Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हा टास्क पण म्हणे बिबॉस ने
हा टास्क पण म्हणे बिबॉस ने थांबवला आहे.जय गायत्री बसले असताना सँनिटायजर वापरल गेल.तेव्हा प्रचंड हल्लाबोल झाला.
जय आक्रमकच आहे, स्प्लिट्सविला
जय आक्रमकच आहे, स्प्लिट्सविला मधे त्यांचा गृप , डोम सेशन्स आणि ओव्हरॉल टास्क्स अशीच असायची भयंकर राडा होणारी , एकदम परफेक्ट आहे तो बिगबॉस साठी !
मारामार्या करून आउट नाही झाला तर फिनाले मधे नक्की !
मीनल गंडलेली आहे. विकास
मीनल गंडलेली आहे. विकास बऱ्यापैकी बोलायला लागला आहे. सुरेखा ताई खूप चिडचिड करतात. गायत्रीच्या आयडिया चांगल्या आहेत. धुरीची आयडिया भन्नाट.तिला सुचत पण आहेत. जियो गायत्री.जय खूपच अग्रेसिव आहे.
सॅनिटायजर वापरलं गेलं म्हणजे?
सॅनिटायजर वापरलं गेलं म्हणजे? कशात वापरलं त्यांनी ?
धुरीची आयडिया ओपन स्पेस मधे वर्क कशी होईल. तसेही ( प्रोमो मधे दिसले त्यात) इत्कुसा कढई कम डाव वाटत होता तो. धूर दिसलाच नाही फारसा. आणि सोनाली अन सुरेखाला तशीही धुरीचा फार भिती नाही वाटणार. त्या मीरा ला द्या धुरी
मला यावेळी bb खूप स्लो का
मला यावेळी bb खूप स्लो का वाटतंय काय माहिती. कालचे वीस मिनिटं बघून थांबले.
जय आणि गायत्री जोडी जमवली, मला बोअर झाले. मी पुढे बघितलं नाही. थोड्या वेळाने बघेन कदाचित परत. जय टीशर्ट मध्ये छान दिसतो खरंतर.
मीरा आणि गायत्री मध्ये मीरा इम्प्रेसिव वाटते, सेम जय गायत्री मध्ये जय वाटतो (अर्थातच म्हणा). गायत्रीचे अजिबात impression पडत नाही, ती बोअरच वाटते. दिसण्यात, बोलण्यात कशातही मलातरी आवडत नाहीये. सेम आविष्कार. आविष्कार पूर्वी बरा वाटायचा. गायत्री सिरियलमध्येही आवडली नव्हतीच. तिच्यामुळेच मी बघितली नव्हती.
विकास जरा जाणवू लागलाय, नाहीतर तो कुठेच दिसत नव्हता.
पहिल्या सीझनवेळी स्मिता झटकन आवडली होती (मेघा आधी आवडली नव्हती नंतर मात्र आवडत गेली, सई नाही ती नाहीच आवडली), दुसऱ्या सीझनला शिव वीणा आवडले तसे मला यावेळी सांगता येत नाहीये (नेहा शिवानी नाही त्या नाहीच आवडल्या) . मिनल मध्येच आवडते, मध्येच ओके वाटते. यावेळी इंग्लिश संभाषण करतात तेव्हा bb सांगत नाहीत की काय.
शिवमध्ये जो स्पार्क दिसायचा मला तो जयमध्ये अजिबात दिसत नाहीये.
आयडिया चांगल्या आहेत. धुरीची
आयडिया चांगल्या आहेत. धुरीची आयडिया भन्नाट.तिला सुचत पण आहेत. जियो गायत्री.जय खूपच अग्रेसिव आहे.
<<
गायत्रीची आयडिआ ?? गुड जोक
ते मठ्ठ आहे, ही मिर्ची धुरी सेम आत्ता १ आठवड्या पूर्वी संपलेल्या बिगबॉस ओटीटी मधे वापरली होती, या आधीच्या सिझन्स मधेही , तिने कॉपी केली ती आयडिआ फक्तं !
