गेल्या काही गणेशोत्सवांमधे लोकप्रिय झालेला : खेळ शब्दांचा !
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या वर्षीही आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
आजचा विषय : व्यक्ती विशेषण ( व्यक्ती/पाळीव प्राणी/ नाते संबंधी) यांना वापरायचे विशेषण
उदा. सासू म्हटली की हेच आठवणार
?ष्ट (उत्तर खाष्ट)
हा भामटा अंगात काय घालून येईल आणि कसा फसवेल सांगता येत नाही.
?फं?
कळलाव्या
कळलाव्या
येस्स्स्स
येस्स्स्स
एखादं मस्त गुटगुटीत मूल
एखादं मस्त गुटगुटीत मूल
@@ल
या शब्दाशी यमक साधणारे एक मुलाचे नाव असते. विशेषतः मुस्लिम समाजात ते नाव असते.
त्या नावावरुन २ हिंदी गाणीही आहेत.
मधला शब्द जोडाक्षर.
बिस्मिल
बिस्मिल /अब्दुल
गब्दुल
गब्दुल
तुंदिल
तुंदिल
येस गब्दुल
येस गब्दुल
मेरा नाम अब्दुल रेहेमान नावाचे एक गाणे आहे.
बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना ... हे दुसरे गाणे.
काळजी करणारा
काळजी करणारा
??ग्र?
शेवटचे अक्षर जोडाक्षर आहे
चिंताग्रस्त
चिंताग्रस्त
बरोबर!
बरोबर!
कोणीही द्या.
कोणीही द्या.
एकाच वेळी अनेक गोष्टी लीलया
एकाच वेळी अनेक गोष्टी लीलया सांभाळणारे
@@व@@
हे आडनावही असते.
अष्टावधानी
अष्टावधानी
होय बरोबर
होय बरोबर
निरुद्योगी, भटक्या, उद्धट
निरुद्योगी, भटक्या, उद्धट मुलगा
? ड ?
कोडगा?
कोडगा?
कोडगा म्हणजे निगरगट्ट. ज्याला
कोडगा म्हणजे निगरगट्ट. ज्याला बोलून फरक पडत नाही असा. नुआन्स मध्ये फरक आहे.
कोडगा नाही
कोडगा नाही
कोडगा म्हणजे निगरगट्ट. >>
कोडगा म्हणजे निगरगट्ट. >>
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते पण काय आहे आपल्या इथे प्रांत परत्वे अर्थ बदलतात!
इकडे दक्षिण भारतात पाल म्हणजे दूध! आणि असे किती तरी शब्द...
महाराष्ट्रातच अर्थ बदलतात विदर्भात वेगळा, खांदेशात वेगला, प महाराष्ट्रात वेगळा, कोकणात वेगळा तर मराठवाड्यात वेगळा!
उंडगा
उंडगा
(उंडारणारा)
आय सी!!! कोडगा या शब्दाचा
आय सी!!! कोडगा या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्ञा प्रांतात वेगवेगळा ह्म्म!!
उंडगा बरोबर वाटतय.
उंडगा बरोबर वाटतय.
उंडगा... बरोबर!
उंडगा... बरोबर!
कोडगा या शब्दाचा अर्थ
कोडगा या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्ञा प्रांतात वेगवेगळा ह्म्म!!>>
असेच काही नाही पण होऊ शकतो असे मला वाटलेले!
कॄष्णा असेल हो. मी
कॄष्णा असेल हो. मी अडेलतट्टूपणा केला. आपले आभार. असू शकते की.
घ्या नविन शब्द!
घ्या नविन शब्द!
आपल्या म्हणण्याला चिटकून राहणारा/री![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एका प्राण्याच्या पिल्लावरून हा शब्द !
- - - - -
हाहाहा आठवते
हाहाहा आठवते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अडेलतट्टू
अडेलतट्टू
मी देते.
मी देते.
सा@@
बाळाचे विशेषण, लहान, गोड, नाजूक.
सानुला
सानुला/ले/ली
Pages