ज्यांना लेख वाचायला बोअर होईल त्यांनी थेट विडिओ बघितला तरी चालेल.
National Hair Day - 1 October - ऋन्मेष Runmesh
लिंक - https://www.youtube.com/watch?v=T5lkycN3k18
------------------------------------
ऐंशीचे दशक असावे. एका प्रसूतिगृहात ऑपरेशन थिएटरबाहेर शशी कपूरसारखा दिसणारा कुरळ्या कुरळ्या केसांचा एक युवक येरझार्या घालत होता. येणारा बालक अमिताभसारखा जन्माला यावा अशी त्याची ईच्छा होती. बालकाला स्वतःला कदाचित शाहरूखसारखे निपजावे असे वाटत असावे. पण डॅम ईट, तेव्हा मुलांच्या ईच्छेला विचारतेय कोण?
बालक जन्माला आले तेच तब्बल ४.५ किलो वजनाचे. जयच्या जागी वीरू आला.. कि गब्बर झाला?? तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये कोणाला आत शिरायची परवानगी नसायची. त्यामुळे बालक ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येण्याआधी दोन वार्ता आतून बाहेर आल्या. पहिली म्हणजे पेढे वाटा, मुलगा झाला आणि दुसरी म्हणजे ४.५ किलोचा वरवंटा झाला, आता त्यानेच पेढे वाटा.
घरच्यांना मात्र सुदृढ बालक जन्माला आले याचा कोण आनंद झाला. पण ऑपरेशन थिएटरात मात्र वेगळीच धांदल उडाली होती. डोक्यावरचे घनदाट केसांचे जंगल पाहून कोण हे जंगली बालक निपजले असे सर्व नर्स आपापसात कुजबूजू लागल्या. ईथे मातोश्री सिझरींग झाल्याने मुर्च्छितावस्थेतच होत्या. त्यांनी डोळे उघडून बघावे आणि पुन्हा मुर्च्छितावस्थेत जावे अशी कोणाचीही ईच्छा नव्हती. त्यामुळे आतल्या आतच एक कट रचला गेला. नवजात शिशुचा कोणाच्याही परवानगीशिवाय हेअर कट केला गेला. आता बालकाचे सुधारीत वजन भरले तब्बल ३.२५ किलो. लावा हिशोब!
या जगात आलो ते पहिल्याच दिवशी मी माझ्या आयुष्यातील पहिली केसांची कुर्बानी दिली. ते देखील अगदी तासाभराच्या आत. पण पुढे एका मराठमोळ्या मध्यमवर्गीय घरातील कर्ता पुरुष म्हणून जगताना आयुष्यभर मला हा त्याग करायचाच आहे याची तेव्हा मला कल्पना नव्हती.
एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल, पण या ऋन्मेषचे केस नाही. असे टोमणे ऐकण्यातच माझे बालपण गेले. कितीही कापले तरी दाटीवाटीने पुन्हा वाढायचे. पुर्ण टक्कल मी करू द्यायचो नाही. आणि दर महिन्याला केस कापावे असे तेव्हा घरच्या परिस्थितीमुळे बजेट नसायचे. त्यामुळे शाळेत गेले की वॉचमनपासून बाईंपर्यंत आणि मॉनिटरपासून वर्गमित्रांपर्यंत, सारे जण माझे केस मुठीत पकडून गदागदा हलवायचे. आणि मला शाळेचे शिस्तीचे नियम सांगायचे.
केसांची वाढ जास्त होती ही खरे तर समस्या नव्हती, पण ते दाट होते ही खरी अडचण होती. त्यामुळे न्हावी सुद्धा नेहमी माझ्यावर डाफरायचा. तुझ्यामुळे माझ्या कात्रीची धार जाते म्हणून ओरडायचा. तुझ्या केसांत माझे कंगवे हरवतात म्हणून चिडायचा. त्यामुळे केसांचा कुठला स्टायलिश कट मारणे दूरची गोष्ट, जे पहिला हाताला वा कात्रीला लागतील ते सटासट कापत सुटायचा.
