(या उपक्रमात दोनच लेख आले. तेव्हा यात लिहिण्याचा विचार केला. परंतु तो धागा पाहिला असता त्यात ठरावीक विषय दिला असल्याची आठवण झाली. दूरदर्शन मालिका, चित्रपट या विषयी माझे ज्ञान अगाध असल्याने, विषयांतर करुन लिहीत आहे, त्याबद्दल क्षमस्व. )
नमस्कार, मायबोली २४ तास वर आपले स्वागत आहे.
आजच्या ठळक बातम्या.
मायबोली व्यवस्थापन मंडळाची आज बैठक झाली. त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
ते निर्णय असे आहेत.
१. येत्या एक ऑक्टोबर पासून, मायबोलीचे अॅडमिन, वेबमास्टर, नियंत्रक हे लोकशाही पद्धतीने निवडले जातील. निवडून आलेल्या चमूचा कालावधी दोन वर्षे असेल. यासाठी खुली मतदान पद्धती अवलंबली जाणार असून मतदान धाग्यात कुणी कुणाला मत दिले हे दिसणार असल्याने, पक्षपाताचा आरोप करण्यास वाव रहाणार नाही. जाणुन घ्या या पदांसाठी काय आहे पात्रता.
अॅडमिन: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान दहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान चार खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान चार मायबोली सदस्यांचे खाते रद्द करवण्यात हातभार लावलेला असावा आणि इतर सदस्यांच्या प्रतिसादाचे किमान शंभर स्क्रीनशॉट्स सेव्ह करुन त्यांचा स्कोअर सेटलींगसाठी वापर केलेला असावा.
वेबमास्टर: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान सहा ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान दोन खाती कारवाईत रद्द झालेली असावीत. तसेच किमान पंचवीस धागे भरकटवण्याचा अनुभव असावा आणि असंबद्ध गप्पा धाग्यात किमान शंभर सुसंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.
नियंत्रक: उमेदवाराच्या मूळ सदस्यनामाव्यतिरीक्त किमान तीन ड्युआयडीज असाव्यात आणि त्यातिल किमान एक खाते कारवाईत रद्द झालेले असावे. तसेच सध्याच्या व्यवस्थापन मंडळावर किमान पंचवीस वेळा पक्षपाताचा आरोप केलेला असावा आणि गंभीर लेखांवर किमान पन्नास असंबद्ध प्रतिसाद दिलेले असावेत.
इच्छुक उमेदवारांनी "मी उभा/भी आहे - पदनाम- {सदस्यनाम}” अशा शिर्षकाचा बाफ़ काढुन त्यात आपली पात्रता सिद्ध करावी, आणि त्याच बाफमध्य़े प्रचार सुरु करावा. हा बाफच उमेदवाराची प्रवेशिका समजली जाईल. प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख एक ऑक्टोबर आहे. सध्या अपात्र असणार्या इच्छुक उमेदवारांनाही पात्रता मिळवण्यास हा कालावधी पुरेसा आहे असे निवडणुक संयोजकांनी सांगीतले.
जरी वरील पदांवरील उमेदवार लोकशाही पद्धतीने निवडल्या जातील, काही ठरावीक कामांसाठी स्थायी समीती सुद्धा नेमण्यात आल्या आहेत.
२. मायबोलीवर शुद्ध मराठीत लेखन व्हावे, इंग्रजी शब्दांचा वापर कमीत कमी व्हावा आणि लेखन देवनागरीतूनच व्हावे या करता सदस्यांवर जातीने लक्ष ठेवणे, समज देणे यासाठी एक स्थायी समीती स्थापन करण्यात आली आहे. राज व नानबा हे त्या समीतीचे सदस्य आहेत.
३. सगळ्या लेखांवर लोक विषयाला धरुन गंभीर प्रतिसाद देतात की नाही, कोतबोमध्ये फसवे धागे निघत नाहीत ना यावर लक्ष ठेवण्यासाठी बोकलत यांची एक सदस्यीय स्थायी समीतीत नेमणुक करण्यात आली आहे.
