Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दादूस त्यान्ना फेअर चान्स
दादूस त्यान्ना फेअर चान्स मिळाला नाही म्हणून चिडले. त्यान्च बरोबर होत.
फॅशन शो टास्कमध्ये उत्कर्षने छान परफॉर्मन्स दिला. वाटल नव्हत इतकी छान एक्टिन्ग असेल त्याची. सिरियल्समध्ये काम करायला हरकत नाही. सगळया मुली विकासच नाव घेत होते. पण मीरा बरोबर बोलली की विकासची एनर्जी कमी पडली.
आज शिवलीला बोलली.
उत्कर्षने मीराला टास्कसाठी निवडल्यावर गायत्रीचा जळफळाट झाला.
सो, मीरा, उत्कर्ष, विशाल, विकास, अक्षय, आणि सुरेखा पुढे जातील गेममध्ये.
उद्या राडा होणार टास्कमध्ये.
जयने ताकद दाखवली. तो एकटा
दादूस गृहीत धरून चालला होता तोच जिंकणार. निकाल लागल्यानंतर खूपच अपसेट होता. खरं म्हणजे तो टास्कच अनफेअर होता. करणारा काहीही आणि कितीही क्वांटीटी खायला घालू शकतो. शेवटी जयने ताकद दाखवली. तो एकटा असता तरी हा टास्क जिंकला असता असं वाटत होतं. मिराची तडफड पाहून बरं वाटलं
तो टास्कच अनफेअर होता. >>+ 1
तो टास्कच अनफेअर होता.
>>+ 1
दादूस परवा क्लियर विनर होता..
दादूस परवा क्लियर विनर होता..... लोक अक्षय अक्षय का म्हणत होते तेच कळत नव्हते म्हणजे त्याने पण चांगले केले टास्क पण दादूसचा कस लागला होता.... काल उत्कर्षबद्दल सोनालीला कन्व्हिन्स करताना मीराने जितका फर्म स्टॅंड घेतला तसा त्यादिवशी दादूसच्या बाजुने बोलणाऱ्यांनी घ्यायला हवा होता!!
पण एकदा निर्णय झाल्यावर दादूसने तो सहजी स्विकारायला पण हवा होता!
उत्कर्षने टास्क जिंकल्यावर प्रतिस्पर्धी म्हणून कुणा कमजोर स्पर्धकाची निवड करायला पाहिजे होती.... सहविजेता या संबोधनामुळे तो गोंधळला वाटत!
मीरा मोमोच्या रोलच्या कंप्लीट अपोझिट निघाली!! मस्त खेळतीय सरळ जाउन म्हणाली की मला जय किंवा अक्षयपैकी कुणीतरी एक पाहिजेच.... आणि उत्कर्षने लगेच दिले पण अक्षयला!! तो नाही म्हणू शकला असता!!
बाकी ते लोक काय खुसुरपुसुर गॉसिप करतात ते टीव्हीवर ऐकु येत नाही नीट..... Voot वर हेडफोन लावून कळत असेल कदाचित नीट!
युट्युबवर. बिग बॉसच्या छोट्या
युट्युबवर. बिग बॉसच्या छोट्या छोट्या क्लिप्स यायला सुरुवात झाली आहे.
युट्युबवर. बिग बॉसच्या छोट्या
युट्युबवर. बिग बॉसच्या छोट्या छोट्या क्लिप्स यायला सुरुवात झाली आहे. >>> मी सध्या त्याच बघते.
काल कुठलातरी एक एपिसोड अर्धा बघितला, ज्यात महिलांच्यात एकमत झाले नाही (ते कधी होतं का ) यावेळी फार इंटरेस्ट वाटत नाहीये.
कालच्या भागात मजा आली.
कालच्या भागात मजा आली. टास्क्स रंगत चालली आहेत. मला वाटले होते त्या प्रमाणे उत्कर्ष हुषार पणे खेळत आहे. काल उखाणा, नाच वगैरेही मस्त केले त्याने. त्यामानाने विकार बोर वाटला अगदी. डान्स मधे सुरेखा ताईंनी पण भार्री पर्फॉर्म केले!
मला ते दादुस -वि. अक्षय टास्कच झेपले नाही. टोर्चर करणारा विरुद्ध टोर्चर सहन करणारा ही कसली कंपॅरिझन?