पाण्याचा स्प्रे नाही तर तांब्यातांब्याने पाणी ओतायचा. केस कापून झाल्यावर तो केसपाण्याचा चिखल झाडू घेऊन मलाच साफ करायला लावायचा. माझ्या केसांचे कापण्याआधी सलूनवाला फोटो काढायचा. तो Before Cut म्हणून लाऊन सोबत After Cut म्हणून दुसर्या एखाद्याचे डोके दाखवायचा. पण त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवायचा. कारण त्यातले पहिले डोके म्हणजे माझे केस त्या सलूनच्या पंचक्रोशीत कुप्रसिद्ध होते. मी केस कापायच्या खुर्चीमध्ये वा रांगेत बसलो आहे हे पाहून मागाहून आलेले गिर्हाईक तिथेच थबकायचे. एक छोटीशी झोप काढून येऊया म्हणून आल्यापावली परत फिरायचे. ते बघून न्हावी अजून चरफडायचा. कारण त्यामुळे त्याचा धंदा जायचा. तुझ्यापेक्षा रावणाची हजामत करणे परवडेल असे बोलायचा. कारण केस कितीही आणि कसेही असले तरी हेअरकटचा रेट दरडोई ठरलेला असायचा.
न्हावी तरी परका होता. मित्रांमध्येही माझे केस टिंगलटवाळीचाच विषय होते. झिपर्या हे माझे टोपणनाव होते. माझ्या केसांची तुलना भांडी घासायच्या किशीपासून आपल्या काखेतल्या केसांपर्यंत करणे हा त्यांचा छंद होता. मारामारी झाली की सर्वात पहिले माझे केस धरले जायचे. ते खेचले की माझी मानगूट आयतीच हातात यायची. पण वयात येऊ लागलो तसे भलतेच प्रेमळ अनुभव येऊ लागले. ज्या मित्रांना गर्लफ्रेंड नव्हती ते बसल्याबसल्या माझ्या केसांतून हात फिरवत राहायचे. पण माझे दुर्दैवही असे की जोपर्यंत त्यांचा हात मनगटापर्यंत आत जाऊन अडकायचा नाही तोपर्यंत मला ते कळायचेही नाही.
मित्र तरी बाहेरचे होते. घरातही फार काही चांगली वागणूक मिळायची नाही. दुसर्या घरांमध्ये पोरगा पावसात भिजून आला की त्याला पहिले टॉवेल देत असावेत. मला दाराबाहेरच थांबवून भांडे हातात द्यायचे. आणि त्यात केस पिळून घ्यायला लावायचे. तुझ्या केसांच्या तेलपाण्यावर खर्च करतोय म्हणून बोलून दाखवायचे. आणि परीक्षा नसतानाही अभ्यास करायला लावायचे. टक्कल कर, टक्कल कर, म्हणून मागे लागायचे. त्या केसांच्या टोपल्यामुळे डोक्यात काही शिरत नाही म्हणून शिमगा करायचे.
कधी त्यांच्या पहिल्या हाकेला ओ न दिल्यास त्याला जबाबदार माझे कानावर आलेले केसच असायचे. तर कधी घरातली एखादी वस्तू मला न सापडल्यास त्यालाही कारणीभूत माझी डोळ्यांवर आलेली जुल्फेच असायची. घरी कोणाला आपला कंगवा सापडला नाही तर उगाच माझ्या केसांत हात आणि डोके खुपसून शोधून जायचे. ऊठसूठ तुझे लग्न शमशूद्दीन न्हाव्याच्या पोरीशीच लावायला हवे अशी धमकी द्यायचे. आणि त्याच्या कधीही न पाहिलेल्या मुलीच्या जागी त्याचाच चेहरा डोळ्यासमोर येऊन माझ्या पोटात गोळे यायचे.
