पाककृती स्पर्धा क्र १: उपासाचे पौष्टिक पदार्थ- बीटचा हलवा - किल्ली

Submitted by किल्ली on 25 September, 2021 - 10:54
हलवा

उपासाचा पदार्थ
........................
साहित्य:
बीट - ३ नग,
शुद्ध साजूक तूप -३ टे स्पून (more is better ),
साखर - ४ चमचे ( चवीनुसार व आवडीनुसार कमिजास्त करु शकता, दगडापेक्षा वीट मऊ हवी असल्यास गूळ वापरा. त्याची चव सुद्धा भन्नाट लागते. Natural sweetner आवडत असेल तर stevea वापरा [ मी कधी वापरला नाही त्यामुळे प्रमाण सांगता येणार नाही ]. हे explanantiom आणि पर्याय पदार्थ आरोग्यदायी करण्यासाठी सुचवले आहेत. नाहीतर साखर दिसली म्हणून बाद कराल Happy ),
वेलची पूड चिमूटभर,
साय/ मलाई असेल तेवढी Lol २ ते तीन चमचे,
सुकामेवा आवडीनुसार

क्रमावर पाककृती :
१. बीट किसून घ्या
२. कढईत तूप घाला. तुपावर बीटचा किस खमंग परतून घ्या
३. त्यावर झाकण ठेवा. वाफ येऊ द्या.
ही प्रक्रिया मंद आचेवर करायची आहे हे ध्यानात असू द्या
४. किस चांगला शिजला की साखर / गूळ घाला
५. मिश्रण पातळ होईल. ते हलवत राहा.
गॅस मध्यम असू द्या.
६. घट्ट झाले की त्यात मलाई / साय घाला
खवा सुद्धा घालू शकता
७. वेलची पूड, सुकामेवा घालून गरम गरम सर्व्ह करा
गार झालेला हलवा सुद्धा छानच लागतो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो नाय टाकले तिने, नियम नाही सांभाळले तर कसं मतपत्रिकेवर येऊ देणार? पार्शालिटी चालत नाय बरं इथे... Wink Happy

असं हाय व्हय. मंग र्‍हाउंद्यात. बाकी मस्त आहे रेसिपी.

मला उकडलेल्या बीटाचे तुकडे, दही, मीठ, मीरपूड घालून केलेली कोशिंबीर भयंकर आवडते.

>>>बीटाचे तुकडे, दही, मीठ, मीरपूड घालून केलेली कोशिंबीर भयंकर आवडते.?
ब घते मी ही करुन पाहीन.

धन्यवाद देवकी, मामी, अस्मिता, साजणी Happy
सीताई बरोबर बोललीस Happy
ममो ताई,
तुमची रेसिपी पाहिली. मला खरंच आधी माहिती नव्हती, आता वाचली.
खासच आहे, creative सुद्धा! Pancakes करून बघेन तुमच्या रेसेपीनुसार Happy
धन्यवाद Happy

मला खरंच आधी माहिती नव्हती, आता वाचली. >> अग त्या दृष्टीने नव्हतं लिहिलं मी. Just रिलेट झाली म्हणून म्हणलं एवढंच.

ममोताई
Happy
Great minds think alike.
पळते आता Proud

Pages