Submitted by सूलू_८२ on 19 September, 2021 - 05:02
आजपासून बिग बॉस मराठी ३ सुरु होत आहे. खर तर हा धागा काढायला जरा उशीरच झाला मला!
सो, स्वागत आहे तुमचे, या चर्चा करु या!
मराठी बिग बॉस
आज ७.३० वा.
सोमवार ते शनिवार ९.३० वाजता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
गायत्री जयबरोबर कनेक्शन
गायत्री जयबरोबर कनेक्शन जुळवायचा प्रयत्न करतेय.
<<<<
Oh No , hope it doesn't work
अरे.. तुम्ही स्प्लित्सवीला
अरे.. तुम्ही स्प्लित्सवीला बघितलेला दिसत नाहीय... जय दुधाने जबर प्लेयर आहे...
जाईल पुढे तो...
. तुम्ही स्प्लित्सवीला
. तुम्ही स्प्लित्सवीला बघितलेला दिसत नाहीय... जय दुधाने जबर प्लेयर आहे...
जाईल पुढे तो...
<<<
Exactly, he's strong and tough task player !
सगळ्यात वयस्कर दादूस,
सगळ्यात वयस्कर दादूस, दारव्हेकर आणि सुरेखाच आहेत वाटतं
मोमो, जय, सोनाली आणि उत्कर्ष
मोमो, जय, सोनाली आणि उत्कर्ष लंबी रेस के घोडे वाटले सध्या तरी. स्नेहा- आविष्कारने चॅनेलला अपेक्षित कन्टेन्ट दिला तर त्यांनाही पुढे पर्यंत ठेवतील.
तो आविष्कार कसला गोड दिसायचा
तो आविष्कार कसला गोड दिसायचा एके काळी, आता सुजलाय फुल्ल.. नगारा झालाय...
>>गायत्री जयबरोबर कनेक्शन
>>गायत्री जयबरोबर कनेक्शन जुळवायचा प्रयत्न करतेय
हो मलापण जाणवले ते टेबलवरच्या सीनमध्ये..... जय आणि मोमोच्या भांडणानंतर..... but too early to say anything!!
>>स्नेहा- आविष्कारने चॅनेलला अपेक्षित कन्टेन्ट दिला तर
देणार की..... त्याचसाठी आणले असेल ना त्यांना!!
बाय द वे, बिग बॉसवर टिप्पणी
बाय द वे, बिग बॉसवर टिप्पणी करणाऱ्या अनेक youtubers मध्ये आता अनिल थत्तेंची भर!!
अनिल थत्ते भारी बोलतात.
अनिल थत्ते भारी बोलतात.
अविष्कार काल स्नेहाशी बोलायचा प्रयत्न करत होता. ती चांगली वाटली मला. तोच नाटकी वाटतोय जास्त
सोनाली पाटील ला कुठेतरी
सोनाली पाटील ला कुठेतरी पाहिले असे वाटत होते. अचानक आठवले की देवमाणूस मध्ये तिने वकीलाचा रोल केला होता. तिच्या बरोबर इन्स्पेक्टर असलेली नेहा खान येणार होती बिग बॉस मध्ये. तिचा पत्ता हिने कट केला असावा....
बाकी ह्यावेळचे सगळेच स्पर्धक सपक वाटले. मागच्यावेळी फार चांगले होते. (बिचूकले, शिवानी, शिव-विणा, किशोरी, तो शेफ, शिवचे ब्रेन वॉश करणारे टीचर यांच्याशी तुलना केली तर हे सगळे आतातरी थंड वाटतात, पुढे बघू काय होते ते).
स्नेहा सर्वात सुंदर दिसतेय.
स्नेहा सर्वात सुंदर दिसतेय.
कालचे जयचे भांडण उगाच कंटेन्ट देण्यासाठी होते असे वाटले.
अविष्कार बोलत असेल तेव्हा स्नेहावर केमेरा घेतात, हे भारीय.
स्नेहा - अविष्कार ...
स्नेहा - अविष्कार ... अपेक्षित content म्हणजे काय ? आयुष्यात कशी चूक झाली तो सांगणार आणि त्याने कसा त्रास दिला हे सांगून ती रडून sympathy votes मिळवणार ?
किती वाईट आहे, अस भांडवल करणं !!
मीरा इज कन्टेन्ट क्वीन,
मीरा इज कन्टेन्ट क्वीन, हॅन्ड्स डाउन !
पहिला पूर्ण एपिसोड तिच्यामुळेच हॅपनिंग झाला
स्नेहा रडताना खूप फेक वाटली, जय आणि विशाल आयकॅन्डीज आहेत
जयमधे राडा करायचे पोटेन्शिअल सुद्धा आहे ते पाहिलय स्प्लिट्सविला मधे , विशालही गुड व्हाइब्ज देतोय !