या व्यतिरिक्त बिगबॉस ओटीटी टॉर्चर टास्क मधल्या आयडिआ: जिवन्त किडे आणून कपड्यात सोडणे , कपड्यांच्या बॅग्ज स्विमिंगपुल मधे फेकून देणे (रिकाम्या केलेल्या पण टास्क मधे टॉर्चर सहन करणार्यांना माहित नाही त्या रिकाम्या आहेत) , स्मोकिंग रुम मधली राख नाका तोंडावर उडवणे , पुरुषांच्या हातापायावरच्या केसांचं वॅल्सिंग करणे आणि सर्वात किळसवाणे म्हणजे टॉयलेटच्या कचर्यातले वापरलेले टॉयलेट पेपर (डाग असलेले) स्पर्धकांच्या अंगाखान्द्यावर ठेवणे
बघुया याही गोष्टी वापरतात का !
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1rSZvOYbjOI
हा व्हिडीओ बघितला, हरीश दुधाडे सोळावा स्पर्धक असेल का. तो पुर्वी कलर्सचा माणूस होता, मिन्स अनेक प्रोजेक्टमधे होता. कोणीतरी ह्याच्याहून फेमस आणायला हवं खरंतर. हा आला तर फायनलमधे यालाही नेऊ शकतं कलर्स.
विकास एकदम सुशांत शेलार आणि
विकास एकदम सुशांत शेलार आणि कंपू छाप आहे. ताई महाराष्ट्र बघतोय वगैरे वगैरे.
त्या गायत्रीला हवेतून पण गुदगुल्या होतात ( हे तिनेच हवा येऊ द्या च्या मंचावर सांगितलं होतं, आणि तिथे लगेच प्रात्यक्षिक पण झालं होतं) हे बाकीच्या स्पर्धकांना माहीत नाहीये का? हवा येऊ द्या मध्ये ती एक जागेवर उभी पण राहू शकत नव्हती गुदगुल्या केल्यावर.
मला यावेळी bb खूप स्लो का वाटतंय काय माहिती. कालचे वीस मिनिटं बघून थांबले.>> याच्याशी सहमत. सलग बघवत नाही.
काल कुठल्याच टीमला सपोर्ट न
काल कुठल्याच टीमला सपोर्ट न करून उत्कर्षला ब्राउनी पॉईंट कमावण्याची संधी होती.
अक्षय नाईलाजास्तव आलेला वाटतोय. नुसताच बसून होता काल सुद्धा.
स्नेहा इमेज जपण्याचा प्रयत्न करत्येय किंवा मुळातच हे प्रकार तिला जमत नाहीत. मीरा सोनालीची मिमिक्री करून चीडवत होती तर स्नेहा नुसतीच हसत होती.
मिरच्यांची धुरी
मिरच्यांची धुरी
साहित्य - सणसणीत तापलेली कढई, मिरच्या किंवा लाल तिखट
तापलेल्या कढईत तिखट घालणे. श्वास कोंडेल इतका खकाणा उडाला की गॅस बंद करणे.
गायत्रीला फोडणी माहितीये हेही खूपच झालं म्हणा.
human psychology ची मास्टरी
human psychology ची मास्टरी आहे बिग बॉसवाल्यांकडे..... ते मुद्दाम एक ग्रूप खुप स्ट्रॉंग, अरोगंट बनवतात साहजिकच पब्लिक सिंपथी दुसऱ्या ग्रूपकडे जाईल आणि ते लोकांना आवडायला लागतील!!
विकासला चांगली संधी आहे!!
उत्कर्ष आणि अक्षयने उद्या दुसऱ्या ग्रूपकडून खेळावे (असेही ते गाडीवर बसतील असे वाटत नाही) त्यामुळे ते जरा फेअर खेळतायत असे वाटेल.... पण तसे बहुतेक होणार नाही.
सुरेखाताईंनी पहीले खेळण्याचा हट्ट धरला ते आवडले कारण विकास, विशाल बसून राहिले असते तर त्यांना कदाचित चान्सच मिळाला नसता पण अगदी उठण्याएवढा त्रास दिला नव्हता सुरेखाताईंना; त्यांनी अजुन बसून राहयला हवे होते..... मीनल त्यांना तेच सांगत होती की तुम्ही प्रॉमिस केलय चांगले खेळायचे त्यामुळे बसून राहा..... बाकी मीनल बाहेर राहून जयला चांगलेच खिजवत होती.... तो डीफोकस होत होता..... दोन तीनवेळा गायत्रीने त्याला ओढून टास्ककडे नेले.
जय फारच शॉर्ट टेंपर्ड दिसतोय...... Not good for him!!
सोनाली मस्त टिकून राहिली.... अजूनपण खेळली असती ती पण सुरेखाताईंमुळे उठायला लागून नंतर तिने फार जास्त धूसफूस केली नाही ते आवडले.