आता काही खळबळजनक बातम्या:
४. व्यत्यय, हायझेनबर्ग, मानव हे त्रिकुट शनी शिंगणापूरच्या देवळात नवस करताना रंगे हात आढळुन आले. त्यांच्या बॅगेत स्तोत्रांची पुस्तके सापडली. घरात होणारा मृतात्म्यांचा त्रास, करणी, भानामती प्रकारांमुळे नोकरीत बढती न मिळणे, व्यवसायाची भरभराट न होणे, देवीच्या कोपामुळे
पसरणार्या कोव्हीड पासून सुरक्षा अशा कारणांसाठी विविध देवस्थानात ते नेमाने नवस करतात, मांत्रिकांची मदत घेतात असे चौकशी अंती निष्पन्न झाले.
५. नवी मुंबई जवळ मद्याचा अवैध साठा असलेले एक मोठे गोदाम सापडले आहे. भेसळ करणे, कर चूकवून लोकांना घरपोच मद्य पोचवणे, ड्राय डेच्या दिवशी मद्य विक्री करणे हे धंदे इथुन चालत असल्याचे लक्षात आले. या गोदामाचे मालक ऋन्मेष व मानव पृथ्वीकर असल्याचे कळते. एकीकडे उघडपणे मद्याच्या उदात्तीकरणाचा कठोर विरोध करत असताना दुसरीकडे लपुन छपुन अवैध मद्यविक्रीचा धंदा ही जोडगोळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
६. एका धाग्यावर ऋन्मेष यांनी आपली चूक कबूल केल्याची बातमी व्हायरल झाल्याने मायबोलीवर मोठी खळबळ उडाली. चौकशी नंतर असे निदर्शनास आले की तो आयडी "ऋन्मेssष" नसून "ऋन्मेsssष" असा तोतया होता. याबाबत ऋन्मेssष यांच्याशी सम्पर्क केला असता "हे मला बदनाम करण्याचे षडयंत्र असुन यावर मी लगेच एक लेख पाड -माफ करा- लिहीणार आहे" असे ते म्हणाले.
धावत्या बातम्या:
७. "फल ज्योतिष्य, राशी भविष्य एक थोतांड" हा लेख मायबोलीवर लौकरच प्रसिद्ध होणार असून, तो सामो आणि रश्मी यांनी मिळुन लिहीला असल्याचे कळते.
८. मायबोलीवरील एक प्रसिद्ध व्यक्ती रोज रात्री वेषांतर करुन हल्दीराम आऊटलेट मध्ये जाउन गुलाबजाम, रबडी, बालुशाही, श्रीखंड, कलाकंद इत्यादि डिशेस आइसक्रीम सोबत खात असल्याचे तेथील एका कर्मचायाने मायबोली २४ तासला फोन करुन सांगीतले. मायबोली २४ तासने याचा शहनिशा केला असुन ती व्यक्ती सई केसकर असल्याचे निदर्शनास आले.
९. “आयुर्वेद तारी त्याला कोण मारी" हा पंचकर्म आणि मंत्रोच्चाराद्वारे शुद्ध केलेले धातु यांचे गंभीर आजारांवरील उपचारांचे महत्व पटवून देणारा लेख मायबोलीवर लौकरच प्रकाशीत होणार असून श्री आरारा हे त्याचे लेखक असल्याचे कळते.
१०. मायबोलीच्या एका गटग मध्ये एक त्रिकुट ऑन द रॉक्स स्कॉचचा आस्वाद घेत असताना, वारंवार बाजुच्या खोलीत जाउन ग्लास संपवून परतत असल्याचे आमच्या बातमीदाराने पाहिले. आधी ते धुम्रपानास जात असावेत असा त्याचा समज झाला. पण नंतर धुम्रपान कक्ष दुसरीकडे असल्याचे लक्षात आल्यावर तोही त्या खोलीत ग्लास घेउन त्यांच्या मागोमाग गेला असता हे त्रिकुट तिथे स्कॉचमध्ये पेप्सी टाकुन पीत असल्याचे दिसून आले. च्रप्स, आशुचॅंप व सोन्याबापू अशी त्यांची नावे असून, नीट पिणे फार अवघड असल्याने व चवही सहन होत नसल्याने नेहमी लपुन पेप्सी अथवा कोक घालुन पीत असल्याचे त्यांनी कबूल केले.
