Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हो शिवलीला जायला हवी, असेल
हो शिवलीला जायला हवी, असेल चांगली वक्ता पण नॅशनल टेलिव्हिजन वर बिबॉ सारख्या शो चे मटेरिअल नाही !

विकास सुद्धा काहीच कन्टेन्ट देत नाहीये !
राखी सावंतला नं.१६ प्लेट रिकामी आहे तिथे ४ दिवस पाहुणी म्हणून पाठवा, बिचुकलेही चालेल तिला पार्टनर म्हणून
परवा मांजरेकर म्हंटले या हाउसमेट्सना , जरा चांगले रहात जा रे , लोक बघतायेत तुम्हाला
मांजरेकरला क्रेडीट द्यायला हवं, हे वाक्यं ऑफेन्सिव वाटु शकतं पण ज्या प्रकारे ते बोलतात ह्युमर+ कानपिचक्या तेही आपलेपणानी दिलेल्या हे योग्य प्रकारे पोचते !
मला आवडते गायत्री . गेम करता
मला आवडते गायत्री . गेम करता फिट आहे. मला तुझे घाणेरडे दात दाखवू नको अस जर सोनाली तीला बोलली असेल तर बरोबर सुनावलं तिने सोनालीला.अजून रुळलेले नाहीये म्हणजे शिवलीला. आविष्कार चाचपडत आहे पण चांगला आहे. स्नेहा शांत शांत असते. ती कुठल्याच ग्रूप मध्ये नाहिये. विकास तर कुठेच दिसत नाहीये
शिवलेली आणि आविष्कार च्या
शिवलीला आणि आविष्कार च्या सोबत जोडली गेल्या मुळे मीनल आपोआप नॉमिनेट झाली, गायत्री मुळे जय आणि विकास मुळे विशाल.
मीनल खूप जास्त insecure झाली की काहीही मुद्दे सोडून बोलते असं वाटलं आज.
स्नेहा लवकरच मीरा, उत्कर्ष, जय ,गायत्री ग्रुप ला जोडली जाणार असं दिसतंय. आज स्नेहा च्या बाजूने त्यांचा पूर्ण ग्रुप बोलत होता मीनल ला.
उद्या बिबॉ फेमस राडा टास्क आहे. आता खरी रंगत येणार खेळाला.
आज नॉमिनेशन झाल्यानंतर त्या
आज नॉमिनेशन झाल्यानंतर त्या गार्डनमध्ये कचाकचा भांडण लावून देण्याची काय गरज होती बिबॉसला.झाल ना एकदा नॉमिनेशन.
त्या जय गायत्रीची जोडी लावण्याचा अट्टाहास का?सूट तरी होत आहेत का ते एकमेकांना?
एवढ सांगूनही,जय आपला उघडाच.
गायत्री इरिटेटिंग वाटते.खरच कधीकधी जुई गडकरीचा भास होतो.
जर जयसोबत पेअर पब्लिकला नाही आवडली,तर बिबॉ तोडेल,मग काय करेल ही.
ती मीरा प्लेअर मस्तच आहे.पण शेवटी मेघाने जसा सईचा काटा काढला ,तसा मीरासुध्दा गायत्रीला अलगद बाजूला करेल.
उद्याचा टास्क ,मोस्ट कंट्रोव्हर्शिअल टास्क.
पण गेल्या वेळसारख होईल अस वाटत नाही.
उद्या बघूच .पण आज जरा बोअर झाल मला.
कालचं मी आज बघतेय.
कालचं मी आज बघतेय.
तृप्ती शिवलीला वादात, तृप्ती बरोबर सांगत होती पण शिवलीलाला समजलं नाही नीट अस मला वाटतं. मुद्दे मांडण्यात तृप्तीचा प्रभाव जाणवत होता. दोघींच्यात बसलेली मिनल फनी वाटत होती.
समहाऊ मला मिनल बरी वाटली.
उत्कर्षने गाणी छान रचलेली. परंपरा जाणवते.
मला जय अजिबात आवडत नाही....
मला जय अजिबात आवडत नाही.... सारखा कुणाच्या तरी चुगल्या करत असतो..... तो top 5 मध्ये जाईलही कदाचित पण जिंकणार नक्कीच नाही... मीनल चांगली आहे.... पण emotional आहे.... सगळ्यांनी target केल्यामुळे तिचा फोकस हलायला नको....