तृप्तीपण एकदम जोषात आल्या होत्या..... दादूस, स्नेहा आणि अक्षय फारसे काहीच करताना दिसले नाहीत टास्कमध्ये
जय आणि गायत्री फुसके का होईना प्रयत्न करत होते...... कसली ती मिरचीची धुरी..... ना देणाऱ्याला शिंक ना घेणाऱ्याला ठसका!!
मीनल जयला चिडवत असताना अविष्कार नुसताच टाळ्या वाजवत उभा राहिलेला बाजुला.
बाकी दातावरच्या कॉमेटवरुन आरडाओरडा केलेली गायत्री आणि तिची टीम सोनालीला पाण्यामुळे मेकअप उतरला तर बघवणार नाही.... घाबरतील लोक..... असल्या कॉमेंट करत होत्या ते कसे चालते म्हणे?
सोनाली फुल्ल bring it on मोडमध्ये होती
जर कुणी सॅनिटायझरचा वापर केला असेल त्रास द्यायला तर ते चुकीचेच आहे...... कॉमन सेन्स आहे राव!
<<या व्यतिरिक्त बिगबॉस ओटीटी
<<या व्यतिरिक्त बिगबॉस ओटीटी टॉर्चर टास्क मधल्या आयडिआ: जिवन्त किडे आणून कपड्यात सोडणे , कपड्यांच्या बॅग्ज स्विमिंगपुल मधे फेकून देणे (रिकाम्या केलेल्या पण टास्क मधे टॉर्चर सहन करणार्यांना माहित नाही त्या रिकाम्या आहेत) , स्मोकिंग रुम मधली राख नाका तोंडावर उडवणे , पुरुषांच्या हातापायावरच्या केसांचं वॅल्सिंग करणे आणि सर्वात किळसवाणे म्हणजे टॉयलेटच्या कचर्यातले वापरलेले टॉयलेट पेपर (डाग असलेले) स्पर्धकांच्या अंगाखान्द्यावर ठेवणे<<
परवा स्ट्रेटेजी ठरवताना, मीरा, उत्क्या ग्रुपने ठरवले होते ना, कि कमोडमधिल पाणी वापरायचे. म्हण्जे खरोखर नाही पण तसे सांगायचे. हे करायच विसरले वाटत. अजुन गरम पाणी, गार पाणी अंगावर टाकायचे पण ठरले होते.
ती सुरेखा ओव्हरकॉन्फिडन्ट तरी
ती सुरेखा मुद्दाम टिम बी ला हरवण्यासाठी लवकर उठली आणि सोनालीवर पर्सनल खुन्नस आहेच तिची !
तशी काही फार वयस्कं वगैरे नाहीये ती, फक्तं ४० आहे !
काही फार टॉर्चर झालेच नाही आज, जय-गायत्री सुद्धा मोस्ट्ली साबणाचं पाणीच फेकत होते, तेही तांब्यानी !
गायत्रीने बिगबॉस ओटीटीच्या आयडिया चोरल्या पण तिने माठपणाचे अनेक पॉइंट्स प्रुव्ह केले.
१. बादल्याभरून धपाधपा स्पीडने पाणी फेकल्याशिवाय कोणाचा श्वास कसा कोडेल , ही छोट्या तांब्याने फेकतेय, काही होत नवह्तं त्याने !
२. पाण्याने मेकप जाईल म्हणतेय, या येडीला टि.व्ही. शो मधे काम करुनही मेकपचं बेसिक ज्ञान नाही ?
आजकाल सगळे प्रॉडक्ट्स वॉटरप्रुफ असतात, वॅक्स बेस्ड , प्रोफेश्॑न्ल अॅक्ट्रेसेस तर वॉटरबेस्ड प्रॉडक्ट्स नाहीच वापरणार !
तेलाने पूसून काढल्या शिवाय मेकप जात नाही, पाण्याच्या स्प्रे मुळे उलट मेकप पक्का होतो
३. बिगबॉस ओटीटी ची स्ट्रॅटेजी मिर्चीची धुरी देता नाही आली तिला , एवढ्याश्या फोडणीच्या कढईतून कसली देतेय धुरी
एनिवेज, सुरेखामुळे टिम बी हरणार आहे नक्की, त्यात उत्कर्ष अक्शयला फेवर करून बिबॉ ने टिम ए मधे टाकलय आणि संचालकही उत्कर्षच !