कदाचित केस दाट असणे ईतकीही मोठी समस्या नसावी. ते कित्येकांचे असावेत. पण त्यांची वाढ सरळ न होता एकमेकांच्या वाकड्यात शिरून होत असल्याने, ते व्यवस्थित विंचरता न येणे ही खरी माझी समस्या होती. आंघोळ करून बाहेर आल्याआल्या पहिल्या दोनेक मिनिटात केस न पुसता ओलेओले असतानाच मी जे काही विंचरून घ्यायचो ती माझी त्या दिवसभराची हेअरस्टाईल असायची. जी संध्याकाळ होता होता आणखी गुंतागुंतीची आणि घट्ट होऊन जायची, जिला मग धक्का लावणे अशक्य व्हायचे.
मी शाळा कॉलेजात असताना बरीच मुले मागच्या पाकिटात एक छोटासा कंगवा ठेवायचे. वॉशरूममध्ये तो मागच्या खिशातून स्टाईलमधून काढून केसातून हलकासा फिरवून केसांचा कोंबडा सेट करणे ही तेव्हा उच्चकोटीची स्टाईल समजली जायची. माझ्या केसांसाठी तो कंगवा वापरणे म्हणजे करकोच्याने बशीतून चहा पिण्याचा प्रकार होता. पण तरीही एकदा त्या स्टाईलची अॅक्टींग करायचा मोह न आवरल्याने मी मधल्या सुट्टीत एका मित्राचा कंगवा हळूच चोरला होता. मग काय. तो घेतला, तो फिरवला, तो अडकला!
बरे, तो अडकलाही अगदी सुरुवातीलाच की निघतही नव्हता आणि लपवावे तर फार आतही जात नव्हता. तसाच तो कपाळावर केसांच्या बटेसह झुलत होता. एखाद्याच्या केसांमध्ये चिकटलेले च्युईंगम प्रयत्न करता निघावे पण माझ्या केसातला कंगवा निघत नव्हता. अखेर त्या कंगव्याच्या लांबी एवढ्या जागेतील केस कापूनच तो काढावा लागला. त्यानंतर पुढचा केस कापायचा दिवस उजाडेपर्यंत तोच माझा कट होता. कारण आम्हा मध्यमवर्गीय घरांमध्ये महिन्याचे बजेट फिक्स असायचे.
पुढे मी जॉबला लागलो तेव्हा आमची आर्थिक परीस्थिती सुधारली. वेळच्यावेळी वा हवे तेव्हा केस कापायची कुवत आली. पण हवे तसे कापू शकत नव्हतो. कारण केसांचे जे जंजाळ होते त्यातून कुठलीही हेअरस्टाईल उगवणे अशक्यच होते. आणि अश्यातच crohn's disease नावाचा सवंगडी माझ्या आयुष्यात आला. आणि तुम्हाला तर माहीतच असेल,
Evidence shows a link between Crohn's and the autoimmune disorder known as Alopecia Areata, which causes sudden hair loss when your immune system attacks your hair follicles leading to coinsized patches of hair falling out....
मातृभाषेत सांगायचे झाल्यास या आजारामुळे माझे बरेपैकी केस गळून गेले. पण होत्याचे नव्हते नाही झाले. तर जे अतिरीक्त मला नकोच होते ते गेले. मी माणसात आलो. शिल्लक केसांना आता जास्त चटईक्षेत्र उपलब्ध झाले. केसांच्या शेंड्यांना मोकळा श्वास घेता येऊ लागला. वार्यासोबत ते फडफडू लागले. त्यावर हलकेच सोडलेले तेलाचे ओघळ आता मूळापर्यंत जाऊ लागले. आधी जरा वाढताच एकमेकांचे गळा धरणारे केस आता स्वतंत्रपणे वाढण्यास सज्ज होते. पण हाय रे दैवा........
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत...
केस आहेत तर कंगवा नाही, कंगवा आहे तर केस नाहीत...
पण आज माझ्याकडे केस, कंगवा आणि माँ .. सारे काही होते.
नव्हती ती केस वाढवायची परवानगी.
मी एका एमेनसीत कामाला लागलो होतो. सोफेस्टीकेटेड वातावरण आणि देशी परदेशी क्लायंटसोबत उठबस. त्यामुळे नीटनेटकेपणा बाबत पुरेसे शिस्तीचे असलेले एचआर पॉलिसीचे नियम. ज्यात लांब वाढलेल्या केसांना कुठलेही स्थान नव्हते. जिथे C फॉर Cool नाही तर C फॉर Concrete होते. S फॉर Style नाही तर S फॉर Steel होते.