मीरा सुद्धा मस्त खेळत आहे. बर्याचदा अनॉयिंग वाटली तरी पॉइन्ट बरोबर काढते ती.
आता फुल्ल स्ट्रॅटेज्या सुरु झाल्या आहेत. विशाल ला एकटे पाडण्याचे प्लान्स दिसताय्त. विशाल खूपसा शिव सारखा वाटतो मला. बॉडी बिल्डर + बालिशपणा. विकास आणि उत्कर्ष दोन्ही ग्रुप्स मधे जाऊन तुम्हीच माझे अशा थाटात बोलत होते.
जय, दादुस आणि अक्षय की अजून कोणी तरी काल बोलत होते आपल्या फॅन फॉलोविंग आहे , विशालकडे ते नाहीये वगैरे. यांना बरे ते माहित?!
होना, अक्षय दादुस वाले टास्क
होना, अक्षय दादुस वाले टास्क जर टु वे झालं असत तर फेअर होतं, एकदा अक्षय कुक करणार, एकदा दादुस !
काल उत्कर्ष आणि सुरेखा ताई लय भारी !
जय आणि उत्कर्ष प्लॅन करतायेत कि विशाल ला एकटं पाडु, जय ने एक शब्द वापरला , बहुतेक विशाल ‘डिप्रेशन’ मधे गेला पाहिजे (बिबॉ ने डिप्रेशन शब्द म्युट केला).
पण या येड्यांना माहित नाही का , बिबॉ मधे ज्याला कॉर्नर करून एकटं पाडतात तो हिरो बनतो, बरेचदा विनर.. इतिहास गवाह है
पण कसला बेरकी आहे उत्कर्ष, वेळ आल्यावर ज्याच्या विरुद्ध कट रचत होते, त्याला घेतलं स्वतःला हेल्प करायला, कारण जय इतकाच विशालही बॉडी बिल्डर आहे (म्हणूनच जयला तो काँपिटिशन म्हणून नको आहे )
बाकी उद्याच्या प्रोमोज मधे जयचा अँगर मोड इज ऑन, जय ऑन फायर, यस्स !
बाकी मुलींमधे मीरा इज स्टिल रुलिंग !
फार भारी चाल्लाय हा सिझन आणि टास्क्स .. नॉन मराठी रिव्ह्युअर्स सुद्धा म्हणतायेत कि हिन्दी वाल्यांनी टास्क्स आणि क्रिएटिव्हिटी मराठी बिबॉ कडून शिका !
हो जय ने डिप्रेशन हाच शब्द
हो जय ने डिप्रेशन हाच शब्द वापरला. दुसर्या एका क्लिप मधे पाहिले मी.
काल विशाल फार दिसला नाही पण एकूण जय आणि त्याची कंपॅरिजन करायची तर दोघेही बॉडी बिल्डर (आणि सतत उघडे ) पण विशाल कडे एक पर्सनेबल फॅक्टर, थोडा इनोसन्स आहे शिवाय एकटे वगैरे पाडले तर सिंपथी पण मिळेल. शिवाय सोनली सोबत काहीतरी खास चालू आहे/ असणार आहे म्हणे त्याचे असे कुठेतरी यूट्यूब वर पाहिले.
मग उलट जय ला त्याचा गेम अप करावा लागेल. तो बराच डम्ब बॉडी बिल्डर कॅटेगरी वाटतो आहे सो फार.
येस..पहिले दोन सिझन एकदम
येस..पहिले दोन सिझन एकदम वरणभात होते.. हा सिझन जबरी चालला आहे..
जय कसला डबल ढोलकी आहे....
जय कसला डबल ढोलकी आहे.... मीरा जवळ उत्कर्षच्या चुगल्या अन् उत्कर्ष जवळ मीराच्या चुगल्या..... बाकी मीराचा आवाज एकदम clear आहे.... सुरेखा, तृप्ती, गायत्री यांचा पण ठीक आहे... स्नेहा अन् शिवलीला तर बोलताना दिसतच नाही... बाकी विशाल, जय, उत्कर्ष, आविष्कार, मीनल ही मंडळी तर काय बोलतात ते कळतच नाही...