११. आमच्या बातमीदाराने अॅमी यांच्याशी संपर्क केला असता इतर महत्वाच्या कार्यात गुंतल्यामुळे मायबोलीवर येणे शक्य होत नाही असे त्यांनी सांगितले. आजकालच्या स्त्रियांच्या डोक्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे नसते खुळ शिरले असून त्यापायी केल्या जाणाऱ्या थेरांमुळे भारतीय समाज अधोगतीला लागला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही अधोगती रोखण्यास गावोगावी फिरून स्त्रियांना जागृत करण्याच्या कार्यात त्या व्यग्र आहेत. "होममेकर हीच खरी आदर्श स्त्री" व "रोजच्या स्वयंपाकात सोवळ्याचे महत्व" यावरील त्यांची गाजत असलेली व्याख्याने लौकरच मायबोलीवर लिखित रूपात प्रसिद्ध करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
१२. राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.
१३. पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते.
याबरोबरच आजच्या बातम्या संपल्या. पुन्हा येउ लौकरच मायबोली निवडणुकांचे लाइव्ह कव्हरेज घेउन. बघत रहा मायबोली २४ तास.
(हे केवळ गमतीने लिहिले असून यात उल्लेख आलेल्या सर्व सदस्यांनी कृपया दिवे घ्या ही नम्र विनंती. हे खेळीमेळीने घेतले जाईल ही अपेक्षा.)
बातम्यांमध्ये व्यत्यय यांनी घातलेली भरः
१४. सातच्या आत घरात या विषयावर सोनू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. स्त्रियांनी संध्याकाळी एकटे भटकण्यावर बंदी आणावी या त्यांच्या मागणीची कारणमीमांसा या व्याख्यानात केली जाईल.
१५. खरे सिम्बा हे एक स्थुलप्रकृती (ढेरपोटे) असून ते सोशल मीडियावर टाकत असलेली प्रकाशचित्रे फोटोशॉप केलेली असल्याची खळबळजनक माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते. ही बातमी मिळाल्यावर हृदयभंग झालेल्या तरुणींनी दिलेल्या प्रतिक्रिया इथे देता येण्याजोग्या नाहीत
१६. आर एस एस च्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र प्रत्यक्षात यावे यासाठी भरत यांनी महायज्ञ आयोजित केला आहे. लवकरात लवकर चातुर्वर्ण्य व्यवस्था पुनर्प्रस्थापित व्हावी हा उद्देशही त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. या महायज्ञाच्या तांत्रिक बाजू श्री आरारा सांभाळतील.
१७. साती यांनी त्यांचा id परत घ्यावा म्हणून वेमा त्यांना फोन करून हॅरास करतायत अशी तक्रार दाखल केली गेली आहे.
१८. "एका भुभु द्वेष्ट्याची डायरी" हे नवीन सदर आशुचॅम्प सादर करतील. यामध्ये त्यांना अमा महत्वाची मदत करतील. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीमुळे प्राण्याची भीती ही आपल्या जीन्समध्ये (पक्षी आपल्या रक्तात [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) आहे त्यामुळे कुत्रे, मांजरी अशा हिंसक होऊ शकणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवावे या मुद्द्यावर या दोघांचा भर असेल
१९. "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या शिर्षकाची मालिका घेऊन येत आहेत जिज्ञासा. "ग्लोबल वॉर्मिंग - एक थोतांड" या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका एव्हढीच जिज्ञासा यांची ओळख नाही तर "प्लास्टिक-एक वरदान" हा त्यांचा कार्यक्रम याआधी सगळे टीआरपी विक्रम तोडणारा ठरलेला आहे. पुढील पिढ्याना उद्देशून केलेल्या "तो मैं क्या करू?" या बिनतोड प्रश्नाला लहान बाळे आणि जन्माला न आलेली पिढी काहीच उत्तर देऊ न शकल्याने त्या सद्यपिढीच्या आयकॉन ठरल्या आहेत
२०. लसीकरणाचे तोटे डॉ कुमार त्यांच्या नवीन मालिकेत समजावतील. क्लिष्ट वैद्यकीय भाषेचा अतिरेक केल्यामुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. पण कॉन्स्पिरसी थियरी सिद्ध करण्यासाठी क्लिष्ट भाषा आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
२१. आपल्या चॅनेलच्या लोकप्रिय अँकर मी_अनु या उद्यापासून पुन्हा तुमच्या भेटीस येतील. "मांजर" या विषयावर उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी सब्बाटिकल रजा घेतलेली. पण शेपटीवालं मांजर की ऑफिसातलं मांजर (पक्षी मॅनेजर [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) यामध्ये निर्णय होऊ न शकल्याने त्या दोनच दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत.