अक्षय वाघमारे एवढ्यात कंटाळला
अक्षय वाघमारे एवढ्यात कंटाळला BB ला की घरची आठवण येते? आज स्वतःलाच nominate करणार होता. या आठवड्यात शिवलीला जाणार नक्की, ती कुठेच दिसत नाही. मुळातच ती किंवा दादूस खूप साधे आहेत. छक्के पंजे, mind games जमत नाही त्यांना, सो बाहेर पडतील लवकरच.
आज स्नेहा उगाच पेटली, थोडी नाटकी वाटत होती. गायत्री मधेमधे का बोलते? ती खूप irratating आहे, मला खरं तर तीच जायला हवी आहे, पण झीच्या सीरियलमुळे fan following चांगलं असल्याने इतक्यात बाहेर पडणार नाही ती .
सध्या तरी खरा गेम समजून फक्त मीरा, उत्कर्ष आणि विकासने खेळायला सुरुवात केली आहे. बाकीचे अजूनही तळ्यात मळ्यातच करत आहेत.
ती गायत्री आणि सोनाली वाद
ती गायत्री आणि सोनाली वाद घालत होत्या कालच्या एपिसोडमध्ये, तेव्हा गायत्री कचाकचा भांडताना बघून मी टीव्ही बंद केला. उद्या ते पुढे करून बघेन.
जसं आपल्या आवडत्या स्पर्धकाला
जसं आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचवण्यासाठी vote करता येतं तसं आपल्या नावडत्या स्पर्धकाला बाहेर घालवण्यासाठी पण votingची सोय असती तर किती छान झालं असतं???
I don't like her at all
गायत्रीला बाहेर घालवण्यासाठी मी भरपूर votes केले असते
न आवडणाऱ्या ला व्होट देण्याची
न आवडणाऱ्या ला व्होट देण्याची सोय असती तर मी मीराला काढलं असतं भरपुर व्होट दिले असते. अजिबात आवडत नाही. अतिशय इरिटेटिंग आहे अणि दोन नंबर वर सोनालीला काढलं असतं. बोरिंग आहे. अजिबात आवडत नाहीत दोघीही
आज दादूस रडत होते का. विशालचं
आज दादूस रडत होते का. विशालचं काय एवढं कोणी आपली पाटी फोडली वर किती विचार करत होता. आज स्नेहा मीनल वादामध्ये जय आणि गायत्री का दात काढत होते. जय कसाही वागला तरी दिसायला तरी चांगला आहे, गायत्रिकडे बघवत नाही.तिचा आवाज तर फारच किरकिरा वाटतो. मीनल का एव्हडी चिडचिड करते. दादूसने खरंच कधी बिबॉं बघितलं नसेल का.
मीनल ला बाहेर काढा
मीनल ला बाहेर काढा
मीनल चांगलीं आहे स्वभावाने.
मीनल चांगलीं आहे स्वभावाने. जरा सारखी रडते ते एक सोडलं तर. ती आणि विशाल शिवलीला पण एकदम साधे आहेत.
मीनल बेस्ट. माझे व्होट तिलाच.
मीनल बेस्ट. माझे व्होट तिलाच.
सध्या तरी ती सगळे पैलू दाखवतेय. मीरा- उत्कर्ष- जय या आठवड्यात पण लीड करणार बहुतेक.
अजून पक्के ग्रुप्स पडलेले दिसत नाहीयेत.
सोनाली- अक्षय काय करावं ह्या संभ्रमात.
विशाल जरा जरा आमच्या स्मितासारखा कन्फ्युज होतो पटकन.
विकास- अविष्कार- स्नेहा अगदीच प्रभावहीन.
तृप्ती- सुरेखा- दादूस जसे आहेत तसे राहतात. कसली अवडंबरे करत नाहीत.
गायत्री लवकरच जाणार. शिवलीला या आठवड्यात बाहेर जाईल.
आज दादूस रडत होते का. >>>>>>
आज दादूस रडत होते का. >>>>>>>> खोट होत ते. तृप्तीने त्यान्ना सान्गितल होत रडायला. हळूहळू तेही गेम शिकतायत.
शिवलीलाही हळूहळू खुलायला लागली आहे. तिलाही गेम कळलाय थोडासा बहुतेक.
स्नेहाचा खरा चेहरा उघडकीस आला मिनलशी भाण्डताना. किती ओरडत होती ती!
आज मीरा गप्प गप्प होती. ममा ने घेतलेल्या शाळेचा परिणाम वाटत. आज तिने थोड हसून खेळून राहण्याचा प्रयन्त केला.