उत्कर्ष, विकास, अक्षय, जय
उत्कर्ष, विकास, अक्षय, जय बोअर आहेत जाम. ह्याला काढू, त्याचा पत्ता कट करू असलं बोललं की सिंपथी मिळते विरूद्ध पार्टीला. मीरा खेळते भारीच, हुशारही आहे. पण तिला टास्कपुरतं गेमा करायच्या आणि एरव्ही आपली हळवी साईड दाखवायची ही ट्रिक कळली नाहीये बहुतेक, दुष्ट इमेज लाँग टर्मसाठी फार चांगली ठरत नाही. स्नेहा, सुरेखा, तृप्ती टास्क नीट खेळतील असे वाटत नाही, पण बाहेर चांगल्या म्हणून पोर्ट्रे होतायत, हिंदीतल्या बऱ्याच बायका जिंकलेल्या असं करायच्या बहुतेक. विशाल, मीनल, सोनाली टास्कमध्ये उपयोगी पण गेमिंगमध्ये कमी पडतील. इथे कधी कधी एकदम निरूपद्रवी लोक सुद्धा पुढे जातात. इव्हन शिवलीला, दादूससुद्धा टिकतील जरा जरी स्टॅंड घेतला तर. प्लॅनिंग, प्लॉटींग, टास्कव्यतिरिक्त काड्या करणारे किंवा कुणाला तरी कटवायची स्वप्ने पाहणारे(राजेश, सुशांत, भुषण, आस्ताद, रेशम किंवा वैशाली, नेहा, केळकर ईत्यादी) नावडते होऊन जिंकण्याची शक्यता कमी होते.
सध्या तरी माझे फेव्हरीट मीनल, सुरेखा आणि विशाल. विकास, अविष्कार, गायत्री बावळटोत्तम आहेत. त्यांच्याने काही होईल असे वाटत नाही.
शिवाय एखाद्याला डिप्रेशन येईल
शिवाय एखाद्याला डिप्रेशन येईल इतकं एकटं पाडू हे म्हणणं किती वाईट आहे. मांजरेकरांनी ह्यावर बोलायला पाहिजे.
पुंबा तुम्ही छान आढावा घेतलात
पुंबा तुम्ही छान आढावा घेतलात, न बघता खूप समजलं.
आविष्कार आणि गायत्रीला आधी बाहेर काढावे अस वाटलं, जे काही थोडं बघितलं त्यावरून. महाबोअर आहेत, डोक्यात जातात. मीनल, सुरेखाताई मलाही बऱ्या वाटल्या. अक्षय बरा वाटला मला. एक कुठलातरी अर्धा एपिसोड आणि दोन तीन मिनिटांच्या क्लिपस बघून फार सांगता येणार नाही मला.
मीरा छान गेम खेळते. जय,
मीरा छान गेम खेळते. जय, विकास डबल ढोलकी आहेत.
आविष्कारने आज पहिल्यान्दाच मीराविरुद्द स्टॅण्ड घेतला. स्नेहा आज आधी सोनाली, नन्तर उत्कर्षकडे आविष्कारविरोधात बोलली.
गायत्रीला कोणी सन्चालक केल? आवाज फुटत नव्हता तिच्या तोण्डून. वरती तिला झोपही येत होती ते स्पष्ट दिसत होत.
उद्या मोमोची शाळा पक्की!
सर्व प्रतिसाद परत वाचले, छान
सर्व प्रतिसाद परत वाचले, छान लिहिताय तुम्ही सर्वजण.
विकास, अविष्कार, गायत्री
विकास, अविष्कार, गायत्री बावळटोत्तम आहेत.
<<<<<
तो विकासही नाही आवडला,
हाहाहा.
तो विकासही नाही आवडला, channel चा माणूस आहे मात्र. दुसरे कोणी मिळालं नाही का कलर्सवाल्याना.
यावेळी प्रवाहवरून बरेच जण आणलेत. सोनाली, विशाल, सुरेखाताई.
प्रचंड डोक्यात जाणारी मीरा
प्रचंड डोक्यात जाणारी मीरा काल आवडली. तिनं कॅप्टनशीप नको हे सांगितलं तेव्हा. पटकन् निर्णय घेतला तिनं विचलीत न होता. नंतर मिठ्या मारताना, मी रडत नाही, मला उगीच रडवू नका म्हणाली ते पण आवडलं.