Submitted by व्यत्यय on 23 September, 2021 - 14:37
लिहाच मानव! ॲमीचंही मस्त
लिहाच मानव! ॲमीचंही मस्त जमलंय.
फिशपॉन्ड्स कुणी सीरियसली घेत नाहीत!
मानवदा.. अजूनही लिहा कि.. मजा
मानवदा.. अजूनही लिहा कि.. मजा येतेय वाचायला..
(No subject)
मानव मामा
मानव मामा
(हे संबोधन फारच आवडलंय मला
तुम्हाला नको वाटत असेल तर सांगा म्हणत नाही)
लिहाच आता
लेख आणि व्यत्यय ह्यांची addition भारीच!
मजा आली
हा हा अमितव.
हा हा अमितव.
तसे काही खास वेगळे नाहीय, तीच थीम आहे.
द्यायचंच तर मग नाव बदलून कशाला? खास लोकाग्नहास्वातव (खर्याखुर्या बरं का) नावासकटच देतो. यातील कुणाही बद्दल (अथवा कुठल्याही माबो सदस्याबद्दल, for that matter) माझ्या मनात कसलाही आकस नाही, त्यांचे गंभीर लेखन, प्रतिसाद आवडलेच आहे. तेव्हा खालील पहिल्यात उल्लेख असलेल्या सदस्यांनी खास करुन दिवे घ्यावेत.
राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.
पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते.
किल्ली, काही हरकत नाही.
किल्ली, काही हरकत नाही.
छान लिहीले आ हे की
छान लिहीले आ हे की
Additions पण भारी!
Additions पण भारी!
* "एका भुभु द्वेष्ट्याची
* "एका भुभु द्वेष्ट्याची डायरी" हे नवीन सदर आशुचॅम्प सादर करतील. यामध्ये त्यांना अमा महत्वाची मदत करतील. हजारो वर्षांच्या मानवी उत्क्रांतीमुळे प्राण्याची भीती ही आपल्या जीन्समध्ये (पक्षी आपल्या रक्तात [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) आहे त्यामुळे कुत्रे, मांजरी अशा हिंसक होऊ शकणाऱ्या प्राण्यांना दूर ठेवावे या मुद्द्यावर या दोघांचा भर असेल
* "ऋणं कृत्वा घृतं पिबेत" या शिर्षकाची मालिका घेऊन येत आहेत जिज्ञासा. "ग्लोबल वॉर्मिंग - एक थोतांड" या बेस्टसेलर पुस्तकाची लेखिका एव्हढीच जिज्ञासा यांची ओळख नाही तर "प्लास्टिक-एक वरदान" हा त्यांचा कार्यक्रम याआधी सगळे टीआरपी विक्रम तोडणारा ठरलेला आहे. पुढील पिढ्याना उद्देशून केलेल्या "तो मैं क्या करू?" या बिनतोड प्रश्नाला लहान बाळे आणि जन्माला न आलेली पिढी काहीच उत्तर देऊ न शकल्याने त्या सद्यपिढीच्या आयकॉन ठरल्या आहेत
* लसीकरणाचे तोटे डॉ कुमार त्यांच्या नवीन मालिकेत समजावतील. क्लिष्ट वैद्यकीय भाषेचा अतिरेक केल्यामुळे त्यांची लोकप्रियता उतरणीस लागली आहे. पण कॉन्स्पिरसी थियरी सिद्ध करण्यासाठी क्लिष्ट भाषा आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
* आपल्या चॅनेलच्या लोकप्रिय अँकर मी_अनु या उद्यापासून पुन्हा तुमच्या भेटीस येतील. "मांजर" या विषयावर उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी सब्बाटिकल रजा घेतलेली. पण शेपटीवालं मांजर की ऑफिसातलं मांजर (पक्षी मॅनेजर [पक्षी म्हणजे उडणारे नव्हे {सगळेच पक्षी उडू शकत नाही हे आम्हाला माहीत आहे}]) यामध्ये निर्णय होऊ न शकल्याने त्या दोनच दिवसात पुन्हा रुजू होणार आहेत
Additions पण भारी >+11
Additions पण भारी >+11
हॅ हॅ
हॅ हॅ
व्यत्यय, कंटेंट तुमचा पण बराच झालाय.सेपरेट लेख/एन्ट्री पण करा.