शिवलीला साध्या कपडयात छान दिसते कधी कधी.
विशाल जरा जरा आमच्या
विशाल जरा जरा आमच्या स्मितासारखा कन्फ्युज होतो पटकन. >>> हो का, हाहाहा.
गायत्री लवकरच जाणार >>> जाऊदे खरंच.
मी ही vote out आविष्कार आणि गायत्रीला केलं असतं. मला त्यांचा वावर बघवत नाहीये अगदी.
शिवलीला साध्या कपडयात छान दिसते कधी कधी. >>> दिसायला मला गोड वाटली ती. बाकी ती टिकणार नाही इथे.
बाय द वे टास्क मध्ये कोण छान करतंय ते लिहा हा सर्वांनी आवर्जून.
आज पण काही फार घडलं नाही,
आज पण काही फार घडलं नाही, मीरा एकदम शान्त वाटली

स्नेहा- मिनल वाद नीट समजला नाही पण मला स्नेहा पेक्षा मिनल पॉझिटिव वाटते.
उद्या टॉर्चर टास्क म्हणजे राडा
मला आविष्कार बाहेर जाईल अस
मला आविष्कार बाहेर जाईल अस वाटत आहे.खरतर तो बिबॉस गेम खेळायला आला आहे , अस वाटतच नाही.त्याला च फार काही इंटरेस्ट आहे अस दिसत नाही.
स्वत:हून सोडलेली किंवा सुटली गेलेली अँक्टिंग करियर पुन्हा चालू करण्यासाठी एक उत्क्रुष्ट प्लँटफॉर्म त्याला बिबिच्या रुपात मिळाला आणि त्याने त्या संधीचा फायदा घेतला .तो विनर होणार नाही,त्याला माहित आहे,फिजिकल टास्क फार खेळू शकणार नाही,हेही माहित आहे,स्नेहाने फार कही रिस्पॉन्स न दिल्याने कंटेंट देता येणार नाही,हे ही त्याला माहित आहे.
हो पण,बिबॉसमुळे आपण पडद्याआड गेलेलो ते पडद्यावर आलो,हेच त्याच्यासाठी महत्वाच आहे.
त्यामुळे बाहेर आल्यावर कॉन्टॅक्ट सपल्यानंतर कुठल्यातरी चँनेवलर एखादी मालिका नक्कीच मिळेल. आणि थांबलेली गाडी पुन्हा सुरु होईल
कारण तो अँक्टर चांगला आहे.
मीनल काल पुरती गंडलेली होती..
मीनल काल पुरती गंडलेली होती..... जयवर खुन्नस खाऊन विकास बरोबर वेगळा ग्रूप बनवायच्या गोष्टी करते आणि परत जयला जाउन मस्का मारते..... त्याने ज्याप्रकारे तिला त्या कान उघाडणी टास्कमध्ये इग्नोर मारलेला ते बघता त्याच्याशी परत जाऊन बोलायची काही गरज नव्हती!!
आणि नंतर आपल्याऐवजी दुसऱ्याला नॉमिनेट करायच्या टास्कमध्ये आधीच नॉमिनेटेड असलेल्या गायत्रीला नॉमिनेट करते काय आणि मग चूक कळल्यावर स्नेहाबरोबर काहीही वाद घालते काय!
स्नेहाविरुद्धच्या तिच्या एकाही मुद्द्यामध्ये दम नव्हता म्हणूनच बाकीचे पण उचकले तिच्यावर!
अक्षय उत्कर्षबरोबर असल्याने आणि कुणाच्या अध्यात मध्यात नसल्याने आत्तातरी वाचला.... तो स्वतालाच नॉमिनेट करायला निघाला होता!
मीनल, अविष्कार आणि शिवलीलामुळे अडकली
बिग बॉसना एक त्रिकूटच करायच होत तर उत्कर्षला त्या त्रिकुटात टाकायच ना? असाही तो सेफच होता!!
नॉमिनेशन करताना सुरेखाताईंनी सोनालीला डॉमिनेट करायचा प्रयन्त केला पण सोनालीने तो हाणून पाडला!
नॉमिनेशनची कारणे देताना मीरा आणि स्नेहा सगळ्यात सॉर्टेड वाटल्या
राडा टास्कला कश्या टीम्स आहेत ते बघू आता..... फार महत्वाचा टास्क आहे!!