लब्बाड चावट बायका जयला शर्ट घालु देत नव्हत्या पुन्हापुन्हा त्याला पुलटास्कमधे बोलावून
मला त्या काकूबाई अतिबावळट्ट गायत्रीला आमच्या जय बरोबर अजिबात बघायच नाहीये
अपेक्षित content म्हणजे काय ?
अपेक्षित content म्हणजे काय ? आयुष्यात कशी चूक झाली तो सांगणार आणि त्याने कसा त्रास दिला हे सांगून ती रडून sympathy votes मिळवणार ?
किती वाईट आहे, अस भांडवल करणं !!
<<
Welcome to बिगबॉस हाउस
Btw Avishkar's conversations with Sneha looks casual!
Sneha makes faces though!
काय ती कविता काल अविश्कारची..
काय ती कविता काल अविष्कारची..... अरारा!
नेहा शितोळेच्या कविता काय सुंदर असायच्या मागच्या सीझनला
यावेळी गायकपण फार खास नाहियेत त्यामुळे वैशाली माडे सारखी मैफिल जमणार नाही!
विनोदवीरही नाही कुणी
पहील्या सीझनमध्ये खुप नावाजलेले लोक होते.... दुसऱ्या सीझनमध्ये ही तुलनेने बरे होते पण या सिरीजमध्ये फार एस्टाब्लिश कुणी दिसत नाहियेत.
म्हणजे डोले शोले वाले टास्क करायला ठीक आहेत पण मराठी बिग बॉस आणि रोडीज, स्प्लिट्सविला वगैरेचा प्रेक्षक वेगळा आहे!!
मला भारी वाटतायत ह्यावेळचे
मला भारी वाटतायत ह्यावेळचे स्पर्धक. आग आणि पेट्रोल एकत्र आणून ठेवलेत जणू
स्नेहा अविष्कार
शिवलीला तृप्ती
जय तर चान्सच बघत असतोय रागवायला
मीरा सतत आग लावणारी आहे
चांगला राडा होईल
दादुस अन् गायत्री फुटतील लवकरच
पहिला दादूस जाईल..
पहिला दादूस जाईल..
या आठवड्यात वोटींग लाईन्स बंद
या आठवड्यात वोटींग लाईन्स बंद आहेत.... म्हणजे इलिमिनेशन नसेल!!
मीरा मुद्दामून सगळ्यांशी
मीरा मुद्दामून सगळ्यांशी वाकड्यात जाते असं वाटत होतं. टिकाऊ टाकाऊ टास्कमध्ये पाण्यात पडली तेव्हा पण मुद्दाम बुडण्याचं नाटक करते असं वाटलं पुन्हा कोणी टाकायला नको म्हणून. शिवलीला सिम्पल साधी वाटते. जय आणि मीनल कॉन्फिडन्ट वाटले. आधी शो केलेत त्यामुळे तसं असेल. तुपारे मधली जयचा हात पकडून पुढे जाईल असा वाटतंय. सोनाली पण भडक डोक्याची वाटते. पाण्यात ढकलायच्या टास्कमध्ये आक्रमक झालेली दिसली थोड्या वेळासाठी. देसाईमध्ये मी पणा आहे. विशाल रोखठोक वाटतो. देसाई सोबत डायरेक्ट भिडला. स्नेहा एव्हड्या मुद्द्यावरून लगेच रडायला लागली. ही तिची स्ट्रॅटेजी होती की खरोखरच वाईट वाटलं काय माहीत? लहानपणी अविनाशला सिरीयलमध्ये पाहिला तेव्हा आवडलेला. त्यावेळचा अंकुश चौधरी होता तो. नन्तर आता अचानक या अवतारात समोर आलेला पाहून खरच कसंतरी झालं. बाकी सगळे असून नसल्यासारखे आहेत. जय आणि विशाल सोडले तर बाकीचे मेल कंटेस्टंट सुट्टी एन्जॉय करायला असल्यासारखे वाटले. शांत होते सगळे. त्या शिंदेला का पाण्यात टाकत होते समजलं नाही. थत्ते सगळ्यांची पोलखोल करणार आहे. बघू आता कुठे पहिला दिवस संपलाय.
स्नेहा विक्टिम कार्ड खेळते
स्नेहा विक्टिम कार्ड खेळते आहे. काम्या पंजाबी ने उघड धमकी दिली आहे तिला ट्विटर वर. म्हणे तुझ्या आधीच्या लग्नात काय झालं माहित नाही पण दुसऱ्या लग्नाच्या नावर विक्टीम कार्ड खेळू नको सगळं बाहेर काढेन मग टाइप.