सिंपथी सगळी टिम बी लस मिळणार आणि पब्लिक सपोर्टही
अजुन तरी हेड शेव्ह करणे वगैरे शस्त्र बाहेर नाही पडली, बघुया कोणाचे टक्कल होते का या आठवड्यात !
कालच्या episode मध्ये विकास
कालच्या episode मध्ये विकास आवडला.... शांत राहून मस्त चिथावणी देत होता विरुद्ध टीमला....आजही मस्त सुनावतोय मीरा अन् स्नेहाला... हुशार आहे.... बाकीचे टीम A मधले निर्बुद्धासारखे वागत होते.... जय तर episode गणिक नावडता होत जातोय...
डंब आहे ती गायत्री...no
डंब आहे ती गायत्री...no screen presence,no dressing style. आणि हि झी ची लीड होती......बापऽऽऽरे.
अजुन तरी हेड शेव्ह करणे वगैरे
अजुन तरी हेड शेव्ह करणे वगैरे शस्त्र बाहेर नाही पडली, बघुया कोणाचे टक्कल होते का या आठवड्यात !.........
हे आपल्या मराठी बिबॉसमध्ये नाही चालणार हो.आपण अजून पहिली, दुसरीत आहोत.हिंदी बिबॉने मास्टर्स केल आहे.
हे अस काही केल,तर कुठून तरी कुठलीतरी संघटना किंवा पब्लिक प्रेशर आणून उगाच चांगलेला शो बंद वगैरे करायला लावायचे.
त्यापेक्षा त्या तुपारेच्या फोडणीवरच चालवाव लागेल.....(हसणारीबाहुली)
टास्क बिबॉसने नाही थांबवला
टास्क बिबॉसने नाही थांबवला.सँनिटायजर वगैरे काही नव्हत.उत्कर्ष म्हणे बायस होता,तो टीम बी ला पाण्याव्यतिरिक्त काहीही टाकायला परमिशन देत नव्हता.म्हणून बी टीमने टास्क सोडला.मग बिबॉसने त्यालाच विनर घोषित करायला सांगितले, आणि अशी टीम ए जिंकली. बिबॉसने मुद्दाम केल असेल.का?.कखरण उत्कर्षने सांगितल आणि टीम बी ने मम केल अस तर होणार नाही ना..आणि खरच अस असेल तर परत हा टास्क
अर्धवट राहिला की हो.
सिझन 1 चा पूर्ण तरी झाला होता.
जर असाच अर्धवट टास्क राहणार असेल,तर बितबॉसने हा टास्क रद्द करावा.
टीम A जिंकली ? हे कुठे दिसलं
टीम A जिंकली ? हे कुठे दिसलं ? पुढचा एपिसोड मधलं सांगताय का ?
अँक्ट राईडर्स या युट्युबवर
अँक्ट राईडर्स या युट्युबवर बर्यापैकी खर सांगतात.तिथे सांगितल.वोटिंग रेटिंग पण सांगतात.कालपर्यंत तुपारे 3वर होती ,पण आता ५वर आली आहे.
विशाल आणि जय मध्ये जबरदस्त फाईट आहे.
सध्याच रेटिंग.
1.जय.2विशाल3 मिनल4विकास(हा 5वर होता)6आविष्कार7 शिवलीला
5वर तुपारे
5वर तुपारे
आयडिया चांगल्या आहेत. धुरीची
आयडिया चांगल्या आहेत. धुरीची आयडिया भन्नाट.तिला सुचत पण आहेत. जियो गायत्री.जय खूपच अग्रेसिव आहे.
<<
गायत्रीची आयडिआ ?? गुड जोक }}अशा बऱ्याच आयडिया सगळ्यात पहिली विनर मठ्मे मेघा धडे ने पण वापरल्या होत्या. धड पने स्वतःच्या आयडिया पण सुचल्या नाहीत तिला आणि म्हणे विनर . मठ नुसती.आधीचे सगळे हिंदी सिझन बघून आलेली ती बया. आणि किती छान आयडिया वापरते म्हणून लोकांनी तिला डोक्यावर बसवली . एखादी स्पर्धक आवडतं नसली की तीच काही म्हणजे काहिच आवडतं नाही अस असतं लोकांचं. इतकी खूप काही नाव ठेवण्या इतक पण कोणी टाकाऊ नसतं . असो
सध्या टीम ए मधे असलेले लोक,
human psychology ची मास्टरी आहे बिग बॉसवाल्यांकडे..... ते मुद्दाम एक ग्रूप खुप स्ट्रॉंग, अरोगंट बनवतात साहजिकच पब्लिक सिंपथी दुसऱ्या ग्रूपकडे जाईल आणि ते लोकांना आवडायला लागतील!!