अजून काही वर्षे अशीच गेली. केस वाढवायला मिळावेत केवळ ईतक्यासाठीच जॉब सोडावा अशी स्थिती नव्हती. अन्यथा बायका पोरे आणि केसांसह रस्त्यावर आलो असतो. आज न उद्या, हा आजार आपले शिल्लक केसही संपवणार आणि मनसोक्त केस वाढवणे हे आपले स्वप्नच राहणार, हे टकले सत्य मी हळूहळू स्विकारले होते.
पुढे दोन मुले झाली. एक मुलगी आणि एक मुलगा झाला. मुलाचे लांबसडक सिल्की केस पाहून मनोमन ठरवले. आपण याच्या केसांचा कंगवा बनायचे. त्यांना आधार द्यायचा, त्यांना वळण द्यायचे. आपले केस वाढवायचे अधुरे स्वप्न आता याच्या डोक्यावर पुरे होताना बघायचे. पण कसले काय. पोरांचे दोन्ही आज्जी आजोबा त्यांच्यावर आपला पहिला मालकी हक्क राखून होते. लहान मुलांचे केस वाढवायचे नाहीत हे संस्कार अजूनही आमच्या घरात शाबूत होते. ना मला वाढवता येत होते ना त्यांचे वाढवू शकत होतो.
आणि मग एक दिवस कोरोना आला आणि लॉकडाऊन लागला...
वर्क फ्रॉम होम आले. सलून बंद झाले. घरबसल्या केसांचे छप्पर रपारप वाढू लागले. आधी चापून चोपून तेल लावणे, मग हेअरबॅंड घालणे, मग वेणी बांधणे.. बघता बघता केसांची केस डोक्याबाहेर गेली.
कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की जो काळ जगासाठी वा मनुष्यजातीसाठी एखाद्या दु:स्वप्नासारखे विसरून जावे असा असेल तो माझ्यासाठी काही स्वप्नपुर्तीचे क्षण घेऊन येणारा असेल.
थोडे केस माझे वाढवले, थोडेसे आपसूक मुलाचेही वाढले. उद्या पुन्हा जनजीवन सुरळीत होता, ऑफिस पुन्हा पहिल्यासारखे चालू होता आपल्याला पुन्हा केसांवर कात्री चालवावी लागणार याची कल्पना होती. त्यामुळे या दिवसांची आठवण म्हणून या काळात बरेच काही फोटो काढले. एक विडिओ मुलासोबतही काढला. क्या पता..! फिर दोनों के ये बाल, कल हो ना हो..
बस्स तोच विडिओ येत्या नॅशनल हेअर डे (१ ऑक्टोबर) च्या निमित्ताने शेअर करतोय
केसांची रोज काळजी घ्या. केस कसेही का असेनात, केसांना लाजू नका. माझे केस माझा अभिमान ही भावना मनात कायम बाळगा. देवाने त्यांना आपल्या शरीरात सर्वोच्च स्थान दिले आहे त्याचा आदर ठेवा. वगैरे वगैरे संदेश मी या निमित्ताने देऊ ईच्छितो
विडिओ खालील लिंकवर बघू शकता.
National Hair Day - 1 October - ऋन्मेष Runmesh
लिंक - https://www.youtube.com/watch?v=T5lkycN3k18
धन्यवाद,
ऋन्मेऽऽष
हो, शशी कपूर वडिलांबद्दल
हो, शशी कपूर वडिलांबद्दल लिहिले आहे. आणि ते साधारण दिसतात / मला वाटतात तसे ..
फेसबूकावर त्यांचा तारुण्यातला फोटो असल्यास शोधून टाकतो थांबा..
छान खुसखुशीत लिहिले आहे.
छान खुसखुशीत लिहिले आहे.
मागे तुम्ही "मला बाबा व्हायचे आहे" असा काहीतरी धागा काढला होता ना?