मला कुमार, जिज्ञासा, ऍमी चे अपडेट सर्वात जास्त आवडले.
नवीन additions पण मस्त!
नवीन additions पण मस्त!
छान भर व्यत्यय.
छान भर व्यत्यय.
व्यत्यय खूप महत्वाच्या ठळक
व्यत्यय खूप महत्वाच्या ठळक बातम्या.
>> सेपरेट लेख/एन्ट्री पण करा.
>> सेपरेट लेख/एन्ट्री पण करा.
नको, तसाही मी मानवदांचा (की ते माझा?) डु आयडी असल्याने या एकाच धाग्याला टीआरपी मिळुदे.
@मानव: शक्य झाल्यास मूळ लेख अपडेट करा या नवीन additions नी
हो, करतो व्यत्यय.
हो, करतो व्यत्यय.
मजा सुरु आहे ! मी करू का दोन
मजा सुरु आहे ! मी करू का दोन तीन अॅडीशन्स?
- प्रत्येक बाफवर सातत्याने चिखलफेक आणि असांसदीय भाषेत ट्रोलिंग करण्यासाठी कुप्रसिद्ध आयडी फारेन्ड यांची अॅडमिन ने अखेर दखल घेतली असून हा उपद्रव ताबडतोब बंद न केल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यास देण्यात आला आहे. फारेन्ड यांची यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांना कारवाईची अजिबात भिती वाटत नसून फाssरेन्ड, फा...... असे काही आयडी त्यांनी आधीच काढून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
-
- रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते DJ....... यांचा पणतू चि. तन्मय हा चित्पावन संघाच्या शिष्यवृत्तीसह अमेरिकेस उच्च शिक्षणासाठी रवाना झाल्याचे DJ...... . यांनी आज सांगितले. उर्वरित आयुष्य संघाच्या कार्यास वाहून घेण्याचा मानस त्यांनी कळवला. त्यांच्या बहुचर्चित "वीर सावरकर - स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार" या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
-
- माबोवर नविन सदस्यांना मनमिळाऊपणे सामावून घेण्यासाठी "स्वागत समिती" हा उपक्रम पुन्हा सुरु करण्यात येणार असून जगमित्र असा सार्थ लौकिक असणार्या "टीपापा" या कंपू ला ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.
राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा
राजकारण हा गंभीर आणि महत्वाचा विषय असून त्यावर विचारांची देवाण घेवाण व्हायलाच हवी. परंतु फ़क्त देवाण करणारे काही लोक मायबोलीवरील सर्वच राजकारण धाग्यांत विषयाच्या पार्श्वभागावर लाथ घालुन तेच ते दळण दळत बसतात, एकमेकांवर वर्षा नु वर्षे तेच ते वैयक्तीक आरोप करत बसतात, इतर काही धाग्यावरही याचे पडसाद उमटत रहातात अशी खंत सध्याच्या व्यवस्थापन मंडळाने व्यक्त केली. यासाठी सदस्यांवर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवण्यास, वेळीच तंबी देण्यास आणि तरीही न ऐकल्यास त्वरीत सदस्यत्व रद्द करण्यास एक स्थायी समीती नेमण्यात आली आहे. नगरवाले, वटवृक्ष, DJ, झम्पू दामले हे त्या समीतीचे सदस्य असून समीतीचे अध्यक्षपद वर्षातून सहा सहा महीन्यांकरता रश्मी व उदय यांना विभागून देण्यात आले आहे.>>>>>>>
पूर्वाश्रमीचे लिंबुटिंबु (सध्याचे कोण बरे?) आणि आरारा यांना मायबोलीचे टॉम अॅंड जेरी अशी उपमा एका सर्वेक्षण मंडळाने दिली आहे. परंतु यातील टॉम कोण व जेरी कोण याबद्दल त्यांनी काहीच खुलासा केला नसल्याने कोण खरा जेरी व कोण खरा टॉम, यावरुन दोघांत लौकरच जुंपणार असल्याच्या अंदाजाने पॉपकॉर्नच्या विक्रीत विक्रमी नोंद झाली असल्याचे कळते. >>>>>>
- प्रत्येक बाफवर सातत्याने
- प्रत्येक बाफवर सातत्याने चिखलफेक आणि असांसदीय भाषेत ट्रोलिंग करण्यासाठी कुप्रसिद्ध आयडी फारेन्ड यांची अॅडमिन ने अखेर दखल घेतली असून हा उपद्रव ताबडतोब बंद न केल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यास देण्यात आला आहे.>>>>>>
-
- रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते DJ....... यांचा पणतू चि. तन्मय हा चित्पावन संघाच्या शिष्यवृत्तीसह अमेरिकेस उच्च शिक्षणासाठी रवाना झाल्याचे DJ...... . यांनी आज सांगितले. उर्वरित आयुष्य संघाच्या कार्यास वाहून घेण्याचा मानस त्यांनी कळवला. त्यांच्या बहुचर्चित "वीर सावरकर - स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार" या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. >>>>>>> डिजे ना सायबर अॅटॅक आला असेल.