मिनल , विशाल खरेतर डोक्याने
मिनल , विशाल खरेतर डोक्याने खेळले तर स्ट्रॉन्ग अपोनंट होउ शकतात, मीरा , जयच्या टिमविरुद्ध. तसे ही यांच्या ग्रुपमधे सुरेखा तृप्ती, सोनालीशिवाय दुसरे बोलणारे नाहित. अन या तिघी फिजिकल टास्कमधे फारश्या उपयोगाच्या नाहीत असे वाटतेय. त्यामुळे आता मीनल, विशालने मुळुमुळुपणा सोडुन द्यावा अन जरा डोके वापरुन खेळावे.
मीनल का त्या जय च्या मागे
मीनल का त्या जय च्या मागे मागे करते कळत नाही. ती, विकास , विशाल मिळून त्या दुसर्या ग्रुप ला चांगली फाइट देऊ शकतात.
त्याच्या प्रत्येक वाक्यावर हो हो.
आता हळू हळू स्नेहा पण जय च्या टीम मधे जाते आहे असे दिसते. तिचा पॉइन्ट बरोबर होता काल. मीनल च्या "आपले इन्टरॅक्शन नाही झाले म्हणून माझ्याऐवजी तुला नॉमिनेट करते" या लॉजिकला काही अर्थ नव्हता. गायत्री किती येडपट आहे. आधी मीरासोबत बुगुबुगु आता जय समोर तेच पुन्हा
बिबॉ जोड्या आणि नॉमिनेशन टास्क व्यवस्थित मॅनिप्युलेट करतात . आविष्कार, शिवलीला नॉमिनेट होणारच होते. बाकीचे तसेही इतक्यात नाही जाणार.
शिवलीलाचा बिग बॉस मधला वावर
शिवलीलाचा बिग बॉस मधला वावर वि. तिचं कीर्तन कम स्टँड अप असे एडिटेड विडिओ इन्स्टाग्रामवर आले आहेत.
एकूणात कीर्तनकार म्हणून ती इंदुरीकरांची तरुण आणि महिला आवृत्ती वाटते.
सध्या घरी बिग बॉस बघणे बंद आहे त्यामुळे इन्स्टाग्राम आणि माबो हेच सोर्सेस आहेत माहितीचे.
इन्स्टाग्रामवर त्या टॉर्चर टास्कचे photos दिसले, एवढं सगळं करण्यापेक्षा गाडीच्या 1/2 चाकांतली हवा काढली तर सोपं होईल काम
गेल्या सिझन मध्ये ती शिवानी
गेल्या सिझन मध्ये ती शिवानी घराची डॉन होती आणि नेहा तिच्या पाठी बुगु बुगु करत होती एकदा का शिवानी बाहेर पडली आणि नेहा ला तिचा सुर सापडला .या सिझन मध्ये मिरा घराची डॉन आहे आणि गायत्री बुग्यू बूगु आहे . मिरा घराबाहेर गेली तरच गायत्री चा आवाज ऐकू येईल . तशीही ती चांगला स्टँड घेते पण मिरा समोर कमी पडते कारण मिरा स्वतःचं च कायम रेटत असतें. दुसऱ्याचं ऐकण्याची तिला सवय नाहीं त्यामुळे सगळीकडे तिचा च आवाज मोठा त्यामुळे बाकीच्यांचे आवाज ऐकू येत नाहीत . गायत्रीला जर स्वतःला तिच्यापासून लांब ठेवायचं असेल तर तिला कोणाशी तरी जोडून घ्यावच लागेल तसही जय च आणि गायत्री च पहिल्या दिवसांपासून पटतंय अस जय नेच सांगितलं होत. त्यामुळे त्यांचं एकमेकांबरोबर दिसणं स्वाभाविक आहे. गेल्या सिझन मध्ये रुपाली भोसले पराग शी जोडलेली होती तो बाहेर पडल्यावर ती विणा शी जमवायला बघत होती. पण ते जमलं नाही. कोणाशी तरी जमवून घेतलं तरच टिकणार तुम्हीं त्या घरात नाही तर कठीण आहे
शिवलीलाचे जास्त नुकसान होणार
शिवलीलाचे जास्त नुकसान होणार आहे. बीबॅामधे ती टिकणार नाहीच पण आता तिला परत किर्तन करू देतील कि नाही शंकाच आहे. तिच्या बऱ्याच चाहत्यांना तिचे बिबॅामधे जाणे आवडले नाही. ती किर्तनात ज्या गोष्टींना नावे ठेवायची त्याच ती करत आहे त्यामुळे बाहेर आल्यावर टिकेला तोंड द्यावे लागेल.
