मराठी बिग बॉस तिसरे पर्व

Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02

आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!

सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!

मराठी बिग बॉस

आज ७.३० वा.

सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आठवण काढल्याबद्दल धन्यवाद अमुपरी, स्वरूप.

मी सगळी चॅनेल्स काढून टाकली आहेत आणि voot वर अजून बघायला सुरुवात नाही केली. वाचायला येते इथे.

आज काय फार मज्जा नाही आली राव!
उत्कर्षने मस्त डोके चालवले त्या पिना सुट्ट्या करुन count वाढवला.
मोमो किती इरिटेटींग आहे! प्रत्येक गोष्टीत तक्रार
कच्चा लिंबू बरा खेळतोय.
सुरेखा कुडची सेन्सिबल आणि कमांडिंग वाटतायत

आजचा भाग बरा होता.
सोनाली आणि गायत्री दोघींना कंठ फुटला आता, fullon भांडाभांडी. गायत्रीने ड्रेसिंग सेन्स आणि तो कॅरी करायची पद्धत थोडी सुधारली पाहिजे. पण ती diplomatic आहे सॉलिड!
आणि त्या सायकल रिक्षेच्या टास्क मध्ये उडी मारून चढताना सोनाली उगाच हिरोगीरी करत होती, बिचाऱ्या मीनलला लागलं की, ती मला जरा sorted वाटते.
अविष्कार intro मध्ये जितका माजोरडा वाटला तितका आत्ता दिसत नाही, उलट सगळं शांतपणे स्वीकारताना दिसतोय.
अविष्कार, दादूस आणि ती शिवलीला खूप शांत वाटतात आणि असेच राहिले तर मागे पडतील अन direct बाहेर जातील .!

मी पण अजुन बघायला सुरवात केली नाही .. येथे येउन वाचणार आणी यूट्यूब वर थोडे क्लिप बघेन. येथे सगळे छान लिहित आहेत.

सगळेच नाटकी वाटताहेत. त्यातल्या त्यात जेन्युईन विशाल, दादूस, सुरेखा आणि तृप्ती वाटताहेत मला तरी. जय फुसका ठरेल बहुतेक तरी. मराठीत मेघा, ऋतुजा, स्मिता सारखे पॉप्युलर होतात. ग्रुप करणारे डोक्यात जातात.

पुंबा धन्यवाद.

यावेळी किती बघेन माहीती नाही, वाचेन मात्र इथे नक्की. मागच्यावेळी लिहिण्याचा अतिरेक झाला माझ्याकडून, यावेळी बघितलं तरी जपून व्यक्त होईन, हाहाहा.

सुरेखा यांची मुलगी काचेच्या पलीकडे का, मागे वैशालीची मुलगी तर भेटायची तिला प्रत्यक्ष.
<<<<<
कोव्हिडमुळे बिबॉ मधे येणारे बाहेरचे गेस्ट काचेच्या पलिकडे ठेवणे मस्ट आहे, आत्ता जो बिगबॉस ओटीटी सिझन झाला त्यात टास्क्स साठी येणारे पाहुणे, फॅमिलीविक मधे जे घरचे लोक आले ते सुद्धा काचेच्या केबिनमधे येऊन गेले , घराच्या आत नाही येऊ शकत हा नियम आहे.
काचेच्या केबिनमुळे मैने प्यार कियाच्या सलमान खान-भागाबाई सारखे काचेवर किस मोमेंट्स भरपूर येऊन गेले Biggrin

मोमो नेहमीप्रमाणे इरिटेटिन्ग.

गायत्री तर पक्की शहाणी निघाली.

विकासच लग्न झालय का? मुलीन्ना कन्विन्स करण्याच्या टास्कवेळी मुलीन्च्या कित्ती जवळ जात होता.

आजची आविष्कार आणि स्नेहाची कन्विन्स करण्याच्या टास्कवेळची इण्टरएक्शन मजेशीर होती.

