
पालेभाजीपासून बनविलेला पदार्थ
.,.......................................................................
साहित्य :
१जुडी पालक,
(निवडून, देठे काढून स्वच्छ धुतलेली पाने )
गव्हाचे पीठ - ४ वाट्या,
लसणीच्या पाकळ्या - तीन ते चार,
मुगडाळ - २ टे स्पून,
बडीशेप - एक टी स्पून,
गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद - चवीनुसार / आवडीनुसार,
ओवाजीरे भाजून त्याची पूड - चिमूटभर,
अद्रक - छोटासा तुकडा, ठेचून किंवा पेस्ट करून
तळण्यासाठी तेल,
पिण्यायोग्य शुद्ध स्वच्छ पाणी,
चालू स्थिती तील गॅस शेगडी / induction / चूल / स्टोव्ह इत्यादी पैकी काहीही एक,
आवश्यक भांडी व उपकरणे,
संयम व चिकाटी,
अंगभूत खादाडपणा (#foodie )
क्रमवार पाककृती:
१. मुगडाळ पाणी घालून (2तास) भिजवत ठेवा.
२. एका कढईत पालकची पाने (20-25 निघतात एका जुडी मध्ये) थोडेसे चमचाभर तेल घालून वाफवून घ्या. पाणी अजिबात घालायचे नाही
३. पूर्ण वाफवल्यानंतर थंड करून मिक्सर मधून फिरवून पेस्ट बनवून घ्या.
४. ह्या पेस्ट मध्ये चवीनुसार तिखट, मीठ, ओवाजीरे पूड व एक चमचा तेल घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
५. गव्हाच्या पिठात हिरवी पालक पेस्ट घालून चांगले मळून कणकेचा गोळा करून घ्या.
पाणी घालण्याची गरज नाही.
६. आता हिरवा कणकेचा गोळा झाकून ठेऊन सारण करायला घ्या.
७.सारणासाठी आधी फोडणी करावी लागेल. एका छोट्या कढईमध्ये 2 चमचे तेल घाला. ते तापलं की जिरे, जिरे फुलले की बडीशेप, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद व गरम मसाला घालून परतून घ्या.
८. ह्यात भिजलेली मुगडाळ घालून अर्धी वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आली की 4 चमचे चणाडाळीचे पीठ / बेसन घालून व्यवस्थित हटवून घ्या (पिठलं हटवतो तसे )
९. हे मिश्रण हटवल्यानंतर ते चांगले घट्ट होईल.
सारण तयार झाले.
ओळखीचे वाटत आहे का?
(हे कशाचे सारण आहे ओळखणाऱ्यांना बावधन गाव इनाम )
१०. आता समोसे करायला घ्या. पारी तयार करण्यासाठी हिरव्या कणकेच्या गोळ्याचा एक उंडा घ्या. पोळी लाटून घ्या.
११. गोल पोळीचे मधोमध कापून दोन अर्धचंद्राकार तुकडे करा. एक तुकडा उचलून त्यात चमचाभर सारण भरा
१२. पारी दुमडून टोक बंद करत समोशाचा आकार द्या.
अशाच प्रकारे इतर सर्व समोसे बनवून घ्या
१३. तळण्यासाठी कढईत तेल घ्या. गॅस शेगडी चालू करा. तेल जरासे गरम/कोमट (आठवा : बालुशाही तळताना झालेली तेलाच्या तापमानाची चर्चा, same प्रकारे तळायचं आहे ) होताच त्यात समोसे सोडा.
गॅसची आच मध्यम असू द्यात.
१४. तळून झाले की हे समोसे गरमा गरम किंवा थंड गार करून(संयम असेल तर) किंवा चिंचगुळाच्या चटणीसोबत किंवा नुसतेच कसेही फस्त करा.
मळलेल्या कणकेचा गोळा
लाटलेली पारी
सारण
कच्चे समोसे
तळलेले समोसे
टीप : कणकेत आवश्यक वाटल्यास दही किंवा ताक घालू शकता.
क्रमवार फोटो दिसत नाहीयेत
.
मका अन ओटसचे सारण आहे का?
मका अन ओटसचे सारण आहे का?
मस्त दिसताहेत एन्ड प्रॉडक्ट
मस्त दिसताहेत एन्ड प्रॉडक्ट समोसे.