महिला महिला आणि भांडायला नंबर
महिला महिला आणि भांडायला नंबर पयला
प्रचंड डोक्यात जाणारी मीरा
प्रचंड डोक्यात जाणारी मीरा काल आवडली. तिनं कॅप्टनशीप नको हे सांगितलं तेव्हा. पटकन् निर्णय घेतला तिनं विचलीत न होता. नंतर मिठ्या मारताना, मी रडत नाही, मला उगीच रडवू नका म्हणाली ते पण आवडलं>>का कुणास ठाऊक? मला तिथे पण fake वाटली ती.....उगाच कॅमेरा साठी आणि प्रेक्षक बघत आहेत म्हणून तसं केलं असं वाटलं...
जयने खरे रंग दाखवायला सुरवात
जयने खरे रंग दाखवायला सुरवात केली, उत्कर्षला कंट्रोल करतोय तो , बाकी पब्लिकही हाजी हाजी करतय जयची !
मीरा आणि जय बॉसलेडी आणि बॉसमॅन झालेत
मीराने टीकार्ड पण काहीतरी विचार करून नाकारलं असणार, इमॅजिन जर उत्कर्ष रोज गार्डनमधे झोपला असता तर सिंपथी घेऊन गेला असता आणि कॅमेरा अटेन्शनही, सो मीरा प्लेड स्मार्ट , तसही कॅप्टन न होता कॅप्टनला कंट्रोल करतेच ती
मिनल आज पण चांगली वाटली टास्कमधे , जयलाही सुनावलं नंतर !
स्नेहा-अविष्कार स्टोरीही हळुहळु बाहेर पडायला लागली आहे, बिबॉ गेटिंग व्हॉट दे वाँट !
मीरा सुरुवातीपासून इतकी चढेल
मीरा सुरुवातीपासून इतकी चढेल आणि आक्रमक झाली आहे की तिच्या विरोधात सगळेच जातील असं वाटतंय.
काल ते पदक तिला मिळालं तेव्हा उत्क्याचा चेहरा कसला जोरात पडला.
कॅप्टनशिप म्हणजे स्वतःच्या मित्रांना सोपी कामं द्यायची हा तिनं दाखवलेला अर्थ भारी आवडला. महेश म्हणेल, बाई तू कर अॅन्करींग..मी भांडी घासतो.
जय आणि मीरा स्वतः कॅप्टन असल्यासारखे वागतायत.
मला ते temptation room चे
मला ते temptation room चे काही झेपलेच नाही.... मीराने काय मिळवले? एकूणात कॅप्टनशीपची संधी नाकारुन तिला काय मिळाले? त्या बुकमधले पहिले पान फाडायचा बहुमान? गुडविल वगैरे ठीक आहे पण ती त्यासाठी बिग बॉसमध्ये आलीय असे वाटत नाही!!
स्नेहाला गेले दोन एपिसोड काहीच स्कोप मिळत नाहिये..... ती आता अविष्कारच्या निमित्ताने का होईना जरा फ्रेममध्ये यायचा प्रयत्न करतेय!!
उत्कर्ष जोपर्यंत स्वताच्या डोक्याने खेळणार नाही तोपर्यंत त्याचे अवघड आहे!! त्याला व्यवस्थित मॅन्युपलेट करतायत बाकीचे लोक!!
सोनाली आवडायलीय
मीनलचा काल पॉईंट बरोबर होता पण नंतर ती इतरांना जितके नीट समजावून सांगत होती की कामाची वाटणी का अनफेअर आहे तेच तिने टेबलवर ठामपणे मांडायला हवे होते.... तिथे उगीच उचकली ती!
यासगळ्यात अक्षय सोबर वाटतोय.... कामे नीट करतोय.... टास्कमध्ये पण नीट आहे.... काही लोकांच्या गुडबुक्स मध्ये जाउन बसलाय.... वेळ आल्यावर आपलाआपला एकटा स्टॅंड घेवू शकेल असे वाटतेय.... सध्यातरी तो जय-मीरा-उत्कर्ष यांच्या कंपूबरोबर दिसतोय पण त्यात रमत नाहीये.... लवकरच त्या कंपूमधून बाहेर पडेल तो असे वाटतेय!!
अक्षय, सोनाली, मीनल वगैरे एक चांगला अपोनंट ग्रूप तयार झालेला बघायला आवडेल
काल ते पदक तिला मिळालं तेव्हा
काल ते पदक तिला मिळालं तेव्हा उत्क्याचा चेहरा कसला जोरात पडला.