हो मीरा सगळे मुद्दाम करत होती
हो मीरा सगळे मुद्दाम करत होती ते दिसत होतं. स्नेहा पण ड्रामा करत होती. तिला आयती संधी मिळाली काल मीरामुळे. आणि एरव्ही आविष्कार मुळे तिच्यावर कॅमेरा भरपूर असणार याची निश्चिन्ती! मीनल तेवढी काही दिसलीच नाही. अजून तरी अक्षय, विकास ला पण जास्त फुटेज मिळाले नाही. विशाल चांगला खेळेल असे वाटते. जय ला फुटेज साठी अजिबात प्रयत्न करावे लागत नाहीयेत. ई पण ती गायत्री नको त्याच्याबरोबर.
सकाळी मेकप धुतल्यावर बाकी सगळ्यां यंग मुलींपेक्षा पेक्षा स्नेहा चांगली दिसत होती.
बाकी कालचा पूल टास्क असाच ग्रुप पाडणे, भांडणे होणे यासाठी असणार.
इथे दिसतील फोटो. Sona>>>>
इथे दिसतील फोटो. Sona>>>> धन्यवाद Piku
स्नेहा जर मेघाची कॉपी करत
स्नेहा जर मेघाची कॉपी करत असेल तर तोंडावर आपटेल. एक तर ती काही तेव्हडी हुशार नाही वाटत आणि मेघाच्या नशीबाने इतर लोक कच्चे लिंबु होते इथे तसे नाहीये. मीरा सुध्दा खुप बळेच, ओढुन भांडण करत होती. खुप फेक वाटले. प्रत्येक वेळी शिवानी स्त्रॅटेजी वर्क होइल असे नाही वाटत.
मीरा चा गुलाबी ड्रेस्स मस्त होता ,साधा तरीही स्ट्यालिश. मला मीनलचा खेळ बघायला आवडेल.
दादुस्,देसाइ,शीवलीला जातील आधी.
हा सीज़न इंटरेस्टिंग होइल असे
हा सीज़न इंटरेस्टिंग होइल असे वाटते. यावेळी अन्जु बघत नाहीये का bb?
हो ना! अंजू दिसल्या नाहीत
हो ना! अंजू दिसल्या नाहीत अजुन!
वर्षभराने नेहमीच्या बीबॉ फॅन्सना इथे बघून बरे वाटले
मला आवडले सगळे स्पर्धक....
मला आवडले सगळे स्पर्धक....
स्नेहा चा वावर प्रसन्न वाटला... पण मेघा इतका स्पार्क अजुनतरी नाही वाटला.
मीरा ला कुठे किती कसं फुटेज खायचं माहिती आहे...पण बाकी चे पण कच्चे लिंबु नाहियेत.
जय , विकास, अक्षय सगळेच भारी वाटले मला....
दादुस आणि अविष्कार त्यांच्यापुढे एकदम फुस्स वाटतात..
सुरेखा, देसाई, शिवलिला जातील लवकरच....
तृप्ती आणि शिवलीला यांनी
तृप्ती आणि शिवलीला यांनी पूलटास्कच्यावेळी अंगभरून कपडे घालण्याचे कारण समाजप्रतिमा जपणे असेल का. तृप्ती यांचे बोलणे पहिल्याच दिवशी खटकले की मी आहे म्हणून लेडीस स्पेशल थीम आहे. पण विशाल म्हणाला हे तीन वेळा झालंय, मी तरी एकदाच ऐकलं पहिल्या दिवशी. स्नेहा खूप गोड दिसते आणि तिची स्किन खूप छान आहे. मीरा सायको वाटते. सुरेखा यांची मुलगी काचेच्या पलीकडे का, मागे वैशालीची मुलगी तर भेटायची तिला प्रत्यक्ष. मीराने असंच ताबडवून घेतलं तर आविष्कार थोडा बारीक होईल.
तुपारेला पूलमध्ये ढकलले
तुपारेला पूलमध्ये ढकलले तेव्हा तिने डायरेक्ट विशालवर उडी मारली. उगीच सुभाने पाहताक्षणी चांगल्या पगाराची नोकरी नव्हती दिली.
तिने डायरेक्ट विशालवर उडी
तिने डायरेक्ट विशालवर उडी मारली >>
नाटकं नुस्ती. जेमतेम ४ फूट पाणी असेल. सो सो सॉरी वगैरे काय उगीच.
सुरेखा यांची मुलगी काचेच्या पलीकडे का >>>. कोविड प्रोटोकॉल असणार. बहुधा कन्टेस्टन्ट्स आणि शो मधल्या इतर लोकांना आधीच क्वारन्टाइन केले असेल,त्यामुळे कुणीही नॉन क्वारन्टीन लोक असतील तर डायरेक्ट भेटू देत नसतील.
तो बिचारा पोरींना पोहता येत
तो बिचारा पोरींना पोहता येत नसलं तर पाण्यात त्यांचा तोल वैगरे जाऊ नये म्हणून त्यांना आधार द्यायला उभा होता आणि हिने डायरेक्ट त्याच्यावरच.
Pages