तृप्ती देसाई आज साध्या वाटल्या.

बाकी ह्या वेळी टास्कस वेगळे आहेत. स्पर्धक सुद्दा चान्गले आहेत.

काल मोमो आविष्कारला ' दादा' म्हणत होती. आज फक्त आविष्कार!

विशालच मराठी कच्च आहे. ' चउताई दार उघड' म्हणत होता. विकासचा आवाज छान आहे. ह्यापुढे टास्कवाचन ह्यालाच देतील.

मीराला हाकलावं सगळ्यांनी मिळून. फार डोक्यात जाते. पण हे असलेच जातात पुढे.
पहिल्या पर्वात जुई, दुस-यात वीणी आणि आता ही...

अविनाश की आविष्कार? नक्की नाव काय यांचे? काही ठिकाणी (पेपरात पण) ही नावे दिसतात. इथे मा.बो.वर पण एकाच माणसाची ही दोन वेगळी नावे दिसतात.

गायत्री मिनी घालून टांग्यात बसत होती. किती विचित्र वाटत होते.

बापरे.. सायकल रिक्षा टास्क वाल्यांना फार पिदडलं, हॅट्स ऑफ टु विशाल अँड अक्षय !
त्यांच्या रिक्षात मुली उड्या मारून बसत होत्या, सुरेखाताई सुद्धा बसल्या होत्या आणि ते सायकल रिक्षावाले त्यांना घेऊन पळत होते, मला तर ‘दो बिघा जमीन‘ मधला सीन आठवला Uhoh
मीरा आणि मिनल टास्क्स मधे चांगल्या आहेत, सोनाली अनॉयिंग आहे !
ती गायत्री विचित्र कॉन्शस होणारे कपडे घालून सायकल रिक्षात बसली होती !

जय का रडला ते समजलं नाही. Splitsvila मध्ये ज्या आक्रमकतेने दुसऱ्या ग्रुपसोबत भांडायचा तो आक्रमकपणा इथे दिसत नाही. कदाचित मराठी फॅमिली शो आहे म्हणून असावं. हताश होऊन रडला असावा .

मीरा म्हणजे नुसती कटकट कटकट आहे राव....वैताग आला काल पण.... तरी तिला ठेवणार कारण असेच लोक पुढे लागतात टी आर पी द्यायला.
आणि तिला आत घेताना तो अ‍ॅजेंडा देउनच पाठवलं असणार आहे.
गायत्री फुल गेमाड आहे असे दिसते...काल एकदम प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चालु होतं.....दिसते तितकी बावळट नसावी.
स्नेहा नुसतं दिसण्यापुरतीच मेघा आहे....काहीही स्पार्क वाटत नाहिये अजुनतरी.
जय पण काल कुठे दिसला नाही.
उत्कर्ष अचानक सगळ्यां बायकांच्या गुड बुक्स मधे कसा काय आलाय कोण जाणे. त्याचे जास्त फुटेज पण दाखवत नाहित पण छुपा रुस्तम दिसतोय...

ही न्युज कुठे द्यायची कळल नाही म्हणून इथे पोस्ट करत आहे.
तर.आजची ब्रेकिंग न्यूज
झीमराठी आणि सोनी मराठी मर्ज झाल.
कारण ,माहिती निही.
मेन राईट्स कुणाकडे माहिती नाही.
लिंक कुणाला पोस्ट करता आली तर करा.
मला वॉट्स अँप वर मेसेज आला होता ,कन्फर्म माहित नव्हत.पण मग गुगल वर बघितल तर खर आहे ,हे कळल.

Btw, ती मिनल थोडी स्मितासारखी वाटते. स्पोर्टसमनशिप असणारी, इनोसंट. सोनाली ऋतुजासारखी आहे. सुरेखा फारच भारी वावरत आहेत. बाकी, अक्षय बरा वाटतोय. उत्कर्ष, विकास बोअर.

Pages