खरंय. शिवलीला ला अवघड जाणार
खरंय. शिवलीला ला अवघड जाणार आहे घरात आणि बाहेर आल्यवर सुद्धा. उलट लवकर बाहेर गेली तरच बरं त्यातल्या त्यात.
तृप्ती आणि दादुस काल आपली आपलीच धमाल करत होते. कुणी त्यांना गेम मधे धरत पण नाहियेत सध्या. शिवलीला नंतर त्यांचेच नंबर लागतील असे वाटते. अक्षय पण सध्या कम्प्लीट लॉस्ट वाटतो आहे. लवकर जागा नाही झाला तर त्याचेही खरं नाही.
आविष्कार चा वावर चीड आणतो अगदी. आळशी, कामचुकार, आणि बनेल वाटतो. त्याला काही गेम समजतोय असेही वाटत नाही.
गायत्री सर्वात बावळट्ट आहे ,
गायत्री सर्वात बावळट्ट आहे , कोणा स्ट्राँग व्यक्ती बरोबर टॅग करणे इतपत शक्य होते तिला, त्यात स्ट्राँग व्यक्तीमुळे ती अजुनच बावळट दिसते !
बोलणे अत्यंत लो ऑन कॉन्फिडन्स आणि आवाज सुपर अनॉयिंग !
बाकी जय उत्कर्ष स्टिल गोइंग स्ट्राँग , मीरा सुद्धा हुषार आहे, टॉर्चर टास्क मधे होपफुली शान्त झालेल्या मीराचे आक्रमक रुप परत दिसु देत !
जय केवढा आक्रमक खेळतो,
जय केवढा आक्रमक खेळतो, समोरच्याला डीवचतो. विकास तेवढाच संयमित!
गादा किती कनिंग .. पण तिची मिरचीची धुरी द्यायची युक्ती काय सक्सेस झाली नाही.
विकास,मीनलने छान सपोर्ट केलं सुरेखा सोनालीला!
सोनाली अजून टिकली असती, सुरेखामुळे माघार घ्यावी लागली!
विकास आवडला आजच्या भागात!
मिरचीची धुरी आणि फोडणी ह्यात
मिरचीची धुरी आणि फोडणी ह्यात फरक असतो हे त्यासाक्षात बावळटेश्वरीला कोण सांगणार?
मला तर जय आणि मिनलमध्ये
मला तर जय आणि मिनलमध्ये आरडाओरडा सुरू झाल्यावर जयच्या ऐवजी परागच दिसायला लागला.म्हटल ,शांत रहा बाबा,पेटू नको,नाहीतर काहीतरी मारामारी करून फुकटचा बाहेर जाशील.
सुरेखा मुद्दाम उठली का,कारण मिनल सारख सांगत होती की ताई,तू प्रॉमिस केल होतस.
गायत्रीचा मिरचीचा प्लँन म्हणजे वरणभात निघाला.स्नेहा परत गायब होती.
जय विकास ,सोनाली मस्त.सोनाली तर एंजॉय करत होती.
ओपन चँलेंज करून कॉन्फिडन्स कमी करण्याचा विकासचा प्लँन असावा अस वाटल.
उद्या बघू.ती नाजूक स्नेहा कशी बसेल.
पण काही गडबड न होता टास्क पूर्ण होऊ देत,ही इच्छा.
तो जय उगाच केवढा आरडाओरडा करत
तो जय उगाच केवढा आरडाओरडा करत असतो, कधीकधी वाटतं याला काय झटका आला की काय ?
त्या उत्कर्ष ला संचालक केला आणि टीम मध्ये खेळायचा पण चान्स दिला, तो full biased आहे.
सोनाली खूप छान खेळली आणि टिकली आज, सुरेखा का लवकर उठल्या, सोमी वर बरेच जण म्हणत आहेत की त्यांना मीराच्या टीममध्ये खेळायचं होतं, सो त्यांनी दगाबाजी केली. काय खरं काय खोटं नीट कळत नाही अजून. विकास मीनल ग्रुप बरा आहे, पण दुसरा group फारच aggresive वाटतो, कंटाळा आला त्यांच्या आवाजाचा फार!!! उद्या दुसरा ग्रुप काय युक्ती करतोय पाहूया .
मीरा जय गायत्री उत्कर्ष हा group फोडायला हवा होता आज खरतर, एकमेकांविरुद्ध खेळवायला हवं त्यांना, मग जरा मजा येईल.
Pages