>>>+ 1
तो एकतर दोन्ही बोडिबिल्डर घेऊन खेळत होता, फेयर गेम नव्हताच.. मीरा चे फुल कौतुक आहे इथे...
ते पदक तिला कस काय मिळालं, हे
ते पदक तिला कस काय मिळालं, हे कळलं नाही! इव्हन ती सुद्धा सरप्राइज होती.
अरे ते पदक तिला मिळणार हे
अरे ते पदक तिला मिळणार हे माहितच होते की. कॅपटन शिप चा तो टास्क होता तो जो जिंकेल त्याला चॉइस होता कॅप्टनशिप निवडायची की टेम्टेशन रूम. मग जे उरेल ते दुसर्याला मिळणार होतं त्यानुसार उत्कर्ष आणि जय ने चर्चा पण केली होती की काय निवडावे. त्याने कॅप्टनशिप निवडल्यावर मगच मीराला टेम्टेशन रूम मिळाली. त्यामुळे तेव्हा तिला किंवा उत्कर्ष ला काही आश्चर्य वाटण्याचा प्रश्न नव्हता.
तो टेन्स झाला केव्हा तर त्या कार्ड मुळे त्याची कॅप्टनशिप जाऊ शकते हे कळल्यावर. ती नंतर पावर कार्ड नको म्हणेल असं वाटलं नव्हतं. कदाचित त्या कार्ड ची पावर नक्की काय असेल हे माहित नसेल तरी ती एक शक्यता आधी लक्षात घेऊन विचार करून गेली असेल ती आत. काहीही असो, मला वाटत नाही तिने हे इमोशनली केलं. मस्त खेळतेय एकूण ती.
मीराने कॅप्टन नाही बनायचं असा
मीराने कॅप्टन नाही बनायचं असा निर्णय घेतल्यावर तिला दुसरा काही पर्याय दिला नव्हता की हे नाही तर ते. बिग बॉस एवढा मध्ये पॉज घेऊन बोलत होते की मला वाटलं सांगतील नंतर पण तिला काहीच नाही दिलं. नुसतं पान फाडून बाहेर आली ती.
गायत्रीने काय भिल्ल लोकांसारखा ड्रेस घातला होता. असं वाटत होतं आता हातात भाला घेऊन नाचायला लागेल. ती सतत त्या जयच्या मागे असते. सुरेखा मध्येच ओरडली ते एडिट केलं का कारण ब्रेकनंतर काही दाखवलं नाही. स्नेहा का बोलली उतक्याशी आविष्कारबद्दल, सोनालीला प्रॉब्लेम आहे तर ती बोलेल ना. अविष्कार काय म्हणत होता सेकंड चान्स वगैरे. दोघांनाही आधी विचारलं असणार की ते comfortable असतील की नाही ते, काहीच माहिती नव्हतं तो/ती असणारे वगैरे खोटे वाटते. त्यांना बघून श्वेता तिवारी आणि राजाची (तिचा पहिला नवरा) आठवण येते. तेही एकाच सीजनला होते.
कमोडचा विषय जयला फारच प्रिय आहे असे दिसते, सारखं आपलं तेच.
कालच्या भागात एक गोष्ट जाणवली
कालच्या भागात एक गोष्ट जाणवली की बिबॉसने यांतील काहींना कानपिचक्या दिल्या का.काल सबटायटल्स कमी द्यावी लागली.स्पष्ट बोलत होते.
शिवलीला एकदम चार्ज झाल्यासारख वाटल. आया मेन ज्या एक्स नवरा बायकोंना घेतल आहे,ते पहिल्यांदाच थोड का होईना पण ओपनली बोलताना दिसले.बहुतेक सांगितलेल दिसत आहे की ज्यासाठी घरात घेतल आहे ते करा.
काल आविष्कार एक वाक्य बोलला आहे,ज्याचा बिबॉ पुरेपूर वापर करणार.
तो म्हणाला की मी शांत आहे,कारण जर भडका उडला,तर सगळ बारा वर्षांपासूनच बाहेर येईल आणि स्नेहासुध्दा व्हॉयलेंट होते.
म्हणजे बिबॉ यांच भांडण चव्हाट्यावर आणणार.
बाकी,टास्क मस्तच आहेत.
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी एका सीझनला नव्हते. राजा राहुल महाजनवाल्या सीझनला होता.
डेलनाझ इराणी आणि तिचा एक्स राजीव पॉल एका सीझनला होते.
Pages