बाबा व्हाल तेव्हा अशा केसांमुळे चांगला गेटअप येईल.
बाबा व्हायचा धागा माझा नव्हता
धन्यवाद वीरू, पण बाबा व्हायचा धागा माझा नव्हता ओ.. मला तिसरे अपत्य हवे आहे किंवा मला मुलगीच हवी आहे हे माझे धागे होते.
असो, हा वर शशी कपूर म्हणून उल्लेखलेल्या माझ्या बाबांचा फोटो
पण बाबा व्हायचा धागा माझा
पण बाबा व्हायचा धागा माझा नव्हता ओ.. >> ओह सॉरी.. या गणैशोत्सवात इतक्या विविधप्रकारच्या, सुंदर शशक वाचायला मिळाल्या की कोणती कथा कोणाची हेच लक्षात नाही. त्यामुळे तो धागाही तुमचाच वाटला असो..
तुमचे बाबा हिरोसारखे दिसतात.
हो. धन्यवाद वीरू. लेखात
हो. धन्यवाद वीरू. लेखात लिहिलेले शशी कपूरसारखे दिसणारे, कुरळे केसांचे युवक, तयावर कोणालातरी शंका आल्याने सवयीप्रमाणे हा बघा सुर्य आणि हा जयद्रथ करायला लगेच फोटो टाकला. अन्यथा त्यांच्यावर एक लेख लिहायचे मनात होते त्यासाठी तो राखून ठेवलेला.
ऋन्मेष, तुलना राहू देत, पण
ऋन्मेष, तुलना राहू देत, पण तुझे बाबा हँडसम आहेत. त्या वेळी हिंदीत ट्राय केला असता तर नक्कीच काम मिळाले असते. मराठीत तर नक्कीच. मला थोडेसे रमेश देव यांच्यासारखे वाटले.
ऋन्मेष त्यांच्या फ्लॅटच्या
ऋन्मेष त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून त्यांचे लांब केस खाली सोडून बसले आहेत आणि सई ताम्हणकर केसांवर चढून वर येत आहे अशी एक कलियुगातल्या रापुंझेलची परीकथा लवकरच सत्यात येईल असे वाटते.
बाहुबलीच्या गाण्याची निवड चपखल बसली आहे विडिओला.
सई एकटीच ? स्वजो नाही ?
सई एकटीच ? स्वजो नाही ?
शांत माणूस, धन्यवाद
शांत माणूस, धन्यवाद
पण मालिका चित्रपटात काम मिळायला अभिनय सुद्धा अंगी लागतो
तरी मॉडेलिंगचे म्हणाल तर नाक्यावरच्या फोटो स्टुडीओत त्यांचे फोटो लावलेले असायचे असे ते एकदा म्हणालेले. पण त्यानंतर बहुधा त्यांनी या एकुलत्या एक मुलाच्या पालनपोषणासाठी मॉडेलिंग कारकिर्दीचा बळी दिला असावा
अश्विनी
अश्विनी
पण काही असो, केस वाढवल्यावर रापुंझील वा एकूणच लांब केस आयुष्यभर सांभाळणार्या बायकांबद्दलचा आदर वाढला _/\_
बाहुबलीच्या गाण्याची निवड चपखल >> हे खरे तर उलटे झालेले. म्हणजे मुलीचे स्टंटचे विडिओ स्लो मोशन रिव्हर्स वगैरे करून त्यात गाणी घालून मॉडीफाय करणे हा माझा फावल्या वेळेतील छंद आहे. एकदा हे गाणे, हा म्युजिक पीस ऐकताना हे सुद्धा एखाद्या विडिओला वापरता येईल असे वाटले. आणि मोबाईलमधले विडिओ चाळू लागलो तर हा विडिओ नजरेस पडला
अभिनय भारत भूषण, प्रदीप कुमार
अभिनय भारत भूषण, प्रदीप कुमार, महिपाल, विजय अरोडा, धीरजकुमार किंवा नवीन निश्चल यांच्याकडे शिकता आला असता की..
