
एकुणात चांगला झाला हा आठवडा.
नवीन Submitted by स्वरुप on
नवीन Submitted by स्वरुप on 27 September, 2021 - 12:36>>>>>>+१
छान आढावा घेतला आहे.
नमस्कार,
नमस्कार,
छान डि्स्कशन, काल म मां सगळ्यांना म्हणाले की जरा बरे रहात जा, छान दिसा, लोकं तुम्हांला बघतायत, नाक्की कोणाकोणाला म्हणाले असावेत???
आह जस्ट होप जय-गायत्री जोडी
आह जस्ट होप जय-गायत्री जोडी करु नये>>>> हीच जोडी आहे
यंदा छान छान कपड्यात फारसं
यंदा छान छान कपड्यात फारसं कुणी दिसतंच नाही. स्नेहाच जरा छान होती काल.
दोन मुलं उघडीच असतात कायम.
सुरेखा ठीकठीक, सोनाली, मीनल ओके टाइप्स
शिवलीला तृप्ती युनिफाॅर्मात
गायत्रीनं काहीही घातलं तरी ते बदकच दिसतं.
मीराचे कपडे चांगले असतात पण अति घट्ट आणि उत्तेजक आणि तिच्या चेह-यावर सतत इतरांप्रती तुच्छता असते म्हणून तिचा रागच येतो सारखा.
बाकी उत्क्याचे कपडे कोणीतरी हायफाय डिझायनरनं डिझाईन केलेले आहेत म्हणे पण असं काही खास जाणवलं नाही.
गायत्रीनं काहीही घातलं तरी ते
गायत्रीनं काहीही घातलं तरी ते बदकच दिसतं.<< अगदि अगदी ...
गादाला काल मांजरेकरांनी सुनावल्याबरोबर एकदम जोशातच आली. . अन स्नेहाशी काहीतरी उकरुन वाद कराय्ला लागली.
जय उत्कर्षला सांगत होता की एक
जय उत्कर्षला सांगत होता की एक कपड्याचा ब्रॅंड स्पिट्सव्हिलाच्या आधी त्याचे कपडे स्पॉन्सर करायचा पण स्प्लिट्सव्हिला नंतर जयने त्या ब्रॅंडबरोबर करार केला आणि त्याला ब्रॅंडींगचे पैसे पण मिळायला लागले का असे काहितरी...... त्याने हळूच चिकटपट्टी काढून उत्कर्षला तो ब्रॅंड दाखवला!!
जय सांगत होता की तो टीशर्ट वाळत घातलेला असताना त्याच्यावर रंगाचे बारीक कण उडालेले आणि त्याच्या insta वरच्या एका पोस्टमध्ये ते ब्रॅंडच्या माणसाला दिसले तर लगेच त्यांनी जयसाठी सेम नवीन टीशर्ट पाठवून दिला वगैरे वगैरे!!
जय सांगत होता की तो टीशर्ट
जय सांगत होता की तो टीशर्ट वाळत घातलेला असताना त्याच्यावर रंगाचे बारीक कण उडालेले आणि त्याच्या insta वरच्या एका पोस्टमध्ये ते ब्रॅंडच्या माणसाला दिसले तर लगेच त्यांनी जयसाठी सेम नवीन टीशर्ट पाठवून दिला वगैरे वगैरे!! >> हे कधीझालं?
(No subject)
गायत्रीनं काहीही घातलं तरी ते
गायत्रीनं काहीही घातलं तरी ते बदकच दिसतं.<< अगदि अगदी
अशा गुबुगुबू ला आता परत संचालक म्हणून नेमू नका परत
ती सोनाली विभाजित व्यक्तिमत्व
ती सोनाली विभाजित व्यक्तिमत्व विकार(split personality disorder) झाल्यासारखी वागते. मधेच कोल्हापूरी होते.
पहिल्या सिजनमधे स्मिताचे कपडे छान असायचे तशी तयारी कोणाची दिसली नाही.
>>हे कधीझालं?
>>हे कधीझालं?
एपिसोडमध्ये नव्हत का?
मग मी voot select किंवा Voot वर online असते तिथे बघितले असेल बहुतेक!!
आह जस्ट होप जय-गायत्री जोडी
आह जस्ट होप जय-गायत्री जोडी करु नये>>>> हीच जोडी आहे >>> अरेरे.
या सिझनमधे फार लक्षवेधी असं
या सिझनमधे फार लक्षवेधी असं कुणी दिसत नाही. माझा पास. यूट्यूबवर बघितलं मांजरेकर ओरडत होते कुणाला तरी. विचित्र ओरडतात. "कहना क्या चाहते हो" असं वाटतं.
या आठवड्यात जोड्यांचा टास्क
या आठवड्यात जोड्यांचा टास्क आणी टॉर्चर टास्क आहे. राडा व्हायला कारणे भरपूर
जोड्या - विशाल -विकास , तृप्ती -दादुस, सुरेखा-सोनाली, स्नेहा -मीरा, जय- गायत्री, मीनल-शिवलीला-आविष्कार, अक्षय-उत्कर्ष
जय, गायत्री, विशाल, विकास, शिवलीला, मीनल, आविष्कार हे नॉमिनेटेड आहेत असे ऐकले.
हे खरं असेल तर मग शिवलीलाच जाईल असे दिसते.
Pages