विकासला चांगली संधी आहे!! >>> +१११
सध्या टीम ए मधे असलेले लोक, सगळे स्टराँग प्लेयर्स आहेत हे खरं. पण सगळे च फक्त टास्क जिंकण्यावर भर देतायत पण बिबॉ मधे पुढे जायचं तर टास्क्स हा फक्त एक भाग आहे. पण फायनल मधे जाऊन जिंकायचे असेल तर आपण प्रेक्षकाच्या नजरेत निगेटिव तर होत नाही ना, प्रेक्षकांना एक लाइकेबिलिटी फॅक्टर लागतो तो देतो आहोत ना हे बघावे लागते अन त्याकडे हे कुणी लक्ष देत नाहीयेत असे वाटते. तो जय तर टास्क खेळताना अॅग्रेसिव असतोच, अन बॉडि लॅन्ग्वेज मुदाम अजून जास्त आक्रमक दाखवतो. काल तर किंग कॉन्ग टाइप छाती बडवत होता नॅस्टी दिसतो पार. मीरा, गायत्री, उत्कर्ष सेम. स्नेहा मात्र एकटी हुषारी दाखवतेय त्या बाबतीत. तिने आपला शिरकाव सध्या या आक्रमक कंपू मधे केला आहे पण ती एक तिची नाइस, गुड गर्ल इमेज जपते आहे.
>>ती एक तिची नाइस, गुड गर्ल
>>ती एक तिची नाइस, गुड गर्ल इमेज जपते आहे.
खरय!
काल मला तिचा एक पॉइंट आवडला की आधीच ठरवून या ग्रूपकडून किंवा त्या ग्रूपकडून खेळणार नाही म्हणाली..... लगेच बोट दिले म्हणून हात धरुन घुसणार नाही जय मीराच्या ग्रूपमध्ये असे वाटतेय!!
पण बिग बॉसमध्ये एकटे खेळणे आणि टिकणे जरा अवघड असते..... you need at least one or two like minded ppl to support you till pre-finale weeks.
खरय, ती स्नेहा आणि विशाल
काल तर किंग कॉन्ग टाइप छाती बडवत होता
<<<
हो
ती मिनल त्याला माकड म्हणून चिडवत होती, माकडाने माकड उड्यांना सुरवात केली म्हणाली .
बाकी ती स्नेहा आणि विशाल काहीही न करता, फार स्क्रीन टाइम मिळत नसूनही बर्याच ऑडियन्सला आवडायला लागलेत ऑलरेडी हे खरय!
आता खेळले तर मग विचारायलाच नको, विशालने सुरवात केली आहे !
बोरिंग आहे हा सिजन एकदम.
बोरिंग आहे हा सिजन एकदम.
मला पण बोअर झाले आज मी एक
मला पण बोअर झाले आज मी एक एपिसोड पहिला पहिल्यांदा..
ह्या सिझन मध्ये कुणीही
ह्या सिझन मध्ये कुणीही उत्स्फूर्त नाही वाटत. सगळे लोक प्रोफेशनल आणि वेल केलक्युलेटेड खेळत आहेत.
भांडणात सुध्दा बर्याचदा त्यांचे गालात बारीक हसणं लपत नाही. पण सिझन 2 च्या निरर्थक कलकलाटा पेक्षा हे बेटर आहे.
गायत्री दातार सिरियल मध्ये असह्य झाली होती. इथे बरीच बरी आहे.
मी मिनलला वोट दिलं. एकच
मी मिनलला वोट दिलं. एकच द्यायचं असतं ना.
मी पण मीनलला! सॉर्टेड, चलाख
मी पण मीनलला! सॉर्टेड, चलाख पोरगी आहे. उत्तम खेळते आहे.
वोटींगला पुन्हा एकदा काही
वोटींगला पुन्हा एकदा काही अर्थ नाहीये, कलर्स मराठीच्या ऑफिशिअल पेज वरून पोस्ट आली कि शिवलीलाची तब्येत बिघडल्याने तिला ट्रिटमेन्ट साठी बाहेर जावे लागत आहे म्हणून वोटिंगलाइन्स बन्द केल्या आहेत.
Pages