हो, ते ही आहेच
हो, ते ही आहेच
पण मग तिथे नशीब वशीला ओळख पैसा वगैरे आणखीही काहीतरी प्रचंड प्रमाणात लागत असावे
(No subject)
हॉट!!
रिचर्ड जेरे
कीनु रीव्हज
छान फोटो सामो... आता
छान फोटो सामो... आता सवयीप्रमाणे ते एडीट करू नका. हल्ली तुम्ही हे फार करता. निदान त्या गोड हिरोईनसाठी तरी करू नका
अश्या उभट चेहर्यांना आणि ऊंच पुरुषांना असे लांब केस छान शोभतात.. आपलेही संजय दत्त पासून हृतिक आणि जॉनपर्यंत यांचे चेहरे असेच उभट आहेत आणि ऊंचीही छान आहे
>>>>हल्ली तुम्ही हे फार करता.
>>>>हल्ली तुम्ही हे फार करता.
ती हिरॉइन सिंडी क्रॉफर्ड आहे. तिची मुलगी क्युट आहे.
ही तिची मुलगी -
ही तिची मुलगी -
अरे हा तर आपला कीनु . याने
अरे हा तर आपला कीनु . याने केस कधी वाढवले ? आईलाच नाव सांगतो त्याच्या.
हो, खरेच फार सुंदर आहे मुलगी
हो, खरेच फार सुंदर आहे मुलगी. तेच शोधायला गेलेलो. आईचीच अॅडवान्स कॉपी आहे.
सिंडी छानच होती तरुणपणी -
सिंडी छानच होती तरुणपणी -
मुलगी गोड आहे. सिंडीचा झट्टॅक उंम्फ नाहीये तिच्यात.
LOL ... एंशीचे दशक असावे
LOL ... मजा आली ..... एंशीचे दशक असावे का ? होते असे लिही की रे.
मजेदार लिहिलं आहेस.
मजेदार लिहिलं आहेस.
सिंडी क्रॉफर्ड आणि मि. अँडरसन!
धन्यवाद !
धन्यवाद !
एंशीचे दशक असावे का ? होते असे लिही की रे. >>>>> असावे असे लिहिलेलेही चालत असावे असे मला वाटले
मजेदार लिहिलेय. व्हिडिओ
मजेदार लिहिलेय. व्हिडिओ पाहिला, छान आहे.
किआनु आणि रिचर्ड गिअरसाठी बदाम बदाम.
शशी कपूर अभिषेकचे बाबा,
शशी कपूर अभिषेकचे बाबा, ऋन्मेषचे नव्हे>>>> ओह्ह्ह्ह आय माय स्वॉरी बरं का
सॉरी वगैरे नको हो, शशी कपूर
सॉरी वगैरे नको हो, शशी कपूर नाही तरी शाहरूख खान तर समजतोच मी स्वतःला. भले त्याच्या अर्धापाऊण टक्काही का नसेना. पण हे आपण सारेच करतो. आरश्यात बघून केस विंचरताना स्वतःला हृतिक समजायचे नाही तर काय शक्ती कपूर समजायचे
असो,
सर्व मायबोलीकर स्त्री-पुरुषांना राष्ट्रीय बालदिनाच्या शुभेच्च्छा
छान
छान
धन्यवाद ब्लॅक कॅट
धन्यवाद ब्लॅक कॅट
संपला हेअर डे
आता गांधीजयंती सुरू झाली
सर्व मायबोलीकरांना
सर्व मायबोलीकरांना गांधीजयंतीच्या शुभेच्छा !
आज केसाबाबत काय लिहायचे ?
धन्यवाद शांत माणूस.
धन्यवाद शांत माणूस.
वरच्या विडिओला एक डिसलाईक आलाय..... कोणी मोबाईल उलटा पकडून विडिओ बघत होते की काय
केशाग्रांचा गुंता व्हावया
केशाग्रांचा गुंता व्हावया लागला. मानेवरी केशखंजिरांनी जखमा दिधल्या.
अर्थात केशकर्तनालयात जाण्याची वेळ आली.
Pages