वाह!! हेल्दी आणि टेस्टि
वाह!! हेल्दी आणि टेस्टि वाटतायत मला.
सामो धन्यवाद
सामो धन्यवाद
नाही मूग डाळीचे
लिहिले आहे कृती मध्ये
धन्यवाद मानव
अरे वाह छान दिसताहेत.
अरे वाह छान दिसताहेत. आमच्यकडे पालकपुऱ्या हा प्रकार हिट असतो. समोसेही ट्राय करायला हवेत एकदा
मस्त!
मस्त!
छान खुसखुशीत रेस्पि!
छान खुसखुशीत रेस्पि!
मस्त रेसिपी किल्ली
मस्त रेसिपी किल्ली
जबरदस्त दिसतोय समोसा..
जबरदस्त दिसतोय समोसा..
हिरवे हिरवे गार समोसे, पालक
हिरवे हिरवे गार समोसे, पालक भाजीच्या मखमालीचे.
त्या सुंदर मखमालीला, किल्लीताई ती तळत होती.
गार नाही हो बोकलत, समोसे गरम
गार नाही हो बोकलत, समोसे गरम खायचे आहेत.
शोभिवंत पदार्थ दिसतो आहे.
कच्चे समोसे छान दिसत आहेत.
कच्चे समोसे छान दिसत आहेत. चटणी किंवा सॉस सोबत तळलेले समोसे खायला भारीच आहेत.
सुरवातीला गारच असणार तळल्यावर
सुरवातीला गारच असणार तळल्यावर गरम होणार.
तळल्यावर नाही. तळताना. झाले
तळल्यावर नाही. तळताना. झाले तळून की गार व्हायला लागतात.
समोसे मस्तच दिसत आहेत.
समोसे मस्तच दिसत आहेत.
हिरवेगार समोसे असले तरी मी ते गरमच खाईन
छान!!
छान!!
सोनाली
>>>>>>>हिरवेगार समोसे असले तरी मी ते गरमच खाईन Happy
सोनाली
चांगली दिसतेय कृती
चांगली दिसतेय कृती
ही पालेभाजी च्या एन्ट्री ला चालेल का?
(आता लिहिले आणि खाली पाहिले.एंट्रीच आहे योग्य गृपात आहे म्हणजे)
मस्त आहेत हरियाली समोसे
मस्त आहेत हरियाली समोसे किल्ली.
म्हणजे हे समोसे खाल्ल्यावर पोपेयची पावर (पालक असल्याने) आणि मोटुची ताकद (समोसे असल्याने) मिळणार का?
आम्ही पालक कॉर्न राईस केला
आम्ही पालक कॉर्न राईस केला होता
मस्त आहे हे!
मस्त आहे हे!
हिरवेगार सामोसे, टेम्प्टींग
हिरवेगार सामोसे, टेम्प्टींग दिसताएत.
>>मोटुची ताकद >>>>>युकी ये मोटू कौन?
मस्त रेसिपी, एअर फ्रायरमध्ये
मस्त रेसिपी, एअर फ्रायरमध्ये केली की 100% हेल्दी. बाकी घटकपदार्थ (कार्ब्ज, प्रोटीन, फायबर इ इ इ) मुळे हा उत्तम हेल्दी स्नॅक होईल.
मोटू पतलु कार्टून मधला मोटू
मोटू पतलु कार्टून मधला मोटू
पॉपाय ला पालक खाऊन शक्ती येते तशी मोटू ला समोसा खाऊन आयडीया येते.
मोटू पतलु कार्टून मधला मोटू
मोटू पतलु कार्टून मधला मोटू
थॅंक्यु अनु ज्ञानात भर पडली. 
पॉपाय ला पालक खाऊन शक्ती येते तशी मोटू ला समोसा खाऊन आयडीया येते.>>>> हो काय? असं सामोसे खाणारं कार्टून माहिती नव्हतं
मस्तच, innovative.
मस्तच, innovative.
छान रेसीपी किल्ली. बक्षिस
छान रेसीपी किल्ली. बक्षिस पात्र मेहनत आहे. हे सारण भरून मी पराठे बनवेन . किवा एअर फ्रायर मध्ये करण्याजोगे आहे.
ह्याचे पिन व्हिल शेप मध्ये पण समोसे करता येतील. ग्रीन समोसा रोल्स.
छान रेसिपी..!
छान रेसिपी..!
मस्त.
मस्त.
Pages