-
मस्तच मैत्रेयी आणि मानव
मस्तच मैत्रेयी आणि मानव
मैत्रेयी
मैत्रेयी
छानच ! जबरदस्त बातम्या.
छानच !
जबरदस्त बातम्या.
DJ ......
DJ ......
कुमार यांचे विषयी आवडले.
>>>>>>>>>>>फाssरेन्ड, फा...... असे काही आयडी त्यांनी आधीच काढून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
अरे व्वा, मस्तंच. अॅडमिन्
अरे व्वा, मस्तंच. अॅडमिन्/वेमा/मॉडरेटर या पदांकरता वेल क्वालिफाय्ड आय्ड्या कोण याची आय्ड्या आली. विशेष पत्रकार व्यत्यय यांच्या प्रादेशिक बातम्या (अड्ड्याच्या) देखील उठावदार आहेत. फक्त त्यात काळीमाऊ आणि उदयशेठ यांचा अनुल्लेख ठळकपणे जाणवला...
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते DJ..>>>>वक्त बदल दिया, जज़बात बदल दिये, जिंदगी बदल दि
राज यांच्या मागणीवरून :
राज यांच्या मागणीवरून :
-रामायण आणि महाभारत हे आपले पुरातन धर्म ग्रंथ इंजिनिअरिंग आणि मेडिकल च्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जावेत अशी मागणी हिन्दु अभिमान सेने च्या श्री. कृष्णमार्जार शास्त्री यांनी महाराष्ट्र राज्य सरकार कडे केली असून माजी मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणविसांची या कामी त्यांनी मदत घेतली आहे.
-राजाराम ब्रिगेड चे कट्टर समर्थक श्री.हेमंत श्रीनगरवाले आणि उजव्या गटाचे श्री. DJ..... तसेच कॄष्णमार्जार शास्त्री यांच्यात गेले काही वर्षे चालू असलेल्या ब्राह्मण वि. ब्राह्मणेतर या वादात प्रथमच कॅनडास्थित श्री अरुणोदय यांनी आपले मत दिले असून माबोवर जातीयवाद आणण्यात दोन्ही बाजू सारख्याच दोषी आहेत अशी त्यांनी नि:संदिग्ध आणि संतुलित भूमिका घेतली आहे.
मूळ लेख आणि नंतरच्या पुरवण्या
मूळ लेख आणि नंतर आलेल्या सगळ्याच पुरवण्या मस्त जमल्या आहेत.
अरे मस्त आहेत मानव ही नवीन अ
अरे मस्त आहेत मानव ही नवीन अॅडीशन्स पण!
व्यतय चार्वाकाची ओळ वाचुन पटकन जामोप्या डोळ्यासमोर आले. जिज्ञासा आणि अनुचं आवडंलं एकदम.
अनुंना अजुन दोन दिवस उशिर होणार आहे असं आत्ताच हाती आलेल्या वृत्तात समजले. याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या मांजराला कोणीतरी 'ए कुत्र्या' अशी हाक मारल्याने त्यांना फारच राग आला आहे. असं आमचा वार्ताहर कळवतो.
रच्याकने: पॅरँथिसिस चांगले बंद केल्याबद्द्ल विशेष धन्यवाद!
>>DJ....... यांचा पणतू चि. तन्मय हा चित्पावन संघाच्या शिष्यवृत्तीसह अमेरिकेस>> फा आणि स्वागत समिती पण एकदम लोल झालेत.
(No subject)
लेख व प्रतिसाद मस्त !
लेख व प्रतिसाद मस्त !
मलाही घ्या रे , माझी अवस्था पुलंच्या कथेतल्या त्या साईड हिरो सारखी झाली !
Pages